Sunday, 1 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 March 2026

Time 17.00 to 17.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ मार्च २०२६ सायंकाळी ५.००

****

·      नागपूरनजिक स्फोटकांच्या कारखान्यातल्या भीषण स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू, १८ जखमी

·      कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन वचनबद्ध – महसूलमंत्री बावनकुळे यांची ग्वाही

आणि

·      टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत – वेस्ट इंडिज लढतीचा रोमांच थोड्याच वेळात

****

नागपूर जिल्ह्यात काटोलजवळ राऊळगाव इथं आज सकाळी एका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या एस बी एल एनर्जी लिमिटेडच्या कारखान्यात हा स्फोट झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या वारसाला राज्यशासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची डीएनए टेस्ट केली जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल असं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथक मदतकार्य करत असल्याचं जिल्हाधिकारी बिपिन इटनकर यांनी सांगितलं.

****

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी असून कॅनडातल्या शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी राज्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट आणि शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू असून मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसंच नवी मुंबई इथं आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत. कॅनडा इथं राज्यातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडातल्या विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ मध्ये आपली शैक्षणिक दालनं उघडावी असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची खरी सुरुवात असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. भविष्यातही कॅनडानं अशाच प्रकारे भारत आणि महाराष्ट्राला भेट देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं.

****

राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात शीख गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानावर आधारित धडा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नवी मुंबईत खारघर इथं शीख गुरू गुरू तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद दिनानिमित्त आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमात ते बोलत होते. नवी मुंबईत गुरू तेग बहादुर यांच्या नावानं नवीन रुग्णालय सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात शीख यांच्यासह बंजारा, शिकलगार, उदासीन, वाल्मिकी यासारखे आठ मोठे समाज एकत्र आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पंजाब मधील घुमानला देशाच्या पर्यटन नकाशावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न राज्य सरकार करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. कोणत्याही धर्मावर, पंथावर अतिक्रमण सहन करणार नाही असं वचन देण्याचं आवाहन शिंदे यांनी उपस्थितांना केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरू तेग बहादुर यांच्या बलिदानाची आठवण काढली. हे बलिदान धर्मासाठी नव्हे तर मानवी संस्कृतीच्या मूल्य रक्षणासाठी होतं, असं त्या म्हणाल्या.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील मदुराई इथं विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मदुराईमध्ये चार हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. पुदुचेरी इथं आज दोन हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभागी झाले.

****

राज्यातल्या भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन वचनबद्ध असून देशातली सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचं जलद आणि प्रभावी निराकरण व्हावं, यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर अधिक परिणामकारकपणे शिबिरांचं आयोजन करावं, असे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले.

****

पश्चिम आशियात संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय दूतावास रात्रंदिवस मदतीसाठी उपलब्ध असतील असं त्यात म्हटलं आहे. तसंच भारतात तात्पुरत्या वास्तव्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांसाठीही परराष्ट्र मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या नागरिकांना व्हिसाची मुदत वाढवून हवी आहे, अथवा आपलं वास्तव्य नियमित करून हवं आहे, त्यांनी आपल्या जवळच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं यात म्हटलं आहे. आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तिथं अडकलेल्या नागरिकांची माहिती कळवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात सर्व शासकीय, खाजगी कार्यालयातील अंतर्गत तक्रार समितीचं परीक्षण एका महिन्यात करण्यात यावं, असे निर्देश जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्तांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. अनेक कार्यालयांमध्ये अंतर्गत समितीची स्थापना नाही, जाणीव जागृती नसणं, समितीला कामकाजाचं प्रशिक्षण नसणं, वार्षिक अहवाल सादर न होणं, दर्शनी भागात फलक नाही असं निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर एट गटातून उपांत्य फेरीसाठी भारत-वेस्ट इंडीज यांच्यातला निर्णायक सामना आज संध्याकाळी सात वाजता कोलकाता इथं होत आहे. नवी दिल्लीत सुरू सामन्यात झिम्बाब्वेनं ठेवलेल्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिका संघानं १३ षटकांत पाच बाद १२० धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रजानं ७३ धावा केल्यामुळे संघाला २० षटकांत सात बाद १५३ धावा करता आल्या.

****

तारुण्यात असलेल्यांची भाषा आणि जेन झीची भाषा यात कमालीचं अंतर पडलं आहे. जेन झी वापरत असलेली भाषा आता स्वीकारावी लागेल. त्यात संस्कृतीचा अंतर्भाव असावा; मात्र शुद्धतेचा आग्रह धरू नये, त्याचे अवडंबर करू नये, असा सूर नाशिकमधील विश्व मराठी संमेलनानिमित्त भाषेतील युवावर्गाचा सहभाग या विषयावरच्या आजच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील हे चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक होते.

****

राज्यात लागू झालेले नवीन शैक्षणिक धोरण मराठी मातृभाषेवर आधारित असून शासन मराठीच्या समृद्धीसाठी पावले उचलत आहे. उच्च शिक्षणावरील आधारित असलेले काही अभ्यासक्रम मराठीत सुरू केले असून बीएससी आणि बी.कॉमचे सर्व अभ्यासक्रमही लवकरच मराठी भाषेत लागू केले जातील, अशी माहिती उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली. नाशिक इथं आज झालेल्या विश्व मराठी संमेलनातील परिसंवादात ‘अभ्यासक्रमातील मराठी भाषा’ या विषयावर ते बोलत होते.

****

मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषद उदगीरतर्फे भाषायण ही भाषिक उपक्रमासाठीची कार्यशाळा लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात झाली. बोली भाषेचे अभ्यासक डॉ. बालाजी मदन इंगळे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

****

छत्रपती संभाजीनगर परिमंडळातल्या चार लाखांहून अधिक ग्राहकांकडं असलेल्या थकीत अडीचशे कोटी रुपयांच्या वीज बिल वसुलीसाठी महावितरणनं धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ फेब्रुवारी महिन्यातच २२ हजार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं हातगाड्यावर व्यवसाय करताना शिस्तीचं पालन करा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनानं हातगाडीचालकांना दिला आहे.

****

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंदाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान अंतर्गत, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय मानांकनात नांदेड जिल्ह्यानं राज्यात पाचवा क्रमांक, तर लातूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून हे यश प्राप्त झालं असल्याची माहिती नांदेड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी दिली.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.

****

नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातल्या येनविहिरा इथं स्फोटकं बनवणाऱ्या एका कंपनीत आज पहाटे झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक संपर्क माध्यमातल्या एका संदेशाद्वारे या संदर्भातली माहिती दिली आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतानाच, मोदींनी जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून प्रत्येक मृताच्या वारसाला दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना ५० हजार रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. एस बी एल एनर्जी लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून स्फोटातल्या जखमींना उपचारासाठी नागपूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नागपूरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या येनविहिरा येथे स्थित या कंपनीमध्ये सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी हा स्फोट झाला. याची तीव्रता येवढी अधिक होती की आवाज दूरवर ऐकू आल्याचं स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं. संबंधित कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटकं, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादनं तयार करते. मुख्यमंत्र्यांनी या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचं सांगून, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आपण याबाबत स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्फोट झालेल्या ठिकाणी मदत कार्य सुरू असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयानं दिली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या दौऱ्यावर आहेत.पुदुचेरी इथं थोड्या वेळापूर्वीच दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमात सहभागी झाले. या प्रसंगी आयोजित जाहीर सभेला पंतप्रधानांनी संबोधीत केलं. आपण यापूर्वी दिलेल्या “बेस्ट पुदुच्चेरी” या मंत्रानुसार अर्थातच बिजनेस: उद्योग, एज्यूकेशन: शिक्षण, स्पीरीट्युॲलिटी: आध्यात्म आणि टुरीजम: पर्यटन याबाबतचा दृष्टिकोन या साडेचार वर्षात फलद्रुप होत असल्याचं प्तप्रधान म्हणाले. जेव्हा केंद्रासह हा केंद्रशासित प्रदेश एकाच दृष्टिकोन आणि समर्पणाने काम करतात, तेव्हा निकाल जलद आणि उत्कृष्ट मिळतात असही ते म्हणाले. नुकत्याच जाहीर केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुधारणांना प्राधान्य देण्यात आलं असून यात ग्रामीण-शहरी अशा दोन्ही भगांवर लक्ष केंद्रीत असून नागरिकांच्या जीवनाला यातील योजना अधिक सुकर करतील असं मोदी म्हणाले.

****

पश्चिम आशियातील भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांना तणावाची प्रादेशिक परिस्थिती लक्षात घेता जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायलमधल्या भारतीय दूतावासानं देशात तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्यांच्या आधीच्या सूचनांचं पालन करण्याची आणि वेळेवर मदत आणि संवाद सुलभ करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याची विनंती केली आहे. सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या एका संदेशामध्ये दूतावासानं म्हटलं आहे की, ते परिस्थितीमुळं बाधित झालेल्या भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात आहेत, ज्यामध्ये पर्यटक, अल्पकालीन व्यावसायिक अभ्यागत आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा समावेश आहे. दरम्यान, या एकंदर परिस्थितीमुळे या भागातील विमानसेवा विस्कळीत झाल्याच्या परिणामस्वरुप मुंबईच्या शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक प्रवाश्यांचा खोळंबा झाल्याचं चित्र आहे.

****

राज्य सरकारनं नेहमीच कोकणातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलं असल्याचं राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग नौकासेवेचं लोकार्पण आज होत आहे, त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या आपल्या एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर एट गटातून उपांत्य फेरीसाठी भारत-वेस्ट इंडीज यांच्यातल्या निर्णायक सामन्यासह दक्षिण अफ्रिका-झिम्बाब्वे औपचारीक सामना, अशा दोन लढती आज खेळल्या जात आहेत. थोड्याच वेळेनंतर दुपारी तीन वाजता दिल्ली इथं दक्षिण अफ्रिका-झिम्बाब्वे सामना होत आहे. झिम्बाब्वे गुणतालिकेनुसार स्पर्धेबाहेर झालेला आहे. तर, दक्षिण अफ्रिका याआधीच उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्युझीलंडशी येत्या चार मार्चला कोलकाता इथं खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील सायंकाळी सात वाजता कोलकाता होणाऱ्या लढतीतील विजेता संघच, येत्या पाच मार्च रोजी मुंबईत इग्लंड विरुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. येत्या आठ मार्चला अहमदाबाद इथं टी-ट्वेंटी विश्वविजेतेपदासाठीची लढत होणार आहे.

****

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातील हरभरा खरेदी, पाच हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल हमीभावानं आजपासून सुरू होत असल्याचं राज्य शासनातर्फे जाहिर झालेलं आहे. तर, महामार्गावरील वाहतूकीच्या वाढीव सुरक्षिततेसाठी ज्वलनशील आणि तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या तीन फेब्रुवारी रोजी प्रोपिलिन नामक ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्यानं झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. तसंच भटक्या कुत्र्यांचं नियमन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्याचे कोणतेही आदेश महापालिकेनं दिलेले नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती अधिकाऱ्याची नेमणूकही केलेली नाही, असं स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि पुदुचेरीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते पुदुचेरी इथं दोन हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं  उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.

****

पश्चिम आशियातील भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांना तणावाची प्रादेशिक परिस्थिती लक्षात घेता जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायलमधल्या भारतीय दूतावासानं देशात तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्यांच्या आधीच्या सूचनांचं पालन करण्याची आणि वेळेवर मदत आणि संवाद सुलभ करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याची विनंती केली आहे. सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या एका संदेशामध्ये दूतावासानं म्हटलं आहे की, ते परिस्थितीमुळं बाधित झालेल्या भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात आहेत, ज्यामध्ये पर्यटक, अल्पकालीन व्यावसायिक अभ्यागत आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा समावेश आहे. दरम्यान, या एकंदर परिस्थितीमुळे या भागातील विमानसेवा विस्कळीत झाल्याच्या परिणामस्वरुप मुंबईच्या शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक प्रवाश्यांचा खोळंबा झाल्याचं चित्र आहे. काल रात्री अनेक प्रवासी विमानतळाबाहेर ताटकळत बसले होते.

****

शिख पंथाचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या साडेतीनशेच्या शहिदी दिनानिमित्त मुंबईत खारघर इथं दोन दिवसीय भव्य ‘हिंद-दी-चादर’ धार्मिक कार्यक्रमाचा आज समारोप होत आहे. काल यात जनकल्याण चिकित्सा शिबिर झालं. या कार्यक्रमास देशभरातून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळातो आहे. शीख समाजाच्या इतिहासाचं दर्शन घडविणारं 'विरासत-ए-सीख' हे प्रदर्शन उभारण्यात आलं असून प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे. 

****

शासनाची पूर्वपरवानगी न घेता सोडत कार्यक्रमात सहभागी होत चार चाकी वाहन जिंकण्याच्या मुद्द्यावरून गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिशा पजई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिव आणि विधि परामर्शी दिलीप घुमरे यांनी ही कारवाई केली आहे.

****

वीस षटकांच्या विश्वचषकाच्या सुपर एट सामन्यात भारताचा सामना आज वेस्टइंडिज संघाविरुद्ध कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथं होणार आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. सायंकाळी सात वाजता सामना सुरु होईल. वेस्टइंडिज सध्या गुणतालिकेत सरस धावगतीच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानं वेस्ट इंडिजला हरवलं तर भारताचे चार गुण होतील आणि ते दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश करतील. आजचा विजेता संघ येत्या पाच मार्च रोजी मुंबईत सायंकाळी सात वाजता इग्लंड विरुद्ध स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना खेळणार आहे. त्याआधी या फेरीचा पहिला सामना दक्षिण अफ्रिका – न्युझीलंड यांच्यात चार मार्चला कोलकाता इथं होईल. उपांत्य लढती जिंकणाऱ्या संघांतील विश्वचषक विजेतेपदाची लढत येत्या आठ मार्चला रविवारी अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडासंकुलामध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेदरम्यानचा सामनाही आज दुपारी तीन वाजेपासून नवी दिल्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

****

राज्यात आज सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

यंदाचा रणजी करंडक प्रथमच जम्मू काश्मीर संघानं पटकावला आहे. पहिल्या डावातल्या आघाडीमुळे जम्मू काश्मीर संघाला विजेता घोषीत करण्यात आलं.

****

 

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: یکم‘مارچ 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 01 March-2026
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: یکم‘مارچ ۶۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہیں خاص خبروں کی سرخیاں:
٭ سروائیکل کینسر سے بچاؤ کیلئے ملک گیر HPV ویکسینیشن مہم کا آغاز۔
٭ ریاست میں کپاس کی مربوط خریداری میں 15 مارچ تک توسیع۔
٭ اجیت پوار کا طیارہ رن وے پر درختوں سے ٹکرانے کے بعد گر کر تباہ: ابتدائی رپورٹ میں دعویٰ۔
٭ ہولی اور دھلنڈی کو ماحول دوست طریقے سے منانے کی پنکجا منڈے کی اپیل۔
٭ جموں و کشمیر کی ٹیم نے پہلی بار جیتا اس سال کی رنجی ٹرافی کا خطاب۔
اور۔۔۔٭ ٹی ٹوئنٹی کرکٹ عالمی کپ میں آج بھارت کا مقابلہ ویسٹ انڈیز سے۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
ملک گیر HPV ویکسینیشن مہم کل راجستھان کے اجمیر سے شروع کی گئی۔ وزیرِ اعظم نریندر موی کی موجودگی میں کل پانچ لڑکیوں کو ٹیکہ لگایا گیا۔ یہ ویکسین کے خواتین کو بااختیار بنانے میں اہم کردار ہونے کا دعویٰ وزیرِ اعظم نے کیا۔ انھوں نے کہا:
Byte: Prime Minister Narendra Modi
سروائیکل کینسر سے بچاؤ کیلئے یہ ویکسین 14 سال یا اُس سے زیادہ عمر کی لڑکیوں کو دی جائیگی۔ ہر سال ایک کروڑ پندرہ لاکھ لڑکیوں کو ٹیکہ لگانے کا ہدف ہے۔ یہ ویکسینیشن رضاکارانہ ہے اور تمام سرکاری مراکزِ صحت پر مفت دستیاب ہے۔
دریں اثناء‘ وزیرِاعظم نریندر مودی نے کل گجرات کے سانند میں مائیکرون ٹکنالوجی کے جدید ترین سیمی کنڈکٹر پروجیکٹ کا افتتاح کیا۔ بھارت کی تکنیکی مہارت کے بارے میں وزیرِ اعظم نے کہا:
Byte: Prime Minister Narendra Modi
یہ انڈیا سیمی کنڈکٹر مشن کے تحت میڈ ان انڈیا سیمی کنڈکٹر میموری ماڈیولز کا پہلا تجارتی پروڈکشن پروجیکٹ ہے جو ساڑھے 22 ہزار کروڑ سے زیادہ سرمایہ کا ہے۔ یہاں سے برآمدات بھی شروع ہوگی۔ سیمی کنڈکٹر کے میدان میں بھارت کی خود مختاری کی سمت میں یہ ایک بہت اہم قدم ہے۔
***** ***** *****
وزیرِ اعلیٰ دیویندر پھرنویس نے احکامات دئیے ہیں کہ ریاست کے مختلف ہوائی اڈوں کے ترقیاتی کاموں کو مقررہ رفتار دی جائے۔ وزیرِ اعلیٰ قانون ساز اسمبلی میں ایئرپورٹ ڈیولپمنٹ اتھاریٹی کے بورڈ آف ڈائریکٹرز کے اجلاس سے خطاب کررہے تھے۔ اس میٹنگ میں ناندیڑ‘ سندھو دُرگ اور ناگپور میں آپریٹنگ ہوائی اڈوں کی سہولت کی توسیع اور جدید کاری کا جائزہ بھی لیا گیا۔
***** ***** *****
مرکزی حکومت نے گگ ورکرز اور پلیٹ فارم ورکرز کیلئے سوشل سیکوریٹی کوڈ 2020 نافذ کیا ہے جس کی وجہ سے ریاستی حکومت ان کارکنوں کیلئے الگ کارپوریشن قائم نہیں کرسکے گی‘ وزیرِ محنت آکاش پھنڈکر نے یہ اطلاع دی۔ وہ کل قانون ساز اسمبلی میں مخاطب تھے۔
***** ***** *****
ریاستی حکومت نے کل ایک بیان کے ذریعے اسمبلی کو مطلع کیا ہے کہ ریاست میں کپاس کی مربوط خریداری کی آخری تاریخ 15 مارچ تک بڑھا دی گئی ہے۔ خریداری کی حد کا فیصلہ فی ایکڑ پیداوار کی بنیاد پر کیاجائے گا۔
دریں اثناء‘ حکومت نے یہ بھی اعلان کیا ہے کہ چنے کی خریداری ایک مارچ سے پانچ ہزار 885 روپئے فی کوئنٹل کی ضمانت شدہ قیمت پر شروع ہوگی۔
***** ***** *****
ریاست میں چھترپتی شیواجی مہا راجسو مہم شروع ہونے جارہی ہے۔ اس کی اطلاع وزیرِ محصول چندر شیکھر باونکولے نے دی۔
***** ***** *****
ریاستی وزیر میگھنا ساکورے بورڈیکر نے کہا ہے کہ ہندو ہردئے سمراٹ بالا صاحب ٹھاکرے سمردّھی ہائی وے پر ملک کے پہلے اے آئی پر مبنی انٹلیجنس ٹرانسپورٹیشن سسٹم کو نصب کرنے کا کام جاری ہے۔ وہ کل قانون ساز کونسل میں مخاطب تھیں۔ انھوں نے بتایا کہ یہ نظام‘ ٹریفک مینجمنٹ کو مزید مؤثر بنائے گا اور مستقبل میں حادثات کی تعداد کو کم کرنے میں مدد کرے گا۔
دریں اثناء‘ بورڈیکر نے بتایا کہ حکومت آیوشمان بھارت وزیرِ اعظم جن آروگیہ اسکیم اور مہاتما پھلے جن آروگیہ اسکیم کو ممبئی کے میٹرو پولیٹن علاقے کے بڑے اسپتالوں میں نافذ کرنے کی کوشش کررہی ہے۔ یہ اسکیمیں ریاست کے چار ہزار سے زیادہ اسپتالوں میں نافذ ہیں۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
شری گرو تیغ بہادر کے ساڑھے تین سو ویں یومِ شہادت کے موقع پر نوی ممبئی کے کھار گھر میں منعقدہ ہند دی چادر میں عقیدت‘ خدمت اور سماجی یکجہتی کے ایک منفرد ماحول کا مشاہدہ کیا جارہا ہے۔ ملک بھر سے عقیدت مندوں کی موجودگی کی وجہ سے یہ علاقہ مکمل طور پر روحانی رنگ میں رنگ گیا ہے۔
***** ***** *****
ایئرایکسیڈنٹ انویسٹی گیشن برانچ کی رپورٹ میں کہا گیا ہے کہ سابق نائب وزیرِ اعلیٰ اجیت پوار کا طیارہ بارامتی کے رن وے پر درختوں سے ٹکرانے کے بعد گرکر تباہ ہوگیا۔ یہ رپورٹ کل جاری کی گئی۔ حادثے کے بعد طیارے میں آگ لگ گئی اور پورا کاک پٹ اور کیبن جل کر راکھ ہوگیا۔ رپورٹ میں یہ بھی کہا گیا ہے کہ طیارے کے دونوں ریکارڈرز بھی آگ کی لپیٹ میں آگئے تھے اس لیے ڈیٹا حاصل کرنے کیلئے خصوصی تکنیک کا استعمال کرنا پڑا۔ رپورٹ میں کہا گیا ہے کہ SSFDR ریکارڈر سے خام ڈیٹا کامیابی سے ڈاؤن لوڈ کرلیا گیا۔
***** ***** *****
ایس ٹی کارپوریشن نے وضاحت کی ہے کہ NCMC اسمارٹ کارڈ کو ایس ٹی سفری کرایے میں رعایت کیلئے لازمی نہیں بنایا گیاہے۔ سوشل میڈیا پر یہ افواہ پھیلی ہوئی ہے کہ یہ کارڈ رعایتی مسافروں کیلئے لازمی ہے تاہم ایس ٹی کارپوریشن نے واضح کیا ہے کہ اس اسمارٹ کارڈ کو مسافروں کیلئے رعایت سفری کرایہ حاصل کرنے کیلئے اُس وقت تک لازمی نہیں بنایا جائے گا جب تک کہ یہ اسمارٹ کارڈ کے ساتھ 80 فیصد رعایتی مسافروں کا اندراج مکمل نہیں ہوجاتا۔
دریں اثناء‘ اس اسمارٹ کارڈ اقدام کو ریاست بھر میں زبردست ردّ عمل مل رہا ہے اور وزیرِ ٹرانسپورٹ نے کہا ہے کہ اس کارڈ کیلئے رجسٹریشن کی تعداد اب ایک لاکھ تک پہنچ گئی ہے۔
***** ***** *****
ہولیکا دہن تہوار کل 2تاریخ کو منایا جائے گا اور اس کے اگلے دن 3 مارچ کو دھلنڈی تہوار منایا جائے گا۔ ریاستی وزیرِ ماحولیات پنکجا منڈے نے شہریوں سے ہولی کے تہوار کے موقعے پر ماحول دوست رنگوں کا استعمال کرنے کی اپیل کی ہے۔
***** ***** *****
اس سال رنجی ٹرافی جموں و کشمیر کی ٹیم نے پہلی مرتبہ جیتی ہے۔ کرناٹک کے خلاف فائنل مقابلے میں دوسری اننگز ڈراء رہی۔ تاہم‘ جموں و کشمیر کی ٹیم پہلی اننگز کی برتری کے باعث فاتح قرار پائی۔ وزیراعظم مودی جموں و کشمیر کے وزیرِ اعلیٰ عمر عبداللہ اور سابق کرکٹر بھارت رَتن سچن ٹینڈولکر نے جموں و کشمیر کی ٹیم کو اس جیت کی مبارکباد دی ہے۔
***** ***** *****
کولکاتہ میں ٹی ٹوئنٹی ورلڈ کپ کے سپر ایٹ میں آج بھارت کا مقابلہ ویسٹ انڈیز سے ہوگا۔ میچ شام سات بجے شروع ہوگا۔ اُدھر پاکستان نے کل اس ٹورنامنٹ میں سری لنکا کو پانچ وکٹوں سے شکست دی۔ اس فتح کے باوجود پاکستان ٹورنامنٹ سے باہر ہوگیا ہے۔ سپرایٹ گروپ بی میں نیوزی لینڈ اور انگلینڈ جبکہ گروپ اے میں جنوبی افریقہ نے سیمی فائنل میں داخل حاصل کرلیا ہے۔ بھارت کیلئے آج کا مقابلہ سیمی فائنل میں داخلے کیلئے فیصلہ کُن ہوگا۔
***** ***** *****
ناسک میں جاری چوتھے عالمی مراٹھی سمّیلن میں کل مختلف موضوعات پر مذاکرے ہوئے۔ مختلف مباحثوں میں یہ رائے ظاہر کی گئی کہ اے آئی یعنی مصنوعی ذہانت سے مراٹھی زبان کو مضبوطی مل رہی ہے اور میڈیا بھی مراٹھی زبان کے استحکام میں معاون ثابت ہو رہا ہے۔ مباحثوں میں اس بات پر روشنی ڈالی گئی کہ میڈیا میں مراٹھی زبان کا استعمال خالص، واضح، بھرپور اور موثر انداز میں کرنے کیلئے میڈیا ہمیشہ پہل کرتا ہے۔
***** ***** *****
ممبئی عدالت ِ عالیہ کی اورنگ آباد بنچ کے جسٹس اور لاتور ضلع کے سرپرست جسٹس ایس جی چپلگاؤنکر نے کہا ہے کہ قانونی خدمات کیمپوں اور سرکاری اسکیموں کے مہا میلے کا بنیادی مقصد سماجی انصاف کے تصور کو عملی طور پر نافذ کرنا ہے۔ وہ کل لاتور میں مہا میلے سے خطاب کررہے تھے۔ انہوں نے اس کیمپ اور میلے کے انعقاد کیلئے ضلع انتظامیہ،چیف ضلع اینڈ سیشن جج ایس جے بھاروکا اور ضلع کلکٹر ورشا ٹھاکرگھوگے کی ستائش بھی کی۔
***** ***** *****
ناندیڑ ضلع کے بھوکر میں بھی کل ایک قانونی خدمات کیمپ اور سرکاری خدمات میلہ منعقد ہوا۔ ممبئی عدالت ِ عالیہ کی ناگپور بنچ کے جسٹس نیرج دھوٹے نے اس دوران حاضرین کی رہنمائی کی۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
اور آخر میں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر...
٭ سروائیکل کینسر سے بچاؤ کیلئے ملک گیر HPV ویکسینیشن مہم کا آغاز۔
٭ ریاست میں کپاس کی مربوط خریداری میں 15 مارچ تک توسیع۔
٭ اجیت پوار کا طیارہ رن وے پر درختوں سے ٹکرانے کے بعد گر کر تباہ: ابتدائی رپورٹ میں دعویٰ۔
٭ ہولی و دھلنڈی کو ماحول دوست طریقے سے منانے کی پنکجا منڈے کی اپیل۔
٭ جموں و کشمیر کی ٹیم نے پہلی بار جیتا اس سال کی رنجی ٹرافی کا خطاب۔
اور۔۔۔٭ ٹی ٹوئنٹی کرکٹ عالمی کپ میں آج بھارت کا مقابلہ ویسٹ انڈیز سے۔
***** ***** *****

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यासाठीच्या एचपीव्ही देशव्यापी लसीकरण मोहिमेला प्रारंभ

·      राज्यात एकात्मिक कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

·      अजित पवार यांचं विमान झाडांना आदळल्यानंतर बारामतीच्या धावपट्टीवर कोसळल्याचा प्राथमिक अहवाल

·      होळी आणि धुळवडीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचं पंकजा मुंडे यांचं आवाहन

आणि

·      टी –ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत – वेस्ट इंडिज लढत

****

एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला काल राजस्थानात अजमेर इथून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल पाच मुलींना ही लस देण्यात आली, हे लसीकरण महिला सक्षमीकरणातलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं, याकरता १४ वर्ष वयाच्या मुलींना ही लस देण्यात येणार आहे. दरवर्षी एक कोटी १५ लाख मुलींना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून, सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये साणंद इथं मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्रकल्पाचं काल उद्घाटन करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या सुसज्जतेबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले,

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत साडेबावीस हजार कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला हा पहिला मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचा व्यावसायिक उत्पादन प्रकल्प आहे. इथून अधिकृत निर्यातदेखील सुरू होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

****

राज्यातल्या विविध विमानतळांच्या विकासकामांना कालबद्ध गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधिमंडळात विमानतळ विकास प्राधिकरणच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीत नांदेड, सिंधुदुर्ग आणि नागपूर इथल्या कार्यरत विमानतळांच्या सुविधा विस्तार आणि आधुनिकीकरणाचा आढावा घेण्यात आला.

****

गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा संहिता २०२० लागू केली आहे, यामुळे या कामगारांसाठी राज्य सरकारला स्वतंत्र महामंडळ स्थापन करता येणार नाही, असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केलं. ते काल विधानसभेत बोलत होते.

**

राज्यात एकात्मिक कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती, राज्य सरकारने काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. यात प्रतिएकर उत्पादकतेच्या आधारे खरेदीची मर्यादा ठरवली जाणार आहे.

दरम्यान, आज एक मार्च पासून हरभरा खरेदी पाच हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल हमीभावानं सुरू करण्यात येणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

**

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला प्रारंभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानाबाबत माहिती दिली, ते म्हणाले,

बाईट - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

**

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर देशातली पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या काल विधान परिषदेत बोलत होत्या. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचं प्रमाण घटण्यास मदत होणार असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली.

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातल्या मोठ्या रुग्णालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं, बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातल्या चार हजारांहून जास्त रूग्णालयात ही योजना लागू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

नवी मुंबईत खारघर इथं श्री गुरु तेग बहादुर यांच्या साडे तिनशेव्या हौतात्म्य वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचं अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.

****

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान झाडांना आदळून त्यानंतर बारामतीच्या धावपट्टीवर अपघातग्रस्त झाल्याचं हवाई अपघात तपास संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल काल प्रसिद्ध झालं. अपघातानंतर विमानानं पेट घेतला आणि त्यात संपूर्ण कॉकपिट आणि केबिन जळून खाक झालं. विमानातले दोन्ही रेकॉर्डर्सही आगीच्या तडाख्यात सापडले, त्यामुळे त्यांच्यातला डेटा मिळवण्यासाठी विशेष तंत्र वापरावं लागलं, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यापैकी एस एस एफ डी आर या रेकॉर्डरमधला रॉ डेटा डाऊनलोड करण्यात यश आल्याचं अहवालात सांगितलं आहे.

****

एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक केलेलं नाही, असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे. सवलत धारक प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक असल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरली आहे. तथापि, जोपर्यंत ८० टक्के सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य केलं जाणार नाही, असा खुलासा एसटी महामंडळानं केला आहे.

दरम्यान, या स्मार्ट कार्ड उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या कार्डच्या नोंदणीची संख्या आता एक लाखाच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

****

होलिका दहनाचा सण उद्या दोन तारखेला तर परवा तीन मार्चला धुळवडीचा सण साजरा होणार आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी होळी सणानिमित्त नागरिकांना पर्यावरणपूरक रंग वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या,

बाईट - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

****

यंदाचा रणजी करंडक प्रथमच जम्मू काश्मीर संघाने पटकावला आहे. कर्नाटक संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात दुसरा डाव अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातल्या आघाडीमुळे जम्मू काश्मीर संघाला विजेता घोषीत करण्यात आलं. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला तसंच माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी जम्मू काश्मीर संघाचं अभिनंदन केलं आहे.

****

टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर आठ फेरीत आज कोलकाता इथं भारताचा सामना वेस्ट इंडिज सोबत होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

दरम्यान, या स्पर्धेत काल पाकिस्ताननं श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतरही पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला आहे. सुपर आठ गटातील ग्रुप ब मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडने, तर ग्रुप अ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतासाठी आजचा सामना उपान्त्य फेरीतल्या प्रवेशासाठी निर्णायक ठरणार आहे.

****

नाशिक इथं सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात काल विविध विषयांवरचे परीसंवाद पार पडले. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठीला बळ मिळेल तसंच माध्यमं मराठी ही भाषा सशक्त करत असल्याचं मत विविध परीसंवादांमध्ये व्यक्त करण्यात आलं. माध्यमांमध्ये मराठी भाषेचा शुद्ध, सुबोध, समृद्ध आणि प्रभावी वापर व्हावा या उद्देशानं माध्यमं नेहमीच पुढाकार घेत असल्याचा सूर चर्चासत्रात उमटला.

****

महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे, हा या मेळाव्यांचा मूळ उद्देश असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं महामेळाव्यात बोलत होते. त्यांनी यावेळी या मेळावा आयोजनाबाबत प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर इथंही काल विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवांचा महामेळावा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...