Sunday, 1 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्यातील हरभरा खरेदी, पाच हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल हमीभावानं आजपासून सुरू होत असल्याचं राज्य शासनातर्फे जाहिर झालेलं आहे. तर, महामार्गावरील वाहतूकीच्या वाढीव सुरक्षिततेसाठी ज्वलनशील आणि तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या तीन फेब्रुवारी रोजी प्रोपिलिन नामक ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्यानं झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. तसंच भटक्या कुत्र्यांचं नियमन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्याचे कोणतेही आदेश महापालिकेनं दिलेले नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती अधिकाऱ्याची नेमणूकही केलेली नाही, असं स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि पुदुचेरीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते पुदुचेरी इथं दोन हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं  उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.

****

पश्चिम आशियातील भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांना तणावाची प्रादेशिक परिस्थिती लक्षात घेता जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायलमधल्या भारतीय दूतावासानं देशात तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्यांच्या आधीच्या सूचनांचं पालन करण्याची आणि वेळेवर मदत आणि संवाद सुलभ करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याची विनंती केली आहे. सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या एका संदेशामध्ये दूतावासानं म्हटलं आहे की, ते परिस्थितीमुळं बाधित झालेल्या भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात आहेत, ज्यामध्ये पर्यटक, अल्पकालीन व्यावसायिक अभ्यागत आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा समावेश आहे. दरम्यान, या एकंदर परिस्थितीमुळे या भागातील विमानसेवा विस्कळीत झाल्याच्या परिणामस्वरुप मुंबईच्या शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक प्रवाश्यांचा खोळंबा झाल्याचं चित्र आहे. काल रात्री अनेक प्रवासी विमानतळाबाहेर ताटकळत बसले होते.

****

शिख पंथाचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या साडेतीनशेच्या शहिदी दिनानिमित्त मुंबईत खारघर इथं दोन दिवसीय भव्य हिंद-दी-चादरधार्मिक कार्यक्रमाचा आ समारोप होत आहे. काल यात जनकल्याण चिकित्सा शिबिर झालं. या कार्यक्रमास देशभरातून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळातो आहे. शीख समाजाच्या इतिहासाचं दर्शन घडविणारं 'विरासत-ए-सीख' हे प्रदर्शन उभारण्यात आलं असून प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे. 

****

शासनाची पूर्वपरवानगी न घेता सोडत कार्यक्रमात सहभागी होत चार चाकी वाहन जिंकण्याच्या मुद्द्यावरून गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिशा पजई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिव आणि विधि परामर्शी दिलीप घुमरे यांनी ही कारवाई केली आहे.

****

वीस षटकांच्या विश्वचषकाच्या सुपर एट सामन्यात भारताचा सामना आज वेस्टइंडिज संघाविरुद्ध कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथं होणार आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. सायंकाळी सात वाजता सामना सुरु होईल. वेस्टइंडिज सध्या गुणतालिकेत सरस धावगतीच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानं वेस्ट इंडिजला हरवलं तर भारताचे चार गुण होतील आणि ते दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश करतील. आजचा विजेता संघ येत्या पाच मार्च रोजी मुंबईत सायंकाळी सात वाजता इग्लंड विरुद्ध स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना खेळणार आहे. त्याआधी या फेरीचा पहिला सामना दक्षिण अफ्रिका न्युझीलंड यांच्यात चार मार्चला कोलकाता इथं होईल. उपांत्य लढती जिंकणाऱ्या संघांतील विश्वचषक विजेतेपदाची लढत येत्या आठ मार्चला रविवारी अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडासंकुलामध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेदरम्यानचा सामनाही आज दुपारी तीन वाजेपासून नवी दिल्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

****

राज्यात आज सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

यंदाचा रणजी करंडक प्रथमच जम्मू काश्मीर संघानं पटकावला आहे. पहिल्या डावातल्या आघाडीमुळे जम्मू काश्मीर संघाला विजेता घोषीत करण्यात आलं.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...