Friday, 27 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान, राज्यांची तयारी आणि उपाययोजनांची माहिती घेणार आहेत. टीम इंडिया या भावनेनं सर्व राज्यांमध्ये समन्वय साधणं, हा या बैठकीचा उद्देश आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे, त्या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रत्येकी दहा रुपये प्रति लिटरने कपात करण्यात आली आहे. यामुळे वाढत्या किमतींपासून ग्राहकांना संरक्षण मिळेल. याव्यतिरिक्त, डिझेलच्या निर्यातीवर साडे २१ रुपये प्रति लिटर आणि विमान इंधनावर साडे २९ रुपये प्रति लिटर दराने शुल्क आकारण्यात आलं आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. त्या म्हणाल्या -

बाईट – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

 

सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांना दिलासा देणारा ठरला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अनेक देशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढवल्या असताना, नरेंद्र मोदी सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा घेतलेला निर्णय, हा त्यांच्या लोककेंद्री प्रशासनाचं आणि संवेदनशीलतेवर आधारित निर्णय प्रक्रियेचं उदाहरण असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होत असताना, अनेक देशांनी हा बोजा आपल्या नागरिकांवर टाकला. भारताने मात्र आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचं रक्षण करण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

****

देशात लॉकडाउनची अफवा पूर्णपणे खोटी असून, असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचं, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. जागतिक परिस्थितीत सातत्याने बदल होत असून, आपात्कालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही, त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली. भारत सगळ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत पुरी यांनी नागरिकांना शांत, जबाबदार आणि एकत्र राहण्याचं आवाहन केलं आहे.

****

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी पुरवठ्यात आणखी २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. निरज मित्तल यांनी राज्य सरकारांना पत्र लिहिलं आहे. यामुळे आता हॉटेल, उपाहारगृह यासारख्या व्यावसायिकांना ७० टक्के एलपीजी पुरवठा होणार आहे.

****

अयोध्येतल्या श्री राम मंदिरात आज रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे. दुपारी बारा वाजता भगवान रामलल्लांचा जन्मसोहळा पार पडला, त्यावेळी सूर्यकिरणांमुळे रामलल्लाच्या कपाळावर सूर्यटिळकाचा भव्य देखावा पाहायला मिळाला. रामनवमीच्या शुभप्रसंगी, रामलल्लाचं दर्शन, पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अयोध्येत आज भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

****

भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडील शस्त्र परवाना पोलिसांनी निलंबित केला आहे. त्याच्या सिन्नर तालुक्यातल्या फार्महाऊसच्या झडतीत एक राजमुद्रा असलेलं पिस्तूल तसंच २१ काडतुसं सापडली होती. यातील पाच काडतुसांचा वापर झाला असून, तो कशासाठी झाला याचा तपास पोलीस करत आहेत. खरात याचं बँक खातंही सील करण्यात आलं आहे. दरम्यान, खरातने शोषण केलेल्या काही पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने नाशिक शहरातल्या सातपूर इथल्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर चढ्या दरानं विकणाऱ्या गॅस एजन्सींच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शहरातल्या २३ गॅस एजन्सीज्‌ना यासंदर्भातलं निवेदन देण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींच्या सभापतींची निवड येत्या दोन एप्रिल रोजी होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...