Sunday, 8 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ मार्च २०२ सकाळी .०० वाजता

****

भारत सरकार पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील बदलत्या सुधारित होत असलेल्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, त्या भागात अडकलेल्या किंवा अल्पकालीन भेटीवर असलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. परराष्ट्रमंत्रालयानं एका निवेदानाद्वारे ही माहिती दिली. एक ते सात मार्च २०२६ दरम्यान ५२ हजारांहून अधिक भारतीय नागरिक विविध विमानसेवांद्वारे सुरक्षितपणे भारतात परतले आहेत. मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं विशेष नियंत्रण कक्ष आणि दूतावासांमार्फत चोवीस तास सुरु असलेली मदतवाहिनी कार्यान्वयीत केली आहे.

****

अमेरीका, इस्राइल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशानं तटस्थ राहून शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे. या संदर्भातलं पत्र त्यांनी पंतप्रधानांकडे सादर केलं. भारतीय संस्कृती ही अहिंसा आणि शांतीचं प्रतिक आहे, भारतासारख्या सशक्त लोकशाही असलेल्या देशाने मानवता आणि शांतीचा संदेश पोहचवावा, अशी विनंती हजारे यांनी केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशातील सर्व नारी शक्तीला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या जिद्द, सर्जनशीलता आणि कर्तृत्वाच्या बळावर भारताच्या प्रगतीला नवी दिशा दिली आहे. त्यांची कामगिरी विकसित भारत घडवण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाला बळ देतं, असं नमूद करुन मोदी यांनी महिला सक्षमीकरण हे विविध योजना आणि उपक्रमांच्या केंद्रस्थानी असून, प्रत्येक महिलेला आपली संपूर्ण क्षमता साकार करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा दृढ संकल्प आहे असं आपल्या संदेशात अधोरेखीत केलं आहे.

****

महिला दिनाच्या निमित्तानं राज्य शासनातर्फे; गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राज्यव्यापी अशा १४ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा  शुभारंभाचा मुख्य शासकीय कार्यक्रम आज दुपारी दोन वाजता मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात होणार आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत लातूर जिल्ह्यातील पात्र अशा १४ वर्ष वयाच्या वीस हजार ६७१ मुलींना गार्डासिल-चार ही लस मोफत देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण-उपजिल्हा- तसंच सामान्य आणि स्त्री रुग्णालयं इथं याची व्यवस्था केलेली आहे. तसंच या लसीकरणासाठी ‘यु विन’ संकेतस्थळावर नोंदणीची सोय आहे.

दरम्यान महिला दिनानिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी महिलादिनानिमित्त दुचाकी वाहनफेरी काढण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवि दिल्ली इथं जवळपास साडेतेहतीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं लोकार्पण तसंच शुभारंभ होणार आहे.

सर्वसाधारणपणे अठरा हजार तीनशे कोटी रुपयांच्या दिल्ली मेट्रो योजने अंतर्गत लोकार्पण तसंच दोन मेट्रो मार्गिकांचाही यात समावेश आहे.

****

बदलत्या युगात युवकांनीही कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय केंद्रित कौशल्यं आत्मसात करण्याचं आवाहन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केलं आहे. काल पुण्यात पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या १५ व्या पदवी प्रदान समारंभोत ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाणार हा केवळ एक भ्रम असून, भारतानं तो मोडीत काढला असल्याचं सेठ यांनी नमूद केलं.

****

आयसीसी पुरुष टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी, गतविजेत्या भारताचा सामना आज अहमदाबाद इथं न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ चौथ्यावेळी पोहोचला आहे. तर न्यूझीलंडसाठी हा दुसरा अंतिम फेरीतला सामना असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं मुंबईत झालेल्या रोमांचक उपांत्य फेरीत इंग्लंडला सात धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर मिशेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडनं कोलकाता इथं दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव केला.

****

भारताच्या लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यने कॅनडाच्या व्हिक्टर लाय याचा २१-१६, १८-२१, २१-१५ असा पराभव केला. आज या स्पर्धेच्या अंतिम फेरीत लक्ष्यचा सामना चीनी तैपेईच्या लीन चून ई याच्यासोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता हा सामना होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...