Sunday, 2 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.

****



·      इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ; राज्यात बेचाळीस शाखा आणि एकशे अडुसष्ट स्वीकृती केंद्रांवर सेवा

·      चर्मकार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी चर्मकार आयोगाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      इंडोनेशियातल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, एक रजत आणि एक कांस्यपदक

आणि

·      चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ८ बाद २६० धावा

*****



 टपाल कार्यालयात बँकिंग सुविधा देण्याच्या योजनेला काल प्रारंभ झाला. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही एक ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नवी दिल्लीत झालेल्या या प्रणालीच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. यामुळे बँकीग सेवा घरा घरात जाऊन एका नव्या सामाजिक व्यवस्थेची सुरुवात होईल असंही ते म्हणाले. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून तीन लाखापेक्षा जास्त पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवकांच्या योगदानानं कार्यरत असलेल्या टपाल खात्याच्या विस्तृत जाळ्याशी ही सुविधा जोडली जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचं धोरण आणि नियम राज्य सरकारनं यापूर्वीच तयार केले असून ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये या बँकेच्या महाराष्ट्र सर्कल गिरगाव शाखेचं तर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवनात अंधेरी शाखेचं उद्घाटन केलं. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद,  आणि बीडसह राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या बँकेचा काल संबंधित जिल्ह्यांच्या खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

****



 घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचं धोरण आणि नियम राज्य सरकारनं यापूर्वीच तयार केले असून ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या गृहसंकुलं  आणि इतर बांधकामांवरची बंदी उठवण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाला करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला फडणवीस यांनी दिले आहेत. वाढत्या वसाहतीमध्ये घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आखलं नसल्याबाबत महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं दंड आकारल्याबाबतचं वृत्त काल प्रसारित झालं होतं, योग्य धोरण आणेपर्यंत या राज्यांमध्ये बांधकामं करता येणार नसल्याचा आदेशही न्यायालयानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे याबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर होऊ शकली नव्हती, असं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.

****



 राज्यातल्या चर्मकार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी चर्मकार आयोगाची स्थापना करण्यात येणार असून, या आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी दूर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत परळ इथं उभारण्यात येणाऱ्या संत रोहिदास भवनच्या भूमिपूजन, आणि  कोनशिला समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री काल बोलत होते. चर्मकार समाजाच्या सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 राज्यातल्या खड्ड्यांमुळे दुरव्यवस्था झालेल्या रस्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सरकारवर जोरदार टीका केली आहे. रस्त्यांची अवस्था एवढी खराब आहे की जागतिक विक्रमांच्या गिनीज बुकातच त्यांची नोंद होईल, आणि तशी नोंद झाल्यानंतरच मग फडणवीस सरकारला, रस्ते खराब झाले आहेत हे लक्षात येईल, अशी कोपरखेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मारली. मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते.

****



 गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचा अंतिम मसुदा  तयार झाला असून, लवकरच हे महामंडळ कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचं, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. बीड इथं आयोजित राज्यस्तरीय ऊसतोड कामगार मेळाव्यात त्या  काल बोलत होत्या.  ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाब शासन सकारात्मक असल्याचं, त्यांनी या वेळी सांगितलं.

****



 जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे लातूर जिल्ह्यातली भुगर्भ पाणी पातळी साडेतीन ते पाच मीटरपर्यंत वाढली आहे. सरासरी पेक्षा जरी कमी पाऊस पडला असला तरी पुढील पाच वर्ष टंचाई उदभवणार नाही, आणि टँकरची  गरज भासणार नाही, असं मत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केलं आहेत. जलसंधारण कामं अंमलबजावणी निमित्त  लातूर आणि रेणापूर तालुक्यांच्या कार्यशाळेत ते काल बोलत होते. जलसंधारणाची शंभर टक्के कामं पूर्ण झाली, तर लातूर जिल्हा जलयुक्त होईल, असही ते म्हणाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 समानता हे आपल्या देशाचं ध्येय असून, ते गाठणं, हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं वकील दिनाच्या कार्यक्रमात काल ते बोलत होते. आरक्षणाचे लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंतही न्यायमूर्तींनी यावेळी व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि गोरगरीबांच्या उन्नतीसाठी या देशात १९८० पासून कायदे झाले नाहीत, न्यायालय आता केवळ श्रीमंताची झाली असल्याचंही नलावडे यांनी म्हटलं.

****



 यापूर्वीच्या सरकारनं मुस्लिमांना जाहीर केलेलं पाच टक्के आरक्षण लागू करावं यासाठी राज्यात विभागवार आरक्षण परिषदांमधून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती, खासदार हुसेन दलवाई दिली आहे. ते काल उस्मानाबाद इथं राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषदेत बोलत होते. शिक्षणाचं मागासलेपणा, नोकऱ्यांमध्ये अल्पप्रमाण यासारख्या विषयांवर जनजागृती केली जाणार असल्याचं हुसेन यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

****



 इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं काल दोन सुवर्ण तर एक रजत पदक जिंकलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत एकोणपन्नास किलो वजनगटात अमित पंघलनं तर ब्रिजच्या सांघिक स्पर्धेत भारताच्या शिवनाथ सरकार आणि प्रणव वर्धन या पुरूषांच्या संघानं सुवर्णपदक जिंकलं. दुसरीकडे भारतीय महिला स्क्वॉश संघाला, अंतिम फेरीत हाँगकाँगकडून पराभव झाल्यानं रजत पदकावर समाधान मानावं लागलं. पुरूषांच्या हॉकीमध्ये भारतानं काल पाकिस्तानला पराभूत करून कांस्य पदक मिळवलं. या स्पर्धेत पंधरा सुवर्ण, चोवीस रजत आणि तीस कांस्य पदकं मिळवत भारत पदक तालिकेत आठव्या स्थानावर आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेतली भारताची ही सर्वाधिक पदक संख्या आहे.

****



 चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दिवसअखेर इंग्लंडनं तिसऱ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात ८ बाद २६० धावा केल्या. यामुळे इंग्लंडकडे आता २३३ धावांची आघाडी झाली आहे. यापूर्वी पहिल्या डावात इंग्लंडनं २४६ आणि भारतानं २७३ धावा केल्या होत्या. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे.

****



 प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गरीबांना मोफत गॅस जोडणी देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत २८ लाख ८१ हजार गॅसच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातल्या वानखेडे नगर भागातल्या रहिवाशी सुषमा तायडे आणि शुभांगी हिरेकर यांनी गॅस जोडणीमुळे मोठी सुविधा झाल्याचं सांगितलं.



माझ नाव शुशमा तायडे आहे. एन १३ भारत नगर, औरंगाबाद. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस मिळालेला आहे. यापूर्वी आम्हा फार समस्या येत होत्या स्वयंपाक करतांना. पहिले आम्ही स्टो वापराचो. रॉकेल कधी-कधी मिळत नव्हतं आम्हाला. खोळंबा व्हायचां फार जास्त. आणि आता सद्या गॅस मिळालेला आहे. तर वेळेची बचत होते आहे. पैसाची आर्थिेक बचत पण  फार होते आहे. शासनाची आभारी आहे.



शुभांगी अशोक खेरेकर. वार्ड क्रमांक ५. माझ्या घरामध्ये गॅस नव्हता. अक्षरश्या मला रॉकेलसाठी फिरावे लागायचं. आज माझ्या घरामध्ये गॅस आहे. आणि आज मी त्याच्यावर अन्न शिजवतेय. आम्हाला गॅस सोबत रेगूलेटर, शेगडी हे सगळ फक्त आणि फक्त  १०० रूपयामध्ये उपलब्ध करून दिलं. याबद्दल आम्ही पंतप्रधान योजनेचे अभिनंदन करतो.

****



 बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक, नंदकिशोर मोदी याला काल बीडच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. विद्यालयातल्या चार शिक्षक आणि एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याचं कारण देत संस्थेनं त्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं होतं. या प्रकरणाची बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुरु असलेल्या चौकशीत बाजू मांडण्यासाठी मोदी यानं तक्रारदार लिपिकाकडे दोन लाख रूपयांची लाच मागितली होती.

****



 जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचं काल नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते एक्कावन वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

*****

***

Saturday, 1 September 2018

“तंत्रज्ञानामुळे जलदगतीनं न्याय मिळण्यासाठी मोठी मदत होईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.” – यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.09.2018 - Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

तंत्रज्ञानामुळे जलदगतीनं न्याय मिळण्यासाठी मोठी मदत होईल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातल्या वकील संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना बोलत होते. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये न्याय मिळण्यास उशीर लागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत देशभरातल्या विविध न्यायालयांमध्ये सुमारे तीन कोटी ३० लाख प्रकरणं पडून असल्याचं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानामुळे कामाचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होईल, असं भारताचे सरन्यायाधिश दीपक मिश्रा यावेळी म्हणाले.

****

भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून सेवा देणार असलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्‌घाटन झालं. ही बँक म्हणजे जन धन योजनेचं विस्तारित रूप असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवकांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या टपाल खात्याच्या माध्यमातून या बँकेचं काम चालणार असून, येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत देशातली सगळी टपाल कार्यालयं या बँकेच्या प्रणालीशी जोडली जातील. महाराष्ट्रामध्ये टपाल कार्यालयांच्या बेचाळीस शाखा आणि एकशे अडुसष्ट स्वीकृती केंद्रांवर या भारतीय टपाल बँकेचं उद्घाटन झालं.

****

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा शक्ती प्रशासनात सहभागी झाल्यानं आपल्या नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणून सामान्यांच्या जीवनात बदल घडवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. फेलोशिप कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवांनी प्रशासनाची आतली बाजू पाहिली आणि आपल्या नवीन कल्पनांच्या मदतीनं त्यात बदल सुचवले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या हिंदी विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ येत्या तीन तारखेला होणार आहे. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र, प्रसिद्ध हिंदी कवी अरुण कमल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, यावेळी या विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचं संमेलन तसंच माजी विभाग प्रमुखांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचं संयोजकांनी कळवलं आहे.

****

समानता हे आपल्या देशाचं ध्येय असून, ते गाठणं, हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथे ‘वकील दिना’च्या कार्यक्रमात बोलत होते. आरक्षणाचे लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचत नसल्याची खंतही न्यायमूर्तींनी यावेळी व्यक्त केली.

****

अहमदनगर शहराजवळच्या केडगाव बायपासवर झालेल्या एका अपघातात एक जण ठार तर मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे २४ डॉक्टर्स जखमी झाले आहेत. यापैकी चार डॉक्टरांची प्रकृती गंभीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या डॉक्टरांचा चमू औरंगाबाद इथं होणाऱ्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असताना त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी अहमदनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

नांदेड इथं कृषी परिषदेतर्फे उद्या कापूस बोंड अळी व्यवस्थापन कार्यशाळा आणि शेतकरी गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सहकारमहर्षी पद्मश्री विट्ठलराव विखे पाटील यांची जयंती आणि कृषी दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं आज दोन सुवर्ण तर एक रजत पदक जिंकलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत एकोणपन्नास किलो वजनगटात अमित पनघळनं आणि ब्रिजच्या सांघिक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं सुवर्णपदक जिंकलं. दुसरीकडे भारतीय महिला स्क्वॉश संघाला, अंतिम फेरीत हाँगकाँगकडून पराभव झाल्यानं रजत पदकावर समाधान मानावं लागलं. पंधरा सुवर्ण, चोवीस रजत आणि एकोणतीस कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत आठव्या स्थानावर आहे. या तालिकेत चीन पहिल्या आणि जपान दुसऱ्या स्थानावर आहेत.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ सप्टेंबर २०१८ दुपारी १.०० वा.

****



 भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आठ पूर्णांक दोन दशांश टक्के, इतका नोंदला गेला आहे. हा वृद्धीदर गेल्या दोन वर्षातला सर्वाधिक दर असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. या आर्थिक वर्षामध्ये हा वृद्धीदर  साडे सात टक्क्यांच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त असेल, असा विश्वासही अर्थ मंत्रालयानं व्यक्त केला आहे. जागतीक आर्थिक घसरणीच्या काळात देखील आर्थिक सुधारणा आणि दूरदृष्टीमुळेंच भारतीय अर्थव्यवस्थेन हा दर गाठल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. उत्पादन क्षेत्राचा १३ पूर्णांक दोन दशांश टक्के आणि बांधकाम क्षेत्रांचा आठ पूर्णांक ९९ दशांश टक्के वृद्धीदर म्हणजे अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेत असल्याचे संकेत असल्याचं अर्थ व्यवहार विभागाचे सचिव एस सी गर्ग यांनी म्हटलं आहे. सरकारनं घेतलेल्या ठाम निर्णयांमुळेच अर्थव्यवस्थेनं हा दर गाठला असल्याचं अर्थ विभागाचे सचिव हसमुख अधिया यांनी म्हटलं आहे.

****

 प्राप्ती कर विवरणपत्रं भरण्याची यावर्षीची अंतिम मुदत काल संपली असून, या वर्षी पाच कोटी एकोणतीस लाखांहून अधिक विवरणपत्रं दाखल झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या सुमारे साठ टक्क्यांनी वाढली आहे. केरळमध्ये ही विवरणपत्रं दाखल करण्याला येत्या पंधरा तारखेपर्यंत मुदतवाढ दिल्यानं या वर्षीच्या एकूण विवरणपत्रांमध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी सुमारे तीन कोटी वीस लाख विवरणपत्रं दाखल झाली होती.

****

 विधी आयोगानं कुटुंब कायद्यांमध्ये करावयाच्या सुधारणांबाबत केलेल्या चर्चेबाबतचे दस्तावेज जारी केले आहेत. यामध्ये धर्मनिरपेक्ष तसेच व्यक्तीगत कायद्यांमधल्या कुटुंब कायद्याच्या तरतूदींबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली असल्याचं विधी आणि न्याय विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यामध्ये अनेक सुधारणा आणि नवीन विधेयक आणण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू विवाहा कायद्यामध्ये संमतीने घ्यायचा घटस्फोट आणि एकत्र नांदण्याच्या तरतूदीबाबत सुधारणा तर मुस्लीम कायद्यामध्ये वारसा कायद्याबाबत काही संहिता निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.  

*****

 राज्यातलं पन्नास टक्के कृषी क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नाबार्डतर्फे आयोजित, ‘पाण्याचा कार्यक्षम वापर’, या अभियानाच्या जनजागृती रथाचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यात त्यांच्या हस्ते  झाला, त्यावेळी ते बोलत होते. सध्या राज्यातलं फक्त अठरा टक्के कृषीक्षेत्र सिंचनाखाली असून, राज्यातल्या प्रलंबित तसंच नवीन सिंचन प्रकल्पांसाठी निधी देऊन, पन्नास टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं गडकरी यांनी सांगितलं.

****

 चौथी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद आजपासून नेदरलँडमध्ये सुरू होत आहे. आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक चार दिवसांच्या या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. नेदरलँडच्या इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाऊंडेशन, नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेस आणि पुण्याच्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद अकादमी, यांनी संयुक्तपणे या संमेलनाचं आयोजन केलं आहे.

****

 आशिया खंडाचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार प्रदान करून, भरत वाटवाणी आणि सोनम वांगचुक या दोन भारतीयांना गौरवण्यात आलं आहे. फिलीपाईन्सची राजधानी मनिला इथे काल या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.

****

 जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांचे मानवतावादी विचार आणि सामाजिक कार्य यांचं नेहमी स्मरण होत राहील, अशा शब्दात तरुण सागरजींना आदरांजली वाहून, त्यांच्या शिष्य आणि अनुयायांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

 अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारताला चौदावं सुवर्णपदक मिळालं.मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या एकोणपन्नास किलो वजनगटात भारताच्या अमित पनगलनं आज सुवर्णपदक जिंकलं.

****

 जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या गणपतराव पाटील पवार प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक छोटीराम मगन जारवाल यांच्यावर आठ हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्याच्या वेतनाचं बिल मंजुरीसाठी पाठवण्याकरता जारवालनं ही लाच मागितली होती.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१ सप्टेंबर  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून सेवा देणार असलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. देशभरात या बँकेच्या सहाशे पन्नास शाखा असतील आणि देशातल्या तीन हजार दोनशे पन्नास ठिकाणी ही योजना सुरू केली जाणार आहे.

****

 जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचं आज नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते एक्कावन वर्षांचे होते.त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण सागरजी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांचे उच्च विचार  आणि सामाजिक कार्य यासाठी देश त्यांचं नेहमी स्मरण ठेवेल, असं नमूद करत, जैन समाजाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****

 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद राहणार असल्याबाबतच्या अफवांचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या अफवा समाज माध्यमांमधून पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं एक निवेदन जारी करून, या आठवड्यात, दोन तारखेला रविवार आणि आठ तारखेला दुसरा शनिवार असल्यानं केवळ हे दोन दिवसच बँका बंद असतील, असं स्पष्ट केलं आहे.

****

 परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्रं उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी काल दिली. या नवीन केंद्रांमुळे राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या आता ३६ होईल. यापैकी बारामती इथल्या केंद्राची सुरुवात येत्या चार तारखेला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत देशभरात दोनशे एकोणनव्वद पासपोर्ट सेवा केंद्रं उघडण्याचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत त्यापैकी दोनशे अठरा केंद्रं सुरू झाली आहेत.

****

 राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीनं येत्या 10 डिसेंबर पासून राज्य बालनाट्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या बालनाट्य स्पर्धांसाठी येत्या तीस सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका पाठवता येणार आहेत. राज्यातल्या, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या  संस्थांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक संजीव पलांडे यांनी केलं आहे. याबाबतची पूर्ण माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

*****

***

Regional Urdu Text  Bulletin, Aurangabad, Date: 01.09.2018 ,Time:8.40-8.45 am

 
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date - 01  September  2018
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ  :  یکم؍ستمبر  ۲۰۱۸؁
وَقت  :  صبح  ۴۰: ۸  -  ۴۵ :۸
***********************
 بھارتی ڈاک کے توسط سے شروع ہونے والی ’’انڈیا پوسٹ پیمنٹ بینک۔ IPPB‘‘ کا آج وزیرِ اعظم نریندر مودی کے ہاتھوں افتتاح ہوگا۔ اس بینک کی ملک بھر کے تین ہزار 250/ مقامات پر 650/ شاخیں شروع ہونگی۔
 انڈیا پوسٹ پیمنٹ بینک کے ذریعے پوسٹ مین اور دیہی ڈاک کے ملازمین کے ذریعے گھر گھر تک بینکنگ خدمات فراہم کی جائیں گی۔ اس کے علاوہ مفت بچت کھاتے اور کرنٹ کھاتے کھولنے کی سہولت بھی دستیاب رہیگی۔ انڈیا پوسٹ پیمنٹ بینک‘ صارفین کو آن لائن بجلی بل ادا کرنے‘ موبائل اور DTH ریچارج‘ پانی یا گیس اور بیمہ کی قسطیں ادا کرنے کی آن لائن سہولت بھی فراہم ہوگی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 مرکزی اور مہاراشٹر حکومت کیخلاف کانگریس پارٹی کی سنگھرش یاترا کی کل کولہاپور سے شروعات ہوئی۔ اس سے پہلے کولہاپور شہر میں جلوس نکالا گیا۔ کانگریس کے مہاراشٹر سربراہ اور رکنِ پارلیمنٹ ملکارجن کھڑگے‘ مہاراشٹر کانگریس صدر اشوک چوہان‘ حزبِ اختلاف کے رہنما رادھا کرشن وکھے پاٹل اور سابق وزیرِ اعلیٰ پرتھوی راج چوہان سمیت کئی سرکردہ رہنمائوں کی موجودگی میں مشعل جلاکر سنگھرش یاترا کی شروعات کی گئی۔ اس کے بعد منعقدہ جلسۂ عام میں سبھی رہنمائوں نے مرکز اور مہاراشٹر میں برسرِ اقتدار بھارتیہ جنتا پارٹی پر زبردست تنقید کی۔ اس موقع پر لنگایت اور مراٹھا سماج کو ریزرویشن دینے کے مطالبے کی تائید کا اعلان کیا گیا۔ سنگھرش یاترا کے پہلے مرحلے میں کانگریس رہنما مہاراشٹر کے مختلف مقامات پر جلوس نکال کر مظاہرے کرینگے۔ یاترا کے پہلے مرحلے کا اختتام 8/ ستمبر کو پونے میں ہوگا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 مہاراشٹر پولس نے دعویٰ کیا کہ پونے ضلع کی یلغار پریشد معاملے میں گرفتار کیے گئے کارکنوں اور مائو نواز تنظیموں کے مابین تعلقات کے ثبوت مل گئے ہیں۔ مہاراشٹر پولس کے ڈائریکٹر جنرل (امن و قانون) پرم بیر سنگھ نے کل ممبئی میں منعقدہ اخباری کانفرنس میں یہ بات کہی۔ اُنھوں نے کچھ کارکنوں کے درمیان ہوئی خط و کتاب کو ثبوت کے طور پر اخباری کانفرنس میں پیش کیا۔
پرم بیر سنگھ نے کہا کہ ان میں سے ایک خط میں راجیو گاندھی کے قتل کی طرح واردات انجام دینے کا ذکر موجود ہے۔ ڈائریکٹر جنرل نے کہا کہ پولس نے روپوش مائو نوازوں کے درمیان ہوئی خط و کتابت سے متعلق ہزاروں خطوط ضبط کیے ہیں جن میں ہتھیاروں کی خریداری کیلئے درکار پیسوں کے مطالبے کا بھی ذکر موجود ہے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 اورنگ آباد کی ضلع و سیشن عدالت نے پیشہ ور قاتل اور گینگسٹر عمران مہدی اور اس کے ساتھی سیّد ظہیر عرف شیرا کو ایک معاملے میں عمر قید کی سزا سنائی۔ عدالت نے دونوں پر پانچ ہزار روپئوں کا جرمانہ بھی عائد کیا۔ ان دونوں ملزمین کو قتل کے جرم میں عمر قید کی سزا سنائی گئی۔ واضح رہے کہ عمران مہدی اور شیرا نے پولس کیلئے مخبری کرنے کے شبے میں شیخ ناصر کو قتل کردیا تھا۔ تاہم عدالت نے اس معاملے میں دیگر پانچ ملزمین کو بری کردیا۔ عمران مہدی کو اس سے پہلے بھی سابق کارپوریٹر سلیم قریشی کے قتل کے معاملے میں عمر قید کی سزا سنائی جاچکی ہے۔ سلیم قریشی قتل کی تفتیش کے دوران ہی پولس کو شیخ ناصر کے قتل کا انکشاف ہوا تھا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 مراٹھا‘ مسلم‘ دھنگر اور کولی سماج کو ریزرویشن فراہم کرنے کے مطالبے پر اورنگ آباد ضلع کانگریس پارٹی کی جانب سے جاری بھوک ہڑتال کل ودھان سبھا اسپیکر ہری بھائو باگڑے کے ہاتھوں ختم کردی گئی۔ بھوک ہڑتال‘ وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس کی جانب سے دئیے گئے تحریری تیقن کے بعد ختم ہوئی ہے جس میں پسماندہ طبقات کے ریاستی کمیشن کی جانب سے رپورٹ موصول ہونے کے ایک مہینے کے اندر مراٹھا ریزرویشن کیلئے قانون سازی کے مقصد سے ریاستی اسمبلی کا اجلاس بلانے کی یقین دہانی کروائی گئی ہے۔
 پرنسپل سیکریٹری بھوشن گگرانی نے اس سے متعلق مکتوب دیا۔ واضح ہوکہ کانگریس نے گذشتہ دو دنوں سے اورنگ آباد ضلع کلکٹر دفتر کے روبرو بھوک ہڑتال شروع کی تھی‘ جس میں رکنِ اسمبلی عبدالستار‘ سبھاش جھامبڑ، سابق رکنِ اسمبلی کلیان کالے سمیت کئی کارکنوں کی طبیعت بگڑ جانے کے بعد انہیں طبّی امداد فراہم کی گئی تھی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 مہاراشٹر نونرمان سینا کے صدر راج ٹھاکرے نے کہا ہے کہ دسمبر میں ہونے والے تین ریاستوںکے انتخابات میں ہار سے بچنے کیلئے بھارتیہ جنتا پارٹی مرکز اور ریاستوں کے ایک ساتھ انتخابات کروانے پر اصرار کررہی ہے۔ راج ٹھاکرے کل بیڑ میں نامہ نگاروں سے گفتگو کررہے تھے۔ انھوں نے وزیرِ اعظم نریندر مودی کے کام کرنے کے طریقہ پر بھی سخت نکتہ چینی کی۔ راج ٹھاکرے نے الیکٹرونک مشینوں‘ EVM کے استعمال پر بھی شکوک و شبہات کا اظہار کیا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 اورنگ آباد کے بیڑ بائے پاس روڈ پر دیولائی چوک میں کل ایک ٹرک نے موٹر سائیکل کو پیچھے سے ٹکر ماردی‘ جس کے نتیجے میں ایک نوجوان کی موت ہوگئی۔ وہیں ایک دیگر واقعے میں جھالٹہ پھاٹا پر پیش آئے حادثے میں ٹووہیلر پر سوار حاملہ خاتون کی موت واقع ہوگئی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 بھارت اور انگلینڈ کے درمیان جاری چوتھے کرکٹ ٹیسٹ میچ کے دوسرے دن کا کھیل ختم ہونے تک کل انگلینڈ نے دوسری اننگز میں بناء کوئی وکٹ کھوئے 6/ رن بنالیے ہیں۔ اس سے پہلے بھارتی اننگز 273/ رنوں پر سمٹ گئی۔ بھارت کو پہلی اننگز میں 27/ رنوں کی برتری حاصل ہے۔ بھارت کی جانب سے چیتیشور پجارا نے 132/ رن بنائے اور آخر تک ناٹ آئوٹ رہے۔ انگلینڈ کے گیند باز معین علی نے پانچ بھارتی کھلاڑیوں کو آئوٹ کیا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 انڈونیشیاء میں جاری ایشین گیمز میں بھارت نے کل دو چاندی اور چار کانسے کے تمغے حاصل کیے۔ طلائی تمغے کی اُمید لگائے بھارتی شائقین کو اُس وقت مایوس ہونا پڑا جب خواتین کی ہاکی ٹیم کو فائنل مقابلے میں جاپان نے ایک کے مقابلے دو گول سے شکست دیدی۔ جسکے بعد بھارتی ٹیم کو چاندی کے تمغے پر اکتفاء کرنا پڑا۔ دوسری جانب بھارت کی جانب سے ورشا گوتم اور شویتا شیرویگار نے چاندی کے تمغے حاصل کیے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

Ø केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातल्या काँग्रेस पक्षाच्या संघर्ष यात्रेला कोल्हापुरमधून सुरूवात

Ø अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांचे माओवादी संघटनांशी संबंध असल्याबाबत सबळ पुरावे असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

Ø १० महामंडळं,  सहा मंडळं, दोन प्राधिकरणं आणि एका आयोगावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची राज्य शासनाची घोषणा

आणि

Ø आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला दोन रजत आणि चार कांस्य पदक तर इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी

****



 केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातल्या काँग्रेस पक्षाच्या संघर्ष यात्रेला काल कोल्हापुरमधून प्रारंभ झाला. त्यापूर्वी शहरातनू रॅली काढण्यात आली. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मशाला प्रज्वलित करून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला.



 त्यानंतर झालेल्या सभेत सर्व नेत्यांनी केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाला यावेळी पाठिंबा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राज्यात विविध ठिकाणी रॅली काढून निदर्शनं करणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आठ सप्टेंबरला पुण्यामध्ये होणार आहे.

****



 पुणे जिल्ह्यातल्या एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांचे माओवादी संघटनांशी संबंध असल्याबाबत सबळ पुरावे हाती लागल्याचं काल पोलिसांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था परमबीर सिंग यांनी अटकेत असलेल्या काही कार्यकर्त्यांदरम्यानच्या पत्रव्यवहारामधली काही पत्रं पत्रकार परिषदेत दाखवली. यापैकी एका पत्रात राजीव गांधी हत्येसारखी घटना घडवून आणण्याच्या कटाचा उल्लेख असल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांनी भूमिगत आणि इतर माओवाद्या दरम्यानची हजारो पत्र जप्त केली आहेत. या पत्रांमध्ये शस्त्र खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांच्या मागणीचाही उल्लेख असल्याचं सिंग म्हणाले.

****



 राज्य शासनानं काल १० महामंडळं,  सहा मंडळं, दोन प्राधिकरणं आणि एका आयोगावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर नरेंद्र पाटील, यांची तर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण - म्हाडाच्या अध्यक्षपदी आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी श्रीमती ज्योती ठाकरे, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ अध्यक्षपदी संदिप जोशी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ - सिडकोच्या अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर तर महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपदी राजा उर्फ सुधाकर सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****



 पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून शेख नासेर शेख चांद याचा खून केल्याप्रकरणी इम्रान मेहंदी आणि त्याचा साथीदार सय्यद जहीर उर्फ शेरा या दोघांना औरंगाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल जन्मठेप आणि पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणातले पाच आरोपींना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं आहे. इम्रानला यापूर्वी माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्या प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुरेशी खून खटल्याचा तपास करत असतानाचं शेख नासेर यांच्या खूनाच्या घटनेचा उलगडा झाला होता.

****



 औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा, मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाच्या आरक्षणासाठी सुरू केलेलं आमरण उपोषण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सोडवण्यात आलं. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळताच मराठा आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याच्या आत विधान मंडळाचे अधिवेशन बोलावण्यात येईल, असे लेखी आश्वासनांचं मुख्यमंत्र्यांचं पत्र, प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिल्यानंतर  हे उपोषण मागं घेण्यात आलं. काँग्रेसनं गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. उपोषणकर्ते आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना काल वैद्यकीय उपचार देण्यात आले होते.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 जलसंधारणाची काम शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या गावांनाच पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतंर्गत निधी प्रदान करण्यात येणार आहे, त्यामुळे गावातल्या सरपंच, उपसरपंच, तसंच ग्रामसेवकांनी आपल्या गावातल्या कामांचा आराखडा येत्या आठ दिवसात सादर करावा असं आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी  केलं आहे. जलसंधारण कामं  -अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या  निमित्ताने जळकोट, अहमदपूर आणि  चाकूर इथं ते काल बोलत होते.    

****



 इंडोनेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला दोन रजत आणि चार कांस्य पदक मिळाली. सुवर्ण पदकाची अपेक्षा निर्माण केलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचा काल अंतिम फेरीत जपानकडून दोन विरूद्ध एक गोलनं पराभव झाला. यामुळे भारतीय संघाला रजत पदकावर समाधान मानावं लागलं. नौकानयनमध्ये भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेरवेगार यांनी रजत पदक जिकलं. नौकानयनमध्येच खुल्या लेझर प्रकारात हृर्षिता तोमर हिनं कांस्य पदक जिकलं आहे. वरूण ठक्कर आणि गणपती चेनगप्पा यांनी पुरूषांच्या नौकानयनमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. मुष्टियुद्धात विकास कृष्णनला दुखापतीमुळे उपांत्य फेरीतून माघार घ्यावी लागल्यानं त्यालाही कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं. मात्र ४९ किलो गटात अमित पंगल अंतिम फेरीत दाखल झाला आहे.



 स्क्वॅशमध्ये सौरव घोसाल, हरींदर पालसिंग संधू, रमित टंडन आणि महेश मानगावकर यांच्या संघांनही कांस्यपदक पटकावलं. स्क्वॅशमध्येच भारताच्या महिला संघानं मलेशियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

****



 चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडनं दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव २७३ धावांवर संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी मिळाली आहे. भारताच्या चेतेश्वर पुजारानं १३२ धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. इंग्लंडच्या मोईन अलीनं पाच गडी बाद केले.

****



 येत्या डिसेंबर मध्ये तीन राज्यांच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणुकीचा घाट घालत असल्याचा आरोप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. इव्हिएम - मतदान यंत्रांच्या उपयोगाबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी शंका उपस्थितीत केली.    

****



 केंद्र सरकारनं सुरु केलेल्या दीनदयाल कौशल विकास योजनेअंतर्गत जळगाव इथल्या दीपक जावळे या तरुणानं संगणकाचा ॲनिमेशन ॲण्ड मल्टिमेडिया हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत या योजनेचा झालेला फायदा सांगतांना दीपक जावळे  म्हणाले  -

मी दीनदयाल उपाध्याय योजना राष्ट्रीय उपयोगी अभियान याअंतर्गत ॲपेक्स कम्पूटर जळगाव या ठिकाणी ॲनिमेयशन ॲण्ड मल्टिमेडिया हा सहा महिन्यापर्यंत कालावधीचा अभ्यासक्रम शिकलो. आणि या अभ्यासक्रमाअंर्तगत मला बेसिक कम्पूटर, ग्रॉफिक डिझांइनीग, प्रिटिंग मिडिया. 2डी अॅनिमेशन आणि 3डी अॅनिमेशन या सारख्या आधुनिक विषयावर मी याठिकाणी स्थडीकेला. आणि या योजनेचं महत्त्व सांगायचं म्हटंल म्हणजे बाहेर ॲनिमेयशनया सारख्या याच अभ्यासक्रमाची फी जवळपास 1लाख ते दिडलाख रूपये आहे. आणि ही योजना माननीय पंतप्रधान यांनी सूरू केल्यामुळे आमच्या सारख्या तरूणांना एक वेगळ्या प्रकारचा आणि आधूनिक तऱ्येचा प्लाटर्फाम त्यांनी उपलब्ध करूण दिला. आमची जी परिस्थिती आहे. ही परिस्थिती अत्यंत हालाखीची असून माझे वडील एम.आय.डी.सी. मध्ये चटाईच्या कंपनी मध्ये जाऊन आमच्या कुटूंबाचं पालनपोषण करतात. या योजनाअंतर्गत हा अभ्यासक्रम मी मोफत शिकल्यामुळे याच प्रशिक्षण केंद्रामार्फत मला हा अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर एक रोजगाराची संधी उपलब्ध करूण दिली गेली. त्याबद्दल मी नरेंद्र मोदीजीनचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.

****



 एकलव्य संघटनेच्यावतीनं विविध मागण्यांसाठी काल औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापर्यंत टिकोरा मोर्चा काढण्यात आला होता. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये, वन जमीन आदिवासींच्या नावे करण्यात यावी, स्वाभिमान सबळीकरण योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासह विविध मागण्यांचं निवेदन आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प आधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं.

****



 औरंगाबाद इथल्या बीड बायपासवर काल देवळाई चौकात हायवा ट्रकनं मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर झाल्टा फाट्यावर एका माल मोटारीनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील गर्भवती महिला ठार झाली.

*****

***

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...