आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 13 August 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 13
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या
घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला. हे अभियान आता
लोकचळवळ बनली असून, ज्यामुळे देशात एकतेचा
संदेश प्रसारित होत असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.
या अभियानांतर्गत अनेक केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेते
आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवून या देशभक्ती मोहिमेत सहभागी झाले. क्रीडा राज्यमंत्री
रक्षा खडसे यांनीही दिल्लीत शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकवून स्वातंत्र्य सैनिकांना
आदरांजली अर्पण केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ इथं झालेल्या
तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.
दरम्यान, हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत इतरही अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
ठिकठिकाणी निघालेल्या तिरंगा फेऱ्यांमध्ये नागरीक उत्स्फुर्त सहभाग नोंदवत आहेत.
****
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने भारतीय सांख्यिकी संस्थेसोबत
डेटा-आधारित नावीन्यपूर्ण संशोधनासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. प्राधिकरणाच्या
उपमहासंचालक तनुश्री देब बर्मा आणि भारतीय सांख्यिकी संस्थेच्या बंगळूरू केंद्र प्रमुख
बी. एस. दया सागर यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या कराराद्वारे आधार संबंधित व्यवहारांना
अधिक बळकटी दिली जाईल, तसंच त्यांची सुरक्षा
आणि विश्वासार्हता वाढवली जाईल.
****
भारताने तत्काळ भू-मार्गाने बांगलादेशातून ज्यूट उत्पादनं
आणि दोरखंड यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार, ज्यूट कापड, दोर, दोरखंड आणि पिशव्या यांसारख्या वस्तू आता केवळ महाराष्ट्रातल्या
न्हावा शेवा बंदरातूनच भारतात येऊ शकतील. हा निर्णय गुणवत्ता नियंत्रण आणि देशांतर्गत
उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातल्या आपत्तीग्रस्त
धाराली-हर्षिल भागात बेपत्ता लोकांसाठी शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे. आतापर्यंत एक
हजार ३०८ लोकांना वाचवण्यात आलं आहे. उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाने बेपत्ता असलेल्या
६८ लोकांची यादी देखील जारी केली असून, त्यात नेपाळी वंशाच्या २५ व्यक्तींचा समावेश आहे
****
राज्यातल्या ६० साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सुमारे
३८७ कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. आगामी गाळप हंगाम जवळ आला असताना गेल्या हंगामातली
ही रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातल्या नऊ कारखान्यांनी
सुमारे एफआरपी चे ८१ कोटी रुपये थकवले असून, ही संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल अहिल्यानगर आणि कोल्हापूर
जिल्ह्याचा क्रमांक लागतो, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
अमेरिकेतल्या नेब्रास्का विद्यापीठ आणि भुवनेश्वर इथल्या
भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी अहिल्यानगर जिल्ह्यात हिवरे बाजार पाणलोट
क्षेत्राला भेट देऊन प्रकल्प कार्यपद्धतीचा अभ्यास केला. भेटीदरम्यान मृद आणि जलसंधारण
अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉ. सचिन कुमार नांदगुडे यांनी
सध्या सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण पाणलोट क्षेत्रातल्या कार्बन स्थिरीकरण प्रकल्पात
वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार
यांची भेट घेऊन नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास आणि ग्रामविकासात हिवरे बाजारच्या क्रांतिकारक
कार्यावर चर्चा झाली.
****
हिंगोली जिल्ह्यात वाशिम - हिंगोली मार्गावर एका मालवाहू
पिकअप वाहनाला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक देउन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
झाला. आज सकाळी हा अपघात झाला. अनिल आणि मोहन ठाकरे अशी मृतांची नावं असून, ते अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरचे रहीवाशी होते.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी बायपासवर ठाणे पोलिसांनी मोठ्या
प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे
पोलिसांनी सापळा रचून तनवीर अहमद आणि महेश हिंदूराव देसाई यांना रंगेहाथ अटक केली.
त्यांच्याकडून सुमारे ३२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
****
‘माझं लातूर, हरीत लातूर’ मोहीमेअंतर्गत लातूर
शहरातल्या गंजगोलाई परिसरात येत्या रविवारी ‘लातूर हरितोत्सव’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात
येणार आहे. यानिमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई दरम्यान वृक्ष दिंडी काढण्यात
येणार असून, रोपवाटिकांचे स्टॉल्सही लावण्यात
येणार आहेत.
****
माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विविध
क्षेत्रातल्या कार्यासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. आयआयटी, आयआयएम, एम्स अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी
केलेल्या क्रीडापटूंना पारितोषकं देण्यात येणार आहे. इच्छुकांनी छत्रपती संभाजीनगर
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन सैनिक कल्याण विभागानं केलं
आहे.
****
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 August
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस
आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला. हे अभियान
आता लोकचळवळ बनली असून, ज्यामुळे देशात एकतेचा संदेश प्रसारित होत असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात नमूद केलं.
****
व्यापार करारांबाबतच्या इतर देशांच्या दबावाला बळी न
पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी धाडसी निर्णय घेतल्याबद्दल देशभरातल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शेतकरी संघाटनांचे नेते आणि शेतकऱ्यांनी काल केंद्रीय
कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन आभार मानले. बनावट खते आणि रसायनज उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नवे कायदे करणार असल्याचा
पुनरुच्चार चौहान यांनी यावेळी केला.
****
लोकसभेत काल भारतीय बंदरे विधेयक २०२५ मंजूर झालं. बंदरांसंबंधित
सर्व कायद्यांना एकत्र आणून एकात्मिक बंदर विकास साधणं, तसंच व्यवसायसुलभता आणत देशाच्या किनारपट्टीचा सर्वोत्तम
वापर साधण्याचं कार्य या विधेयकामुळे साध्य होईल. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन विधेयकही
काल सभागृहात मंजूर झालं.
राज्यसभेत नवं आयकर विधेयक, कर आकारणी विधेयक, राष्ट्रीय क्रीडा सुशासन विधेयक २०२५
तसंच राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी विधेयक २०२५ ही विधेयकं मंजूर करण्यात आली.
‘एक देश- एक निवडणूक’ विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा
अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार हा अहवाल आता संसदेच्या
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी सादर करता येईल.
****
रायगड जिल्ह्यातल्या उरण इथं काल बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या
जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी आणि इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने, ग्रीन अँड डिजिटल मेरिटाईम कॉरिडॉर्स
लिडर्स डायलॉग आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित
होते. भारत आणि सिंगापूर यांच्यात सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात वाढतं सहकार्य
आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंध अधिक दृढ होत असून यामुळे विशेषतः महाराष्ट्र
आणि सिंगापूरमधल्या संबंधांना नवीन आयाम मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
राज्यातल्या ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी
शासन सकारात्मक असल्याचं, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मुंबईत काल २०२३-२४
या वर्षाचे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट
ग्रंथालय कार्यकर्ता तसच सेवक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. वाचनाची
आवड निर्माण होण्यासाठी ग्रंथालयांनी प्रदर्शनं, पुस्तक परीक्षण, कविता वाचन यासारखे कार्यक्रम घ्यावे, असं त्यांनी सूचित केलं. मान्यता
रद्द झालेल्या दोन हजार नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार असून, ज्या सार्वजनिक वाचनालयाला ५०, ७५ आणि १०० वर्ष पूर्ण झाली आहेत
त्यांना विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही पाटील यांनी केली.
****
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने मॅजिक गोल्ड
बुलियन या कंपनीविरोधात केलेल्या कारवाईत कंपनीचा संचालक यशवंत कुमार टेलर याला अटक
केली आहे. टेलर याने ३० कोटी ५१ लाख रुपयांच्या महसुलात अफरातफर केल्याचा आरोप आहे.
वस्तुंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बिलं जारी करणाऱ्या पुरवठादारांकडून चुकीच्या पद्धतीने
इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणं किंवा वापरणं अशा कारवायांमध्ये टेलर याचा सहभाग असल्याचं
आढळलं आहे. त्याला मुंबईच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन
कोठडी सुनावली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वाशिम - हिंगोली मार्गावर एका मालवाहू
पिकअप वाहनाला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक देउन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
झाला. आज सकाळी हा अपघात झाला. अनिल आणि मोहन ठाकरे अशी मृतांची नावं असून, ते अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरचे
रहीवाशी होते.
****
अंगारकी चतुर्थीनिमित्त काल जालना जिल्ह्यातल्या राजुरेश्वर
गणपतीची माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या
उपस्थितीत महापूजा करण्यात आली. काल जवळपास दहा लाख भाविकांनी राजुरेश्वराचं दर्शन
घेतलं.
****
साड्यांची महाराणी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्राची
पैठणी आता लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतिक
कार्य मंत्री आशिष शेलार सध्या लंडन दौऱ्यावर असून, त्यांनी तिथल्या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर काल संचालकांसोबत
झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
****
अहिल्यानगर शहरातल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकस्थळी
उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण काल विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या
हस्ते झालं. हे प्रवेशद्वार, भावी पिढ्यांना देशभक्ती, शौर्य आणि ऐक्याचा संदेश देणारं स्मारक ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 August
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
केंद्रीय मंत्रिमंडळाची
चार नव्या सेमीकंडक्टर योजनांना मंजुरी, देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात गेल्या ११ वर्षांत
सहा पट वाढ
·
१८ व्या खगोलशास्त्र आणि
खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडला मुंबईत सुरुवात
·
पोलीस दलात शिपायांची १५
हजार पदं भरण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
·
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत
राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन
आणि
·
राज्याच्या बहुतांश भागात
पावासाचा अंदाज, मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना पुढील तीन दिवस हवामान विभागाकडून
यलो अलर्ट जारी
****
केंद्रीय
मंत्रिमंडळाने चार नव्या सेमीकंडक्टर योजनांना मंजुरी दिली. सुमारे चार हजार ५९४ कोटी
रुपयांचे हे प्रकल्प ओडिशा, पंजाब आणि आंध्रप्रदेशात उभारले जाणार आहेत. अरुणाचल प्रदेशातला
टॅटो टू जलविद्युत प्रकल्प तसंच लखनऊ मेट्रोच्या पुढच्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने
मंजुरी दिली.
दरम्यान, देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स
उत्पादनात गेल्या ११ वर्षांत सहा पट वाढ झाली असून, इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत आठ पट वाढ झाली आहे. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. देशांतर्गत मोबाईल उत्पादनातही सुमारे दीडशे पट वाढ झाल्याचं
त्यांनी सांगितलं.
बाईट-
प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
****
भारतात
परंपरा आणि नवोन्मेष, आध्यात्मिकता आणि विज्ञान, औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात, असं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं
औपचारिक उद्घाटन काल मुंबईत झालं, या कार्यक्रमाला पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
संबोधित करत होते. विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती आणि विविध प्रयोगाविषयी
त्यांनी यावेळी माहिती दिली. या ऑलिम्पियाड मध्ये ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी
सहभागी झाले असून, पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलं.
****
राज्य
मंत्रिमंडळाची काल बैठक झाली, या बैठकीत पोलीस दलात शिपायांची १५ हजार पदं भरण्याला
मंजुरी देण्यात आली. या भरतीमध्ये २०२२ आणि २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा
ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.
रास्त
भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना
अन्नधान्याचं वितरण करण्याला, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत, विविध महामंडळांच्या कर्ज
योजनेतल्या जामीनदारीच्या अटी शिथिल करणं आणि शासन हमीला पाच वर्षांची मुदतवाढ देण्यालाही
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
नवी
मुंबईत ऐरोली इथं कॅपिटालॅंडच्या डाटा सेंटरचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते उद्घाटन झालं. यानंतर बातमीदारांशी बोलतांना फडणवीस यांनी, देशाची ६० टक्के डेटा सेंटर
महाराष्ट्रात असल्याची माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्य
मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला रक्षाबंधन तसंच सलगच्या सुट्टयांमुळे झालेल्या प्रवासी
वाहतुकी मधून १३७ कोटी रुपये उत्पन्न झालं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
ही माहिती दिली. ११ ऑगस्ट या एकाच दिवशी तब्बल ३९ कोटी रुपये उत्पन्न महामंडळाला प्रवासी
वाहतुकीतून मिळालं, चालू आर्थिक वर्षात हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचं सरनाईक
यांनी सांगितलं.
****
राज्य
सरकारचं जनसुरक्षा विधेयक तसंच त्रिभाषा सूत्राला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध
दर्शवला आहे. पक्ष कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत पक्षाचं धोरण निश्चित
करण्यात आलं. भाकपचे राज्य सचिव सुभाष लांडे तसंच राज्य सचिव मंडळ सदस्य नामदेव चव्हाण
यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
राज्यात
पॉलिटेक्निक अर्थात तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या २०२५-२६ या पहिल्या वर्षासाठी
आतापर्यंत एक लाख तीन हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशाची टक्केवारी
तब्बल ९३ टक्के झाली असून, हे मागील दहा वर्षांतलं सर्वोच्च प्रमाण आहे. विद्यार्थ्यांचा
कल पाहता, तंत्रनिकेतन
प्रवेशाची मुदत चार सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
हर
घर तिरंगा अभियानात सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत
या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं, आणि येत्या स्वातंत्र्यदिनी आपापल्या घरांवर तिरंगा
ध्वज फडकवण्याचं आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं...
बाईट-
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत
नांदेड
जिल्ह्यात या अभियानांतर्गत काल स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. जिल्ह्यातल्या सर्व
तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भोकर, किनवट, हिमायतनगर या तालुका बसस्थानकांवरही स्वच्छता करण्यात
आली.
हर
घर तिरंगा या अभियानात सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी महानगपालिकेचे
मुख्य लेखाधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते यांनी केलं. परभणी महानगरपालिकेतर्फे काल तिरंगा
सायकल फेरी काढण्यात आली. क्रीडा प्रेमी, सायकलिस्ट, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी
झाले. या फेरीत सहभागी झालेले सायकलपटू कल्याण देशमुख यांनी या फेरीबाबत माहिती दिली...
बाईट-
सायकलपटू कल्याण देशमुख
लातूर
शहरातही महानगरपालिकेतर्फे मोटार सायकल फेरी काढण्यात आली. नागरिकांना महानगरपालिकेतर्फे
तिरंगा ध्वज मोफत दिला जाणार असून, प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावण्याचं आवाहन प्रशासनानं
केलं आहे.
दीनदयाळ
अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत लातूर महानगरपालिका परिसरात
तिरंगा ध्वज आणि त्यावर आधारित विविध वस्तूंचं विक्री केंद्र सुरु करण्यात आलं आहे.
धाराशिव
इथं हर घर तिरंगा अभियानाच्या आयोजनाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
मैनाक घोष यांनी माहिती दिली...
बाइट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी मैनाक घोष
****
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती
यांच्या संयुक्त विद्यमाने "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५"ला
आजपासून प्रारंभ होत आहे. मुंबईतल्या कुर्ला क्रीडा संकुल इथं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते या महाकुंभचं उद्घाटन होणार असून, सोळा प्रकारच्या स्पर्धा यात होणार आहेत.
****
बीड
इथं काल केशरकाकू महाविद्यालयात बालरंगभूमी परिषदेच्या ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या स्पर्धेची
प्राथमिक फेरी पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते या फेरीचं
उद्घाटन झालं. या प्राथमिक फेरीत जिल्ह्यातले ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
****
शक्तीपीठ
महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या महाळंगी गावातील मोजणीचा टप्पा शंभर टक्के पूर्ण
झाला आहे. जिल्ह्यातल्या तेरा गटधारक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी स्वेच्छेने
आपली जमीन देण्यास संमती दिली होती. त्यानुसार काल जिल्हा उपविभागीय अधिकारी ओंकार
देशमुख, उपअधीक्षक
भूमि अभिलेख मोरे यांच्या उपस्थितीत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
****
हवामान
राज्यात
कोकण, विदर्भ
तसंच मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांना आज तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांना
उद्यापासून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...