Sunday, 31 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

प्रत्येक नागरिकानं स्वेदेशीचा आग्रह धरावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशावाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाच्या मालिकेतील १२५व्या भागामध्ये बोलत होते. ते म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

युवकांनी क्रीडा क्षेत्रात रस घ्यावा अशी सूचना त्यांनी केली. व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. क्रीडाक्षेत्रात अलिकडच्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे खेळाडू ओडिशाची रश्मिता साहु आणि श्रीनगरचा मोहसीन अली यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

हैदरबाद मुक्ती संग्रामात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासहेब आंबेडकर यांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले..

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सौरउर्जेचा वापर करत गावाचा विकास साधणाऱ्या मुजफ्फरपूरच्या रतनपुरा इथल्या सोलारदीदी देवकी यांचा गौववपूर्ण उल्लेख करत पंतप्रधानांनी सौरउर्जेच्या माध्यमातून होत असलेल्या क्रांतीची माहिती दिली. सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी स्वच्छतेचा अंगीकार करावा, असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत चिनपिंग इथं चर्चा केली. मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीच्या निमित्तानं चीनमध्ये आहेत. ते संघटनेतील इतर नेत्यांसोबतही द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. मोदी हे संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनाससुद्धा उपस्थित राहतील. परराष्ट्र मंत्रालयातल्या पश्चिम विभागाचे सचिव तन्मय लाल यांनी सांगितलं की, संघटनेची स्थापना प्रामुख्यानं दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकवाद नष्ट करण्याच्या उद्देशानं करण्यात आली होती, पण अशी अनेक अन्य क्षेत्रं आहेत ज्यामध्ये सदस्य देश सहकार्य वाढवू शकतात.  भारत २०१७ पासून या संघटनेचा सदस्य आहे. २०२२-२३मध्ये भारत या संघटनेचा अध्यक्ष होता. शांघाय सहकार्य संघटनेत एकूण दहा सदस्य देश आहेत.

****

सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं उद्यापासून उपोषणाची तीव्रता वाढवणार असून पाणी घेणंही बंद करणार असल्याचा इशारा मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. मुंबईतल्या आझाद मैदान इथं जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी शांतपणे आंदोलन करण्याचं आवाहन आंदोलकांना केलं.

****

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ती ३८ वर्षांची होती. गेल्या काही काळापासून ती कर्करोगाने ग्रस्त होती. आज दुपारी चार वाजता मुंबईतल्या मीरा रोड मधल्या स्मशानभूमीत तिच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाउस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प धरणाच्या सांडव्याच्या २ दरवाजांमधून कुंडलिका नदीपात्रात एक हजार ६८३ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळं कुंडलिका नदी काठावरील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन आज धरणाची दोन दारं उघडून पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती धनेगांव पुरनियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली.

****

मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा जामिनासाठीचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जावरील निकाल अद्याप राखून ठेवण्यात आला आहे.

****

No comments: