Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 28 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
मावळत्या वर्षानं भारताला
दिला आणखी आत्मविश्वास- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन
·
भारत सुरक्षेशी तडजोड करत
नसल्याचं जगानं अनुभवलं- पंतप्रधान
·
पंतप्रधानांनी केली
क्रिकेटमधील कामगिरीची प्रशंसा
आणि
·
काँग्रेस आणि वंचित बहुजन
आघाडीची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा, अन्य
२८ महापालिकांसाठीही आघाडीची चर्चा
****
नव वर्ष २०२६ साठी देशवासियांना शुभेच्छा देताना मावळत्या
वर्षानं स्वदेशीच्या माध्यमातून भारताला आणखी आत्मविश्वास दिला असल्याचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील `मन
की बात` या कार्यक्रम मालिकेतल्या १२९व्या भागामध्ये देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी
बोलत होते. ते म्हणाले…
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
यावेळी त्यानी सरत्या वर्षातील अनेक घटनांच्या आढावा घेत
स्मरण केलं. 'ऑपरेशन सिंदूर '
हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचं प्रतीक असुन भारत
आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नसल्याचं जगानं पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले.
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुढच्या महिन्यात आपण देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा
करणार आहोत. जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आपलं हृदय स्वातंत्र्यसैनिक
आणि संविधान निर्मात्यांबद्दलच्या कृतज्ञतेनं भरून येतं असं मोदी म्हणाले.
ओडिशाच्या स्वातंत्र्यसेनानी पार्वती गिरी यांची जानेवारी २०२६ मध्ये जन्मशताब्दी
साजरी केली जाईल. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी भारत छोडो चळवळीत भाग घेतला.
स्वातंत्र्य चळवळीनंतर गिरी यांनी आपलं जीवन समाजसेवा आणि आदिवासी कल्याणासाठी
समर्पित केलं. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली. त्यांचं प्रेरणादायी जीवन
प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करत असल्याचं ते म्हणाले. आपल्या देशाची सर्वात सुंदर
गोष्ट म्हणजे वर्षभर देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात उत्सवाचं वातावरण असतं हे
सांगत गुजरातमधील रणोत्सव २३ नोव्हेंबर रोजी सुरू झाला आणि तो २० फेब्रुवारीपर्यंत
चालणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमात कच्छची विविध लोकसंस्कृती, लोकसंगीत, नृत्य
आणि हस्तकला यांचं दर्शन घडतं. कच्छच्या पांढऱ्या रणाची भव्यता पाहणं हा खरोखरच एक
आनंददायी अनुभव असल्याचं ते म्हणाले. देशातील पारंपरिक कला केवळ समाजाला सक्षमच
बनवत नाहीत तर लोकांच्या आर्थिक प्रगतीचं एक मोठं माध्यम बनत आहेत. पंतप्रधानांनी
क्रीडाक्षेत्रातील गौरवपूर्ण कामगिरीचा आवर्जुन उल्लेख केला.
ते म्हणाले.
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
आंध्र प्रदेशच्या नरसापुरम जिल्ह्यातल्या महिलांच्या
हातातील लेस क्राफ्टची चर्चा आता संपूर्ण देशात पसरत असल्याचं मोदी म्हणाले. आंध्र
प्रदेश सरकार आणि नाबार्ड हे एकत्र येऊन कारागिरांना नवीन डिझाईन्स शिकवत आहेत. या
लेसला जीआय टॅग मिळाला असुन यापासून ५०० पेक्षा अधिक उत्पादनं बनवली जात असल्याचं
मोदी म्हणाले. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्लातील जेहनपोरा इथले उंच ढिगारे हे
नैसर्गिक नसल्याचं मोदी यांनी सांगितल. नंतर फ्रान्समधल्या एका संग्रहालयाच्या
भांडारात एक जुना,
अस्पष्ट फोटो सापडला. बारामुल्लाच्या त्या फोटोमध्ये तीन
बौद्ध स्तूप दिसत होते. इथूनच काळानं एक वळण घेतलं आणि काश्मीरचा वैभवशाली भूतकाळ
आपल्यासमोर आल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. हा सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास
आहे. काश्मीरमधला जहानपोराचा हा बौद्ध परिसर आपल्याला काश्मीरचा भूतकाळ काय होता, त्याची
ओळख किती समृद्ध होती याची आठवण करून देत असल्याचं ते म्हणाले.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज कर्नाटकातल्या
कारवारमधल्या कदंब नौदल तळाला भेट दिली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी
त्यांचं स्वागत केलं. नौदलतळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी आयएनएस वाघशील पाणबुडीतून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यावेळी
त्यांच्या सोबत होते. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती एपीजे
अब्दुल कलाम यांच्यानंतरच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत.
****
मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या
संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहभागी झाले. शिक्षण
आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी
म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या
संस्थेच्या स्थापनेतही अशाच वैश्विक विचाराचं स्वरुप दिसून येतं असं ते म्हणाले.
मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आभासी पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी
झाले होते.
****
राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त नवी दिल्ली इथं केंद्रीय
ग्राहक व्यवहार,
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बॉम्ब
निकामीकरण प्रणाली कार्यक्षमता मूल्यमापन आणि आवश्यकता हे भारतीय मानक प्रकाशित
केलं. बॉम्ब निकामीकरण कार्यांमध्ये सुरक्षितता आणि मानकीकरण अधिक बळकट करण्याच्या
उद्देशाने हे मानक तयार करण्यात आलं आहे.
****
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महापालिका
निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. मुंबईतील २२७ जागांपैकी ६२ जागा वंचित
आघाडी लढविणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे
नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या आघाडीची घोषणा
केली. संविधानाला अभिप्रेत भारत घडविणं हा दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा असल्यानं
दोन्ही पक्षातील मैत्री ही नैसर्गिक स्वरूपाची असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी
यावेळी सांगितलं. समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं
सांगतानाच राज्यातील अन्य २८ महापालिकांसाठीही आघाडीची चर्चा सुरू असल्याचही
त्यांनी स्पष्ट केलं.
****
सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाची युती झाली असुन दोन्ही पक्ष आता ५१- ५१ जागेवर लढणार आहेत. माजी मंत्री
शिवसेनेचे नेते सिध्दाराम म्हेत्रे यांनी आज सोलापुरमध्ये याची माहिती दिली.
भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव न आल्यानं अनेक दिवस चालेली
चर्चा निष्फळ ठरल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या महापालिका निवडणुकीत मतदारांचा
कौल निश्चित या युतीला मिळेल असं म्हेत्रे म्हणाले. लवकरच उमेदवारांची अधिकृत
घोषणा होईल असंही ते यावेळी म्हणाले.
****
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ
असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज
दुपारी बारा वाजता घटस्थापनेनं झाली. मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या
हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना केली. तत्पूर्वी आज पहाटे
देवीची मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. सात दिवस
चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता ३ जानेवारी रोजी शाकंभरी
पौर्णिमेला दुपारी १२ वाजता पूर्णाहुती आणि त्यानंतर घटोत्थापनानं होणार आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि श्रीलंकेदरम्यान
चौथा टी – ट्वेंटी सामना आज तिरुवअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या
सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेने भारताने तीन – शून्य
अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी
अंमलबजावणीच्या अनुषंगाने पालघर जिल्हा परिषद पुढाकारातून पालघर जिल्ह्यातल्या
वाडा खडकोना ग्रामपंचायत हद्दीत सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची
यशस्वी उभारणी करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
सभापतीपदाची निवड येत्या मंगळवारी- ३० डिसेंबरला होणार आहे. राधाकिसन पठाडे यांनी
राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं.
उमेदवारी अर्जाची छाननी, माघार,
अंतिम उमेदवार यादी घोषित करणं, मतदान
प्रक्रिया आणि मतमोजणी या प्रक्रिया राबवून नवीन सभापतीची निवड केली जाणार
असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment