Monday, 3 September 2018

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad, Date: 03.09.2018 ,Time:8.40-8.45 am

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 03 September 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 03؍ستمبر۲۰۱۸؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
***** ***** *****
 وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے کہا ہے کہ زرعی پیداوار کو مناسب قیمت دئیے جانے کے لیے ریاستی حکومت لائحہ عمل تیار کرے گی۔ وزیرِاعلیٰ کل نئی ممبئی کے واشی میں ا یک کریڈٹ سوسائٹی کی تقریب سے خطاب کررہے تھے۔ انھوں نے کہا کہ مرکزی حکومت کے ذریعے کیے گئے قومی منڈی کے فیصلے میں بازار کمیٹی کی اہمیت بڑھ گئی ہے۔ وزیرِ اعلیٰ نے یہ بھی کہا کہ سماج کے نچلے طبقات تک ترقی کے ثمرات پہنچانے کیلئے مالی ادارے بڑی اہمیت رکھتے ہیں اور ملک سمیت ریاست کے اقتصادی ترقی میں ان کا بڑا حصہ ہے۔ انھوں نے اپیل کی کہ اسٹارٹ اپ اسکیم کے تحت نوجوانوں کو قرض کی فراہمی کے لیے مالی ادارے پیش رفت کریں۔
***** ***** *****
 نکسلیوں سے تعلقات کے الزام کے تحت گذشتہ ماہ جون میں گرفتار پانچ افراد کے خلاف چارج شیٹ داخل کرنے کیلئے پونا سیشن عدالت نے پولس کو دی گئی مدت میں 90/ دنوں کی توسیع کردی۔ پونا پولس کی جانب سے مدت میں توسیع کی درخواست کو کل عدالت نے سماعت کے دوران منظوری دی۔ اس توسیع کے سبب ملزمین کو ضمانت حاصل کرنے کیلئے فائدہ نہیں ملے گا۔ پونا میں منعقدہ یلغار کانفرنس کے نکسلائٹس سے تعلق کے الزام میں اس کانفرنس میں مشتبہ بیانات دینے کے معاملے میں پولس نے ماہِ جون میں سدھیر ڈھولے‘ رونا ولسن‘ مہیش رائوت‘ سریندر گڑلنگ اور شوما سین کو گرفتار کیا تھا۔
***** ***** *****
مرکزی وزیر رام داس آٹھولے نے کہا ہے کہ یہ کہنا غلط ہوگا کہ مودی کے دورِ حکومت میں درجِ فہرست ذاتوں اور قبائل پر ظلم میں اضافہ ہوا ہے۔ وزیرِ موصوف نے کل نئی دہلی میں کہا کہ ذات سے متعلق ظلم ملک میں اب بھی جاری ہے۔ انھوں نے یہ بھی کہا کہ حکومت کسی کی بھی ہو‘ مجرمین کے خلاف اقدامات کیے جانے چاہیے۔ اس موقع پر انھوں نے آئندہ عام انتخابات میں جنوب وسطی ممبئی سے اپنی اُمیدواری کا اشارہ بھی دیا۔
***** ***** *****
مہاراشٹر نونرمان سینا کے سربراہ راج ٹھاکرے نے الزام عائد کیا ہے کہ BJP دوسری جماعتوں میں پھوٹ ڈال کر حزبِ اختلاف کو ڈرا دھمکاکر اور خوب پیسے خرچ کرکے انتخابات میں کامیابی حاصل کرتی ہے۔ وہ کل دھولیہ میں پارٹی کنونشن سے مخاطب تھے۔ انھوں نے مرکزی حکومت پر تنقید کرتے ہوئے کہا کہ 2014ء میں وزیرِ اعظم نریندر مودی کو اکثریت حاصل ہوئی اور اس کے بدلے میں انھوں نے نوٹ بندی کی۔ انھوں نے مزید کہا کہ شہروں کے ہجوم میں اضافہ ہورہا ہے۔ دوسرے صوبوں سے لوگ ریاست میں آرہے ہیں اور یہ صورتحال کل کے لیے ایک چیلنج ہے۔
***** ***** *****
 ممبئی عدالت ِ عالیہ نے ہدایت دی ہے کہ ریاستی حکومت کی تمام Websites میں اس طرح تبدیلی کی جائے کہ معذور افراد بھی اسے استعمال کرسکیں۔ ایک رضاکار تنظیم کی جانب سے دائر کی گئی مفادِ عامّہ کی درخواست پر سماعت کے دوران عدالت نے یہ ہدایت دی۔ عدالت نے Websites میں تبدیلی کیے جانے کے بعد آئندہ تین مہینوں میں اس تعلق سے رپورٹ پیش کرنے کی ہدایت بھی دی۔
***** ***** *****
 بھارتیہ دُور سنچار نگم لمیٹیڈ BSNLکی جانب سے گاہکوں کیلئے شروع کی گئی CDMA خدمات ’’ترنگ‘‘ پرسوں بدھ سے بند کردی جائیگی۔ BSNL کی جانب سے جاری مکتوب میں کہا گیا ہے کہ موبائل شعبے میں کمپنیوں کے اضافے اور نئی ٹیکنالوجی کے سبب اس خدمت کی مانگ میں کمی کی وجہ سے یہ فیصلہ کیا گیا۔
***** ***** *****
 اقلیتی کمیشن کے چیئرمین اور شیوسینا کے قائد حاجی عرفات شیخ نے بھارتیہ جنتا پارٹی میں شمولیت اختیار کرلی ہے۔ ممبئی BJP کے صدر آشیش شیلار اور وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس سے ملاقات کے بعد وہ BJPمیں شامل ہوئے۔ دو دِن قبل ہی انہیں حکومت کی جانب سے اقلیتی کمیشن کے چیئرمین عہدے پر نامزد کیا گیا۔
***** ***** *****
 انڈونیشیاء کے جکارتہ میں کل 18/ ویں ایشیائی کھیل مقابلوں کا اختتام عمل میں آیا۔ اختتامی تقریب میں خواتین ہاکی ٹیم کی کپتان رانی رام پال بھارت کی پرچم بردار تھیں۔ بھارت نے ان مقابلو ںمیں 15/ سونے‘ 24/ چاندی اور 30/ کانسے کے تمغے جیت کر میڈل ٹیلی میں 8 / واں مقام حاصل کیا۔ اب تک ہوئی ایشیائی مقابلوںمیں بھارت کی یہ سب سے زیادہ تمغوں کی کمائی ہے۔
***** ***** *****
 چوتھے ٹسٹ کرکٹ مقابلے میں انگلینڈ نے بھارت کو 60/ رنوں سے شکست دے دی۔ اس طرح انگلینڈ نے 5/ میں سے 3/ مقابلے جیت کر سیریز اپنے نام کرلی۔ انگلینڈ نے جیت کے لیے بھارت کے سامنے 245/ رنوں کا ہدف رکھا تھا‘ تاہم بھارتی ٹیم 184/ رنوں پر ہی آئوٹ ہوگئی۔ انگلینڈ کے اسپین گیند باز معین علی نے 4/ وکٹ لیے۔ انہیں مین آف دی میچ قرار دیا گیا۔
***** ***** *****
 لاتور ضلع کی نلنگہ تحصیل آفس کی نئی عما رت کا افتتاح کل رابطہ وزیر سنبھاجی پاٹل نلنگیکر کے ہاتھوں عمل میں آیا۔ اس موقع پر رکنِ پا رلیمنٹ سنیل گائیکواڑ بھی موجود تھے۔
***** ***** *****  

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.

****



·      शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी राज्य सरकार धोरणं आखणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ

·      राज्य सरकारची सर्व संकेतस्थळं दिव्यांगांभिमुख करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

आणि

·      अठराव्या अशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप. तर, चौथ्या कसोटीत भारताला साठ धावांनी पराभूत करून इंग्लंडनं पाच कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकली

****



 शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी राज्य सरकार धोरणं आखणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबईत वाशी इथं एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात काल ते बोलत होते. केंद्र सरकारनं केलेल्या राष्ट्रीय बाजारपेठेच्या निर्णयामध्ये बाजार समितीचं महत्व वाढणार असल्याचं  नमूद करुन  समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी  वित्तीय संस्था महत्वाच्या असल्याचं ते म्हणाले. देशासह राज्याच्या आर्थिक वाटचालीत वित्तीय संस्थांचा वाटा मोठा असून तरूणांना स्टार्टअप उद्योगासाठी  कर्ज देण्यास त्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

****



 नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून जून महिन्यात  अटक केलेल्या पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे सत्र न्यायालयानं काल पुणे पोलिसांना  ९० दिवसांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी परवा शनिवारी न्यायालयात अर्ज केला होता. तो कालच्या सुनावणीत न्यायालयानं मंजूर केला. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सरकारी वकिलांनी या सुनावणी दरम्यान केली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यानं आरोपींना जामिनासाठी फायदा मिळणार नाही. पुण्यात आयोजित एल्गार परिषदेशी नक्षलवाद्यांचा संबंध असल्याच्या आरोपावरून आणि या परिषदेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी जून महिन्यात सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग आणि शोमा सेन या पाच जणांना अटक केली होती. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांवर अत्याचार वाढले असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत बोलत होते. मात्र जातीशी संबंधित अत्याचार देशात सुरूच आहेत, असं सांगून सरकार कोणत्याही पक्षाचं असो, गुन्हेगारांविरूद्ध सरकारनं पावलं उचलायला हवीत असं ते पुढं म्हणाले. २०१९ ची निवडणूक दक्षिण मध्य मुंबईतून लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

****



 इतर पक्ष फोडणं, विरोधकांना धमकावणं, प्रचंड पैसा खर्च करणं या मार्गांनी भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते काल  धुळे इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं, पण त्या बदल्यात मोदींनी नोट बंदी केली, असं सांगत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. शहरातली गर्दी वाढतेय, परप्रांतीय लोक राज्यात  येत आहेत, ही स्थिती उद्याचं आव्हान आहे, असं ते म्हणाले.

****



 राज्य सरकारच्या सर्व संकेतस्थळांमध्ये दिव्यांगांना वापरता येतील, अशा रितीनं बदल करावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. संकेतस्थळांमध्ये बदल केल्यानंतर त्या बाबतचा अहवाल पुढच्या तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****



 अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष शिवेसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी भाजप प्रवेश केला. दोनच दिवसापूर्वी त्यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारनं नियुक्ती केली आहे.

****



 राज्यातल्या ३० जिल्ह्यांमध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे. द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी, पेरू, डाळींब, आंबा, काजू या फळपिकांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्या महसूल मंडळात अधिसूचित फळपिकांचं क्षेत्र २० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या महसूल मंडळासाठी ही योजना आहे.

****



 भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड-बीएसएनएल तर्फे ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली सीडीएमए तरंग सेवा परवा बुधवारी पासून बंद करण्यात येणार आहे. मोबाईल क्षेत्रात वाढलेल्या कंपन्या आणि आलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे या सेवेची मागणी कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बीएसएनलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 इंडोनेशियात जकार्तामधल्या अठराव्या अशियाई क्रीडा स्पर्धेचा काल दिमाखदार सोहळ्यानं समारोप झाला. समारोपाच्या कार्यक्रमात महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही भारतीय ध्वजवाहक होती. या स्पर्धेत ४० क्रिडा प्रकारात ४६५ प्रकारच्या स्पर्धा झाल्या. भारतानं स्पर्धेत पंधरा सुवर्ण,चोवीस रौप्य आणि तीस कांस्य पदकांची कमाई करत पदक तालिकेत आठवं स्थान मिळवलं. आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताची ही सर्वाधिक पदकांची कमाई आहे.

****



 चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा ६० धावांनी पराभव केला. या बरोबरच इंग्लंडनं पाच पैकी तीन सामने जिंकत ही मालिका जिंकली आहे. विजयासाठी भारताला २४५ धावांच उद्दिष्ट इंग्लंडनं दिलं होतं. मात्र भारताचा संघ १८४ धावांतच सर्वबाद झाला. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अलीनं चार गडी बाद केले, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पहिल्या डावातही त्यांनं पाच गडी बाद केले होते.

****



 लातूर जिल्ह्यात निलंगा तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्द्घाटन काल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी खासदार सुनिल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. निलंगा पंचायत समिती तसंच तालुक्यातल्या जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पणही यावेळी  करण्यात आलं. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना निलंगेकर यांनी, जिल्ह्यात प्रस्तावित रेल्वे बोगी  निर्मिती प्रकल्पासह  सुरु असलेली  राष्ट्रीय महामार्गाची कामं पूर्ण झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला.

****



 लातूर जिल्ह्यात औसा इथं काल  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, कृषी सहाय्यक यांना या कार्यशाळेद्वारे जलसिंचनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांची यावेळी उपस्थिती होती.

****



 रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातल्या पेझारा इथल्या रुपाली योगेश पाटील यांनी सन २०१७-१८ या काळात प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा लाभ घेतला. या योजनेच्या झालेल्या लाभाविषयी बोलतांना त्या म्हणाल्या.



मी सन २०१७-१८ या वर्षात गरोदर असल्याने, मला माझ्या गावातील सिस्टर ताईन प्रधानमंत्री मातृवंदन गरोदर योजना बद्दल माहिती सांगितले. व त्यांनी माझी योग्य वेळी पंतप्रधान मातृवंदन योजना मध्ये नोंदणी केली. त्यामुळे मला योग्यवेळी  अनुक्रमे १ हजार, २ हजार, २ हजार रूपये असे तीन टप्यामध्ये एकून ५ हजार रूपये मला लाभ मिळाला असून, त्याचा उपयोग मला माझ्या व  मुलाच्या पोषण आहारासाठी झाला. त्याबद्दल मी शासनाचे आभारी आहे. धन्यवाद.

****



 सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीचं लवकर दर्शन घडवून आणण्यासाठी खासगी व्यक्तींमार्फत पैसे घेऊन काळा बाजार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अधटराव यांना आज तीन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. थेट दर्शनाचं आमिष दाखवून अधटरावनं हैदराबाद इथून आलेल्या दोन भाविकांकडून आठशे रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती.

****



 भगवान श्रीकृष्ण जयंती देशभरात भक्तीभावानं साजरी होत आहे. मध्यरात्री ठिकठिकाणी भजन-किर्तनाच्या नादात बालकृष्णाचा जन्मोत्सव झाला. कृष्णाच्या मंदीरांवर रोषणाईसह गाभाऱ्यांमध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे. आज जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाला - दहीहंडीचा पारंपारीक उत्सव असून राज्यात यानिमित्त गोविंदा पथकांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देशवासीयांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



 दरम्यान, औरंगाबाद शहरात दहीहंडीमुळं वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यात टी.व्ही. सेंटर , कॅनॉट प्लेस, पुंडलिक नगर – गजानन महाराज मंदिर – त्रिमुर्ती चौक,  रेल्वेस्थानक रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर चौक, गुलमंडी याठिकाणांवरील वाहतुकीचा यात समावेश आहे.

*****

***

Sunday, 2 September 2018

“२०१७ या वर्षात दक्षिण आशियात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांपैकी सर्वात जास्त पर्यटक भारतात आले होते, असं संयुक्त राष्ट्र पर्यटन संघटनेच्या आकडेवाडीत नमूद करण्यात आलं आहे.” – यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.09.2018 - Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 2 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

२०१७ या वर्षात दक्षिण आशियात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांपैकी सर्वात जास्त पर्यटक भारतात आले होते, असं संयुक्त राष्ट्र पर्यटन संघटनेच्या आकडेवाडीत नमूद करण्यात आलं आहे. भारतातली सुधारलेली परिस्थिती आणि व्हिसा प्रक्रियेत आलेली सुलभता हे याचं मुख्य कारण असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. गेल्या वर्षी दीड कोटीपेक्षा जास्त पर्यटक भारतात आले़. त्यात युरोप आणि आफ्रिकेतल्या पर्यटकांची संख्या सर्वात जास्त होती.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांवर अत्याचार वाढले असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. मात्र जातीशी संबंधित अत्याचार देशात सुरूच आहेत, असं सांगून सरकार कोणत्याही पक्षाचं असो, गुन्हेगारांविरूद्ध सरकारनं पावलं उचलायला हवीत असं ते पुढं म्हणाले. २०१९ ची निवडणूक दक्षिण मध्य मुंबईतून लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

****

स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या गृह, वाहन आणि इतर कर्जांच्या व्याजदरात दोन दशांश टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ कालपासून लागू झाली आहे. याआधी या बँकांनी द्वैमासिक वित्तीय धोरण आढाव्याआधी जून महिन्यात कर्जाच्या व्याजदरात वाढ केली होती. रिझर्व्ह बँकेनं जूनमध्ये रेपो दरात २५ शतांश टक्क्यांची वाढ करुन तो सहा पूर्णांक २५ शतांश केला होता.

****

राष्ट्रपति रामनाथ कोविंद तीन देशांच्या विदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज सायप्रसला पोहोचले. लारनाका विमानतळावर त्यांचं सायप्रसच्या उर्जा, वाणिज्य आणि उद्योग तसंच पर्यटन मंत्र्यांनी स्वागत केलं. राष्ट्रपति तिथल्या विद्यापीठात व्याख्यान देणार असून आणि तिथल्या भारतीयांशीही संवाद साधणार आहेत.

****

उत्तर प्रदेशातल्या अनेक शहरांत जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सतत झालेल्या पावसामुळं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत पावसाशी संबधित अनेक घटनांमध्ये राज्यात २० हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत देशातली आठ राज्य वगळता, इतर राज्यांत मॉन्सून सामान्य राहिला. आणखी १५ दिवस देशात मॉनसून सक्रीय राहील, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

****

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड-बीएसएनएलतर्फे ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली सीडीएमए तरंग सेवा येत्या पाच सप्टेंबरपासून कायमची बंद करण्यात येत आहे. मोबाईल क्षेत्रात वाढलेल्या कंपन्या आणि आलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे या सेवेची मागणी कमी झाली. त्यामुळे ही सेवा बंद करण्यात येत असल्याचं बीएसएनलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****

राज्य सरकारच्या सर्व संकेतस्थळांमध्ये दिव्यांगांना वापरता येतील, अशा रितीनं बदल करावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. वेबसाईट्समध्ये बदल केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल पुढच्या तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री दोन जणांची धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या केली. हे दोघे जण ३५ आणि ४० वर्ष वयोगटातले आहेत. आज सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. हे दोघेही पोलिसांचे खबरे असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी रात्री सोनू पदा आणि सोमजी पदा यांच्या गावी गेले. त्यांना झोपेतून उठवून गावाबाहेर आणले आणि त्यांची हत्या केली.

****

धुळे शहराचा आणि पर्यायाने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा झाला तर राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला हवं, असं प्रतिपादन माजी कृषि मंत्री शरद पवार यांनी आज धुळ्यात केलं. विशेष निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या धुळे महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. धुळे महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन पवार यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं.

****

औरंगाबाद महानगरपालिकेत उद्या सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी हजर रहाण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लडनं भारतासमोर विजयासाठी २४५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. आठ बाद २६० धावांवरून इंग्लंडनं तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. मोहम्मद शमीनं दिवसातील पहिल्याच चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडला बाद केलं. त्यानंतर कुरननं धावसंख्या वाढवण्याचे प्रयत्न केले. पण, अतिरिक्त धाव घेण्याचा नादात तो धावबाद झाला आणि इंग्लंडचा दुसरा डाव २७१ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावाचा खेळ सुरू केला, तेव्हा भारताच्या तीन बाद २९ धावा झाल्या होत्या.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 2 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ सप्टेंबर २०१८ दुपारी १.०० वा.

****



 पाकिस्तानला दिली जाणारी ३०० दशलक्ष डॉलर्सची मदत रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. दहशतवाद रोखण्यात पाकिस्तानला आलेलं अपयश, हे या निर्णयामागचं प्रमुख कारण असून, हा निधी ३० सप्टेंबरपर्यंत इतर आवश्यक बाबींवर खर्च करायचा असल्यामुळे या निर्णयाला अमेरिकी काँग्रेसनं मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याचं पेंटागॉनचे प्रवक्ते कोन फॉकनर यांनी म्हटलं आहे.

****

 राष्ट्रपति रामनाथ कोविंद आज सकाळी सायप्रस, बल्गेरिया, आणि झेक प्रजासत्ताक या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज सायप्रसला पोहोचतील. सायप्रस संसदेच्या विशेष सत्राला कोविंद संबोधित करणार आहेत, तसंच सायप्रस विद्यापीठात व्याख्यानही देणार आहेत. मंगळवारी राष्ट्रपती बल्गेरियाला पोहोचणार असून, दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते झेक प्रजासत्ताकला जाणार आहेत.

****

 उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या गेल्या वर्षभरातल्या कामकाजाच्या अनुभवावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आज नवी दिल्ली इथं करण्यात आलं. 'मूव्हिंग ऑन... मूव्हिंग फॉरवर्ड: अ ईयर इन ऑफिस' या २४५ पानी पुस्तकात नायडू यांनी सात प्रकरणांमध्ये ४६५ अनुभव लिहिले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना नायडू यांच्या कारकीर्दीबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

 देशातल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्कनी माहिती तंत्रज्ञान निर्यातीला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. कोलकाता इथं भारतीय सॉफ्टवेअर पार्क इनक्युबेशन सेंटरच्या पायाभरणी सोहळ्यात ते काल बोलत होते. देशातल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क्समधून 1992-93 साली 52 कोटी रुपये मूल्याची होणारी निर्यात 2016-17 या वर्षापर्यंत 3 लाख 50 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे, असं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. देशभरात डिजिटल समावेशकता, तसंच लिंगभाव समानता आणण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, असं प्रसाद यावेळी म्हणाले.

****

 आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत या वर्षी ७० पूर्णांक ८६ शतांश टक्यांनी वाढ झाली आहे. या वर्षीच्या आर्थिक वर्षात गेल्या ३१ ऑगस्टपर्यंत पाच कोटी ४२ लाख आयकर विवरणपत्रे भरण्यात आली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३ कोटी १७ लाख एवढी होती.

****

 गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरणी हरयाणा पोलिसांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

 वड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं गुरुग्राममध्ये हुडा यांच्या कार्यकाळात 7 कोटी 50 लाख रुपयांची जमीन खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी या जमिनीचा विकास करण्यासाठी हुडा यांच्या मदतीनं व्यावसायिक परवाना मिळवून, डीएलएफ कंपनीला ती जमीन 58 कोटी रुपयांना विकली, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

****

 पुण्यात ३१ डिसेंबरला घेण्यात आलेल्या एल्गार परिषद प्रकरणी शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग आदी आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास न्यायालयानं 90 दिवसांची मुदतवाढ दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 यंदाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनानं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग स्तरावर 108 शिक्षकांची निवड केली आहे. यात 38 प्राथमिक शिक्षक, 39 माध्यमिक शिक्षक, 18 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, आदींचा समावेश आहे. येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी हे पुरस्कार सातारा इथं प्रदान केले जाणार आहेत.

****

 २०१८-१९ या वर्षासाठी राज्यातल्या ३० जिल्ह्यांमध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे. द्राक्ष, केळी संत्री, मोसंबी, पेरू, डाळींब, आंबा, काजू या फळपिकांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्या महसूल मंडळात अधिसूचित फळपिकांचे क्षेत्र २० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त आहे अश महसूल मंडळात ही योजना आहे.

****

 बुलडाणा जिल्हयातल्या पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त झालेल्या लोणार सरोवर परिसरातील पुरातन वास्तूंची पडझड होत असून, रामगया आणि कुमारेश्वर मंदिर परिसरातल्या पुरातन बांधकामात आढळणाऱ्या पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, तसंच   दगड आता फारसे दिसत नसल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या सरोवराला २००२ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र वन विभाग आणि पुरातत्व विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

******

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२ सप्टेंबर  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 देशात औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नियमांचा मसुदा तयार केला आहे. नोंदणी असल्याशिवाय ई-फार्मसीच्या माध्यमातून कोणीही व्यक्ती औषधाचा साठा, विक्री करु शकणार नाही, असं या नियमात म्हटलं आहे. ई फार्मसी करु इच्छिणाऱ्यांसाठी, केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर 18 AA  क्रमांकाच्या फॉर्मद्वारे अर्ज करावा लागेल.

 देशभरात नागरिकांना औषधांची उपलब्धता योग्यरित्या व्हावी, हा या नियमावलीचा उद्देश असल्याचं औषधं नियंत्रण महासंचालक ईश्वरा रेड्डी यांनी सांगितलं.

****

 इंडोनेशियातल्या जकार्ता इथं झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल भारतीय संघाची ध्वजवाहक राहणार आहे. भारतानं या स्पर्धेत शानदार कामगिरी केली असून गेल्या ६७ वर्षातलं आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन  केलं आहे. १५ सुवर्ण २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकं जिंकून भारतानं या स्पर्धेत पदकतालिकेत आठवं स्थान पटकावलं आहे.

****

 श्रीकृष्ण जन्माष्ठीनिमित्त आज देशभरात ठिकठिकाणी  विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादेतही जन्माष्टमीनिमित्त इस्कॉनच्या राधाकृष्ण मंदिरात  आज सायंकाळी भजन कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान्, उद्या साजऱ्या होत असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातल्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गुलमंडी, राजाबाजार, औरंगपुरा, निराला बाजार तसंच टी.व्ही. सेंटर, बजरंग चौक, कॅनॉट प्लेस या शहरातल्या प्रमुख मार्गावरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला असून ती दुसरीकडे वळवण्यात आली आहे.

****

 ज्येष्ठ शास्त्रीय गायक नाथराव नेरळकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज सायंकाळी सहा वाजता तापडिया नाट्यगृहात होणार आहे. निवृत्त प्रशासकीय अधिकारी जयंत देशपांडे आणि बजाज उद्योग समूहाचे सी. पी. त्रिपाठी यांच्या हस्ते नाथरावांचा गौरव करण्यात येईल. यावेळी त्यांच्या शिष्यांची स्वरवंदना, डॉ. मंगला वैष्णव लिखित संगीतनाथ - नाथ नेरळकर या पुस्तकाचे आणि एका माहितीपटाचे प्रकाशनही होणार आहे.

****

 विकास कामांना विरोध न करता पाठिंबा द्यावा असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या फिल्ड आऊटरिच ब्यूरो कार्यालयातर्फे स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह, आणि शासनाच्या विविध योजनां विषयी विशेष प्रसिद्धी कार्यक्रमाचं आयोजन काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या गणोरी इथं करण्यात आलं होतं. त्यावेळी बागडे बोलत होते.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 02 September 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 02؍ستمبر۲۰۱۸ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 ڈاک دفاتر میںبینکنگ سہولت فراہم کرنے والی اسکیم کاکل آغازہوا۔انڈیا پوسٹ پیمنٹ بینک یہ ایک تاریخی واقعہ ہے۔ یہ بات وزیراعظم نریندرمودی نے کہی۔نئی دلی میں اس طریقہ کارکی افتتاحی تقریب سے وہ مخاطب تھے۔اس کی وجہہ سے بینکنگ خدمات گھرگھرمیں پہنچ جائے گی اورنئے سماجی نظام کاآغازہوگا۔یہ بات انہوںنے کہی۔
 ریاست میں ڈاک دفاتر کے 42 شاخوں اور168 آٹومیٹک مراکزپرانڈین پوسٹ بینکس کا افتتاح ہوا۔وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس نے ممبئی میں بینک کے مہاراشٹر سرکل گیرگائوں شاخ اورگورنر سی ودھیا ساگررائو نے راج بھون میں اندھیری شاخ کا افتتاح کیا۔اورنگ آباد،جالنہ،پربھنی،ہنگولی، ناندیڑ،لاتوراورعثمان آباداوربیڑ سمیت ریاست کے تمام اضلاع میں اس بینک کاکل متعلقہ اضلاع کے اراکین پارلیمنٹ اوردیگر معززشخصیتوں کی موجودگی میں آغازعمل میںآیا۔
***** ***** *****
 کچراانتظام کے سلسلے میںپالیسی اورضوابط ریاستی حکومت نے اس سے قبل ہی تیار کرلئے ہیں۔ یہ سات سپریم کورٹ کو بتانے کی ہدایت وزیر اعلیٰ دیویندرپھڑنویس نے دی ہے۔اسی کے ساتھ ریاست کے ہائوزنگ کامپلیکس اوردیگر تعمیرات پرعائد کی گئی پابندی ختم کرنے کی اپیل سپریم کورٹ سے کرنے کی ہدایت متعلقہ مشنری کوپھڑنویس نے دئیے۔بڑھتی ہوئی بستیوں میں کچراانتظام کے سلسلے میںمناسب پالیسی پرعمل درآمد نہ کرنے پرمہاراشٹر سمیت کئی ریاستوں پرسپریم کورٹ نے جرمانہ عائدکرنے کی خبر کل نشر ہوئی تھی۔مناسب پالیسی اختیار کرنے تک ان ریاستوں میںتعمیرات نہیں کی جاسکتی یہ بات حکمنانے میںکہی گئی۔اس کے مدنظر یہ ہدایتیں دی گئی۔
***** ***** *****
 ریاست میں چمڑا تیارکرنے والے سماج کی ہمہ رخی ترقی کے لئے چمڑا تیارکرنے والوں کاکمیشن قائم کیاجائے گا۔ اس کمیشن کے ذریعے سے اس سماج کی روکاوٹیں دورکی جائے گی۔یہ بات وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس نے کہی ہے۔ممبئی میںتعمیر کئے جانے والے سنت روہی داس بھون کی بھومی پوچن اور سنگ بنیاد تقریب کے موقع پروزیراعلیٰ مخاطب تھے۔
***** ***** *****
 ریاست میںگڑھوں کی وجہہ سے راستوں کی خراب حالت پرراشٹروادی کانگریس پارٹی نے حکومت پرسخت تنقید کی ہے۔راستوں کی حالت اتنی خراب ہے کہ عالمی ریکارڈ کے گنیز بک میں اس کااندراج ہوگااورایسا اندراج ہونے کے بعد ہی پھڑنویس حکومت کوراستے خراب ہونے کااحساس ہوگا۔ایسی تنقید قانون سازکونسل میں حزب مخالف رہنمادھننجے منڈے نے کی ہے وہ کل ممبئی میں صحافیوں سے مخاطب تھے۔
***** ***** *****
 گوپی ناتھ منڈے کامگارمہامنڈل کاحتمی مسودہ تیارہوگیاہے۔جلدہی یہ مہامنڈل اپنا کام کاج شروع کردیگا۔ایسی کوشش جاری ہے۔ یہ بات دیہی ترقیاتی وزیرپنکجامنڈے نے کہی ہے۔بیڑ میں منعقد ریاستی سطح کی گناتوڑکامگارکانفرنس سے وہ کل مخاطب تھیں۔گناتوڑمزدوروں کے مطالبات پرحکومت کامثبت رول ہے۔یہ بات وزیرموصوفہ نے کہی۔
***** ***** *****
 اس سے قبل حکومت نے مسلمانوں کے لئے ظاہر کیاگیاپانچ فیصد ریزرویشن عائد کیاجائے۔ اس کے لئے ریاست میںتمام ڈیویژن میں ریزرویشن کانفرنس کے ذریعے سے بیداری پیدا کی جائے گی۔اس کی اطلاع رکن پارلیمنٹ حسین دلوائی نے دی ہے۔وہ کل عثمان آباد میںریاستی سطح کی مسلم ریزرویشن کانفرنس سے مخاطب تھے۔تعلیم میں پچھڑاپن ، ملازمتوں میںقلیل تعداد وغیرہ مسائل پربیداری پیدا کی جائے گی۔یہ بات حسین دلوائی نے اپنی مخاطبت میں کہی۔
***** ***** *****
 انڈونیشیاء میںجاری اٹھارہویں ایشیائی کھیلوں کے مقابلوں میںبھارت نے کل دوسونے کے ایک چاندی کاتمغہ حاصل کیا۔باکسنگ کے مقابلے میں 49کلووزن کے گروپ میں امیت پنگلم اور بریچ ٹیم کے مقابلے میںبھارت کے شیوناتھ سرکار اور پرنو وردھن مردوں کی اس ٹیم نے سونے کے تمغے حاصل کئے۔دوسری جانب بھارتی خواتین اسکاش ٹیم کوآخری رائونڈ میںہانگ کانگ سے شکست کاسامناکرناپڑااورچاندی کے تمغے پراکتفاکرناپڑا۔مردوں کے ہاکی مقابلے میںبھارت نے کل پاکستان کوشکست دے کرکانسے کاتمغہ حاصل کیا۔ ان مقابلوں میںپندرہ سونے کے چوبیس چاندی کے اورتیس کانسے کے تمغے حاصل کرکے بھارت تمغے حاصل کرنے والوں کی فہرست میں آٹھویں نمبر پرہے۔اب تک ہوئے مقابلوں میںبھارت کی یہ سب سے بہترین کارکردگی ہے۔
***** ***** *****
 چوتھے ٹیسٹ کرکٹ مقابلے میں کل کھیل ختم ہونے تک انگلینڈ نے دوسری اننگز میں 8؍وکٹ پر260 رن بنائے اور233 رنوں کی برتری حاصل کرلی ۔ اس سے قبل پہلی اننگز میںانگلینڈ نے 246 رن اوربھارت نے 273 رن بنائے تھے۔پانچ مقابلوں کی سیریز میں انگلینڈ کو2-1 کی سبقت حاصل ہے۔
***** ***** *****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...