Monday, 30 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३०  जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

 निर्यात क्षेत्राला प्राधान्यक्रम कर्ज वितरण श्रेणीत समाविष्ट करण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या २०३५ मध्ये दहा ट्रीलीयन अमेरीकी डॉलरचं उद्दीष्ट गाठण्यासाठी याची मदत होणार असल्याचं प्रभु यांनी नमूद केलं. भारतातून होणारी निर्यात लक्षणीय असून, त्यात वाढही होत असल्याचं ते म्हणाले.

****



 द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची प्रकृती आता स्थिर आहे. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होत आहेत. करुणा निधी यांच्या वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालात त्यांची प्रकृती पूर्वपदावर येत असल्याचं म्हटलं आहे. त्यांना सतत जीवरक्षक यंत्रणेचा आधार देण्यात येत असल्याचं रुग्णालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रासायनिक हल्ल्याची धमकी देणाऱ्या एका इसमाला मुंबई पोलिसांनी वाळकेश्वर इथून अटक केली आहे. काशिनाथ मंडल असं त्याचं नाव असून, तो झारखंडचा रहिवासी आहे. मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या काशिनाथनं राष्ट्रीय सुरक्षा रक्षक - एनएसजीला फोन करून, पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची धमकी दिली, एनसजीनं याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिल्यावर ही कारवाई करण्यात आली.

****



 रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातल्या पाली-भुतीवली इथल्या धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला. मृत दोघेही मुंबईच्या विक्रोळी भागातले रहिवाशी आहेत. काल रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या शोध मोहिमे नंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. या धरणात पोहण्यास बंदी असताना देखील दोन तरूण धरणात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाले.

****



 प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पिक विमा अर्ज स्वीकारण्याची मुदत संपणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये ३१ जुलै पर्यंत संबंधीतांचे अर्ज आणि पिक विमा हप्ता स्वीकारुन येत्या १३ ऑगस्ट पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात आली आहे.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ३०  जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांचं आंदोलकांना शांततेचं आवाहन 

Ø येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Ø मराठवाड्यात विविध जिल्ह्यात अद्याप आंदोलन सुरू

Ø हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था काल जेद्दाहला रवाना

आणि

Ø विविध देशांमधल्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी

****



      मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार गांभीर्यानं सर्वतोपरी प्रयत्न करत असून, आंदोलकांनी शांतता राखून सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत मराठा आंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीला भाजपाचे खासदार नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणे उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळाल्यावर महिनाभरात निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आंदोलकांविरूद्धचे गुन्हे मागं घेतले जात असून, मात्र पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अभय दिलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत यापूर्वी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची चोख अंमलबजावणी व्हावी, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊ, त्यात स्थानिक पातळीवर  सहकार्य आवश्यक आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

****



 दरम्यान, मुंबईत काल मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक झाली, त्यांच्याशी आमचा कसलाही संबंध नाही, असं या मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केलं आहे. काल लातूर इथं झालेल्या बैठकी नंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करत असून, या आंदोलनात झालेल्या मृत्यूंना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, एक ते आठ ऑगस्ट दरम्यान मराठा खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापुढचं आंदोलन राज्यभर एकसंघपणे राबवलं जाणार असल्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं.

****



 विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी काल परळी मधल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांची भूमिका असणारं एक निवेदन देऊन त्यांनी यावेळी आंदोलकांबरोबर चर्चा केली.

****



 परभणी जिल्ह्यात आंदोलनामुळे गेल्या सहा दिवसांपासून विस्कळीत झालेलं जनजीवन कालपासून पूर्वपदावर येत असलं, तरीही तणाव कायम आहे. जिल्ह्यातली बस सेवाही सहा दिवसांपासून बंद आहे. जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या इरळद इथं काल दुधना नदी पात्रात जलआंदोलन, तर पूर्णा तसंच पाथरी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.



 नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक निशीथ मिश्रा यांनी काल परभणी इथल्या आंदोलनाचा आढावा घेतला, तसंच जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांचीही भेट घेतली.



 जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-सिल्लोड रस्त्यावर मालखेडा इथं काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी रस्त्यावर रबरी चाकं पेटवून दिल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. जाफराबाद तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.



 दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या दाभड इथले तरूण शेतकरी कचरू दिगंबर कल्याणे यांनी काल आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 रायगड जिल्ह्यात महाड जवळ परवा शनिवारी आंबेनळी घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातले सर्व ३० मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातात ठार झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत घोषित करण्यात आली आहे, तर जखमी झालेले एकमेव प्रवासी प्रकाश देसाई यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.

****



 केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं देशातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची तीन दिवसीय परिषद झाली, यात दहा सूत्रे असलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला.

****



 पंढरपूरची वारी म्हणजे एक अद्भुत यात्रा असून, ही वारी शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी वरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या ४६व्या भागातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास अशा अनेक संतांची शिकवण ही अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळं देत असल्याचं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.



 पर्यावरण संवर्धन, शिक्षण, तंत्रज्ञान, आदी विषयांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं.

*****



 हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था काल मुंबईहून रवाना झाला. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यावेळी विमानतळावर उपस्थित होते. राज्यातल्या साडे अकरा हजारांहून अधिक भाविकांसह  विक्रमी एक लाख, ७५ हजार, पंचवीस नागरिक हजयात्रेला जाणार असून त्यात ४७ टक्के महिला  आहेत. यातील एक हजार, ३०८ महिला विना मेहरम अर्थात पुरुष सहप्रवाशाशिवाय जात आहेत.



 दरम्यान, औरंगाबाद इथल्या विमानतळावरुनही ७८ पुरुष आणि ६८ महिलांचा समावेश असलेला हज यात्रेकरुंचा पहिला जथ्था जेद्दाहला रवाना झाला. परवा एक ऑगस्टपर्यंत चार वेगवेगळ्या विमानांनी साडेपाचशे यात्रेकरु औरंगाबादहून जेद्दाहला जाणार आहेत.

****



 जालना जिल्ह्यात सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे एक लाख लाभार्थी आहेत. या पैकी जिल्ह्यातल्या ३६ हजार लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत गॅस जोडणीसाठी अर्ज केले असून, २७ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी मिळाली आहे. जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या शहागड इथल्या अजरबी बाबू शेख या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील एक लाभार्थी आहेत.  आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीकडे या शब्दात व्यक्त केला -

मी अजरबी बाबू शेख. राहणार शहागड  जालना. पूर्वी आम्ही चूलिवर स्वयंपाक करायचो, त्यामुळे सरपण आणायचं त्यामुळे धूराचा त्रास होता. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत गॅस जोडणीसाठी मिळाली. आता धूराचा त्रास होत नाही. काम पूर्ण वेळात होते. उज्ज्वला गॅसचा आम्हाला फायदा झाला.

****

 लातूरच्या बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत शिवशंकर बिडवे यांच्या नेतृत्वातील सदस्यांच्या गटानं विजय मिळवला आहे. यासाठी काल सकाळी मतदान आणि दुपारनंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत विधीज्ञ सांबप्पा गिरवलकर यांच्या नेतृत्वाखालील गट पराभूत झाला.

****



 भारतीय क्रीडापटूंनी विविध देशांमध्ये सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये काल चमकदार कामगिरी केली आहे.



 रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं पुरुष एकेरीचं विजेतपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत त्यानं जपानच्या कोकी वातानबे याचा १८ - २१, २१ - १२, २१ - १७ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला पराभव पत्करावा लागला.

****



 महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं अमेरीकेसोबतचा सामना बरोबरीत सोडवून आपलं आव्हान कायम राखलं आहे. इग्लंडच्या लंडन इथं काल झालेला स्पर्धेच्या इ गटातला हा अखेरचा साखळी सामना एक-एक अशा बरोबरीत राहिला.   

****



 फिनलँड इथं सुरू असलेल्या साओ क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. नीरजनं ८५ पूर्णांक ६९ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलं.

****



 तुर्कस्तान मध्ये सुरू असलेल्या यासर दोगु आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या बजरंग पुनियानं सुवर्ण तर संदीप तोमरनं रौप्यपदक पटकावलं आहे. महिलांच्या गटात पिंकीनं सुवर्ण तर सीमा, पूजा धांडा, रजनी यांनी रौप्यपदक जिंकलं आहे. गीता फोगाट हिला ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

****



 वेदना हे श्रेष्ठ साहित्य निर्मीतीचं बीजकारण असल्याचं मत ९० व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्काराचं वितरण काळे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोहरीर वाङमय पुरस्कार डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या 'लक्षणीय असे काही' या पुस्तकाला, नरहर कुरंदकर वाङमय पुरस्कार प्रसाद कुमठेकर यांच्या 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या पुस्तकाला, म.भि.चिटणीस वाङमय पुरस्कार कैलास इंगळे यांच्या 'वाङमयीन मराठवाडा' या पुस्तकाला, कुसुमावती देशमुख काव्यपुरस्कार डॉ.पी.विठ्ठल यांच्या 'शून्य एक मी' या काव्यसंग्रहाला देण्यात आला, कुमार देशमुख नाट्यपुरस्कार राजीव नाईक यांच्या 'लागलेली नाटकं' या पुस्तकाला तर रा.ज देशमुख स्मृती पुरस्कार निर्मलकुमार सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.

****



 प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पिक विमा अर्ज स्वीकारण्याची मुदत संपणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये ३१ जुलै पर्यंत संबंधीतांचे अर्ज आणि पिक विमा हप्ता स्वीकारुन येत्या १३ ऑगस्ट पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात आली आहे.

*****

*** 

Sunday, 29 July 2018

“मराठा आरक्षणावर सरकार गांभीर्यानं काम करत असून, आंदोलनादरम्यान हिंसा न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.” – यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -


Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 29 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

मराठा आरक्षणावर सरकार गांभीर्यानं काम करत असून, आंदोलनादरम्यान हिंसा न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आज मराठा आंदोलकांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. खासदार नारायण राणे या बैठकीला उपस्थित होते. पोलिसांवर थेट हल्ला किंवा तत्सम प्रकारचे गुन्हे करणारे आंदोलक वगळता, इतरांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या महाभरतीतही मराठा तरुणांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

****

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. लातूर इथं आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापुढचं आंदोलन राज्यभर एकसंघपणे राबवलं जाणार असल्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करत असून, या आंदोलनात झालेल्या मृत्यूंना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं उद्यापासून मुंडण आंदोलनाला सुरुवात होत असून, एक ऑगस्ट पासून बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात आंदोलनामुळे गेल्या सहा दिवसांपासून विस्कळीत झालेलं जनजीवन आज पूर्वपदावर येत असलं, तरीही तणाव कायम आहे. सहा दिवसांपासून जिल्ह्यातली बससेवाही ठप्प आहे. जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या ईरळद इथं आज दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन, तर पूर्णा तालुक्यातल्या पिंपळा भत्या आणि पाथरी तालुक्यातल्या बाभळगाव इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक निशीथ मिश्रा यांनी आज परभणी इथं आंदोलनाचा आढावा घेतला, तसंच जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांचीही भेट घेतली.

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-सिल्लोड रस्त्यावर मालखेडा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी रस्त्यावर रबरी टायर पेटवून दिल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. जाफराबाद तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या दाभड इथले तरूण शेतकरी कचरू दिगंबर कल्याणे यांनी आज आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीत आपण जाणार नसल्याची माहिती, बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.  

****

रायगड जिल्ह्यात काल एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातले सर्वच्या सर्व ३० मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आता शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सुमारे ३१ कर्मचारी महाबळेश्वरला सहलीसाठी जात असताना काल सकाळी हा अपघात झाला. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला.

****

शुध्द आणि भेसळरहीत अन्न मिळणं हा सामान्यांचा अधिकार असून, अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने तपासून दिले पाहिजेत, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपूर इथं आज अन्न आणि औषध प्रशासन विभागाची प्रयोगशाळा, तसंच इमारतीचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनानं जनतेला वेळेत आणि ऑनलाईन सेवा द्याव्यात, असं ते म्हणाले.

****

तस्करी विरोधी विधेयक व्यापक आणि पीडित केंद्रित असून, या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यावर संघटित गुन्हेगारीला आळा बसेल, असं नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मानवी तस्करी विरोधी विधेयक लोकसभेत पारित झालं असून, राज्यसभेत चर्चेला येणार आहे. देशाला अशा कायद्यांची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचानं हिरो फायनान्स कंपनीला, अर्जदाराला नुकसान भरपाईपोटी ४० हजार ६०० रुपये परत करण्याचा आदेश दिला. दुचाकीच्या कर्जाच्या परतफेडीची नोंद न घेता कंपनीनं दुचाकी जप्त केल्याची तक्रार अर्जदारानं केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

लंडनमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता सामना सुरू होईल. बाद फेरीत दाखल होण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकावा किंवा बरोबरीत सोडवावा लागेल.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९  जुलै २०१८ दुपारी १.०० वा.

****



 पंढरपूरची वारी म्हणजे एक अद्भुत यात्रा असून, ही वारी शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या ४६व्या भागातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास अशा अनेक संतांची शिकवण ही अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळं देत असल्याचं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

       

 देशात अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा असल्याचं सांगून त्यांनी, मानवानं निसर्गाला आव्हान दिल्यामुळे निसर्गही मानवावर रुसून बसतो, असं नमूद केलं. आपण सर्वांनी निसर्ग प्रेमी, निसर्गाचे रक्षक, संवर्धक बनलं पाहिजे, असं ते म्हणाले.



 महाविद्यालयात नव्यानं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी, शिक्षण घेतानाच नवनवीन गोष्टी शोधून काढण्याची नैसर्गिक उत्सुकता स्वत:मध्ये कायम ठेवावी असा सल्ला दिला. रायबरेलीचे दोन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक, योगेश साहू आणि रजनीश वाजपेयी या तरुणांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करून ‘स्मार्टगांव अॅप’ तयार केलं असून, हे अॅप गावामध्ये एक प्रकारे डिजिटल क्रांती घडवण्याचं काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.



 २३ जुलैला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्य सेनानी चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली, तर येत्या एक ऑगस्टला टिळकांची पुण्यतिथी आहे. पंतप्रधानांनी या दोन्ही नेत्यांचं स्मरण करुन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.



 कवी नीरज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधानांनी, नीरज यांची प्रत्येक गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी खूप प्रेरणादायी आणि ताकद देणारी ठरू शकते, असं सांगितलं.



 दरवर्षी प्रमाणे यावर्षीही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.



 २० वर्षांखालील कनिष्ठ ॲथलेटिक्स विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हिमा दासनं सुवर्ण पदक मिळवलं, तर विश्व पॅरा अॅथलेटिक्स ग्रॅंड प्रिक्स २०१८ मध्ये एकतानं सुवर्ण आणि कांस्य पदकं, तर सुंदर सिंह गुर्जर यांनी जॅवेलिनमध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी या खेळाडूंचं अभिनंदन केलं.

****



 रायगड जिल्ह्यात महाडजवळ पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला, यापैकी २९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त गाडी हजार फुटापर्यंत खाली गेली असून, दाट धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे बचाव मोहिमेत अडथळे येत आहेत. आज सकाळी ही मोहिम पुन्हा सुरू झाली. अपघातात ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत घोषित करण्यात आली आहे, तर यात जखमी झालेल्या प्रकाश देसाई यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा देखील सरकारनं केली आहे.

****



 देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कुलगुरूंनी शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबत आणि सर्व विद्यापीठं आणि विद्यापीठांशी संलग्न संस्थांना २०२० पर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाचं मानांकन मिळवण्याबाबत पुन्हा एकदा निर्धार केला. नवी दिल्ली इथं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची तीन दिवसीय परिषद झाली, यात दहा सूत्रे असलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला. उच्च शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमात विविध बाबींचा अंतर्भाव आणि संशोधनात सुधारणा इत्यादींचा समावेश प्रस्तावात करण्यात आला आहे.

****



 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस आज पाळण्यात येत आहे. वाघांच्या संरक्षणाप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. यानिमित्तानं मध्य प्रदेशच्या वन विभागाच्या टायगर फाऊंडेशन सोसायटीनं व्याघ्र संरक्षणा संदर्भात जागरुकता आणि समर्थन मिळवण्यासाठी सहा शहरामंध्ये भित्तीचित्र स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

****



 रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं पुरुष एकेरीचं विजेतपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम फेरीत त्यानं जपानच्या कोकी वातानबे याचा १८ - २१, २१ - १२, २१ - १७ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला पराभव पत्करावा लागला.

****



 तुर्कस्तान मध्ये सुरू असलेल्या यासर दोगु आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या बजरंग पुनिया आणि संदीप तोमरनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बजरंगनं ७० किलो वजनी गटात तुर्कस्तानच्या मुस्तफा कायाचा १५ – चार असा पराभव केला, तर तोमरनं बेलारुसच्या आंद्रेयूचा सात – चार असा पराभव केला.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 29 July 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 29؍  جولائی  ۲۰۱۸ئ؁
وَقت: صبح  ۸:۴۰ -  ۸:۴۵
 مراٹھا ریزرویشن کے سلسلے میںپچھڑے ہوئے طبقات کمیشن کی رپورٹ حاصل ہونے کے بعد فوراً اسمبلی کاایک روزہ خاص اجلاس طلب کیا جائے گا۔یہ بات وَزیراعلیٰ دِیویندرپھڑنویس نے کہی ۔کل اس ضمن میںہوئی ہمہ پارٹی میٹنگ میںمراٹھاریزرویشن پرسب متفق ہوئے ہیں۔یہ بات وزیر اعلیٰ نے کہی وہ میٹنگ کے بعد صحافیوں سے مخاطب تھے۔اس سلسلے میںقائم کئے گئے پچھڑے ہوئے طبقات کے کمیشن کوجہاں تک ممکن ہوجلدازجلداپنی رپورٹ پیش کرنے کی درخواست کی گئی ہے۔یہ رپورٹ حاصل ہونے کے بعد فوراً اسمبلی کاخاص اجلاس لیاجائے گا۔یہ بات وزیراعلیٰ نے کہی۔
 احتجاج کے دوران احتجاجیوں پرشدیدقسم کے جرم کے علاوہ دیگرجرائم واپس لینے کاحکم پولس انتظامیہ کودیاگیاہے۔یہ بات پھڑنویس نے کہی۔ راشٹروادی کانگریس کے رہنمااجیت پوارنے اس میٹنگ کے بعد اپنی مخاطبت میںکہا کہ ریاست میں امن قائم رکھاجائے۔ایسا حزب مخالف پارٹیوں کا رول ہے۔ نوجوان غلط قدم نہ اُٹھائیں۔ ایسی اپیل اُنہوںنے کی۔
***** ***** *****
 مراٹھا ریزرویشن کے سلسلے میںمراٹھا کرانتی مورچے نے ریاست میںجاری احتجاج اجازت حاصل کرکے ہی شروع کیاہے۔احتجاجیوں پر درج کئے گئے جرائم واپس نہیں لئے گئے تویکم اگست سے جیل بھرواحتجاج شروع کرنے کااشارہ کرانتی مورچہ احتجاجیوں نے کل پرلی میںہوئی صحافتی کانفرنس میں دیا۔ اس احتجاج کوبدنام کرنے کی طاقت فعال ہوگئی ہے۔یہ بات احتجاجیوں نے کہی ہے۔
 اسی بیچ مراٹھا ریزرویشن کے مطالبات پراورنگ آبادشہرمیں تقریباً چھ سے سات ورکرس نے پانی کی ٹانکی پرچڑھ کرنعرے بازی کرتے ہوئے خودکشی کرنے کااشارہ دیا۔پولس افسران نے ان ورکرس کوسمجھاکرنیچے اُتارا۔
 پربھنی ضلع میںکل بھی کئی مقامات پرراستہ روکواحتجاج کیاگیا۔ہجوم کی جانب سے کئے گئے پتھرائومیں تین پولس ملازمین زخمی ہوگئے۔ضلع میں بس سروس مسلسل پانچویں یوم بندرہی۔
 ناندیڑ ضلع میںراستہ روکواحتجاج کیاگیا۔ایس ٹی کارپوریشن کی ایک بس احتجاجیوں نے نذرآتش کردی۔ ناسک میںکل رکن اسمبلی باڑاصاحب سانپ کے رہائش گاہ کے روبرودھرنااحتجاج کیاگیا۔تاہم دھولیہ ریلوے اسٹیشن سے قریب احتجاجیوں نے دھولیہ،چالیس گائوں ریلوے گاڑی روک دی جس کی وجہہ سے تقریباً 20؍منٹ ریلوے خدمات مفلوج ہوکررہ گئی تھی۔
***** ***** *****
 مرکزاورریاست میںبھارتیہ جنتاپارٹی اقتدارمیںہونے کی وجہہ سے حکومت فوراً مراٹھاسماج کوریزرویشن دیں۔ یہ بات راشٹروادی کانگریس کے صدررکن پارلیمنٹ شردپوارنے کہی ہے۔کولہاپورمیںکل پوارنے مراٹھا ریزرویشن احتجاجیوں سے ملاقات کی۔اس موقع پروہ مخاطب تھے۔
***** ***** *****

 رائے گڑھ ضلع میںکل ایک نجی بس کھائی میںگرجانے کی وجہہ سے ہوئے حادثے میں33؍افرادہلاک ہوگئے۔کل صبح مہاڑ سے قریب مہابلیشور راستے پرامبیناڑی گھاٹ میںیہ بس کھائی میںگرپڑی۔ رات دیرگئے تک اس حادثے میں ہلاک ہونے والے 17 مسافروں کی نعشیں نکالی گئی تھی۔اس کی اطلاع پولس ذرائع نے دی۔حادثے میں ہلاک ہونے والوں کے خاندان کوفی کس چارلاکھ روپیوں کی امدادظاہر کی گئی ہے۔
***** ***** *****
 وزیراعظم نریندرمودی آج صبح 11؍بجے آکاشوانی پرـ'من کی بات' کے اپنے پروگرام میںبھارت وبیرون ملکوں میںرہنے والے عوام کے ساتھ اپنے خیالات کااظہار کریںگے۔یہ 46؍واں ماہانہ پروگرام ہوگاجوآکاشوانی اوردوردرشن کے تمام نیٹ ورک پرنشرکیاجائے گا۔یہ وزیراعظم کے دفتر کے یو ٹیوب چینلوں ، اطلاعات ونشریات کی وزارت، آکاشوانی اورڈی ڈی نیوز پرنشرکیاجائے گا۔یہ AIR کی ویب سائٹ www.allindiaradio.gov.in پرایک ساتھ نشر ہوگا۔آکاشوانی ،ہندی نشریے کے فوراً بعد علاقائی زبانوں میںیہ پروگرام نشر کرے گا۔علاقائی زبانوں کاترجمہ شام 8؍بجے بھی دوبارہ نشر کیاجائے گا۔
***** ***** *****
 ریاست کے اسکولوں میں سن 2011 میں عمل درآمدکی گئی خاص حاضری پٹ پڑتاڑنی مہم میںجہاں بوگس طلباء پائے گئے تھے اُن اسکولوں کے اداروں کے منتظمین ،صدر مدرسین اسی طرح اساتذہ اوردیگر ملازمین کے خلاف فوجداری جرم داخل کرنے کے احکام ڈائریکٹر آف ایجوکیشن سنیل چوہان نے دئیے ہیں۔ہائی کورٹ کی اورنگ آباد بنچ کے حکمنامے کے مطابق کاروائی کے ضمن میں مکتوب جاری کیاگیا۔اس مہم میںدیڑھ لاکھ طلباء بوگس پائے گئے تھے۔
***** ***** *****
 جالنہ ضلع کے بھوکردن ۔جعفرآبادراستے پرویرے گائوں پرکل ایک کارکی زدمیں آکردومعصوم بچے ہلاک ہوگئے۔ بھوکردن کی جانب جارہی تیزرفتار کارایک دکان میںگھس گئی۔دکان میںخریدی کے لئے آئے ہوئے دومعصوم بچوں کی جائے حادثے پرموت ہوگئی۔اورایک شخص زخمی ہوگیا۔ اس سے قبل ایک ٹووہیلرکواس کارنے ٹکردینے کی وجہہ سے ٹووہیلرپرسواردونوں افرادزخمی ہوگئے۔
***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २९  जुलै २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीनं विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमत; आंदोलकांविरोधातले गंभीर गुन्हे वगळता, इतर गुन्हे मागे घेण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश

Ø रायगड जिल्ह्यात खाजगी बस दरीत कोसळून दापोलीच्या कृषी विद्यापीठातल्या ३३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू;

आणि 

Ø जालना, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि लातूरच्या पोलिस प्रमुखांच्या बदल्या, औरंगाबाद शहरातल्या दोन पोलिस उपायुक्तांचाही समावेश

****



 मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर तातडीनं विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल यासंदर्भात झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत मराठा आरक्षणावर एकमत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात स्थापन मागासवर्गीय आयोगाला शक्य तितक्या लवकर आपला अहवाल सादर करण्याची विनंती करणार असून, हा अहवाल आल्यानंतर, तातडीनं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकार यासंदर्भात दिरंगाई करत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले..



 राज्यसरकारच्या वतीनं याच्यामध्ये  दिरंगाई करण्यात येत नाहीयं. किंबहूना, न्यायालयामध्ये हा कायदा टिकला पाहिजे, यादृटिने मागच्या कालात ज्या त्रूटी राहिल्या त्या कश्या दूर करता येतील आणि सैंवेधानीक प्रकिया कशी पुर्ण करता येईल या संदर्भाचा  प्रश्र हा या ठिकाणी चालेला आहे.



 आंदोलन काळात आंदोलकांविरोधातले गंभीर गुन्हे वगळता, इतर गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या बैठकीनंतर बोलताना, राज्यात शांतता नांदावी, अशी विरोधी पक्षांची भूमिका असून, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन केलं. 

****



 मराठा आरक्षणा संदर्भात मराठा क्रांती मोर्चानं राज्यात सुरू केलेलं आंदोलन परवानगी घेऊन सुरू करण्यात आलं असून आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर येत्या १ ऑगस्ट पासून जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी काल परळीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. या आंदोलनाला बदनाम करणाऱ्या शक्ती सक्रीय झाल्या असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

****



 दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणी साठी औरंगाबाद शहरात सुमारे सहा ते सात कार्यकर्त्यांनी जलकुंभावर चढून घोषणाबाजी करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना समाजावून खाली उतरवलं.



 परभणी जिल्ह्यात कालही अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं, जमावानं केलेल्या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. जिल्ह्यातली बससेवा काल सलग पाचव्या दिवशी बंद होती.



 नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या भोकर फाटा, दाभड आणि महादेव पिंपळगाव परिसरात रस्ता रोको आंदोलन, तसंच टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नांदेड - बिदर या राष्ट्रीय महामार्गावर देगलूर - औरंगाबाद ही महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाची बस हिंसक जमावानं मारतळा गावाजवळ काल जाळली. या घटनेमुळे देगलूर आगारातून काल दुपारनंतर एकही बस सोडण्यात आली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 नाशिक इथं काल आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात आलं, तर धुळे रेल्वेस्थानका जवळ आंदोलकांनी धुळे-चाळीसगाव रेल्वे अडवून धरल्यानं सुमारे २० मिनिटं रेल्वेसेवा ठप्प झाली होती.

****



 केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे सरकारनं तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथं काल पवार यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं घटनेत दुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून, याबाबत विरोधकांशी चर्चा करण्यास तयार असल्याचं पवार म्हणाले.

****



 रायगड जिल्ह्यात काल एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला. काल सकाळी महाड जवळ पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात ही बस दरीत कोसळली. या बसमध्ये दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सुमारे ३४ कर्मचारी महाबळेश्वरला सहलीसाठी जात असताना हा अपघात झाला. बसमधले प्रकाश देसाई हे एकमेव प्रवासी वाचल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली आहे. या अपघातातल्या १७ प्रवाशांचे मृतदेह रात्री उशिरा पर्यंत बाहेर काढण्यात आले, पाऊस आणि धुक्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्यामुळे रात्री हे काम थांबवण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून, आज सकाळी उर्वरीत कर्मचाऱ्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू केलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 राज्यातल्या शाळामंध्ये गेल्या २०११ साली राबवण्यात आलेल्या विशेष पट पडताळणी मोहिमेत बोगस विद्यार्थी आढळलेल्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, तसंच शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार संचालकांनी कारवाई संदर्भात परिपत्रक काढलं आहे. या मोहिमेत दीड लाख विद्यार्थ्यांची संख़्या बोगस दाखवण्यात आली होती.

****



 राज्यातल्या विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या सहा, पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या १९ आणि पोलिस अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या ९५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद इथल्या राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून अपर्णा गिते यांची, जालना इथल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य पदी नामदेव चव्हाण, हिंगोली पोलिस अधीक्षक पदी योगेश कुमार, जालना पोलिस अधीक्षक पदी एस चैतन्य, उस्मानाबाद पोलिस अधीक्षक पदी राजा रामस्वामी, परभणी पोलिस अधीक्षक पदी कृष्णकांत उपाध्याय, नांदेड पोलिस अधीक्षक पदी संजय जाधव, लातूर पोलिस अधीक्षक पदी आर एस माने, तर औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्त पदी सी के मीना यांची बदली करण्यात आली आहे.

****



 देशात वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यासाठीच्या विधेयका विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपात, औरंगाबाद मधले एक हजार ४५० डॉक्टर सहभागी झाले होते. हे विधेयक भ्रष्टाचाराला चालना देणारं असल्यामुळे ते मंजूर करू नये, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे. 

****



 मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या ‘ग्रंथ पुरस्कारांचं वितरण’ आज औरंगाबाद इथं, नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, डॉक्टर अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम मसापच्या डॉ. ना.गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता होणार असल्याचं परिषदेनं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****



 औरंगाबाद इथल्या डॉ. कांचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालयाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राचार्य राजाराम राठोड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने आणि उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठवाडा महसूल प्रबोधनीच्या सभागृहात एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याचं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.

****



 जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर विरेगाव इथं काल एका मोटारीनं चिरडल्यानं, दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. भोकरदनच्या दिशेनं सुसाट निघालेली ही कार एका दुकानात घुसली. दुकानात खरेदी साठी आलेले दोन लहान मुलं जागीच चिरडल्या गेले तर अन्य एक जण जखमी झाला. तत्पूर्वी एका दुचाकीला या मोटारीनं ठोकरल्यानं दुचाकीवरच्या दोघीजणी जखमी झाल्या.

****



 जालना आणि  परभणी जिल्ह्यातल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतीगृह सुरु करण्यासाठी पर्यायी  जागांचा प्रस्ताव तसंच वसतिगृह तातडीनं सुरु करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, बबनराव लोणीकर यांनी दोन्ही जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या वसतीगृहासाठी लोणीकर यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.

****



 मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य स्तरीय बैठकीचं आयोजन आज लातूर इथं करण्यात आलं आहे. राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार असून, राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या समन्वयक, आणि मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आंदोलनाची पुढील दिशा या बैठकीत ठरवली जाईल.

****



 मराठा आरक्षणास पाठींबा म्हणून लातूर इथल्या राष्ट्रीय गुमास्ता मंडळ, आणि आडत व्यापारी संघटनेच्यावतीनं काल लातूरचा आडत बाजार बंद ठेवण्यात आला. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, हा समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे त्यामुळे ती मागणी योग्य असल्याचं मत, राष्ट्रीय गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे.

*****

***

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...