Wednesday, 1 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हा फक्त योगायोग नसून, हजारो वर्षांच्या परंपरेचं पुनरुत्थान-संघ शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन 

·      केंद्रीय मंत्रिमंडळाची एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या विविध निर्णयांना मान्यता

·      एसटीची दिवाळीतली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·      शून्य शिल्लक सुविधा असणाऱ्या ग्राहकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय

आणि

·      उद्या विजयादशमी-नागपुरात दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी दाखल होण्यास प्रारंभ

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हा फक्त योगायोग नसून, हजारो वर्षांच्या परंपरेचं पुनरुत्थान असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संघ स्थापनेबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

संघ शताब्दीनिमित्त एका विशेष टपाल तिकीटाचं तसंच नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यावेळी उपस्थित होते. कोणा व्यक्तीला नव्हे तर भगव्या झेंड्याला गुरू मानणाऱ्या आणि राष्ट्र प्रथम या धेय्याने कार्य करणाऱ्या संघ स्वयसेवकांनी, संघाच्या स्थापनेपासून आजवर अनेकदा आपत्तीच्या वेळी स्वयंस्फुर्तीने मदतकार्यात सहभाग घेतला आहे. संघाच्या विविध शाखा समाजात आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रात निस्वार्थ भावनेनं कार्यरत आहेत. 

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या विविध निर्णयांना मान्यता दिली. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ, कडधान्य उत्पादन वाढीसाठी विशेष योजना, रबी हंगामातल्या धान्यांसाठी किमान हमी भावात वाढ, आदी निर्णयांचा समावेश आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या निर्णयाबांबत माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट -  केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

****

गेली अनेक वर्ष रखडलेली राज्यसरकारची अनुकंपा भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या चार ऑक्टोबरला पाच हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना तसंच इतर पाच हजार १२२ उमेदवारांना नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार आहेत

****

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ-एसटीची यंदा दिवाळीतली प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना शिंदे यांनी, आपण परिवहन मंत्र्यांना असे निर्देश दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

शून्य शिल्लक - झिरो बॅलन्स सुविधा असणाऱ्या बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. विविध २२ सुधारणाही मल्होत्रा यांनी जाहीर केल्या.

दरम्यान, बँकेनं रेपो दर पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी महागाईचा दर दोन पूर्णांक ६ टक्के एवढा राहिल, असा अंदाज बँकेच्या पतधोरणा आढाव्यात वर्तवण्यात आला आहे.

****

ग्राहकांची बंद पडलेली बँक खाती तसंच कोणताही दावा न करण्यात आलेल्या ठेवी आणि रक्कमा ग्राहकांना परत मिळाव्यात यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक योजना जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत या योजनेचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे.

****

नवरात्रोत्सवात महानवमीचा उत्सव आज श्रद्धेनं साजरा झाला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये आज पूर्णाहुती देण्यात आली. अंबेजोगाईमधल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची पुर्णाहुतीनं सांगता झाली. विजया दशमीचा सण उद्या साजरा होत आहे. यानिमित्तानं बाजारपेठांमध्ये झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे.

****

६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उद्या नागपूरमध्ये साजरा होणार आहे. यानिमित्त बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षा भूमीवर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुराई ससाई यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी परिसरात पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दीक्षाभूमी इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं. उद्या सकाळी नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाला कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

****

सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'च्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं सीमांच्या पलीकडं जाऊन भारताची ओळख एक विश्वासू मित्र आणि जागतिक संकटाच्या वेळी प्रथम प्रतिसाद देणारे राष्ट्र अशी निर्माण केली आहे, त्याविषयी जाणून घेऊ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत आपल्या सीमा ओलांडून संकटांत असणाऱ्या देशांना प्रथम प्रतिसाद देणारा देश आहे. गेल्या पाच वर्षांत, भारतानं १५० हून अधिक देशांमध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणात मदत केली आहे. साथीच्या आजारांपासून ते नैसर्गिक आपत्तींपर्यंतच्या संकटांना तोंड देण्यासाठी वैद्यकीय पथकं,औषध पुरवठा आणि तज्ज्ञ मनुष्यबळ तैनात केलं आहे.

साथियों, दुनिया मे कोई भी मुश्कील आती है, तो भारत विश्वबंधु के तौर पर फर्स्ट रिस्पॉन्डर बन के वहा पहुँचता है आप को कोरोना का समय याद होगा, उस समय दुनिया मे कितना हाहाकार मचा था हर देश वैक्सीन के लिये परेशान था संकट के उस घडी में, भारत ने ठाना, के जादा जादा से जादा देशों को, वैक्सीन दी जायेगी

 

कोविडच्या संकटकाळात भारतानं लस मैत्री उपक्रम सुरू केला. युक्रेनमधील ऑपरेशन गंगा ते सुदानमधील ऑपरेशन कावेरी आणि इस्रायलमधील ऑपरेशन अजयपर्यंत, भारत जलद प्रतिसाद देणारा देश राहिला आहे. भारत केवळ आपल्या नागरिकांनाच नाही तर परदेशी नागरिकांनाही मदत करत आहे.परेशन सिंधू अंतर्गत इराणमधून परतलेल्या एका निर्वासितानं सांगितलं की, कितीही गंभीर परिस्थिती असली तरी सरकारवर त्याचा पूर्ण विश्वास आहे...

निर्वासित - बाईट

येमेनमध्ये अडकलेल्या ४ हजार ७०० हून अधिक भारतीय आणि दोन हजार परदेशी नागरिकांना भारताने ऑपरेशन राहतच्या माध्यमातून मदत केली. मादागास्करला तांदूळ पाठवणे असो, उत्तर कोरियाला टीबीवरील औषधी पाठवणे असो, किंवा प्रशांत महासागरातील टोंगा आणि भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला मदत पाठवणे असो, भारत हे काम विवेकबुद्धी आणि सन्मानानं करत आहे. संकटांना प्रतिसाद देऊन, भारत एक जागतिक मित्र- विश्वबंधू म्हणून उदयास आला आहे.

****

प्रत्येक नागरिकाने जलसाक्षर होण्यात तसंच जलसंधारणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं भूमी आणि जल व्यवस्थापन संस्था- वाल्मीच्या ४६ व्या स्थापना दिन सोहळ्यात बोलत होते. वाल्मीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राठोड यांनी यावेळी दिली.

****

लोकसहभागातून आदर्श तसंच जलसमृध्द गावाची उभारणी करण्याचं आवाहन, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी केलं आहे. त्या आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होत्या.

****

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना वेळीच मदत मिळावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते आज बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी आपला एका दिवसाचा पगार मदत म्हणून दिला आहे. पन्नास लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री मदतनिधीत जमा करण्यात आला.

****

हवामान

राज्यात आज नांदेड जिल्ह्याला तर उद्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments: