Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16
October 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
पुण्यात आज सिंबॉयसिस कौशल्य विद्यापीठाचा पदवी प्रदान
समारंभ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला. संरक्षण आणि अंतराळ
तंत्रज्ञान शाळेचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी
उपस्थित होते.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओ इथं सिंह यांच्या
उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होतील. नाशिकमध्ये
स्वदेशी बनावटीच्या तेजस एमके-वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या तिसऱ्या टप्प्याचं
उद्घाटन, तसंच ओझर मिनी स्मार्ट टाऊनशिपचं
उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
****
जागतिक स्तरावर आपला देश सकारात्मक
आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी
दिल्ली इथं आज ‘फरारांचे प्रत्यार्पण - आव्हाने आणि रणनीती’ या परिषदेत ते बोलत होते.
आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. आपण भारतात भ्रष्टावार, गुन्हा आणि
दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं असून, भारताबाहेर राहून जे अशी सगळी
कारस्थानं करतात त्यांच्याबद्दलही देशाचं शून्य सहिष्णू धोरण असल्याचं शहा यांनी नमूद
केलं. सध्या भारताशी संबंधित ३०० हून अधिक प्रत्यर्पण प्रकरणं विविध देशांमध्ये प्रलंबित
आहेत. या गुन्हेगारांना परत आणण्यासाठी कायदेशीर आणि धोरणात्मक उपायांवर या संमेलनात
सखोल चर्चा होत आहे.
****
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक
- एनएसजीचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यानिमित्त
एनएसजीच्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. देश रक्षणासाठी त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि
बलिदानाने राष्ट्राचं रक्षण करून अविचल पराक्रम आणि त्यागाचा सुवर्णमानक स्थापित केला
असल्याचं शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय
हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसनं आज २२ उमेदवारांची यादी जाहिर केली. तर जेडीयूनं
आपली १०१ उमेदवार घोषित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजपासून बिहारमध्ये
प्रचारात सहभागी होत आहेत.
दरम्यान, बिहार विधानसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना
दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील प्रसारण वेळ वाटप करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. आयोगाने
या पक्षांना मोफत प्रसारण आणि त्याच्या वेळेसाठी डिजिटल व्हाउचर वाटप केले आहेत. याअंतर्गत, प्रत्येक पक्षाला
दूरदर्शन आणि आकाशवाणीवर ४५ मिनिटांचा निश्चित वेळ देण्यात येणार आहे.
****
जागतिक अन्न दिवस आज पाळण्यात येतो. अधिक चांगलं अन्न
आणि अधिक चांगलं भवितव्य यासाठी सहयोग, ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना. आज, आपण केवळ अन्नच नाही तर भारताच्या लोकांना पोषण देण्याचा
आणि जागतिक अन्न भविष्याचं नेतृत्व करण्याचा संकल्प साजरा करत आहोत, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
इतर मागास वर्ग ओबीसीला खाजगी क्षेत्रातही आरक्षण मिळायला
हवं, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय
राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मांडली. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.
आणखी दोन ते तीन राज्यात पक्षाच्या जागा निवडून आल्यास आरपीआयला राष्ट्रीय पक्ष म्हणून
मान्यता मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं, आठवले यांनी सांगितलं. येत्या आठ मार्च रोजी पक्षाचं राष्ट्रीय
अधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत
महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन फारसा फायदा होणार नसल्याचं
मत आठवले यांनी व्यक्त केलं.
****
मुंबई विद्यापीठातल्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय संशोधन
केंद्रात डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन केलं जात आहे. काल नवी दिल्ली इथं मुंबई
विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन
यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री
डॉ. वीरेंद्र कुमार यावेळी उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडित विचार शैक्षणिक आणि
धोरणात्मक पातळीवर प्रसारित केले जातील.
****
देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या
जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने 'सरदार@150 युनिटी मार्च' या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत
राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१
ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मोहिमेत राज्यातल्या जास्तीत - जास्त युवकांनी सहभागी होण्याचं
आवाहन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. यासंदर्भात त्यांनी
काल मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
****
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचं
रूंदीकरण करून कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक महानगर विकास प्राधीकरणाच्या
वतीने या मार्गावरचं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे.
****
No comments:
Post a Comment