Saturday, 28 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात सामाजिक आणि आर्थिक समता आणि न्याय प्रस्थापित होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित विसाव्या 'जस्टा कॉजा' या वार्षिक विधी उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ते बोलत होते.

***

पंढरपूर, देहू, आळंदी पालखी मार्गाच्या कामासाठी सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा खर्च होत आहे आणि हे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यात माढा लोकसभा मतदार संघातल्या फलटण इथं विविध विकासकामांची सुरुवात झाली, त्यावेळी गडकरी काल बोलत होते.

***

राज्यात काल सर्वात कमी किमान तापमान औरंगाबाद इथं १३ पूर्णांक २ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळनं वर्तवली आहे.

***

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचं आज पुण्यात निधन झालं. ते २०२१पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पहात होते.

***

परभणी इथं आजपासून ज्येष्ठ संगीतकार उस्ताद डॉ. गुलाम रसुल यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन दिवसीय संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पार्वती मंगल कार्यालयात संध्याकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. 

//***********//

 


No comments: