Thursday, 30 June 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.06.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.06.2022 रोजीचा सायंकाळी 06.35 वाजेचा वृत्तविशेष कार्यक्रम - ध्वनीचित्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2022

Time - 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जून २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज संध्याकाळी साडे सात वाजता शपथ घेणार.

·      अडीच वर्षांत चालू कामांना स्थगिती, विकास काम नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार बघायला मिळाला- देवेंद्र फडणवीस यांची टीका.

·      फडणविसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकासाठी मनाचा मोठेपणा दाखवला - एकनाथ शिंदे यांची भावना.

आणि

·      देशात कोरोना विषाणू संसर्ग मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ५५ शतांश टक्के.

****

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज संध्याकाळी साडे सात वाजता राज्याचे विसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शिंदे यांच्यासह मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातली घोषणा केली. शिंदे आज एकटेच शपथ घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. फडणवीस म्हणाले –

कुठल्यातरी मुख्यमंत्री पदाकरता आम्ही करत नाही आहोत. ही तत्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल. आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. मग आम्ही एक्सपँशन करू. शिवसेनेचे, शिंदे साहेबांसोबत असलेले, अपक्षामधले आणि भारतीय जनता पक्षाचे असे सगळे लोक या एक्सपँशनमध्ये या मंत्रीमंडळात येतील. मी स्वत: बाहेर असेल पण हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे. पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार.

 

नवं सरकार इतर मागास वर्गाचं तसंच मराठा आरक्षण आणि अन्य सगळे असे विषय एका टप्प्यापर्यंत नेईल. सर्वांना न्याय देण्याचा हे सरकार प्रयत्न करेल, असंही त्यांनी सांगितलं. मावळत्या मंत्रिमंडळानं शेवटच्या दिवशी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशीव केलं, नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं, याला आपलं समर्थन असेल, असंही फडणवीस म्हणाले. त्या आधी फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.

****

महाविकास आघाडी अस्तित्वात आली हा जनमताचा अपमान होता, अशी टीका फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत केली. २०१९मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि अन्य लहान पक्ष, अपक्ष मिळून आपल्या १७० जागा निवडून आल्या होत्या. सहाजिकच ही अपेक्षा होती की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार येईल. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचं नावही जाहीर केलं होतं, असं फडणवीस म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत चालू कामांना स्थगिती, विकास काम नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार बघायला मिळाला, असा आरोप त्यांनी केला. या मंत्रिमंडळातले दोन मंत्री तुरुंगात गेले. या सरकारच्या कार्यकाळात रोज स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्त्वाचा अपमान होत होता. या शिवसेनेच्या आमदारांची मोठी कुचंबना झाली. त्यामुळे त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी तोडायचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी या आमदारांऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त प्राधान्य दिल्याचं फडणवीस म्हणाले. सरकार पडलं तर पर्यायी सरकार देऊ, लोकांवर आता निवडणुका लादणार नाही, असं आपण म्हटलं होतं, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सोळा अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार आपल्या सोबत आले आहेत. अजुन काही लोक येत आहेत. सगळ्याचं पत्र राज्यपालांना दिलं आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

****

देवेंद्र फडणवीस स्वतःही मुख्यमंत्रीपद घेऊ शकले असते पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकासाठी मनाचा मोठेपणा दाखवला, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी या निमित्त पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्ष आणि इतर मिळून सुमारे १२० आमदारांचं संख्याबळ असल्याचं ते म्हणाले. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जात असल्याबद्दल त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि फडणवीस यांचे आभार मानले. आपल्या सोबत पन्नास आमदार हे एक वैचारिक भूमिका, राज्याचा विकास या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी  दिली. ही ऐतिहासिक घटना आहे. आपल्या कोणालाही पद पाहिजे असं नाही. फडणवीस मंत्रिमंडळात नसले तरी ते सोबत आहेत, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

****

आज अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे दुपारी गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यांनी प्रथम देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ते राज्यपालांना भेटण्यासाठी रवाना झाले.

****

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि आमदारांनी आज मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण राज्याला सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार दिलं असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी त्या आधी एका संदेशाद्वारे नमुद केलं आहे. या सरकारला राज्याच्या सर्व घटकातल्या नागरिकांचा भक्कम पाठिंबा होता. हे सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला असल्याचंही चव्हाण यांनी या संदेशात म्हटलं आहे.

****

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. एखादा माणूस आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, असं राज ठाकरे यांनी आपल्या या संदेशात नमुद केलं आहे.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. काल तेरा हजार ८२७ रुग्ण बरे झाले आहेत. या संसर्गातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या चार कोटी २८ लाख २२ हजार ४९३ झाली आहे. सध्या या संसर्गाच्या एक लाख चार हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आज कोरोनाविषाणू बाधीत नवे नऊ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या १ लाख २ हजार ८९३ एवढी झाली असून, सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या २ हजार ६९२ एवढी झाली आहे.

****

वार्षिक अमरनाथ यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर नंतर आज सकाळी पुन्हा पहलगाम आणि बालटाल मार्गांवरुन सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून ४३ दिवसांची ही यात्रा ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाविकांचा ठावठिकाणा आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा त्यांना `रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज` देण्यात आले आहेत. भाविकांसाठी जेवण, औषधं आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा पुरवण्यात येत आहेत.

****

शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद इथं आगमन झालं. उस्मानाबाद शहर आणि परिसरातल्या भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखीचा आज उस्मानाबाद इथं मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी तुळजापूर मार्गे पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे. संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍‍वर माउलींचा पालखी सोहोळा दीड दिवसांचा सातारा जिल्ह्यात लोणंद इथल्या मुक्कामानंतर आज तरडगावकडे मार्गस्थ झाला. मार्गावर पहिलं उभं रिंगण चांदोबाचा माळ इथं झालं. यासाठी हजारोंची गर्दी जमली होती. तरडगाव इथं मुक्काम आटोपून पालखी सोहोळा उद्या दोन दिवस मुक्कामासाठी फलटणकडे मार्गस्थ होणार आहे. 

****

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक क्रमवारीत एकवीसाव्या क्रमांकावर असलेल्या एचएस प्रणॉय यांनी मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं आज क्वालालंपूर इथं थायलंडची प्रतिस्पर्धी फिट्टायापोर्न चायवानचा १९-२१, २१-९, २१-१४ असा पराभव केला. आता सिंधूचा उपांत्य पूर्व फेरीतला सामना चिनी तैपेईच्या ताई त्झू यिंगशी होणार आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.06.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.07.2022 ‘आजादी का अमृत महोत्सव - गाथा स्वातंत्र्यसेनानींची’.

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 – सोलापूर जिल्हा वार्तापत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जून २०२ दुपारी १.०० वा.

****

भारताची निर्यात सतत वाढवण्यासाठी आणि भारताची उत्पादनं नवीन बाजारपेठेत पोहोचण्यासाठी, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र मजबूत असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत जवळपास एक तृतीयांश वाटा या क्षेत्राचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली.

सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची कामगिरी आणि गती, निर्यातदारांची क्षमता वाढवणाऱ्या तसंच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांच्या योजनांचा शुभारंभ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. उद्यमी भारत हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची आज मुंबईत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महाराष्ट्राचे प्रभारी सी टी रवी, पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.

****

नवीन सरकार आणि मंत्रिपदाच्या याद्या याबाबत माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्या चुकीच्या असून, यावर विश्वास ठेवू नका, असं शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असं त्यांनी ट्वीट संदेशात नमूद केलं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातली विकास कामं यालाच आमचं प्राधान्य असल्याचं शिंदे म्हणाले.

****

महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार दिलं, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या सरकारला राज्याच्या सर्व घटकातल्या नागरिकांचा भक्कम पाठिंबा होता. हे सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला असल्याचं चव्हाण यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

वार्षिक अमरनाथ यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर नंतर आज सकाळी पुन्हा पहलगाम आणि बालटाल मार्गांवरुन सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून ४३ दिवसांची ही यात्रा ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाविकांचा ठावठिकाणी आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा त्यांना रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज देण्यात आले आहेत. भाविकांसाठी जेवण, औषधं आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा पुरवण्यात येत आहेत.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सिंगापूरचे तीन उपग्रह पी एस एल वी - सी 53 वाहनाद्वारे अवकाशात पाठवण्यासाठी सज्ज आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ही मोहिम मार्गस्थ होईल. या मोहिमेची उलटगणना व्यवस्थित सुरू आहे. भारताच्या दोन खासगी अंतराळ स्टार्ट-अप्सचे सहा लघु-उपग्रह देखील याच मोहिमेतून अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख १७ हजार २१७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ६१ लाख ९१ हजार ५५४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १८ हजार ८१९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १३ हजार ८२७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख चार हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद इथं आगमन झालं. उस्मानाबाद शहर आणि परिसरातल्या भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखीचा आज उस्मानाबाद इथं मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी तुळजापूर मार्गे पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे.

****

नांदेड-पुणे ही जलदगती रेल्वे गाडी येत्या चार जुलैपासून दररोज धावणार आहे. मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचं, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. ही गाडी आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचणार आहे.

****

कझाकिस्तानमध्ये सुरु झालेल्या एल्डोरा करंडक मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू सिम्रनजीत कौर आणि अनंत चोपडे यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अनंतनं ५४ किलो वजनी गटात मंगोलियाच्या खेळाडूचा तीन - दोन असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना कझाकस्तानच्या खेळाडूसोबत होणार आहे. या स्पर्धेत ३३ भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी झाला आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेचं आज बोलावलेलं विशेष अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. अधिवेशन ज्या प्रयोजनासाठी बोलावण्यात आलं होतं ते प्रयोजन आता राहिलेलं नाही त्यामुळे हे विशेष अधिवेशन संस्थगित केल्याचं विधानसभेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

वार्षिक अमरनाथ यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर नंतर आज सकाळी पुन्हा पहलगाम आणि बालटाल मार्गांवरुन सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून ४३ दिवसांची ही यात्रा ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाविकांचा ठावठिकाणी आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा त्यांना रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज देण्यात आले आहेत. भाविकांसाठी जेवण, औषधं आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा पुरवण्यात येत आहेत.

****

देशातच उत्पादन झालेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीवरचं नियंत्रण पूर्णपणे काढून टाकण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे तेल उत्पादक कंपन्यांना उत्खनन आणि उत्पादनासाठी अधिक मोकळीक मिळेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

एलईडी दिवे, त्यासाठी लागणारं सर्किट, सोलर हीटर, पाणी उपसा करायच्या मोटारी, शाई, टेट्रा पॅक आणि हिरे यावरच्या जीएसटीचा दर वाढवण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारांकडून देण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या कंत्राटांसाठी १२ ऐवजी १८ टक्के दराने वस्तू आणि सेवा कर द्यावा लागेल. १८ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

****

दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात नवापोरा इथं काल संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. या भागातल्या दहशतवाद्यांबाबत गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनंतर सुरक्षा दलांनी ही संयुक्त कारवाई केली.

****

चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत २७ चित्रपटांकरता प्राथमिक टप्प्यात आठ कोटी ६५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. दादासाहेब फाळके चित्रनगरीत काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی خبریں' تاریخ : 30 جون 2022 وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad

Date : 30 June 2022

Time : 09.00 to 09.10 AM

آکاشوانی اَورنگ آ باد

علاقائی خبریں

تاریخ  :  ۳۰   ؍  جون  ۲۰۲۲؁ ء

وقت  :  صبح  ۹.۰۰   سے  ۹.۱۰   بجے 


چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے ...

٭ اکثر یت جانچ کو روکنے کا مطالبہ سپریم کورٹ نے مسترد کرنے کے بعد اُدّھو ٹھا کرے کا 

وزیر اعلیٰ عہدے سمیت قا نون ساز کونسل کی رکنیت کا بھی استعفیٰ

٭ شیو سینا کا باغی گروپ کَل گوہاٹی سے گوّا میں داخل

٭ اورنگ آ باد شہر کا سنبھا جی نگر تاہم عثمان آ باد کا دھارا شیو نام کرنے کی تجویز کو ریاستی کابینہ کی منظوری 

٭ مراٹھواڑہ ‘  وِدربھ  اور  باقی ماندہ مہاراشٹر ترقیاتی بورڈس کو از سرِ نو تشکیل دینے کی تجویز کو منظوری 

٭ احمد نگر  -   بیڑ-    پر لی ویجناتھ ریلوے لائن کے 805؍ کروڑ17؍ لاکھ روپیوں کے نظر ثانی شدہ بجٹ کو بھی

حکو مت کی منظوری 

٭ نائب صدر جمہوریہ عہدے کا  6؍  اگست کو انتخاب 

٭ ریاست میں کووِڈ وباء کے نئے3؍ ہزار957؍ مریض‘  مراٹھوارہ میں108؍ متاثرین

اور

٭ حیدر آ باد مُکتی سنگرام کے سینئر مجاہد آ زادی بیرِسٹر کاشی ناتھ ناوَندر چل بسے 


اب خبریں تفصیل سے...

ٌٌ مہا وِکاس فرنٹ حکو مت کو اکثر یت ثابت کرنے کے ٹیسٹ کو روکنے کے لیے شیو سینا کا مطا لبہ سپریم کورٹ نے کَل مسترد کر دیا ۔ بعد ازاں شیو سینا چیف اُدّھو ٹھا کرے نے وزیر اعلیٰ کےعہدے کے ساتھ قا نون ساز کونسل کی رکنیت سے بھی کَل استعفیٰ دےد یا ۔ گور نر بھگت سنگھ کوشیاری سے اُنھوں نے راج بھون میں راست ملا قات کر کے وزیر اعلیٰ کے  عہدے کا استعفیٰ سپرد کیا ۔ گور نر نے ٹھاکرے کااستعفیٰ قبول کر لیا  اور  اُنھیں متبا دل انتظام ہونے تک عہدے کا کام کاج سنبھالنے کے لیے کہا ہے ۔ گور نر کو شیاری نے اکثر یت ٹیسٹ لینے کے لیے قانون ساز اسمبلی کا خاص اجلاس طلب کر نے کا حکم دینے کے بعد شیو سینا نےسپریم کورٹ کا رخ کیا اور اکثر یت ٹیسٹ روکنے کامطالبہ کرنے والی عرضداشت سپریم کورٹ میں پیش کی تھی ۔

  باغی اراکیِن اسمبلی کی نا اہلیت کا معا ملہ عدالت میں التواء میں رہنے پر اعتماد کی تجویز کا اجلاس طلب کرنا  یہ آئین کے خلاف ہے ۔ یہ بات شیو سینا نے عرضداشت میں کہی تھی ۔ عدالت نے اِس عرضداشت پر شام کو فوراً سماعت کی دو نوں فریقین کے بیا نات سُننے کے بعد عدالت نے اکثر یت جانچ پر روک لگانے کے شیو سینا کے مطالبے کو مسترد کر دیا  اِس کے بعد سماجی ذرائع سے  عوام سے راست خطاب کر تے ہوئے اُدّھو ٹھا کرے نے استعفیٰ دینے کا اعلان کیا  اپنے دور ِ حکو مت میں کَل ہوئی کابینی میٹنگ میں اورنگ آ باد کا نام سنبھا جی نگر  اور  عثمان آ باد کا دھاراشیو کیا گیا ۔ اِس پر اُنھوں نے اطمینان کا اظہار کیا ۔ جن افراد نے مسلسل یہ مطالبہ کیا تھا وہ افرادسے میٹنگ میں غیر حاضر تھے  تاہم  جن کی نام میں تبدیلی کی مخالفت تھی  یعنی  کانگریس  اور  راشٹر وادی کانگریس پارٹیوں نے نام میں تبدیلی پر مخالفت نہ کرتے ہوئے فوراً منظوری دینے پر وزیر اعلیٰ نے اُنکا شکریہ ادا کیا ۔ گزشتہ ڈھائی سال میں کسانوں کو قرضوں سے نجات سمیت مہا وِکاس فرنٹ حکو مت نے لیے گئےفیصلوں کا وزیر اعلیٰ نے اِس موقعے پر جائزہ لیا ۔

اِسی بیچ وزیر اعلیٰ نے استعفیٰ دینے کی وجہ سے قانون ساز اسمبلی کا آج طلب کیا گیا خاص اجلاس منسوخ کر دیاگیا ہے ۔ شیو سینا کا باغی گروپ کَل گو ہا ٹی سے گوا پہنچ گیا ہے ۔ اکثر یت ٹیسٹ کے مدّ نظر یہ گروکپ آج ممبئی آنے والا تھا ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد شہر کا نام تبدیل کر کے سنبھا جی نگر  تاہم  عثمان آباد کا دھا را شیو کرنے کی تجویز کو کَل ریاستی کابینہ نے منظوری دیدی ہے ۔ کا بینہ کی میٹنگ میں پاس کی گئی یہ تجویز مرکزی حکو مت کو روانہ کر کے اِس کے بعد ڈیویژن‘ ضلعے‘ تعلقہ اِسی طرح میونسپل کار پوریشن  اور  بلدیہ میں نام تبدیل کی جائے گی ۔ اِس سلسلے میں کار وائی علیحدہ سے محصول  اور محکمہ جنگلات اِسی طرح شہری تر قیات محکمے کی جانب سے قا نونی لحاظ سے کی جائے گی ۔

نئی ممبئی بین الاقوامی طیران گاہ کا نام عوامی رہنما آنجہا نی ڈی بی پاٹل بین الاقوامی طیران گاہ کر نے کا فیصلہ بھی کَل  کےکا بینی میٹنگ میں کیا گیا ہے ۔

***** ***** ***** 

ریاست کے وِدربھ تر قیاتی بورڈ مراٹھواڑہ تر قیاتی بورڈ  اور  باقی ماندہ مہاراشٹر تر قیاتی بورڈ اِن تینوں علاقائی تر قیاتی بورڈس کی از سرِ نو تشکیل کر نے کا فیصلہ کابینہ نے لیاہے ۔ اِن بورڈس کو ازسرِ نو تشکیل دینے کے ضمن میں در خواست مرکزی حکو مت کو کرنے کے سلسلے میں گور نر کو سفارش کی گئی ہے ۔

***** ***** ***** 

احمدنگر-  بیڑ-پر لی ویجناتھ اِس نئی ریلوے لائن کے پروجیکٹ کے805؍ کروڑ17؍ لاکھ روپیوں کے نظر ثانی شدہ بجٹ کو کابینہ کی میٹنگ میں منظوری دی گئی ۔ اِسی طرح سے اِس میں ریاستی حکو مت کا مالی حصّہ دینے کا فیصلہ کیا گیا ۔ اِس پروجیکٹ کے لیے ریاستی حکو مت کا 2؍ ہزار402؍ کروڑ 59؍ لاکھ روپیوں کا 50؍ فیصد کاحصّہ مرکزی حکو مت کو

فنڈ کی فراہمی کے لحاظ سے مر حلے وار دیا جائے گا ۔

***** ***** ***** 

ہنگولی ضلعے میں باڑا صاحب ٹھا کرے ہلدی ریسرچ  اور  تر بیتی مرکز قائم کرنے کو کابینہ نے منظوری دی ۔ اِس مرکز کے لیے100؍ کرور  روپیوں کا فنڈ فراہم کیا جائے گا ۔


***** ***** ***** ***** ***** ***** 

یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** ***** ***** ***** 


مرکزی انتخا بی کمیشن نے نائب صدر جمہوریہ کے عہدے کے انتخاب کی تاریخ کا اعلان کر دیا ہے ۔ انتخاب کا آرڈیننس 5؍ جولائی کو جاری کیا جائے گا ۔ اِس کے لیے 19؍ جولائی تک امید وار در خواستیں داخل کر سکتے ہیں ۔ ضرورت پڑ نے پر 6؍ اگست کو نائب صدر جمہوریہ کےعہدے کے انتخاب کے لیے رائے دہی ہو گی ۔ موجودہ نائب صدر جمہوریہ ایم  وینکیا نائیڈو کی مُدّت 10؍ اگست کو ختم ہو رہی ہے ۔

***** ***** ***** 

ریاست میں کَل کووِڈ وباء کے نئے3؍ ہزار957؍ مریضوں کی تصدیق ہوئی ۔ اِس کی وجہ سے تمام ریاست میں کووِڈ متاثرین کی جملہ تعداد 79؍ لاکھ72؍ ہزار474؍ ہو گئی ہے ۔ کَل اِس وباء کی وجہ سے 7؍ مریض فوت ہو گئے ۔ ریاست میں اب تک اِس وباء کی وجہ سے مر نے والے مریضوں کی جملہ تعداد ایک لاکھ47؍ ہزار922؍ ہو گئی ہے ۔ شرح اموات ایک اعشا ریہ 85؍ فیصد ہے ۔ کَل3؍ ہزار696؍ مریض شفا یاب ہو گئے ۔ ریاست میں اب تک 77؍ لاکھ98؍ ہزار817؍ مریض اِس بیماری سے نجات حاصل کر چکے ہیں ۔ کووِڈ سے نجات کی شرح 97؍ اعشاریہ 84؍ فیصد ہو گئی ہے ۔ ریاست میں فی الحال 25؍ ہزار735؍ مریضوں کا علاج جا ری ہیں۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ میں کَل108؍ کورونا وائرس متاثرہ مریضوں کا انکشاف ہوا ۔ اورنگ آ باد ضلعے میں42؍ ناندیڑ  اور  عثمان آ باد اضلاع میں فی کس18؍ جالنہ  اور  لاتور اضلاع میں فی کس14؍ تاہم  بیڑ ضلعے میں2؍ نئے مریضوں کا اندراج ہوا ۔

***** ***** ***** 

اورنگ آ باد کے میونسپل کارپوریشن کے ایڈمنسٹریٹر کے عہدے پر سانگلی کے ضلع کلکٹر ڈاکٹر ابھیجیت چو دھری کا تقرر کیا گیا ہے ۔ موجودہ ایڈ منسٹریٹری آستِک کمار پانڈے کا اورنگ آباد سڈ کو کے چیف ایڈ منسٹریٹر کے عہدے پر تبادلہ کیا گیا ہے ۔

***** ***** ***** 

حیدر آ باد مُکتی سنگرام کے سینئر مجاہد آزادی بیرِسٹر کاشی ناتھ نا وَندر کَل اورنگ آباد میں چل بسے ۔ وہ95؍ برس کے تھے ۔ وہ مختلف تنظیموں کے صدر تھے۔نا وَندر کے جسدِ خاکی پر کَل شام اورنگ آ باد میں آخری رسو مات ادا کر دی گئی ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد کا سنبھا جی نگر نام میں تبدیلی کی تجویز منظور ہونے کے بعد شہر کے  ٹی  وی  سینٹر چوک میں چھتر پتی سنبھاجی مہاراج کے مجسمّے پر خراجِ عقیدت پیش کر تے ہوئے شیو سینا کے رہنما چندر کانت کھیرے ‘ رکن اسمبلی امبا دا س دانوے  سمیت شیو سینکوں نے ڈھول تاشوں ‘ آتِش بازی کر کے پیڑے تقسیم کر کے جشن منا یا ۔ عثمان آباد کا دھا را شیو نام کرنے  کی تجویز کو منظوری دینے کی وجہ سے عثمان آباد شہر میں شیو سینا کی جانب سے جشن منا یاگیا ۔

***** ***** ***** 

اِسی بیچ اورنگ آباد کے رکن پارلیمنٹ امتیاز جلیل نے اورنگ آباد کا سنبھا جی نگر نام کرنے کی مخالفت ظاہر کی ہے ۔ اقتدار جارہاہے اِس کا اندازہ ہو تے ہی وزیر اعلیٰ اُدّھو ٹھا کرے نے یہ فیصلہ کیا ۔ آخری فیصلہ مرکزی حکو مت کے ذریعے سے لیا جائے گا ۔ اِس لحاظ سے ہم مقابلہ کریں گے ۔ یہ بات رکن پارلیمنٹ امتیاز جلیل نے کہی ہے ۔

***** ***** ***** 

ریاست میں آئندہ2؍ یوم میں بارش ہونے کا قیاس محکمہ موسمیات نے ظاہر کیا ہے ۔ سِندھو دُرگ  اور  رتنا گیری میں آج Orange  الرٹ جاری کیا گیا ہے  تاہم  تھا نے ‘  پالگھر  ‘  وِدربھ  اور  مراٹھواڑہ کے کئی علاقوں میں آج  یلو  الرٹ جاری کیا گیا ہے ۔ کو کن ساحلی علاقوں ‘ مراٹھواڑہ   اور  وِدربھ میں کَل کے لیے  یلو الرٹ جاری کیا گیا۔

***** ***** ***** 


آخر میں چند اہم خبروں کی سر خیاں دوبارہ سماعت کیجیے...


٭ اکثر یت جانچ کو روکنے کا مطالبہ سپریم کورٹ نے مسترد کرنے کے بعد اُدّھو ٹھا کرے کا 

وزیر اعلیٰ عہدے سمیت قا نون ساز کونسل کی رکنیت کا بھی استعفیٰ

٭ شیو سینا کا باغی گروپ کَل گوہاٹی سے گوّا میں داخل

٭ اورنگ آ باد شہر کا سنبھا جی نگر تاہم عثمان آ باد کا دھارا شیو نام کرنے کی تجویز کو ریاستی کابینہ کی منظوری 

٭ مراٹھواڑہ ‘  وِدربھ  اور  باقی ماندہ مہاراشٹر ترقیاتی بورڈس کو از سرِ نو تشکیل دینے کی تجویز کو منظوری 

٭ احمد نگر  -   بیڑ-    پر لی ویجناتھ ریلوے لائن کے 805؍ کروڑ17؍ لاکھ روپیوں کے نظر ثانی شدہ بجٹ کو بھی حکو مت کی منظوری 

٭ نائب صدر جمہوریہ عہدے کا  6؍  اگست کو انتخاب 

٭ ریاست میں کووِڈ وباء کے نئے3؍ ہزار957؍ مریض‘  مراٹھوارہ میں108؍ متاثرین

اور

٭ حیدر آ باد مُکتی سنگرام کے سینئر مجاہد آ زادی بیرِسٹر کاشی ناتھ ناوَندر چل بسے 


علاقائی خبریں ختم ہوئیں

٭٭٭٭٭


आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      बहुमत चाचणी रोखण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा

·      शिवसेनेचा बंडखोर गट काल गुवाहाटीमधून गोव्यात दाखल

·      औरंगाबाद शहराचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा प्रस्तावही मंजूर

·      अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या ८०५ कोटी १७ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य सरकारची मान्यता

·      हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन होणार

·      उपराष्ट्रपती पदाची सहा ऑगस्टला निवडणूक

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे तीन हजार ९५७ रुग्ण, मराठवाड्यात १०८ बाधित

आणि

·      हैदराबाद मुक्तीसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचं निधन

****

सविस्तर बातम्या

महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी रोखण्याची शिवसेनेची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचाही काल राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी राजभवन इथं भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, बहुमत चाचणी थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं, शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं होतं. न्यायालयानं या याचिकेवर सायंकाळी तातडीनं सुनावणी घेतली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं बहुमत चाचणी रोखण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी थेट संवाद साधत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले...

Byte

महाविकास आघाडीकडे शिवसेनेकडे किती आमदार आहेत, मग भाजपकडे किती आहेत, आणखी किती आहेत, मला त्यामध्ये रस नाही. मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे, की माझ्या विरोधामध्ये कोण आहेत, किती आहेत, मला त्याच्यात आजीबात रस नाही. पण माझ्या विरोधात एक जरी माझा माणूस उभा राहीला तरी ते मला लज्जास्पद आहे. ठिके तुमची इच्छा ही प्रमाण. कारण का मला तो खेळच खेळायचा नाहीये. आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा देखील त्याग करत आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे

आपल्या कार्यकाळात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण करता आलं, याचं समाधान वाटत असल्याची भावना, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ज्या लोकांनी सतत ही मागणी केली, ते लोक या बैठकीला अनुपस्थित होते, मात्र ज्यांचा या नामकरणास विरोध असल्याचं भासवण्यात आलं, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र या नामकरणाला कोणताही विरोध न करता, तत्काळ मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी कर्जमुक्तीसह महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

बहुमत चाचणीची मागणी होताच, राज्यपालांनी तत्काळ बहुमत चाचणीचे आदेश दिले, तीच तत्परता विधान परिषदेच्या नामनियुक्त १२ आमदारांच्या प्रलंबित प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी दाखवावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

बंडखोर शिवसैनिक आमदारांनी नाराजीच्या मुद्यावर प्रत्यक्ष आपल्याशी चर्चा करायला हवी होती, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लावल्या जात असलेल्या सुरक्षा बंदोबस्तावर, त्यांनी उपरोधिक टीका केली. ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांततेचं आवाहन केलं. शिवसेना आपलीच आहे, ती कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आश्वासित केलं. ते म्हणाले...

Byte

   

मी आज सांगतो उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्या अधेमध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचलं, शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या, आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या, तो गोडवा त्यानं लखलाभो. मला तुमच्या प्रेमाचा गोडवा पाहीजे. मला तुमच्या आशिर्वादाचा गोडवा पाहीजे, हा कोणी हिरावून नाही घेऊ शकत. मला पुन्हा सगळ्यांची साथ, सोबत, आशिर्वाद पाहीजे, प्रेम पाहीजे. पुन्हा मी शिवसेना भवनामध्ये बसायला सुरूवात करणार आहे. माझ्या शिवसैनिकांना भेटायला सुरूवात करणार आहे आणि पुन्हा एकदा नविन भरारी मारणार आहे. सगळे जे काही तरुण तरुणी आणि माझ्या माता - भगीनी आहेत, त्यांना सोबत घेऊन. शिवसेना आपलीच आहे, शिवसेना कधीही आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेचं आज बोलावलेलं विशेष अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे.

****

शिवसेनेचा बंडखोर गट काल गुवाहाटीमधून गोव्यात दाखल झाला. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर हा गट आज मुंबईत येणार होता.

****

औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत संमत झालेले हे ठराव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येऊन त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका तसंच महानगरपालिका आणि नगरपालिका यांचं नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल आणि वन विभाग तसंच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं “लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

****

राज्यातल्या विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ या तिन्ही प्रादेशिक विकास मंडळांचं पुनर्गठन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. ही मंडळे पुर्नगठीत करण्यासंदर्भातली विनंती केंद्र शासनाला करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येईल. सध्याच्या मंडळाचा कालावधी ३० एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आला आहे.

अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या ८०५ कोटी १७ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच यात राज्य शासनाचा आर्थिक हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठीचा राज्य शासनाचा दोन हजार ४०२ कोटी ५९ लाख रुपयांचा ५० टक्के इतका हिस्सा केंद्र शासनास निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्याने देण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. राज्यात हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने केलेल्या शिफारशीस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

राज्यातल्या ग्रामीण भागात विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ग्रामीण भागात २० लाभार्थ्यांकरता एक वसाहत निर्माण करण्यात येईल. दहा कुटुंबांकरता प्रति वसाहतीसाठी अंदाजे ४४ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला लाभार्थी निवडण्याचे अधिकार देण्यात येणार आहे.

****

केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतिपद निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीची अधिसूचना पाच जुलै रोजी जारी करण्यात येणार आहे. यासाठी १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आवश्यकता भासल्यास सहा ऑगस्टला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान घेतलं जाईल. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ९५७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ७२ हजार ४७४ झाली आहे. काल या संसर्गानं सात रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९२२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ६९६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ९८ हजार ८१७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २५ हजार ७३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १०८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४२, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १८, जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी १४, तर बीड जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

राज्यातल्या चार कोटी जमीनमालकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी त्यांच्या सातबारा उताऱ्याशी लिंक करण्याचा निर्णय, भूमिअभिलेख विभागानं घेतला आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंद, बोजा आदींची माहिती, खातेदाराला एस एम एस आणि ई-मेलच्या माध्यमातून समजणार आहे. तसंच जमिनींची परस्पर विक्री होत असल्यास ही बाब खातेदारांना समजणार असून, या माध्यमातून फसवणूक रोखणं शक्य होणार आहे.

****

राज्यात पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यातल्या २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, चार ऑगस्टला मतदान होणार असल्याची घोषणा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं केली आहे.

****

औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासकपदी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक पदी बदली झाली आहे.

मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त सेवानिवृत्त होत असल्यानं, गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसाळकर यांची मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

हैदराबाद मुक्तीसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बॅरिस्टर काशीनाथ नावंदर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले नावंदर यांनी भुमीगत राहून औरंगाबाद तहसिल कचेरीवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. परसोडा आणि रोटेगाव रेल्वे रुळ उखडून, तसंच तारा तोडून निजाम सरकारची दळणवळण व्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील ते सहभागी होते. विद्यार्थी संघाचे चिटणीस, मराठवाडा स्वातंत्र्यसैनिक संघटना, मराठवाडा बुद्धिबळ संघटना, तसंच औरंगाबाद वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. नावंदर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शहरातल्या टी.व्ही.सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, आतिषबाजी करुन आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे उस्मानाबाद शहरातही शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला.

दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला विरोध दर्शवला आहे. सत्ता जात असल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतला जातो. त्याअनुषंगानं आम्ही लढा देणार असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.

****


औरंगाबादचे आमदार हरवले असल्याची तक्रार आम आदमी पक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष तक्रार घेण्यास नकार देण्यात आल्यानं ही तक्रार टपालानं पाठवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच आमदारांचा समावेश आहे, या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काल वाहन फेरी काढण्यात आली.

दरम्यान, पैठण तालुक्यातल्या रजापूर इथं शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि संदिपान भुमरे यांच्या समर्थनार्थ शांततेत भव्य रॅली काढण्यात आली. पाचोड पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

****

राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आज ऑरेंज अलर्ट तर ठाणे, पालघरसह विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****