आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ जून २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटानं १६ आमदारांरुद्ध अपात्रतेची कारवाई
आणि गटनेता बदल या दोन्ही निर्णयाविरोधात, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर
आज सुनावणी होणार आहे.
****
जी-7 देशांच्या नेत्यांसोबत उर्जा, अन्न सुरक्षितता, दहशतवाद या मुद्यांवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज चर्चा करणार आहेत. विकसनशील देशांना हवामान बदलाचा सामना करण्यास मदतीसाठी
जी-7 देशांद्वारे 600 बिलियन डॉलर्सच्या पायाभूत सुविधा उपक्रमाचा प्रारंभ यावेळी होणार
आहे.
दरम्यान, जी-7 परिषदेसाठी पंतप्रधान काल म्युनिक इथं पोहोचले. तीथे त्यांचं जर्मनीस्थित
भारतीयांनी स्वागत केलं. यावेळी स्वागतासाठी जमलेल्या लहानमोठ्या भारतीयांशी त्यांनी
संवाद साधला.
****
राष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा आज आपला उमेदवारी अर्ज
दाखल करणार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांची
आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. येत्या १८ जुलैला ही निवडणूक होणार असून, २१ जुलै
रोजी मतमोजणी होणार आहे.
****
सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि गुजरातचे माजी पोलिस महासंचालक आर बी
श्रीकुमार यांना स्थानिक न्यायालयानं दोन जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. २००२
मधल्या गुजरात दंगल प्रकरणात निरपराध व्यक्तींना गोवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
****
फ्रान्समध्ये झालेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या रिकर्व्ह प्रकारात भारतीय
महिला संघानं रौप्यपदक पटकावलं आहे. या स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या
दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि सिमरनजीत कौर यांच्या संघाला, चिनी तैपेईच्या संघाकडून
पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा जोडीने मिश्र
कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं, तर ज्योतीने वैयक्तिक गटात रौप्यपदकही पटकावलं
आहे.
****
रणजी करंडकच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईला मध्य प्रदेशाकडून पराभव स्वीकारावा
लागला. दुसऱ्या डावाअखेर मुंबईनं दिलेलं १०८ धावांचं आव्हान मध्य प्रदेशनं चार गडी
गमावून पूर्ण केलं. मध्य प्रदेशनं पहिल्यांदाच रणजी करंडक पटकावला आहे.
****
No comments:
Post a Comment