Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५
जुलै २०२२ दुपारी १.०० वा.
****
पुढच्या
२५ वर्षात देशाला 'सबका प्रयास,
सबका कर्तव्य' या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार
असून, या २५ वर्षांत अमृतकाळ प्राप्तीचा
मार्ग पुढे जाईल, जे प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं, नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं
आहे. देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित
केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. वॉर्ड काऊन्सिलर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी आपल्याला मिळाली,
ही भारताची महानता असून, लोकशाहीची ताकद असल्याचं
त्या म्हणाल्या. आपल्या सारख्या आदिवसी महिलेला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला, याचा
अर्थ असा होतो की, भारतातला गरीब स्वप्न पाहू शकतो आणि त्याला पूर्णही करु शकतो, असं
त्यांनी नमूद केलं. २६ जुलै हा कारगिल विजय दिवस असून, हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचं प्रतीक असल्याचं सांगून राष्ट्रपती मुर्मू यांनी, देशाच्या
सैन्याला आणि सर्व नागरिकांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी, उपेक्षितांच्या उत्थानासाठी,
महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याच्या आपल्या संकल्पाचा राष्ट्रपतींनी पुनरुच्चार केला.
या
शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री,
विविध राज्यांचे राज्यपाल तसंच मुख्यमंत्री,
संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली.
तत्पूर्वी,
राष्ट्रपती मुर्मू यांनी आज सकाळी राजघाट इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली
वाहिली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. पुढच्या २५ वर्षांच्या अमृत
काळात राज्यात सुशासन आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावेत, असं त्यांनी
यावेळी सांगितलं. भाजपाशासित राज्यात सरकारच्या सर्व महत्त्वाच्या योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करुन, सुशासनाचे लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत
पोहोचवण्यासाठी देखील
प्रयत्न करावेत, अशी सूचना पंतप्रधानांनी
यावेळी दिली.
****
खराब
हवामानामुळे बालटाल आणि पहलगाम इथून जाणारी अमरनाथ यात्रा काही काळासाठी थांबवण्यात
आली आहे. या मार्गावर मुसळधार पाऊस सुरु आहे. पाऊस कमी झाल्यावर यात्रा पुन्हा सुरु
करण्यात येणार आहे. काल संध्याकाळी ६३ हजाराहून अधिक भाविकांनी अमरनाथाचं दर्शन घेतलं.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १६ लाख
८२ हजार ३९० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०२ कोटी १७ लाख
६६ हजार ६१५ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या १६ हजार ८६६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ४१ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १८ हजार १४८ रुग्ण बरे झाले.
****
यंदाच्या साखर हंगामात साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात आल्यानं देशातल्या शिल्लक साखरेचं ओझं कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच
पुढील हंगामात साखर उद्योगाला अधिक चांगले दिवस येण्याचा अंदाज भारतीय साखर कारखानदार
संघटना अर्थात इस्माने व्यक्त केला आहे.
****
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असला तरी राज्य
शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार
असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा पार पडला, त्यावेळी
ते बोलत होते. धनगर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, विविध
कल्याणकारी योजना राबवल्या जातील, अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना
म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या १४
तुकड्या तैनात केल्या आहेत.
दरम्यान,
राज्यात एक जून पासून आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे
२८ जिल्हे आणि ३०९ गावं प्रभावित झाली असून, ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत.
अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांचा मृत्यू झाला असून, २१८ प्राणी दगावले
आहेत.
****
ब्रिटनमधल्या
बर्मिंघम इथं या महिन्याच्या २८ तारखेपासून राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धा सुरु होणार आहेत.
भारतीय क्रिडा प्राधिकरणानं खेळाडुंचा उत्साह वाढवण्यासाठी क्रिएट फॉर इंडिया हे अभियान
सुरु केलं आहे.
****
No comments:
Post a Comment