आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ जुलै २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
भारत संचार निगम लिमिटेड - बीएसएनएल साठी एक लाख ६४
हजार कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
तसंच भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड आणि बीएसएनएलच्या विलीनीकरणालाही
मान्यता दिली. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी
वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.
****
अँटी डोपिंग, अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी
विधेयक २०२१ काल लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. क्रीडा क्षेत्रातल्या
अँटी डोपिंग नियमनासाठी नाडा या राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्याची तरतूद या विधेयकात
आहे.
****
मागच्या काही वर्षात सरकारनं योजलेल्या विविध उपायांमुळे देशाचं कोळसा उत्पादन
वाढत असून, पुढच्या आर्थिक वर्षात हे उत्पादन एक अब्ज टनांवर
पोचण्याचा अंदाज आहे. कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल लोकसभेत
ही माहिती दिली.
जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांवर सध्या विपरीत परिणाम दिसत असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेत
सातत्यानं तेजी असून, ती मजबूत होत आहे, अशी
माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी काल लोकसभेत दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या हर्शीचा तहसीलदार मनोजकुमार शेरखाने
याला चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल औरंगाबाद इथं
अटक करण्यात आले. तक्रारदाराच्या वडिलांच्या जमिनीतली
वाटणीची जमीन नावावर करून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या भुसणी इथल्या कृष्णार्जुन ॲग्रो इंडिस्ट्रीज
अँड वेअर हाऊस या ठिकाणाहून अवैध विनापरवाना बनावट देशी मद्याची निर्मिती करण्याचं
मोठ्या प्रमाणातलं साहित्य जप्त करण्यात आलं. राज्य उत्पादन
शुल्क विभागाच्या पथकानं मंगळवारी ही कारवाई केली. या प्रकरणी
दोन जणांना अटक करण्यात आलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लू
मुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या ३३ जणांना स्वाईन
फ्लू ची लागण झाली आहे.
****
४४
व्या बुध्दीबळ ऑलिंपियाड स्पर्धेला आजपासून चेन्नई इथं सुरुवात
होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.
//***********//
No comments:
Post a Comment