आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ जुलै २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
देशाच्या
१५व्या राष्ट्रपती म्हणूण द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. सरन्यायाधीश
न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
मुर्मू या देशाच्या दुसर्या महिला राष्ट्रपती, तर पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती
आहेत. आपल्या सारख्या आदिवसी महिलेला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला, याचा अर्थ असा
होतो की, भारतातला गरीब स्वप्न पाहू शकतो आणि त्याला पूर्णही करु शकतो, असं मुर्मू
यांनी याप्रसंही बोलताना नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी,
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री,
विविध राज्यांचे राज्यपाल तसंच मुख्यमंत्री,
संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी या शपथविधी सोहळ्यासाठी
उपस्थित होते.
त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या
या समारंभानंतर, राष्ट्रपती मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या असून, तीथे त्यांना मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी राष्ट्रपती
मुर्मू यांनी राजघाट इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. पुढच्या २५ वर्षांच्या अमृत
काळात राज्यात सुशासन आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावेत, असं त्यांनी
यावेळी सांगितलं. भाजपाशासित राज्यात सरकारच्या सर्व महत्त्वाच्या योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करुन, सुशासनाचे लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत
पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पंतप्रधानांनी
यावेळी दिली.
****
मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे.
दरम्यान, दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला
आहे. या रुग्णाला कुठेही प्रवास न करता
मंकीपॉक्सची लागण झाली आहे. देशातल्या मंकीपॉक्स रुग्णांची संख्या
आता चार झाली आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा
आणि वाङमय विभागाच्या वतीनं आयोजित शब्दोत्सव या कार्यक्रमाचं
उद्घाटन आज दुपारी
१२ वाजता कवी नारायण पुरी यांच्या हस्ते होणार आहे.
****
No comments:
Post a Comment