Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 02 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०२ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग
तसंच तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त
·
केंद्रीय मंत्रिमंडळाची डिजिटल
कृषी योजनेला मंजुरी-मुंबई इंदूर रेल्वेमार्गासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपये निधीलाही
मान्यता
·
मराठवाड्यात पावसाची संततधार
कायम; जालन्यात एकाचा नदीत बुडून मृत्यू
तर परभणीत शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्या ठार
आणि
·
पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत आज
भारताच्या नीतेश कुमारला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक तर योगेश कठुनियाला थाळीफेकमध्ये
रौप्य पदक
****
सहकार
क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवल्यास, प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढून सहकारी संस्थांचा कायापालट करता येणं शक्य असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर
इथं वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात त्या बोलत होत्या. राज्यपाल
सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय
राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार
धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहकार
हे सामाजिक शक्तीचा योग्य वापर करून घेणारं क्षेत्र आहे, मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. बदलत्या काळासोबत
सहकार क्षेत्रानंही बदलण्याच्या गरजेकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या –
इस तेजी से बदलते हुये समय में सहकारी संस्थाओं को
भी अपने आप को बदलने की आवश्यकता है। उन्हें अधिक से अधिक टेक्नॉलॉजी का उपयोग करना
चाहिये। साथ ही मॅनेजमेंट को प्रोफेशनल बनाना चाहिये। ये सदैव ध्यान रखना चाहिये की,
कोई भी सहकारी संस्था किसी के व्यक्तिगत हित और लाभ कमाने का साधन बनकर ना रह जाये।
नही तो को ऑपरेटीव्ह का उद्देश्य ही समाप्त हो जायेगा। मेरा मानना है की, सहकारीता
समाज मे ही एक शक्ती का सदुपयोग करने का उत्तम माध्यम है। सहकारीता का योगदान देश के
विकास में अतुलनीय है।
दरम्यान, तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपतींचं कोल्हापूर
इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वागत केलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंबाबाईचं
दर्शन घेतलं. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत
समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान
परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. परवा चार तारखेला
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण
योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.
****
केंद्रीय
मंत्रिमंडळानं आज दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये गुंतवणुकीच्या डिजिटल कृषी योजनेला
मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रांच्या बळकटीकरणासाठी एक हजार दोनशे दोन
कोटी रुपयांची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची
तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. मुंबई-इंदूर दरम्यान तीनशे
नऊ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या
निधीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा नवा रेल्वेमार्ग २०२८-२९ मध्ये पूर्ण होणं
अपेक्षित आहे.
****
मराठवाड्याच्या
बहुतांश भागात पावसाची संततधार आजही कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात आज
पहाटे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण सुमारे ९० टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची
शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे
विभागानं केलं आहे.
जिल्ह्यातल्या
सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे.
****
बीड
जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के झाला आहे. बीड शहरातील बिंदुसरा
नदीच्या काठावरील परिसराती नागरिकांनी
सद्यस्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. क्षीरसागर
यांनी आज अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल
रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळामध्ये
अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झालं आहे.
****
जालना
जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक
बंद आहे. जिल्ह्यातल्या २९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे.
दरम्यान, घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव
इथले शेतकरी शिवाजी विठ्ठल शिंदे यांचा आज सकाळी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात ५२ मंडळांपैकी ५० मंडळांत अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून, या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यांतल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
आहे. जिल्ह्यातल्या पूरस्थितीकडे पाहता बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर मिळावं, अशी मागणी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे.
पाथरी
तालुक्यात बोरगव्हाण इथे पुरामुळे एका शेतातल्या शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद
शेळ्या आणि चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाला तर काही शेळ्या आणि शेती साहित्य वाहून गेलं.
महसूल विभागानं या घटनेतल्या नुकसानाचा तात्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझुर
गावात रात्री मुक्कामी असलेली बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. याशिवाय एक मळणी यंत्रही
पुरात वाहून गेल्याचं वृत्त आहे. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
हिंगोली
जिल्ह्यात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेवाळा गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. गावातल्या
दीडशे ते दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं आहे. कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमरा फाटा रस्त्यावर
कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक
करणं धोकादायक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औंढा
नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर आज सकाळी साडेअकराच्या सुमाराला वीज कोसळली.
यात वायरलेस सेटसह इतर विद्युत साहित्य जळून गेलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित
हानी झाली नाही.
****
लातूर
जिल्ह्यातल्या १० पैकी ०६ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या
नुकसानाचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. नुकसानीचे
पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला
दिल्या. नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष
हजर राहून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
****
नांदेड
शहरातल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग
करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जुन्या नांदेडमधील संत दासगणू
महाराज पुलावरून पाणी वाहत असल्याने, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
नांदेड
शहरात महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्रं उघडली आहेत. अनेक नागरिकांना
सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
****
सततच्या
पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी कराव्यात, असं आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
पॅरिस
पॅरालिंपिक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आज भारताच्या नीतेश कुमारनं बॅडमिंटनमध्ये सुवर्ण
पदक जिंकलं. याशिवाय योगेश कठुनियानं पुरुषांच्या एफ छपन्न थाळीफेक क्रीडाप्रकारात
रौप्य पदक जिंकलं. आजच्या या पदकांमुळे आता भारताची पदकसंख्या नऊवर पोहचली आहे. भारताचा
बॅडमिंटन पटू सुहास यतिराजही आज सुवर्णपदकासाठीचा आपला सामना खेळणार आहे.
****
स्मिता
वत्स शर्मा यांनी आज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या
महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. स्मिता वत्स शर्मा यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन
मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली आहे.
****
राज्यात
आज बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर सह परभणी
तसंच हिंगोली जिल्ह्यात बैलांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली, तसंच पुरणपोळी खाऊ घालून मिरवणूक काढण्यात आली. अनेक ठिकाणी
मुसळधार पाऊस सुरू असला तरी मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
यंदाचा
बी. रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या
कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या ८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर इथं
आयोजित बी. रघुनाथ स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार भालेराव यांना सन्मानपूर्वक प्रदान
करण्यात येईल. या कार्यक्रमात ‘बी.
रघुनाथ आणि परभणीची कविता’ हा
मूळ परभणी जिल्ह्यातील कवितांवर आधारित विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
****
अंबाजोगाई
इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे
स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या २१ सप्टेंबरला अंबाजोगाई
इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रीय
क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ४ लाख ९२ हजार
प्रौढ पात्र नागरिकांचं उद्यापासून बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी
बीसीजी लसीकरण करून घ्यावं, असं
आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment