Sunday, 27 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.10.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 October 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं जागरुक राहण्याची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बातया कार्यक्रम श्रृंखलेच्या तिसऱ्या आवृत्तीतल्या पाचव्या भागातून संवाद साधत होते. सायबर घोटाळ्याविरोधातल्या मोहिमेत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. समाजातील सगळ्यांच्या प्रयत्नानेच या आव्हानाचा सामना करू शकतो, असं सांगताना, पंतप्रधानांनी या प्रकारापासून सावध राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं

Digital सुरक्षा के तीन हैं – ‘रुको-सोचो-Action लो’ Call आते ही, ‘रुको’ - घबराएं नहीं, शांत रहें, संभव हो तो screenshot लें और Recording जरूर करेंअपनी व्यक्तिगत जानकारी न देंदूसरा चरण कोई भी सरकारी Agency Phone पर ऐसे धमकी नहीं देती, न ही ऐसे पैसे की मांग करती है - अगर डर लगे तो समझिए कुछ गड़बड़ हैतीसरा चरण कहता हूँ - एक्शन लो राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन 1930 डायल करें, cybercrime.gov.in पर रिपोर्ट करें, परिवार और पुलिस को सूचित करें, सबूत सुरक्षित रखें साथीयों, digital arrest जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है, तमाम जांच एजेंसियाँ, राज्य सरकारों के साथ मिलकर काम कर रही हैं लेकिन बहुत जरूरी है – हर किसी की जागरूकता, हर नागरिक की जागरूकता

 

सुलेखन, लोककला, शास्त्रीय नृत्यकला, या सांस्कृतिक विषयांसह संरक्षण, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. फिट इंडिया अभियानाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी विविध मुद्यांच्या माध्यमातून व्यायामाचं महत्त्व विशद केलं. 

उद्याच्या 'जागतिक ॲनिमेशन दिवसाच्या निमित्तानं बोलतांना, पंतप्रधानांनी ॲनिमेशनच्या जगात ‘मेड इन इंडिया’ आणि ‘मेड बाय इंडियन्स’ ह्यांचा प्रभाव असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, भारताला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र  बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. आपल्या आसपासच्या परिसरातल्या नवीन शोधाबाबत किंवा स्थानिक स्टार्ट-अपबाबत आत्मनिर्भर इनोव्हेशन ह्या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमांवर लिहिण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सहभागी होण्याचं तसंच सरदार वन फाईव्ह झिरो तसंच बिरसामुंडा वन फाईव्ह झिरो या हॅशटॅगसह या दोन्ही राष्ट्रपुरुषांबाबतचे विचार सामाजिक संपर्क माध्यमांवरून सामायिक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी ३१ ऑक्टोबरला होणारी राष्ट्रीय एकता दौड यंदा दिवाळीमुळे २९ ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

 सर्व देशवासियांना दीपावली आणि छट पूजेसह सर्व सणांच्या शुभेच्छा देतांना, vocal for local चा मंत्र लक्षात ठेवत, या सणांसाठीची खरेदी स्थानिक दुकानदारांकडूनच करण्याचं आवाहन करत, पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.

दरम्यान, सैन्य दलाचा इफन्ट्री दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

मुंबईत वांद्रे रेल्वे स्थानकावर आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीने झालेल्या चेंगराचेंगरीत काही प्रवाशांची प्रकृती बिघडली. पहाटे सहा वाजेच्या सुमारास वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस सुटण्याच्या वेळी ही घटना घडली. नऊ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यापैकी दोन जण अत्यवस्थ आहेत.

****

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून विजयसिंह पंडित, अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मधून काशिनाथ दाते, नाशिक जिल्ह्यात निफाड इथं दिलीप बनकर आणि सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथून सचिन सुधाकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये भारत-न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळला जाईल. थोड्याच वेळात अहमदाबाद इथं हा सामना सुरु होत आहे. याआधीचा पहिला सामना भारतानं जिंकून एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं, नांदेड-पनवेल-नांदेड आणि विजयवाडा-नांदेड या विशेष रेल्वे गाड्यांची प्रत्येकी एक फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-पनवेल नांदेड अशी अजून एक विशेष रेल्वे मनमाड - कल्याण मार्गे चालवण्याचं नियोजन होतं, मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ही गाडी रद्द करण्यात आली आहे.

****

No comments: