Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 27 October 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २७ ऑक्टोबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं
जागरुक राहण्याची आवश्यकता - मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन
· विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा मोठा वाटा - परराष्ट्र व्यवहार मंत्री
एस जयशंकर
· राष्ट्रवादी काँग्रेस, तसंच
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
आणि
· किनवट इथं मतदार जनजागृतीसाठी युवा संसद, संकल्प पत्र आणि मतदार शपथ कार्यक्रम
****
डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी
प्रत्येक नागरिकानं जागरुक राहण्याची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात
या कार्यक्रम श्रृंखलेच्या तिसऱ्या आवृत्तीतल्या पाचव्या भागातून संवाद साधत होते.
सायबर घोटाळ्याविरोधातल्या मोहिमेत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं आवाहन
त्यांनी केलं. समाजातल्या सगळ्यांच्या प्रयत्नानेच या आव्हानाचा सामना करू शकतो, असं सांगताना, पंतप्रधानांनी या प्रकारापासून सावध राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं –
Digital
सुरक्षा
के तीन हैं – ‘रुको-सोचो-Action लो’। Call
आते
ही, ‘रुको’ - घबराएं नहीं, शांत रहें, संभव हो तो screenshot लें और Recording
जरूर
करें। अपनी व्यक्तिगत जानकारी न दें। दूसरा चरण
कोई भी सरकारी Agency Phone पर ऐसे धमकी
नहीं देती, न ही ऐसे पैसे की मांग करती है - अगर डर लगे तो समझिए कुछ गड़बड़ है। तीसरा
चरण कहता हूँ - ‘एक्शन
लो’। राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन 1930 डायल
करें, cybercrime.gov.in पर
रिपोर्ट करें, परिवार और पुलिस को सूचित करें, सबूत सुरक्षित रखें। साथीयों, digital arrest जैसी कोई
व्यवस्था कानून में नहीं है, तमाम जांच एजेंसियाँ, राज्य सरकारों के साथ मिलकर काम
कर रही हैं। लेकिन बहुत जरूरी है – हर
किसी की जागरूकता, हर नागरिक की जागरूकता।
सुलेखन, लोककला, शास्त्रीय नृत्यकला, या सांस्कृतिक विषयांसह संरक्षण, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी
आढावा घेतला. फिट इंडिया अभियानाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी विविध मुद्यांच्या माध्यमातून
व्यायामाचं महत्त्व विशद केलं.
आशय आणि सर्जनशीलतेमुळे मनोरंजनपर ॲनिमेशनमधली भारतीयांची कामगिरी
जगभर नावाजली जाते, त्यामुळेच
भारतातील ॲनिमेशन स्टुडिओज, डिस्ने
आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या जगातल्या नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं. देशातलं गेमिंग अवकाशही झपाट्यानं विस्तारत असून, भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले.
ॲनिमेशन क्षेत्रामुळे भारतीयांची सर्वाधिक निर्मिती असलेल्या व्ही आर अर्थात आभासी
पर्यटनालाही मोठी चालना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या २८ ऑक्टोबरला जागतिक
ॲनिमेशन दिवस साजरा होणार असून, यानिमित्तानं
देशाला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करायचं आवाहनही त्यांनी केलं.
यावेळी पंतप्रधानांनी भारतानं लडाखमध्ये हानले इथं आशियातल्या सर्वात मोठ्या एम ए सी
ई या इमेजिंग टेलिस्कोपची स्थापना केल्याविषयी देखील सांगितलं.
सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी
जयंती महोत्सवात सहभागी होण्याचं तसंच सरदार वन फाईव्ह झिरो तसंच बिरसामुंडा वन फाईव्ह
झिरो या हॅशटॅगसह या दोन्ही राष्ट्रपुरुषांबाबतचे विचार सामाजिक संपर्क माध्यमांवरून
सामायिक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी ३१ ऑक्टोबरला
होणारी राष्ट्रीय एकता दौड यंदा दिवाळीमुळे २९ ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये सहभागी
होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
सर्व देशवासियांना दीपावली आणि छट पूजेसह सर्व सणांच्या शुभेच्छा
देतांना, vocal for local चा मंत्र लक्षात ठेवत, या सणांसाठीची खरेदी स्थानिक दुकानदारांकडूनच करण्याचं आवाहन
करत, पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा
समारोप केला.
दरम्यान, सैन्य
दलाचा इन्फन्ट्री दिवस आज साजरा होत आहे.
यानिमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
गेल्या दहा वर्षात भूमीबंदरांचा जो विकास झाला आहे, त्यामुळे शेजारी देशांमधल्या भाषा, संस्कृती आणि साहित्य यांच्यातल्या आदानप्रदानात भर पडत असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये
पेत्रापोल या भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या ‘मैत्रीद्वार’
या प्रवेशद्वाराचं तसंच प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते.
लँडपोर्ट ॲथॉरिटीचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समृद्धी, शांतता, भागीदारी
आणि विकास या चतुःसुत्रीवर चालत असल्याचं शाह यांनी सांगितलं. बांगलादेशातून दररोज
पाच ते सहा हजार माणसे भारतात वैद्यकीय इलाजासाठी येतात. या भूमीबंदरावरच्या वाढत्या
सुविधांमुळे व्यापार वाहतूकीत वाढ होईल, परिणामी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असंही त्यांनी सांगितलं.
****
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा वाटा मोठा असल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज
मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. जेथे राज्य आणि केंद्र सरकार एकत्र
काम करतात, तेथे उद्योगांची सहाजिकच पहिली
पसंती असते. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक
योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं.
****
या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात कर्मचारी राज्य विमा योजनेत २०
लाख ७४ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट
महिन्याच्या तुलनेत सहा पूर्णांक आठ शतांश टक्के जास्त कामगारांनी नोंदणी केल्याचं
आकडेवारीतून दिसून आलं आहे. यापैकी जवळपास १० लाख कर्मचारी २५ वर्षांखालच्या वयोगटातले
आहेत. ऑगस्ट महिन्यात नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ४ लाख १४ हजार महिला आहेत.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची
तिसरी यादी आज जाहीर केली. यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून विजयसिंह पंडित, अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मधून काशिनाथ दाते, नाशिक जिल्ह्यात निफाड इथं दिलीप बनकर आणि सातारा जिल्ह्यातल्या
फलटण इथून सचिन सुधाकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही उमेदवारांची तिसरी
यादी आज जाहीर केली. यामध्ये माजलगाव मतदारसंघातून मोहन जगताप, परळी - राजेसाहेब देशमुख, कारंजा - ज्ञायक पाटणी, हिंगणघाट
- अतुल वांदिले, हिंगणा - रमेश बंग, अणुशक्तीनगर - फहद अहमद, चिंचवड - राहुल कलाटे, भोसरी
- अजित गव्हाणे तर मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली
आहे.
****
श्रोते हो, विधानसभा
निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी
सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या
विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संसद, संकल्प पत्र आणि मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपच्या नोडल अधिकारी मीनल करणवाल
यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम राबवण्यात आले. नव मतदारांच्या युवा संसद कार्यक्रमात
नवमतदारांचं स्वागत करण्यात आलं. सर्वांनी आपल्या आई-वडिलांना, पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं, तसंच शिक्षकांसह सर्व नवमतदार युवक युवतींना मतदान शपथ देण्यात
आली.
****
नागपूर इथं आज सीमा शुल्क विभागाने मोठा मद्यसाठा जप्त केला.
यात मद्याच्या ४४८ सिलबंद बाटल्या तसंच वाहन आणि मोबाईलसह एकूण ३८ लाख ६९ हजार रूपयांचा
मुद्येमाल जप्त करत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
****
मुंबईत वांद्रे रेल्वे स्थानकावर आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीने
झालेल्या चेंगराचेंगरीत काही प्रवाशांची प्रकृती बिघडली. पहाटे सहा वाजेच्या सुमारास
वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस सुटण्याच्या वेळी ही घटना घडली. नऊ प्रवाशांना रुग्णालयात
दाखल करण्यात आलं असून, त्यापैकी
दोन जण अत्यवस्थ आहेत.
****
महिला क्रिकेटमध्ये, भारत-न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसर्या सामन्यात
न्यूझीलंडने भारताला २६० धावांचं लक्ष्य दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या
संघाने निर्धारित षटकात नऊ बाद २५९
धावा केल्या. भारताकडून राधा यादवनं चार, दीप्ती शर्मानं दोन, तर
सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा यांनी प्रत्येकी एक खेळाडू बाद केला. शेवटचं वृत्त हाती
आलं तेव्हा भारताच्या तीन बाद चौतीस धावा झाल्या होत्या.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड-पनवेल-नांदेड आणि विजयवाडा-नांदेड
या विशेष गाड्यांची प्रत्येकी एक फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
****
No comments:
Post a Comment