Monday, 28 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 28.10.2024 रोजीचे सकाळी : 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 October 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये वडोदरा इथं स्पेनचे राष्ट्रपती पेड्रो सांचेझ यांच्यासोबतटाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन केलं. सी-295 या विमानांच्या निर्मितीसाठी हे संकुल उभारण्यात आलं आहे. सी-295 विमानांच्या प्रकल्पाअंतर्गत ५६ विमानं तयार करण्यात येणार आहेत. यापैकी १६ विमानं एअरबसच्या माध्यमातून थेट स्पेनमधून दिली जाणार आहेत. उर्वरित ४० विमानांची निर्मिती भारतात होणार आहे. टी ए सी एल या विमानांची निर्मिती करणार आहे. संरक्षण दलासाठी लागणाऱ्या विमानांच्या निर्मितीप्रक्रियेतील फायनल ॲसेब्ली खाजगी उपक्रमाच्या माध्यमातून करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे. या प्रक्रियेंतर्गत विमानांची निर्मिती, ॲसेंब्ली, चाचणी आणि उड्डाणासाठी सज्ज बनवताना विमानांचा पुरवठा आणि देखभाल यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये पंतप्रधानांनी फायनल ॲसेंब्ली प्रकल्पाचं भुमिपूजन केलं होतं.

या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पेड्रो सांचेझ रोड शो मध्ये सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन त्यांचं वडोदरा मध्ये स्वागत करण्यात आलं.

****

एन डी एम ए अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा २० वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. वर्तनात्मक बदलांच्या जागरूकतेद्वारे आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी समुदायांचं सक्षमीकरण, ही यंदाची संकल्पना आहे. नवी दिल्ली इथं होणार्या स्थापना दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. 

****

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार, तसंच मुंबईतल्या माहिम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे आज अर्ज दाखल करणार आहेत.

****

शिवसेनेनं २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये हदगाव मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण - आनंद तिडके पाटील, परभणी - आनंद भरोसे, वरळी - मिलिंद देवरा, कुडाळ - निलेश राणे, तर रिसोड मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

काँग्रेसनं १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये नांदेड उत्तर मधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. आता या मतदार संघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी आता लहू शेवाळे निवडणूक लढवणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे ऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

****

खरीप विपणन हंगाम २०२४-२५ या काळात १८५ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी केला जाईल, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. तांदूळ गिरणी मालकांच्या तक्रार निवारणासाठी लवकरच आँनलाईन पोर्टल सुरू केलं जाईल, या पोर्टलच्या माध्यमातून तक्रारींचं, तात्काळ निवारण केलं जाईल, असं ते म्हणाले.

****

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल, असं केंद्रीय नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे. ते सतराव्या भारतीय नागरी वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते. गांधीनगरमधल्या महात्मा मंदीर इथं झालेल्या या परिषदेत खट्टर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या शाश्वत गरजेवर भर दिला. शाश्वत आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्थेसाठी सरकारने अनेक उपक्रम गेल्या दहा वर्षात हाती घेतले आहेत असं त्यांनी सांगितलं. वाहतूक व्यवस्थेसाठी तंत्रज्ञान, संशोधन हरित उपाय आणि खाजगी- सार्वजनिक भागीदारी याला महत्व असल्याचं ते म्हणाले. या परिषदेत शहरी वाहतुकीच्या सर्वोत्तम प्रकल्पांना गौरवण्यात आलं.

****

राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल केलेल्या वेगवगेळ्या कारवाईत अवैध मद्याचा मोठा साठा जप्त केला.

नागपूर इथं केलेल्या कारवाईत मद्याच्या ४४८ सिलबंद बाटल्या तसंच वाहन आणि मोबाईलसह एकूण ३८ लाख ६९ हजार  रूपयांचा मुद्येमाल जप्त करत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे तालुक्यातल्या नेर गाव शिवारात देखील विभागाने बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून २५ लाख २२ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातले सर्व संशयित पळून गेले असल्याची माहिती, राज्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अन्य एका कारवाईत रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या मद्याचा ८७ लाख ९४ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. मुद्देमाल ताब्यात घेऊन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...