Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 October
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख घटक पक्षांसह भाजपकडूनही
दुसरी उमेदवार यादी जाहीर
· राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा
निवडणूक विभागाचा निर्णय
· मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध
उपक्रम
· नांदेडच्या ५२ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत परभणी इथं
राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबीर
आणि
· पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा ११३ धावांनी पराभव करत
न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
सविस्तर बातम्या
महाविकास
आघाडीतल्या तीनही प्रमुख घटक पक्षांनी काल उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली. काँग्रेसनं
२३ उमेदवारांची दुसरी, तर १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये जालना
मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मधुकर देशमुख, निलंगा - अभयकुमार पाटील, नांदेड दक्षिण - मोहनराव
हंबर्डे, देगलूर - निवृत्ती कांबळे, मुखेड - हणमंतराव बेटमोगरेकर तर तुळजापूर मतदारसंघातून
कुलदीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून
रुपाली पाटील तर परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल जाहीर केलेल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
गंगापूर इथून सतीश चव्हाण, बीड मधून संदीप क्षीरसागर धाराशिव जिल्ह्यात परांडा इथून
राहुल मोटे, येवला
- माणिकराव शिंदे, तर अहिल्यानगर शहर मतदार संघातून-अभिषेक कळमकर यांचा समावेश
आहे.
****
भाजपनेही
काल २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये नाशिक मध्य मतदार संघातून देवयानी
फरांदे, जत
मतदारसंघातून गोपीचंद पडळकर, वरोरा इथून करण संजय देवतळे, धुळे ग्रामीण - राम भदाणे, लातूर ग्रामीण - रमेश कराड
तर पंढरपूर मतदार संघातून समाधान औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र
नवनिर्माण सनेनं काल पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये गंगाखेड मतदारसंघातून रुपेश देशमुख, फुलंब्री - बाळासाहेब पाथ्रीकर, उस्मानाबाद - देवदत्त मोरे, परांडा - राजेंद्र गपाट
तर बीड मतदारसंघातून सोमेश्वर कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
अखिल
भारतीय मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमिन - ए आय एम आय एम नं विधानसभा निवडणुकीसाठी दोन
उमेदवार काल जाहीर केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलिल, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून
नासेर सिद्दीकी निवडणूक लढवणार आहेत.
****
प्रहार
जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत करत, त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी
नियुक्ती केली. गावंडे यांचे सहकारी आमदार प्रकाश डहाके आणि यांच्या पत्नी सई डहाके
यांनीही यावेळी भाजपत प्रवेश केला.
****
विधानसभा
निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देण्याऐवजी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नोंदणीकृत पक्षाच्या
चिन्हावर उमेदवार उभे करावेत, असा प्रस्ताव स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे
यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याकडे मांडला आहे. छत्रपती संभाजीराजे
यांनी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा
केली.
दरम्यान, शिवसेना नेते उदय सामंत
यांनीही काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
विधानसभा
निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला
काल पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी
तयार केलेल्या या विशेष एलईडी व्हॅनच्या माध्यमातून, महायुतीच्या काळात राबवलेल्या विविध योजना मतदारांना
दाखवण्यात येणार आहेत.
****
आगामी
विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक विभागामार्फत राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये
९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो
मतदान केंद्र, तर
सांगलीत एक शॅडो मतदान केंद्र असणार आहेत. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
नऊ, बीड
इथं बावीस आणि नांदेड इथं बारा शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचं विभागामार्फत
सांगण्यात आलं. मतदानाच्या दिवशी विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्ही एच एफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा
रनर या विशेष सेवा शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बी एस एन एल मार्फत
पर्यायी संदेश वहनाची यंत्रणाही कार्यरत असेल.
****
विधानसभेसाठी
येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी या दिवशी मतदान
करण्याचं आवाहन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे.
बाईट
****
श्रोते
हो, विधानसभा
निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी
सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या
विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती
संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पाचवा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
मतदानाचं
प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा
भाग म्हणून, हिंगोली
इथं स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत
आहेत. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करत आहेत.
या पत्रातला मजकूर विद्यार्थ्यांनी वाचून दाखवला...
बाईट
****
धाराशिव
जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी
आपल्या पालकांना एस एम एस तसंच व्हाट्सअप वर संदेश पाठवून मतदान करण्याचं आवाहन केलं
आहे. गटशिक्षणाधिकारी मेहरुबा इनामदार आणि मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्या मार्गदर्शनात
शिक्षकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांनी हे संदेश पाठवले आहेत.
****
अहिल्यानगर
जिल्ह्यात पाथर्डी इथल्या श्री सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी
मानवी साखळीद्वारे ‘से येस टू वोट’ हा संदेश तयार केला. ३०० विद्यार्थी या उपक्रमात
सहभागी झाले होते. यावेळी शाळेत रांगोळी, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांही घेण्यात आल्या.
****
मतदान
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी
अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या कौठा इथं झालेल्या
पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. या प्रशिक्षणात ८८४ मतदान केंद्राध्यक्ष
आणि मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या मतदार संघातल्या हैदरबाग परिसरात
काल मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
****
धाराशिव
जिल्ह्यात, ५७
पैकी ३३ महसूल मंडळात सततच्या पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर
झाला
आहे. मात्र, यासोबतच उर्वरित २४ महसूल
मंडळातल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांनाही नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्यात यावी अशी
मागणी करण्यात येत आहे. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या मदत, पुनर्वसन आणिव आपत्ती व्यवस्थापन
विभाग प्रधान सचिवांना पत्र लिहून, सध्याच्या आचारसंहिता काळात राज्य निवडणूक आयुक्तांच्या
अनुमतीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.
****
परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या
५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण
शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरिंग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण
देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९ एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल
एम. रंगा राव यांनी दिली.
****
भारत
आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा
सामना न्यूझीलंड संघानं ११३ धावांनी जिंकला. काल तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव
२५५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह भारताला
विजयासाठी ३५९ धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला.
तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडच्या संघानं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
मालिकेतला अखेरचा तिसरा सामना मुंबईत येत्या एक नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे.
****
लातूर
इथं कालपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत
राज्यभरातून ३३६ खेळाडू सहभागी झाले.
****
No comments:
Post a Comment