Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 October
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्य विधानसभा
निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होत आहे. उमेदवारांना चार नोव्हेंबरपर्यंत
अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, काल अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या
दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी
एकूण सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं
दिली.
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात काल ३६८ अर्ज दाखल झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात
काल १३० उमेदवारांनी १७९ अर्ज भरले. जिल्ह्यात आतापर्यंत १८५ उमेदवारांचे २७१ नामनिर्देशनपत्र
दाखल झाले आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या
सहा विधानसभा मतदारसंघात काल १२५ उमेदवारांनी १७३ नामनिर्देशन पत्रं दाखल केले, तर जिल्ह्यात आतापर्यंत २१३ उमेदवारांनी
३०१ अर्ज भरले आहेत.
नांदेड लोकसभा
पोटनिवडणुकीसाठी काल २७ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले. आतापर्यंत ४१ जणांचे ५६ अर्ज
दाखल झाले आहेत. तर जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघात काल ३८८ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत
५१५ उमेदवारांनी एकूण ६६७ अर्ज भरले आहेत.
जालना जिल्ह्यातल्या
पाच विधानसभा मतदारसंघात काल १४९ उमेदवारांनी २०८ अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत एकूण २५८ उमेदवारांचे
३८२ अर्ज दाखल झाले आहेत.
बीड जिल्ह्यातल्या
सहा मतदारसंघात आतापर्यंत ४०९ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले, परभणी जिल्ह्यात १८९ उमेदवारांनी
२४४ अर्ज भरले आहेत तर हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदार संघात काल १२४
नामनिर्देशनपत्रं दाखल झाली आहेत.
****
झारखंड विधानसभा
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देखील काल संपली असून, अर्जांची छाननी आज होत आहे. शुक्रवारी
एक नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतिल. या टप्प्यात
३८ मतदारसंघांमधे येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी
अर्जांच्या छाननीत ६२ अर्ज बाद झाले असून, ४३ मतदारसंघांमधे
मिळून ७४३ अर्ज वैध ठरले आहेत. या टप्प्यासाठी उमेदवारी मागं घेण्याची मुदत आज संपणार
आहे. या टप्प्यात येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
****
अयोध्येच्या प्रभू
श्रीराम मंदिरात आज भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शरयू नदीच्या घाटावर होणाऱ्या
दीपोत्सवात, पणत्या उजळण्याचे
सर्व विक्रम मोडले जाणार आहेत. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी २८ लाख दिवे
उजळले जाणार आहेत. मुख्य कार्यक्रमासाठी संपूर्ण शहराची स्वच्छता आणि सजावट करण्यात
आली आहे. एक हजार १०० हून अधिक पुजाऱ्यांकरवी शरयू नदीची आरतीही करण्यात येणार आहे.
नागरिकांनीही हा सण उत्साहानं साजरा करत आपल्या घरी दीपोत्सव करावा असं आवाहन उत्तरप्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
****
भारत - स्पेन
दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील, असं स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ
यांनी म्हटलं आहे. मुंबईत चौथ्या स्पेन- भारत मंचाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत
होते. शाश्वत भविष्याच्या दृष्टीनं या दोन्ही देशांचं सहकार्य सकारात्मक पुढाकार ठरेल, असा विश्वास, त्यांनी व्यक्त केला. व्यापार, गुंतवणूक त्याचप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञान
आणि त्यानं निर्माण झालेली आव्हानं या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची
गरज त्यांनी अधोरेखित केली.
****
विधानसभा निवडणुकीत
आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण एक हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी एक हजार ६४६ तक्रारी निवडणूक
आयोगाने निकाली काढल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यात
सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून, जिल्हा रुग्णालयात
रक्तदान करण्यासाठी रक्तदान भवन तयार करण्यात आलं असून, त्याठिकाणी सेल्फी
पॉईंट देखील उभारण्यात आला आहे. जिल्हाभरातल्या नागरीकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं
आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात
काल अवैध वाहतुक होणाऱ्या मद्यासह सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला. कळंब- अंबाजोगाई मार्गावर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
****
नंदुरबार इथं
काल एका तलवार बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी २३ तलवारी एक गुप्ती आणि
दोन चाकू जप्त केले. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
****
धाराशिव इथल्या
जात प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयातला शिपायाला १९ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत
प्रतिबंधक पथकाने काल रंगेहात पकडलं. सागर क्षीरसागर असं त्याचं नाव आहे
****
पॅरिस मास्टर्स
टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार
मॅथ्यू एब्डेन यांच्या जोडीने उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या
सामन्यात या जोडीने जर्मनीचे ॲलेक्झांडर ज्यूरेव आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो या
जोडीचा सहा - सात, सात - सहा असा
पराभव केला.
****
No comments:
Post a Comment