Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 December
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते समारंभपूर्वक
प्रदान
· देशासाठीचं प्रत्येक कार्य वीरता असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
· स्वामित्व योजनेअंतर्गत ई प्रॉपर्टी कार्ड वितरणाला उद्यापासून प्रारंभ
· बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबरला रेल्वेची जलदगती चाचणी
आणि
· बॉर्डर गावसकर मालिकेच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या
दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद ३११ धावा
****
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं.
कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष,
विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा,
क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण
कामगिरीसाठी गौरवण्यात आलं, यामध्ये नऊ मुलं आणि दहा मुलींचा
समावेश आहे. महाराष्ट्रातल्या दोन मुलींचा यावेळी गौरव करण्यात आला. यात मुंबईची १३
वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या १७ वर्षीय करिना थापा हिचा समावेश आहे. केया हटकर,
डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्टसेलर पुस्तकांची
लेखिका आहे. तिला कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं.
करिनाला धाडसाबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. करिनानं गॅस सिलिंडरच्या
आगीतून स्थानिकांचे प्राण वाचवले होते.
या बालकांचं साहस अद्वितीय असून सर्व भारतीयांसाठी
प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. त्या म्हणाल्या –
प्यारे बच्चों, मुझे आप सभी
पर गर्व है। मुझे ही नही पुरे देश को, पुरे समाज को आप सभी पर नाज है। आपने जो काम
किये है, वो असाधारण है। आपने जो हासिल किया है, वो आश्चर्यजनक है। आप सब की जो क्षमतायें
है, वो असीम है। आप सब मे जो गुण है, वो अतुलनीय है। अपने देश के बच्चों के लिये आदर्श
प्रस्तुत किये है।
****
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर करिना थापा
हिने आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
आज जो मुझे अवार्ड मिला है,
वो मेरे बहादुरी के कारण मिला है। मै सिर्फ इतना ही कहना चाहती हूं की, हमे मुसीबत
से घबराना नही चाहीये। मुसीबत से हमे पिछे नही हटना चाहीये। बल्की उसका सामना करना
चाहीये, क्योंकी डर के आगे जीत है।
****
देशासाठी केलेलं प्रत्येक कार्य वीरता असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज वीर बाल दिनी, दिल्लीत झालेल्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. शीख धर्मियांचे दहावे गुरू,
गुरू गोविंदसिंह यांची दोन धाकटी मुलं, बाबा जोरावरसिंह
आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो,
या दोन्ही वीर बालकांचं स्मरण करतांना पंतप्रधान म्हणाले –
वीर बाल दिवस का ये दिन,
हमें यह सिखाता है, की चाहें कितनी भी बिकट स्थितीयां आयें, कितना भी विपरीत समय क्यूं
न हो, देश और देशहित से बडा कुछ नही होता। देश के लिये किया गया हर काम, वीरता है।
देश के लिये जीना वाला हर बच्चा, हर युवा वीर बालक है।
यावेळी झालेल्या संचलनाला पंतप्रधानांनी
हिरवा झेंडा दाखवला आणि मानवंदना स्वीकारली. विविध राज्यांच्या पारंपरिक समृद्धीचं
दर्शन घडवणारी वेशभूषा केलेली सुमारे तीन हजाराहून अधिक मुलं आणि चित्ररथ या संचलनात
सहभागी झाले होते. सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत
लेझीम कलाप्रकाराचं प्रात्याक्षिक सादर केलं. संस्थेतल्या १८ विद्यार्थिनी सह ४ वादक, १ व्यवस्थापक आणि १ संघ प्रमुख अशा २४ जणांच्या संघाने हे प्रात्यक्षिक यशस्वी
केलं.
****
या बाल वीरांच्या स्मृतीला देशात सर्वत्र
अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बाबा जोरावरसिंह
आणि बाबा फतेहसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या
मालकी हक्काविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रापर्टी कार्ड च्या वितरणाला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते प्रारंभ होणार आहे. उद्या २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी साडे बारा वाजता दूरदृश्य
प्रणाली द्वारे या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीनं पाहता येईल.
दरम्यान, या योजनेत
महाराष्ट्रातील ३० हजार ५१५ गावांतल्या नागरिकांना लाभ मिळणार असून, आतापर्यंत १५ हजार ३२७ गावांतील मालमत्ता पत्र तयार करण्यात आल्याची माहिती
भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.
ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबर
रोजी विघनवाडी ते राजूरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. सकाळी दहा
ते सायंकाळी सहा या वेळेत होणाऱ्या या चाचणीदरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येवू नये, असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी
केलं आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचं काम गतीने पूर्णत्वास जात असून, जानेवारी अखेरपर्यंत बीडपर्यंत रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होण्याची शक्यता
वर्तवली जात आहे. सध्या बीडपासून काही अंतराबर असलेल्या राजूरीपर्यंत रेल्वे मार्गांचे
काम पूर्ण झालं आहे.
****
मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचं
आज छत्रपती संभाजीनगर इथं बंजारा समाजाकडून स्वागत करण्यात आलं. राज्य सरकारनं बंजारा
समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी ७२ वसतीगृहांना मंजुरी दिली असून सरकारनं
मुंबईत समाजासाठी जागा दिल्याचं राठोड यांनी यावेळी सांगितलं. येत्या चार महिन्यांत
गाळमुक्त धरण ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असल्याची माहिती राठोड यांनी आज
प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
****
क्रिकेट
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या
बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं खेळवला जात आहे.
यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद ३११ धावा झाल्या
होत्या. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
No comments:
Post a Comment