Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रीय मतदार दिन देशभरात उत्साहात साजरा-राष्ट्रपतींच्या हस्ते निवडणूक पुरस्कार
प्रदान
· प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं तसंच सेवा पदकं
जाहीर
· ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर
अंत्यसंस्कार
आणि
· मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषण
सुरू
****
१५ वा राष्ट्रीय मतदार दिन आज देशभरात उत्साहात
साजरा होत आहे. निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या
दृष्टीने उत्कृष्ट आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांचा सर्वोत्तम
निवडणूक पद्धती पुरस्कार देऊन गौरव केला गेला. नवी दिल्ली इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या निवडणूक
प्रक्रियेचा गौरव करतांना राष्ट्रपती म्हणाल्या –
आधुनिक
विश्व के लिये भारत का लोकतंत्र का अनोखा उदाहरण है। हमारी चुनाव प्रणाली तथा प्रबंधन
से विश्व के अनेक देश सीख ले रहे है। निर्वाचन आयोग के प्रबंधन, मतदाताओं की भागीदारी,
सुरक्षाकर्मी तथा इलेक्शन मिशनरी ने सहयोग देनेवाले नागरिकों के बल पर भारतीय लोकतंत्र
द्वारा जिस विशाल पैमाने पर चुनाव आयोजित किये जाते है, वो पुरे विश्व में अतुलनीय
है।
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला, निवडणुकीच्या
सर्वोत्तम नियोजनासाठी पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. यासोबतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर
या महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यांनाही पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
मतदार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा
आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा आहे, अशा
शब्दात मोदी यांनी समाज माध्यमांच्या द्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या.
हमारे संविधान निर्माताओं ने संविधान मे हमारे चुनाव आयोग को लोकतंत्र मे लोगों
की भागीदारी को बहोत बडा स्थान दिया है। देश मे जब 1951-52 में पहली बार चुनाव हुये, तो
कुछ लोगों को संशय था की क्या देश का लोकतंत्र जीवीत रहेगा? लेकिन हमारे लोकतंत्र ने सारी आशंकाओं को गलत साबित किया।
****
राज्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. राज्याचा मुख्य कार्यक्रम
पुण्यात झाला. या निमित्तानं नागरिकांना मतदार शपथ देण्यात आली
बीड इथं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार
जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हिरवा झेंडा या फेरीला
प्रारंभ झाला,
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या
नारायणराव वाघमारे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन जनजागृती अभियान राबवण्यात आलं, यानिमित्ताने
रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी रांगोळीतून मतदान जनजागृती केली.
परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी चित्र प्रदर्शन
तसंच रांगोळी स्पर्धा भरवण्यात आल्या विविध शाळेचा विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती
रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नगारिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान
यंत्राबाबत माहिती दिली.
एक जानेवारी २०२५ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण
करणाऱ्या तरुणांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
मनोहर चासकर यांनी केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त
कुलगुरू बोलत होते.
अहिल्यानगर इथं जिल्हा निवडणूक प्रशासनानं
सर्वाधिक मतदान झालेल्या गावांचा सन्मान केला. शिर्डी विधानसभा मतदार संघातील तरसवाडी
या गावाला सर्वाधिक ९५ टक्के मतदानाबद्दल जिल्हास्तरीय
पुरस्कार देण्यात आला.
राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून
मतदार दिवस साजरा करण्यात आला.
****
राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा
दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही, निवडणूक
आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप, माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतदार याद्यांमधील घोळ
हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगत, यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक
आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत असून, विधानसभा निवडणुकीत महाविकास
आघाडीच्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्याची
माहिती चव्हाण यांनी दिली.
प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
प्रविण चक्रवर्ती यावेळी उपस्थित होते, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या
दरम्यान राज्यात ३२ लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले, याचं
उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे, अशी मागणी चक्रवर्ती यांनी केली
आहे.
****
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा
होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या संदेशाचं थेट प्रसारण संध्याकाळी ७ वाजता आकाशवाणीवरुन
होणार आहे. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन दररोज संध्याकाळी ७ वाजता
प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज, संध्याकाळी पावणेसात वाजता प्रसारित
होईल.
****
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातल्या
९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं तसंच सेवा पदकं आज जाहीर झाली. यामध्ये पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक
दल तसंच नागरी सुरक्षा आणि कारागृह प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये
महाराष्ट्रातल्या एकूण ४३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरवलं जाणार आहे. याशिवाय
रविंद्रकुमार सिंघल,
दत्तात्रय कारळे, सुनील फुलारी आणि रामचंद्र केंडे
या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. याशिवाय ३९ पोलीस
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय कारागृह
सेवेतल्या ५ जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
****
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र
चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
करण्यात आले. चपळगांवकर यांचं आज पहाटे निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते.
साहित्य, कला, राजकीय,
सामाजिक, प्रसारमाध्यमं, विधी
आणि न्याय,
उद्योग, वैद्यकीय, प्रशासन आदी क्षेत्रातील
मान्यवरांनी चपळगांवकर यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ
करणारे चपळगांवकर यांनी,
७० च्या दशकात वकिली पेशात प्रवेश केला, आणि
८० च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून
जबाबदारी स्वीकारली. १९९९ साली न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात
अखेरपर्यंत सक्रीय राहिले. वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे
ते अध्यक्ष होते. माजलगाव इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची
अध्यक्षपदं त्यांनी भूषवली. संयमी तरीही परखड विचारांचे साहित्यिक म्हणून चपळगांवकर
यांची ओळख होती. वर्धा इथं साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अशा संमेलनांविषयी
त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं.
न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या निधनाबद्दल
सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चपळगावकर
यांच्या निधनानं एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो
आहोत, अशी भावना आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, अशा
व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक
चळवळीची हानी असल्याचं म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे
यांनी आज पुन्हा अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी
संवाद साधला. आजपर्यंत कधीही घडले नाही, असे मराठा समाजाच्या बाबतीत
घडत आहे, त्यामुळे आपण पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र
देण्यात यावे,
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करावी, ज्यांच्या
कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगेसोयरे नोंदीच्या आधारावर कुणबी
प्रमाणपत्र द्यावे,
न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, प्रमाणपत्र
वाटपासाठी कक्ष सुरु करावेत, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत
आदी मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धारित
केल्याप्रमाणे शंभर दिवसांच्या नियोजनात सात सुत्री कार्यक्रमाची नांदेड जिल्हा प्रशासनाने
अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील
कार्यालय, यांची स्वच्छता मोहीम सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विविध कार्यालयांना
भेट देऊन स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला.
****
भारत आणि इंग्लंड संघात दुसरा टी ट्वेंटी
क्रिकेट सामना आज होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर संध्याकाळी सात वाजता
हा सामना होईल.
****
No comments:
Post a Comment