Wednesday, 18 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सरकारने शुद्धीपत्रकात जारी केलं. आता विद्यार्थ्यांना हिंदी ऐवजी इतर भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय असून, किमान २० विद्यार्थी इच्छुक असतील तर शिक्षक नियुक्ती किंवा ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करता येईल, असं या पत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

आषाढी वारीसाठी देहू इथून संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज दुपारी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे ५०० दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन होईल, त्यानंतर पालखी मार्गस्थ होईल.

****

भारत-अमेरिका व्यापार करार आणि भारत आणि पाकिस्तानमधल्या मध्यस्थीबाबत अमेरिकेने अलीकडील लष्करी कारवाई थांबवण्यासाठी कधीही कोणत्याही पातळीवर चर्चा केलेली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितलं. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची दिली. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. लष्करी कारवाई थांबवण्याबाबतची चर्चा भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट दोन्ही सैन्यांमध्ये स्थापित केलेल्या विद्यमान माध्यमांनुसार झाली आणि ती इस्लामाबादच्या विनंतीवरून झाली. भारताने कधीही तृतीय पक्षाची मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही अशी मध्यस्थी स्वीकारणार नाही, असं मोदी यांनी स्पष्ट केलं. भारत आता दहशतवादाला युद्धाच्या रुपातच बघत असून, ऑपरेशन सिंदूर अजुनही सुरुच असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. यासह इतर जागतिक घडामोडींवर उभय नेत्यांदरम्यान चर्चा झाल्याचं, मिस्त्री यांनी सांगितलं.

****

कॅनडाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज क्रोएशियाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात ते क्रोएशियाचे पंतप्रधान अँद्रेज प्लेकीं-योविक यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, तंत्रज्ञान, पर्यटन, शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यावर या भेटीदरम्यान भर देण्यात येणार आहे.

****

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात मालेडपल्लीच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षली कमांडर ठार झाले. यामध्ये नक्षली म्होरक्या चलपती आणि अरुणा यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशच्या विशेष दलाने ही कारवाई केली. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि साहित्य जप्त करण्यात आलं असून, परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हळद उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी हिंगोली इथं बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलं असून, हे केंद्र स्वंयपूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले. यासंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या दोन वर्षात या केंद्रामार्फत पिकाची होणारी वाढ आणि पीक परिस्थिती पाहून काय उपाययोजना हाती घ्यायला हव्यात याबाबत जनजागृती करणं, उत्पादन खर्चात बचत करून उत्पादकता वाढवणं, हळद लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार करणं यांसारख्या कामात यश मिळवलं आहे. हे केंद्र पूर्णत्वात आल्यानंतर यामार्फत शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण माहिती आणि अर्थसहाय्य मिळावं असं, जयस्वाल यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातून जाणार्या उदगीर - साकोळ ते तिपराळ रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून, वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेसंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागातल्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे तिपराळ, कानेगाव, शेंद, साकोळ, सय्यदपूर इथल्या नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं नेवासा तालुक्यातल्या घोडेगाव इथं गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबलेल्या ठिकाणी छापा मारला. या कारवाईत ४२ जनावरांची सुटका करण्यात आली असून, एक कोटी दोन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिर्डी इथंही स्थानिक गुन्हे शाखेनं गुटखा आणि सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. याअंतर्गत २७ हजार १७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या छाप्यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पोलिसांनीही अवैधरित्या नेलार जाणारा गुटखा जप्त केला. प्रकाशा गावाजवळ केलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण २५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 29 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 29 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...