आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ ऑगस्ट २०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशात कोरोना विषाणुचे ५७
हजार ११८ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातली रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ९५ हजार ९८८
झाली आहे.
****
कोरोना विषाणुच्या संसर्गातून
बरे झालेल्या देशातल्या रुग्णांची संख्या दहा लाख ९४ हजार ३७४ झाली आहे. पाच लाख ६५
हजार १०३ रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली
आहे.
****
कोरोना विषाणुमुळे गेल्या
चोवीस तासांमधे देशात ७६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची
एकूण संख्या ३६ हजार ५११ झाली आहे.
****
`ईद उल अजहा` अर्थात बकरी
ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शाहजहानी ईदगाह मैदानावरील बकरी ईदचा
सामुहिक शाही सोहळा रद्द करण्यात आला असून घरांमधे नमाजपठण करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
कोरोना विषाणुचे नवे ६९ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १४ हजार
१९२ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणुचे दहा हजार १९२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. जिल्ह्यात तीन हजार ५२५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत कोरोना विषाणुचे नवे
एक हजार १०० रुग्ण आढळले असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात याची लागण
झालेले ८१८ नवे रुग्ण सापडले असून २८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणुचे
६७५ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात या संसर्गामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना
विषाणुचे ३६० तर सांगली जिल्ह्यात ३३९ आणि रायगडमधे ३८३ नवे रुग्ण आढळले आहेत.
****
परभणी शहरातल्या देशमुख गल्लीतील
३५ वर्षीय महिला आणि मानवत इथल्या ५७ वर्षीय पुरुषाचा आज कोरोना विषाणूवर उपचार सुरू
असताना आज पहाटे मृत्यू झाला.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड
तालुक्यातला शिवना टाकळी मध्यम प्रकल्प ९३% भरलेला असून पाण्याची आवक सुरू असल्याने
धरण केव्हाही १००% भरुन नदीपात्रात पाणी सोडण्यात येण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या
गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment