आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१
ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता
****
देशात
कोविड रुग्णांचा बरे होण्याचा दर ७६ पूर्णांक ६१ शतांश टक्के एवढा झाला आहे. कोविड
संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २७ लाख ७४ हजारावर पोहोचली असल्याचं,
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. शाह यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे १८ ऑगस्ट रोजी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात
दाखल करण्यात आलं होतं.
****
पालघर
इथं जमावाकडून झालेल्या साधूंच्या हत्या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात
आलं आहे. यात एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश
आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात फुलंब्री पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र लहाने यांचं अपघाती निधन
झालं. खुलताबादहून परतत असताना त्यांचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटून, दुचाकी रस्त्यावर
उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला धडकली. फुलंब्री - खुलताबाद मार्गावर हा मार्गावर अपघात
झाला.
****
भंडारा
जिल्ह्यातल्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत घट होत असून या नद्यांना येणाऱ्या
संभाव्य पुराचा धोका कमी झाला आहे.
दरम्यान,
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
धरणात सध्या घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.
****
केरळ राज्यबांधव
आज ओणम हा सण साजरा करत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या
आहेत. समाजातल्या बंधुभाव आणि सलोख्याचं प्रतिक असलेला हा सण म्हणजे शेतकऱ्यांच्या
कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात
म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment