Thursday, 31 March 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 31.03.2022 रोजीचे- कोरोना वृत्त विशेष

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.03.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक निर्बँध हटवले.

·      कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रांची संख्या १६ कोटी १३ लाखाच्या वर.

·      देशात दहा लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी.

आणि

·      गुढीपाडव्यानिमित्त नांदेड - विशाखापट्टनम - नांदेड विशेष रेल्वे.

****

राज्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सविस्तर निर्णय लवकच जाहीर केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विवाह आदी समारंभांमध्ये उपस्थितीवर घालण्यात आले निर्बंध आता हटवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भातली माहिती दिली. नव्या निर्णयाअंतर्गत मास्क वापरणं ऐच्छिक ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.  सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मात्र मुखपट्टीचा वापर प्रत्येकानं आपल्या तसंच इतरांच्या सुरक्षेसाठी करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. राज्यातल्या बावीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी बंधनकारक करण्यात आली असल्याचं टोपे यांनी सांगितलं. चाळीस वर्षे ते पन्नास वर्षे वयोगटातल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी वर्षात एक वेळा तसंच पन्नास ते साठ वर्षे वयोगटातल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा आरोग्य चाचणी बंधनकारक करण्यात आली असल्याचं टोपे म्हणाले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या संदर्भातही माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली. गुढीपाडवा तसंच रमजान हे सण तसंच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदींवेळी मिरवणुका काढण्याचा मार्ग या निर्णयामुळं मोकळा झाला आहे. 

****

राज्यात आज सकाळपासून दुपारपर्यंत १ लाख ८१ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण झालं आहे. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी १३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी २ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर १८ लाख १८ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६१ लाख ९६ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना १३ लाख ५० हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.

****

कठिण प्रश्न सोडवण्यासाठी अनुभव कामी येतो, म्हणून सदस्यांनी आपला अनुभव देशहिताच्या उपयोगी आणला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत कार्यकाळ संपवून एप्रिल ते जुलैदरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या निरोप समारंभात बोलत होते.या सदस्यांनी दीर्घकाळ काम करताना सभागृहाला खूप काही दिलं आहे. असे सदस्य निवृत्त झाल्यानंतर त्यांची उणीव जाणवत राहते. अनुभवी सहकाऱ्यांच्या जाण्यानं जबाबदारी वाढते, असं ते म्हणाले. या सदस्यांनी सभागृहातल्या आपल्या अनुभवाबद्दल लिहावं, ते पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल, असंही पंतप्रधानांनी सुचवलं आहे.

****

केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं `प्रधानमंत्री शहरी आवास` योजनेअंतर्गत सहा राज्यांमध्ये दोन लाख ४२ हजार घरांचं निर्माण करायला मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, गुजरात, त्रिपुरा, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही ती सहा राज्यं आहेत. नवी दिल्ली इथं झालेल्या एका बैठकीत ही मंजूरी देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत घरं बांधण्यासाठी ७ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.  आतापर्यंत एक कोटी १७ लाखाहून अधिक मंजूर झालेल्या घरांपैकी ९५ लाख घरांचं निर्माण झालं असून सुमारे ५६ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.

****

गेल्या १३ मार्च पर्यंत देशात दहा लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असल्याची माहिती रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली. सध्या एक हजार ७४२ चार्जिंग स्टेशन काम करत असल्याचं सांगून  ४८ शहरात दोन हजार ८७७ चार्जिंग स्टेशन्सला मंजूरी देण्यात आल्याचं ते म्हणाले.

****

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅसच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ अज नवी दिल्लीतल्या विजय चौक इथं कॉंग्रेस पक्षातर्फे निदर्शनं करण्यात आली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना गेल्या दहा दिवसात पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत नऊ वेळा वाढ झाल्याचं सांगितलं. वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली. काँग्रेस पक्ष वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ देशव्यापी निदर्शनं करत आहेत.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी देण्यात वारंवार कमतरता येत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. आज लोकसभेत शून्यकाळात त्यांनी यामुळं रोजगाराच्या संधी कमी झाल्याचं सांगून श्रमिकांना वेळेवर पगार मिळाला नसल्याचं सांगितलं. पुरेसा मनरेगा निधी देण्याची आणि श्रमिकांना १५ दिवसांत पगार देण्याची आणि विलंबाबद्द्ल नुकसान भरपाई देण्याची मागणीही गांधी यांनी यावेळी केली.

****

कायम खाते क्रमांक - पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदत आज संपणार आहे. जर हो दोन्ही क्रमांक एकमेकांशी जोडले नाही तर एक हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा त्याच बरोबर पॅन क्रमांकही रद्द केला जाईल, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ -सीबीडीटीच्या सूचनेत म्हटलं आहे. मात्र दंड भरून पॅनकार्ड पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. कोरोना विषाणू संकटाशी यशस्वीपणे सामना केल्यानंतर, सध्या देशात शाळा- महाविद्यालयांमध्ये वार्षिक परीक्षांचा काळ सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तणाव विरहित परिस्थितीत परीक्षेला सामोर जावं यासाठी, पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

****

गुढी पाडव्यानिमित्त दोन एप्रिलला दक्षिण भारतात साजरा करण्यात येणाऱ्या उगादी महोत्सवानिमित्त होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. नांदेड - विशाखापट्टनम - नांदेड हा या गाडीचा मार्ग आहे. उद्या दुपारी साडे चारवाजता नांदेडहून ही गाडी निघणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता ही गाडी विशाखापट्टनमला पोहचेल. परतीच्या प्रवासामध्ये येत्या रविवारी ही गाडी विशाखापट्टनम इथून निघणार आहे.

****

धुळे शहराजवळील मोराणे शिवारातल्या जवाहर सरकारी सुतगिरणीच्या आवारात आज खराब कापूस मोकळा करतांना मशिनची ठिणगी उडून मोठी आग लागली. या आगीत शेकडो टन कापूस जळून खाक झाला आहे.

****

`कोविड- 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या धुळे जिल्ह्यातल्या तीन बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवींचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकाद्वारे दिली आहे.‘कोविड- 19’ मुळे ज्यांचे दोन्ही पालक दगावले आहेत, अशा बालकांची जबाबदारी शासनानं स्वीकारली आहे. त्यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलं स्थापन करण्यात आली आहेत. अशा मुलांसाठी राज्य शासनाकडून पाच लाख रुपये, तर केंद्र सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.03.2022 रोजीचा सायंकाळी 06.35 वाजेचा वृत्तवि...

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.03.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यसभेच्या ७२ सदस्यांना त्यांचा कार्यकाळ संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर आज  निरोप देण्यात आला. येत्या एप्रिल ते जुलै दरम्यान हे सर्व सदस्य निवृत्त होत आहेत. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व सदस्यांच्या कार्याचा गौरव केला. क्लीष्ट समस्या सोडवतांना अनुभव महत्वाची भूमिका बजावतो असं ते म्हणाले. राज्य सभेच्या सदस्यांचा अनुभव हा खूप मोठा असून अनेक प्रसंगी ज्ञानापेक्षा अनुभव सरस ठरतो असं सांगून या सर्व सदस्यांनी आपले अनुभव शब्दात नमूद करावेत जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांसाठी ते आदर्श ठरतील, असं ते म्हणाले.

****

कायम खाते क्रमांक - पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदत आज संपणार आहे. जर हो दोन्ही क्रमांक एकमेकांशी जोडले नाही तर एक हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा त्याच बरोबर पॅन क्रमांकही रद्द केला जाईल, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ -सीबीडीटीच्या सूचनेत म्हटलं आहे. मात्र दंड भरून पॅनकार्ड पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. कोरोना विषाणू संकटाशी यशस्वीपणे सामना केल्यानंतर, सध्या देशात शाळा- महाविद्यालयांमध्ये वार्षिक परीक्षांचा काळ सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तणाव विरहित परिस्थितीत परीक्षेला सामोर जावं यासाठी, पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

****

देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १८४ कोटी लस मात्रांचा टप्पा पार केला. काल दिवसभरात लसीच्या २२ लाख २७ हजारांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. १२ ते १४ वर्षं वयोगटातल्या १ कोटी ५९ लाख मुलांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तर एकंदर २ कोटी ३० लाख आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि ६० वर्षांवरच्या नागरिकांना लसीची वर्धक मात्रा देण्यात आली आहे. १५ ते १८ वर्षं वयोगटात आत्तापर्यंत लसीच्या ५ कोटी ७० लाखांहून जास्त पहिल्या मात्रा तर ३ कोटी ७९ लाखापेक्षा जास्त दुसऱ्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

केंद्रशासित प्रदेश पाँडेचरी कोरोना विषाणूमुक्त झाला आहे. गेल्या फेब्रुवारीपासून तिथं कोविड रूग्णामध्ये घट दिसून येत होती. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रदेशाच्या चारी क्षेत्रात कोविडचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. मोठ्या प्रमाणात झालेल्या कोविड लसीकरणामुळं हे शक्य झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.

****

अंमलबजावणी संचालनालय- ईडीनं आज नागपूरमधील प्रसिद्ध विधीज्ञ सतीश उके यांच्या निवासस्थानी छापे मारले. सकाळपासून इडीचं पथक त्यांच्या घराची झडती घेत आहे. उके यांचे राजकीय नेत्यांशी घनिष्ट संबध आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरूद्ध याचिका दाखल केल्यामुळं ते चर्चेत आले होते.

****

वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी तसंच वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ. राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.  विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश औरंगाबादमधील महावितरणच्या सह व्यवस्थापकीय संचालकांना दिल्याचं राऊत यांनी सांगितलं.

****

तीन लाखापर्यंतचं पिक कर्ज घेऊन ते नियमित परतफेड केलेल्या सांगली जिल्ह्यातल्या २१ हजार शेतकऱ्यांना व्याज सवलत म्हणून ३ कोटी ३७ लाख रुपये राज्य सरकार कडून प्राप्त झाले. डॉ. पंजाबराव देशमुख योजने खाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ही रक्कम जमा झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा केली जाणार असल्याचं बँकेच्या सूत्रानं सांगितलं.

****

आठ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जळगावच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्याच्या एकलग्न इथला हा आरोपी आहे. अत्याचार झालेली मुलगी गतिमंद असल्यानं मूकबधीर विद्यालयाच्या शिक्षकांच्या मदतीनं सांकेतिक भाषेद्वारे तिची साक्ष नोंदविण्यात आली होती.

****

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं देशातल्या जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ३६ व्यक्तींना आज नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते विशेष राष्ट्रीय जल प्रवाह सन्मान २०२२ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यात महाराष्ट्रातून नांदेड ईथले जलमित्र दिपक मोरताळे आणि प्राध्यापक डॉक्टर सुनंदा मोरताळे यांचा समावेश आहे. मोरताळे पती पत्नी यांनी नद्यांच्या दुषित पाण्यावर संशोधन करून जैविक पध्दतीने जलप्रदूषण कमी करण्यात यश मिळविले आहे.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत कामासाठी दिल्या जाणाऱ्या दैनंदिन मजुरीत वाढ करण्यात आली असून, उद्यापासून देशभर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मनरेगाच्या दैनंदिन मजुरीत पूर्वीच्या २४८ रुपयांवरून २५६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विविध राज्यात या मजुरीचे दर वेगवेगळे असून सिक्कीमच्या तीन ग्राम पंचायत हद्दीत तो दर सर्वाधिक म्हणजे ३३३ रुपये आहे तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये सर्वात कमी म्हणजे २०४ रुपये आहे.

****

येत्या तीन ते चार दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यात काल सर्वात जास्त ४३ पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. जळगाव जिल्ह्यात पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. मराठवाड्यातही काही जिल्ह्यात उष्णतेची लाट असून, नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं, उद्या एक एप्रिलपासून मास्क वापरण्याची सक्ती वगळता सर्व निर्बंध हटवण्याबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं घेण्यात येईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उद्यापासून आपत्कालीन कायदा मागे घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असं ते म्हणाले. मात्र जगभरातल्या काही देशात कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं निघणाऱ्या शोभा यात्रांबाबत कोरोना कृती दलानं सकारात्मक शिफारस केली, तर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहण्याची त्यांनी विनंती केली.

****

कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी आणि कोयना एक्सप्रेस या रेल्वे गाड्या एप्रिल महिन्यापासून विद्युत इंजिनवर धावणार आहेत. कोल्हापूर - मिरज ते पुणे या ३२८ किलोमीटर   मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. ही रेल्वे चालवण्यासाठी पुणे विभागातील ५५ चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. महालक्ष्मी, कोयना एक्सप्रेस विद्युत इंजिनासह धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व एक्सप्रेस पॅसेंजर, मालगाड्यांसाठी विद्युत इंजिन असणार आहे.

****

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेलं पदस्पर्श दर्शन, गुढीपाडव्यापासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मंदिर समितीच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन यावर चर्चा केली.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ مارچ 2022 وقت : صبح 09.00 ؍ سے 09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 31 March 2022

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ  :   ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ ۳۱   ؍  مارچ  ۲۰۲۲ء؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


  چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے...


٭ ریاست میں کورونا وائرس کا پھیلائو کم ہو جانے کی وجہ سے کَل سے ما سک سے 

نجات کے علا وہ تمام پا بندیاں ختم کر دی جائے گی ‘ وزیر صحت راجیش ٹو پے 

٭ مرکزی  اور  ریاستی سر کا ری ملازمین کے مہنگائی بھتّے میں3؍ فیصد اضا فہ ‘ ریاستی حکو مت کے 

ملازمین کو مہنگائی بھتّے کے بقا یہ جات دینے کا فیصلہ 

٭ ریاست کے28؍ شہروں کو کچرے پر پروسیسنگ کرنے کے لیے 433؍ کروڑ74؍ لاکھ 

روپیوں کا فنڈ

٭ دُکانوں  اور  اِداروں کے نام کے بورڈ مراٹھی میں آ ویزاں کا آرڈیننس جاری 

٭ ریاست میں کووڈ وباء کے119؍ تاہم مراٹھواڑہ میں5؍ نئے مریضوں کا اندراج 

٭ مراٹھواڑہ کے ریلوے راستوں کے پرو جیکٹس فوراً مکمل کیے جائیں ‘ رکن ِ اسمبلی 

ستیش چوہان کا ریلوے مملکتی وزیر رائو صاحب دانوے سے مطا لبہ 

اور

٭ دھو لیہ-   شو لا پور  قو می شاہراہ کی اراضی تحویل لینے میں بد نظمی کرنے کے جرم میں

اورنگ آباد کے رہائشی ڈِپٹی کلکٹر ششی کانت ہدگل معطّل


 

اب خبریں تفصیل سے....

ریاست میں کورونا وائرس کا پھیلائو کم ہو جانے کی وجہ سے کَل یکم اپریل سے ماسک کے استعمال کی سختی کے علاوہ تمام پا بندیاں ختم کرنے کا فیصلہ وزیر اعلیٰ کی رضا مندی سے لیا جائے گا ۔ یہ بات وزیر صحت راجیش ٹو پے نے کہی ہے ۔ وہ کَل ممبئی میں صحا فیوں سے مخاطب تھے ۔ کَل سے ہنگامی قانون واپس لینے کا عمل شروع کیا جا ئے گا ۔ یہ بات اُنھوں نے کہی۔ تاہم دنیا کے چند مما لک میں کورونا کی چو تھی لہر آ نے کی وجہ سے فی الحال ماسک سے نجات کا کوئی خیال ریاستی حکو مت نہیں کر رہی ہے ۔ اِس بات کی وضا حت ٹو پے نے کہی ۔

***** ***** ***** 

آئندہ آنے والے گڈی پاڑوا کے سلسلے میں نکالی جانے والی شو بھا یاترا کے ضمن میں کورونا ایکشن فورس نے مثبت سفارش کی ہے ۔ تاہم پا بندیوں میںنر می کرنے کا فیصلہ وزیر اعلیٰ لیں گے ۔ اِس کے لیے مزید ایک دِن انتظار کر نے کی اپیل اُنھوں نے کی  ۔ ڈاکٹر با با صاحب امبیڈکر کی جینتی جوش و خروش سے منا نے کی اجازت ریاستی حکو مت نے دی ہے ۔ تاہم نظم و ضبط کے ساتھ یہ جینتی منا نے کی اپیل ٹو پے نے کی ہے ۔

***** ***** ***** 

مرکزی  اور  ریاستی سر کاری ملازمین کے مہنگائی بھتّے میں3؍ فیصد اضا فہ کر دیا گیا ہے ۔ مرکزی کا بینہ کی کَل ہوئی میٹنگ میں یہ فیصلہ کیا گیا ۔ اِس کی وجہ سے اب مرکزی سر کاری ملازمین کا مہنگائی بھتّہ 34؍ فیصد ہو گیا ہے ۔ مرکزی حکو مت کے47؍ لاکھ68؍ ہزار ملازمین اِسی طرح 68؍ لاکھ62؍ ہزارسبکدوش ملازمین کو اِس کا فائدہ حاصل ہو گا ۔ 

ریاستی حکو مت نے بھی مہنگائی بھتّے میں اضا فے کے سلسلے میں GR کَل جاری کیا ۔ اِس کے تحت تمام ملازمین کو28؍ فیصد کے بجائے31؍ فیصد شرح سے مہنگائی بھتّہ دیا جا ئے گا ۔ غیر تر میمی تنخواہ ڈھانچے کے تحت چھٹے تنخواہ کمیشن کے تنا سب سے تنخواہ حاصل کرنے والے ملازین کا مہنگائی بھتّہب 189؍ فیصد سے 196؍ فیصد کر دیا گیا ہے ۔ یکم جولای 2021؁ سے یہ فیصلہ عائد ہو گا ۔ 9؍ ماہ کا بقایہ  ماہ  مارچ کی تنخواہ میں نقد ادا کرنے کی ہدایت دی گئی ہے ۔

***** ***** ***** 

کچرے کے انتظام پر پُر اثر طریقے سے عمل در آمد کرنے کے لیے مہاراشٹر کا تعا ون کرنے کے نظر یہ سے مرکزی حکو مت نے 3؍ اعشا ریہ 7؍ کروڑ میٹرک ٹن شہری کچرے پر  پروسیسِنگ کرنے کے لیے 433؍ کروڑ74؍ لاکھ روپیوں کی تجویز کو منظو ری دی گئی ہے ۔ اِس میں مہاراشٹر کے28؍ شہری مقامی خود مختار اِدارے شامل ہیں ۔

***** ***** ***** 

ریاست کے دُکانوں اور اِداروں کے نام کی تختیاں مراٹھی دیو نا گِیری رسم الخط میں آ ویزاں کرنے کے سلسلے میں آرڈیننس جاری کیا گیا ۔ اِس کے تحت اب آئندہ ریاست کے تمام دُکانوں اِسی طرح اِداروں کو مراٹھی زبان میں نام کے بورڈ آ ویزاں کرنا لازمی کر دیا گیا ہے ۔ اِس سلسلے میں کابینہ کی منظوری سے مہا راشٹر شاپ اینڈ اِنسٹی ٹیوٹ ایکٹ 2017؁ میں تر میم کرنے کے ضمن میں بِل مالی بجٹ اجلاس کے دو نوں ایوانوں میں منظور کر لیا گیا ۔ اِس لیے ایکٹ کو گور نر نے منطوری دے دی ۔

***** ***** ***** 

ریاست میں کَل کووِڈ وباء کے نئے119؍ مریضوں کی شناخت ہوئی ۔ اِس کی وجہ سے تمام ریاست میں کووِڈ متاثرین کی جملہ تعداد78؍ لاکھ73؍ ہزار841؍ ہو گئی ہے ۔ اِس وباء کی وجہ سے کَل 2؍ مریض چل بسے ۔ ریاست میں اب تک اِس وباء کی وجہ سے مرنے والوں کی جملہ تعداد ایک لاکھ47؍ ہزار782؍ ہو گئی ہے ۔ شرح اموات ایک اعشاریہ 87؍ فیصد ہو گیا ہے ۔ کَل138؍ مریض شفا یاب ہو گئے ۔ ریاست میں اب تک77؍ لاکھ25؍ ہزار120؍ مریض کورونا وائرس سے نجات حاصل کر چکے ہیں ۔ کووِڈ سے نجات کی شرح 98؍ اعشا ریہ 11؍ فیصد ہو گئی ہے ۔ ریاست میں فی الحال 160؍ مریضوں کا علاج جاری ہیں ۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ میں کَل5؍ کورونا وائرس مریضوں کی تصدیق ہوئی ۔ اِس میں اورنگ آ باد اور بیڑ اضلاع میں فی کس 2؍  اور  عثمان آبادضلعے میں ایک مریض پا یا گیا ۔ پر بھنی ‘ ناندیڑ‘ جالنہ ‘ ہنگولی  اِسی طرح لاتور ضلعے میں کَل کورونا وائرس سے متاثرہ ایک بھی مریض نہیں پا یا گیا ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد میں ریلوے کی پیٹ لائن کے لیے رکن پارلیمنٹ  اور  رکن اسمبلی کی جانب سے کوشش کی گئی ۔ اورنگ آ باد  کے رکن پارلیمنٹ امتیاز جلیل نے اورنگ آباد میں مجوزہ ریلوے پِیٹ لائن جالنہ میں منتقل نہ کریں ۔ ایسا مطا لبہ کَل لوک سبھا میں کیا ۔ اِسی طرح شیواجی نگر میں ریلوے لائن کے التواء میں پڑے ہوئے کام کو فوراً شروع کرنے کا سوال  اُٹھا یا  اور  کام میں ہو رہی تاخیر کے سلسلےمیں مرکزی ریلوے کابینہ سے وضاحت طلب کی ۔

***** ***** ***** 

صنعتی اِسی طرح سیاحتی نظر یہ سے اہمیت کے حامل مراٹھواڑہ کے التواء میں پڑے ریلوے راستوں کے پرو جیکٹس فوراً مکمل کیے جا ئیں ۔ ایسا مطالبہ مراٹھواڑہ گریجویٹ حلقہ انتخاب کے رکن اسمبلی ستیش چو ہان نے ریلوے مملکتی وزیر رائو صاحب دانوے سے کیا ہے ۔ چو ہان نے کَل دِلّی میں دانوے سے ملا قات کر کے اُنھیں اِ س سلسلے میں میورینڈم پیش کیا ۔

***** ***** ***** 

اورنگ آ باد کے رہائشی ڈِپٹی کلکٹر ششی کانت ہد گل کو معطّل کر دیا گیا ہے ۔ کار گذار سب ڈیویژنل آفیسر اِسی طرح اراضی تحویل آفیسر کے عہدے پر رہتے ہوئے اُنھوں نے دھو لیہ- شو لا پور قو می شاہراہ 211؍ کی اراضی تحویل میں دیگر اراضی کو شاہراہ کے قیب کی اراضی بتا کر تقریباً41؍ کروڑ روپیوں کا اضا فی فنڈ دیا ہے ۔ اِس پر یہ کار وائی کی گئی ۔ معطّلی کے دوران ہد گل ‘ ضلع کلکٹر سنیل چوہان کی رضا مندی کے بغیر ہید کوارٹر نہیں چھوڑیں گے ۔ یہ بات حکم نا مے میں کہی گئی ہے ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد ضلعے کے اجنتا میں کھیت تا لاب میں تیر نےکے لیے گئے ہوئے3؍ اسکولی طلباءڈوب کر جا بحق ہو گئے ۔ عمیر خان نصیر خان پٹھان ‘ شیخ محمد انس عبد الحفیظ  اور  اِکرام خان ایوب خان پٹھان  مرنے والوں کے نام ہے ۔ کَل دو پہر کے قریب یہ سانحہ پیش آ یا ۔

***** ***** ***** 

موسم :

آئندہ 3؍ سے4؍ یوم میں ریاست میں کئی مقا مات پر درجہ ٔ  حرارت میں2؍ سے3؍ ڈگری سیلسِیس اضا فہ کا قیاس محکمہ ٔ  موسمیات نے ظاہر کیا ہے ۔ آکو لہ ضلعے میں سب سے زیادہ43؍ اعشا ریہ ایک ڈگر سیلسیس درجہ ٔ  حرارت درج کیا گیا ۔ 

مراٹھواڑہ کے چند اضلاع میں گرم لہر جاری ہے ۔ شہری اپنی فکر کریں ۔ ایسی اپیل انتظامیہ نے کی ہے ۔

***** ***** ***** 

***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 







آخر میں اہم خبروں کی سر خیاں دوبارہ  

٭ ریاست میں کورونا وائرس کا پھیلائو کم ہو جانے کی وجہ سے کَل سے ما سک سے 

نجات کے علا وہ تمام پا بندیاں ختم کر دی جائے گی ‘ وزیر صحت راجیش ٹو پے 

٭ مرکزی  اور  ریاستی سر کا ری ملازمین کے مہنگائی بھتّے میں3؍ فیصد اضا فہ ‘ ریاستی حکو مت کے 

ملازمین کو مہنگائی بھتّے کے بقا یہ جات دینے کا فیصلہ 

٭ ریاست کے28؍ شہروں کو کچرے پر پروسیسنگ کرنے کے لیے 433؍ کروڑ74؍ لاکھ 

روپیوں کا فنڈ

٭ دُکانوں  اور  اِداروں کے نام کے بورڈ مراٹھی میں لگا نے کا آرڈیننس جاری 

٭ ریاست میں کووڈ وباء کے119؍ تاہم مراٹھواڑہ میں5؍ نئے مریضوں کا اندراج 

٭ مراٹھواڑہ کے ریلوے راستوں کے پرو جیکٹس فوراً مکمل کیے جائیں ‘ رکن ِ اسمبلی 

ستیش چوہان کا ریلوے مملکتی وزیر رائو صاحب دانوے سے مطا لبہ 

اور

٭ دھو لیہ-   شو لا پور  قو می شاہراہ کی اراضی تحویل لینے میں بد نظمی کرنے کے جرم میں

 اورنگ آباد کے رہائشی ڈِپٹی کلکٹر ششی کانت ہدگل معطّل


اِسی کے ساتھ آکاشوانی اورنگ آباد سے علاقائی خبریں ختم ہوئیں۔

٭٭٭٭٭


آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ مارچ 2022 وقت : صبح 09.00 ؍ سے 09.10 ؍ بجے

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं, उद्यापासून मास्क मुक्ती वगळता सर्व निर्बंध हटवणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे

·      केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्याची थकीत रक्कमही देण्याचा निर्णय

·      राज्यातील २८ शहरांना घन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, ४३३ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी

·      दुकानं आणि आस्थापनांचा नामफलक देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी

·       राज्यात कोविड संसर्गाचे ११९ तर मराठवाड्यात पाच नवे रुग्ण

·      मराठवाड्यातले रेल्वे मार्ग प्रकल्प तातडीनं मार्गी लावण्याची आमदार सतीश चव्हाण यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

आणि

·      धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात अनियमितता केल्याच्या आरोपावरून औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल निलंबित

****

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं, उद्या एक एप्रिलपासून मास्क वापरण्याची सक्ती वगळता सर्व निर्बंध हटवण्याबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं घेण्यात येईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उद्यापासून आपत्कालिन कायदा मागे घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असं ते म्हणाले. मात्र जगभरातल्या काही देशात कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं निघणाऱ्या शोभा यात्रांबाबत कोरोना कृती दलानं सकारात्मक शिफारस केली, तर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहण्याची त्यांनी विनंती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आाहे, पण शिस्तबद्द पद्धतीनं ही जयंती साजरी करण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

****

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. केंद्र सरकारचे ४७ लाख ६८ हजार कर्मचारी तसंच ६८ लाख ६२ हजार निवृत्ती वेतन धारकांना  याचा लाभ होणार आहे.

राज्य सरकारनंही महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय काल जारी केला. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना २८ टक्क्यांऐवजी ३१ टक्के दरानं महागाई भत्ता दिला जाणार आहे. असुधारित वेतन संरचनेतल्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता १८९ टक्क्यांवरून १९६ टक्के करण्यात आला आहे. १ जुलै २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू होईल. नऊ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मार्च महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याची सूचना करण्यात आली आहे. असुधारित वेतन संरचनेतल्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत महागाई भत्त्यातली ११ टक्के वाढीची तीन महिन्यांची थकबाकीही मंजूर करण्यात आली आहे.

****


घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राला मदत करण्याच्या दृष्टीनं, केंद्र सरकारने तीन पूर्णांक सात कोटी मेट्रिक टन शहरी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, ४३३ कोटी ७४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दीड हजार एकरापेक्षा अधिक जमिनीवरचा हा प्रकल्प पर्यावरणीय संतुलन सुनिश्चित करेल. ‘लक्ष्य झिरो डंपसाइट या मिशन अंतर्गत, देशभरातल्या विविध शहरांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे.

****

महाराष्ट्रात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमधल्या मंजुर झालेल्या घरांच्या बांधणीसाठी निधीची कमतरता नाही, असं ग्रामीण गृहनिर्माण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काल राज्यसभेत सांगितलं. त्यांनी आपल्या उत्तराबरोबरच, गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातल्या मंजुर झालेल्या लाभार्थ्यांच्या निधीचं कोष्टक मांडलं. यानुसार गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात, प्रधानमंत्री ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी देण्यात आलेल्या निधीपैकी प्रत्येक वर्षी निधी शिल्लक आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अखेरीसही या योजनेत ९१३ कोटी एक लाख इतका निधी शिल्लक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यातली दुकानं आणि आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे. यानुसार आता यापुढे राज्यातली सर्व दुकानं तसंच आस्थापनांना मराठी भाषेत नामफलक प्रदर्शित करणं अनिवार्य आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम, २०१७  मध्ये सुधारणा करण्यासंबंधीचं विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मान्य झालं असून,  या नवीन अधिनियमास राज्यपालांनी संमती दिली आहे. जी दुकानं किंवा आस्थापनांमध्ये मद्य पुरवलं जातं किंवा मद्य विकलं जातं अशी दुकानं आणि आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावं लिहिता येणार नाहीत, असंही या आदेशात म्हटलं आहे.

****

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या, आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या, ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२ - अभय योजनेची सूचना काल जारी करण्यात आली.

****

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची अथवा इतर औषधांची विक्री करणाऱ्या औषधी दुकानांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्याची सूचना, अन्न-औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतच्या बातम्यांची गंभीर दखल घेत, यड्रावकर यांनी, यासंदर्भात प्रशासनानं पोलीस विभागाशी समन्वय साधून कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहिलं आहे. कोरोना काळामुळे किमान समान कार्यक्रम राबवणं शक्य झालं नाही, परंतु आता कोरोना संकटाची तीव्रता संपली आहे. त्यामुऴे किमान समान कार्यक्रम पुन्हा राबवण्यात यावा. दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली जावी, असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेलं पदस्पर्श दर्शन, गुढीपाडव्यापासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मंदिर समितीच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ११९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७३ हजार ८४१ झाली आहे. या संसर्गानं काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७८२ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १३८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २५ हजार १२० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. परभणी, नांदेड, जालना, हिंगोली तसंच लातूर जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

 ****

औरंगाबाद इथं रेल्वेच्या पीटलाईनसाठी खासदार आमदारांकडून दिल्लीत पाठपुरावा करण्यात आला. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद इथं प्रस्थावित रेल्वे पीटलाईन जालना इथं स्थलांतरण करु नये, अशी मागणी काल लोकसभेत केली. तसंच शहरातल्या शिवाजीनगर इथल्या रेल्वे पटरीच्या भुयारी मार्गाचं प्रलंबित काम त्वरीत सुरु करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन, कामास होणाऱ्या विलंबनाबाबत, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितलं.

****

औद्योगिक तसंच पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असणारे मराठवाड्यातले प्रलंबित रेल्वे मार्ग प्रकल्प तातडीनं मार्गी लावावेत, अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी काल दिल्लीत दानवे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन दिलं. औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जालना इथं ‘पीटलाइन जरूर करावी, मात्र औरंगाबाद इथंही ‘पीटलाइन झाल्यास, ते मराठवाड्याच्या फायद्याचं ठरणार असल्याचं, आमदार चव्हाण यांनी सांगितलं. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी लावले जातील असं आश्वासन दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

****


औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना निलंबित करण्यात आलं आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी असतांना हदगल यांनी, धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ च्या भुसंपादनामध्ये, लाबवरच्या जमिनी महामार्गाजवळ दाखवून जवळपास ४१ कोटी रुपये अधिकचा निधी दिल्याचं निदर्शनास आल्यानं, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. निलंबन कालावधीत हदगल यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचं या आदेशात नमूद करण्यात आला आहे.

****

प्रलंबित सेवा विषयक मागण्या मान्य न झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. एक एप्रिलला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन, तसंच १८ एप्रिलला रजा टाकून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास चार मे पासून बेमूदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे.

****

मोतीबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, लातूरसह राज्यात सर्व जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरांचं आयोजन करावं, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेल, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं, जिल्हा काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्म्याचं वाटप करण्यात आलं. मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी लातुरात उपचार सुविधा उपलब्ध करून, शासकीय महाविद्यालयात डायलेसिस वार्ड सुरुवात करण्याची सूचनाही देशमुख यांनी केली.

****

नांदेड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अत्यावश्यक करण्यात आलं आहे. एक एप्रिल २०२२ पासून दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा अशी सूचना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सर्व शासकीय कार्यालयात जाऊन केली आहे.

शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी चालवताना आढळून आलेल्या नागरिक, कर्मचारी आणि अधिकारी यांच्याविरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा उस्मानाबाद इथले उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिला आहे.

****

बीड विधानसभा मतदारसंघातल्या विविध गावांमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी विविध विकास कामांचं भूमिपूजन करत शुभारंभ केला. रुईलिंबा इथंलं विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, संत भगवानबाबा मंदिर, संत वामनभाऊ मंदिर परिसरात सभामंडपाच्या कामाचं भूमिपूजन आणि उमरद, दगडी शहाजानपूर, कुमशी आदी गावांमध्ये, जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसंच बीड शहरातल्या अंबिका चौकातला रस्ता आणि नाली बांधकामाची पाहणीही आमदार क्षीरसागर यांनी केली.

****

पंजाबमधल्या जालंधर इथून औरंगाबाद शहरात आलेल्या ३७ धारदार तलवारी आणि एक कुकरी क्रांती चौक पोलिसांनी काल पकडली. डीसीटीसी कंपनीच्या निराला बाजार इथल्या कार्यालयावर छापा टाकून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, कुरियर कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्यातीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. उमेखान नासिरखान पठाण, शेख मोहम्मद अनस अब्दुल हाफिज आणि अक्रमखान आयुबखान पठाण अशी मृतांची नावं आहेत. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

****

Wednesday, 30 March 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.03.2022 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 30.03.2022 रोजीचे - अर्थविशेष

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.03.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 March 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ.

·      सध्या तरी मास्कमुक्तीचा विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट.

·      औरंगाबाद इथं रेल्वेच्या पीटलाईनसाठी खासदार आमदारांचा दिल्लीत पाठपुरावा.

आणि

·      अजिंठा इथं तीन किशोरवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू.

****

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. यामुळे आता महागाई भत्ता ३४ टक्के झाला आहे. केंद्र सरकारचे ४७ लाख ६८ हजार कर्मचारी तसंच ६८ लाख ६२ हजार निवृत्ती वेतन धारकांना लाभ होणार आहे.

 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना २८ टक्क्यांऐवजी ३१ टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. असुधारित वेतन संरचनेतल्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता १८९ टक्क्यांवरून १९६ टक्के करण्यात आला आहे. १ जुलै २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू होईल. नऊ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मार्च महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याची सूचना करण्यात आली आहे. असुधारित वेतन संरचनेतल्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत महागाई भत्त्यातली २५ टक्के वाढीची थकबाकीही मंजूर करण्यात आली आहे.

****

जगभरातल्या काही देशात कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. आज यासंदर्भात वार्ताहरांशी बोलताना टोपे यांनी, कोरोनाचा प्रदुर्भाव आणखी कमी झाला तर, आपतकालीन कायदा मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं निघणाऱ्या शोभा यात्रांबाबत कोरोना कृती दलानं सकारात्मक शिफारस केली तर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहण्याची विनंती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आाहे, पण शिस्तबद्द पद्धतीनं ही जयंती साजरी करण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

****

दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा निर्णय आज जारी करण्यात आला. आता यापुढे महाराष्ट्रातल्या सर्व दुकानं तसंच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. ज्या दुकाने किंवा आस्थापनांमध्ये मद्य पुरवलं जातं किंवा मद्य विकलं जातं अशा दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावं लिहिता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद इथं रेल्वेच्या पीटलाईनसाठी खासदार आमदारांकडून दिल्लीत पाठपुरावा करण्यात आला.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद इथं प्रस्थावित रेल्वे पीटलाईन जालना इथं स्थलांतरण करु नये अशी मागणी आज लोकसभेत केली. तसंच शहरातल्या शिवाजीनगर इथल्या रेल्वे पटरीच्या भुयारी मार्गाचं प्रलंबित काम त्वरीत सुरु करण्याबाबत लोकसभेत मुद्दा उपस्थित करुन कामास होणाऱ्या विलंबनाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितलं.

 

औद्योगिक तसंच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे मराठवाड्यातले प्रलंबित रेल्वे मार्ग प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी आज दिल्लीत दानवे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं. औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. जालना इथं ‘पीटलाइन’ जरूर करावी मात्र औरंगाबाद इथंही ‘पीटलाइन’ झाल्यास ते मराठवाड्याच्या फायद्याचं ठरणार असल्याचं, आमदार चव्हाण यांनी सांगितलं. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी लावले जातील असं आश्वासन दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

****

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना निलंबित करण्यात आलं आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी असतांना हदगल यांनी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ च्या भुसंपादनामध्ये गंभीर स्वरुपाची अनियमितता केल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. निलंबन कालावधीत हदगल यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचं या आदेशात नमूद आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहिलं आहे. कोरोना काळामुळे किमान समान कार्यक्रम राबवणे शक्य झालं नाही, परंतु आता कोरोना संकटाची तीव्रता संपली आहे. त्यामुऴे किमान समान कार्यक्रम पुन्हा राबवण्यात यावा. दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली जावी, असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

मुंबै बॅँक फसवणूक प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात आज आम आदमी पक्षाच्या वतीनं मुंबईत प्रविण दरेकर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. दरेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला, बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

****

प्रलंबित सेवा विषयक मागण्या मान्य न झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. एक एप्रिलला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन, तसंच १८ एप्रिलला रजा टाकून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास चार मे पासून बेमूदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे.

****

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची अथवा इतर औषधांची विक्री करणाऱ्या औषधी दुकानांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्याची सूचना अन्न-औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतच्या बातम्यांची गंभीर दखल घेत, यड्रावकर यांनी, यासंदर्भात प्रशासनानं पोलीस विभागाशी समन्वय साधून कडक कारवाईचे निर्देश दिले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा इथं तीन किशोरवयीन मुलांचा आज शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सुमारे सोळा वर्ष वयाची ही तिन्ही मुलं दहावीची परीक्षा झाल्यानंतर शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता बुडून मरण पावल्याचं, अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबाद इथं आज सव्वा चार लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. सय्यद अजिम सय्यद युनूस याने त्याच्या घरात गुटख्याचा बेकायदेशीररित्या साठा करुन ठेवला होता. अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकासह छापा टाकून गुटख्याचा साठा आणि आरोपीला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

औरंगाबाद पोलिसांनी आज शहरात तलवारीचा मोठा साठा जप्त केला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका खासगी कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून, कुरिअरमार्फत आलेल्या ३७ तलवारी आणि एक कुकरी पोलिसांनी जप्त केली.

****

राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक निवडताना निकषांच्या पातळीत नव्याने बदल करून परीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी आज सोलापूर इथं ही माहिती दिली

****

नांदेड जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. एक एप्रिल २०२२ पासून दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा अशी सूचना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सर्व शासकीय कार्यालयात जाऊन केली आहे.

****