आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ मार्च २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीयकृत
बँकांचं खासगीकरण करू नये या मागणीसह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी कालपासून
दोन दिवसांचा संप पुकारला आहे. वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनीही
संप पुकारला असून विविध कर्मचारी संघटनांनी या संपाला पाठींबा दिला आहे.
****
वीज
कर्मचारी संघटनांसोबतची ठरलेली आजची बैठक रद्द करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन
राऊत यांनी घेतला आहे. संप मागे घेण्याचं आवाहन करूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद
न मिळाल्यानं हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मेस्माची कठोर अंमलबजावणी करण्यात
येणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
****
देशात
२१ हरित विमानतळ साकारण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे. नागरी उड्डयन राज्यमंत्री जनरल
व्ही के सिंग यांनी ही माहिती दिली. यामध्ये महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग
विमानतळाचा समावेश आहे.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आज नवी दिल्ली इथं तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण करणार आहेत.
यावेळी राष्ट्रपती जल शक्ती अभियान - कॅच द रेन मोहिम २०२२ ची सुरुवात करणार आहेत.
****
अमरनाथ
यात्रा येत्या ३० जूनला कोविड प्रतिबंधक नियमांसह सुरु होणार आहे. या यात्रेसाठी ऑनलाईन
नोंदणी ११ एप्रिलपासून सुरु होईल. ही यात्रा ४३ दिवस चालणार असून ११ ऑगस्टला समारोप
यात्रेचा समारोप होणार आहे.
****
बीड
इथल्या स्थानिक गुन्हे शाखेला काल चोरट्यांच्या एका टोळीला पकडण्यात यश आलं. या टोळीनं
२७ गुन्ह्यांची कबूली दिली आहे. महाराष्ट्रासह गोव्यातही या टोळीने गुन्हे केले असल्याची
माहिती, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.
****
औरंगाबाद
इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठातल्या महागामी गुरुकुलात सुरू असलेल्या शार्ङ्गदेव
महोत्सवात आज पंडित सुरेश तळवलकर यांचं भारतीय संगीतातील ताल-लय या विषयावर स-प्रयोग
व्याख्यान, डॉ. शब्बीर अहमद मीर यांचं ‘कश्मीर सुफियाना मौसीकी’ या विषयावर व्याख्यान
होणार आहे. तसंच संध्याकाळच्या सत्रात उड़िसी ताल या विषयावर गुरु पार्वती दत्ता मार्गदर्शन
करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment