आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ मार्च २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
देशातली
आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा दोन वर्षांच्या कालावधीनंतर आज मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू
होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं मार्च २०२० मध्ये कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर
आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित केली होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये आरोग्य आणि
कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन केलं जाईल. जगभरात झालेल्या
कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीमुळे आणि योग्य त्या सल्लामसलतीनंतर अनुसूचित व्यावसायिक
आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा हा निर्णय घेतला मंत्रालयानं घेतला
आहे.
****
पेट्रोल
आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात ८२ तर डिझेलच्या दरात ८१
पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ११३ रुपये २९ पैसे प्रती लिटर, तर
डिझेलची किंमत ९७ रुपये ४९ पैसे प्रती लिटर इतकी झाली आहे.
****
देशात
१२ ते १४ या वयोगटातल्या एक कोटीपेक्षा अधिक मुलांना कोविडची पहिली मात्रा मिळाली असल्याचं
आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. पहिली मात्रा
मिळालेल्या या मुलांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे.
****
विधीमंडळाच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १८ ते २८ जुलै
दरम्यान मुंबईत होणार आहे.
****
महिलांसाठीच्या
विविध शासकीय योजनांचा लाभ घेत महिलांनी स्वावलंबी झालं पाहिजे, असं मत महिला आर्थिक
विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल परभणी इथं
मोफत ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रमात बोलत होत्या.
****
बीड
इथले शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे यांचं काल अपघाती निधन झालं, ते
४० वर्षांचे होते. बीडहून लिंबागणेशकडे जाताना मोरे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने
धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला
****
मराठवाड्यात
काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात तीन, बीड दोन, तर लातूरत
आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली. नांदेड, उस्मानाबाद,
जालना तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
No comments:
Post a Comment