Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 March 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मार्च २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
आसाम
आणि मेघालयातला सीमावाद संपुष्टात; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही मुख्यमंत्र्यांची
सामंजस्य करारावर स्वाक्षरी.
·
जल
आंदोलन हे जन आंदोलन होण्याची गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून व्यक्त.
·
चंद्रपूर
वीज निर्मिती केंद्रातील पाच संच कामगारांअभावी तर एक संच तांत्रिक बिघाडामुळे बंद.
·
भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांचे प्रशासनाला निर्देश.
आणि
·
पेट्रोल
- डिझेलवरील मुल्यवर्धीत कर कमी करावा - भाजपचे संजय केणेकर यांची मागणी.
****
ईशान्य
भारतातल्या आसाम आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेला
सीमा वादावर पडदा पडला आहे. दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री
हेमंत बिस्वा सरमा आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी सीमा वादावरील
ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. १९७२ साली आसाममधून वेगळ्या झालेल्या मेघालयाने १९७१च्या
आसाम पुनर्रचना कायद्याला आव्हान दिलं होतं. ज्यामुळे सुमारे ९०० किमी-लांबीच्या सामायिक
सीमेच्या विविध भागांमधील १२ क्षेत्रांवर वाद सुरू होता. आज झालेल्या या करारानुसार
१२ पैकी सहा विभागातल्या सीमा प्रश्नावर तोडगा निघाला आहे.
****
जल
आंदोलन हे जन आंदोलन होण्याची गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे.
ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केल्यानंतर बोलत होते. जल शक्ती मंत्रालय
राज्य, संघटना आणि व्यक्तिगत पातळीवरील विविध स्तरातील ११ श्रेणींमध्ये ५७ पुरस्कार
यावेळी देण्यात आले. जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यात उत्तर प्रदेश प्रथम, राजस्थान
द्वितीय तर तामिळनाडूनं तिसरा क्रमांक पटकावला. पाणी वाचवण्याच्या बाबतीत देशातील लोकांचे
विचार बदलून पाणी वापराबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण हा या पुरास्कारांचा
उद्देश असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. जल शक्ती अभियान-कॅच द रेन मोहिम २०२२ चा
ही राष्ट्रपतींनी यावेळी शुभारंभ केला.
****
महाविकास
आघाडी सरकार खाजगीकरणाचं समर्थन करणार नाही, असा खुलासा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी
केला आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या आंदोलकांसोबतची आजची नियोजित
बैठक रद्द करण्यात आली असली तरी, ज्या कामगार नेत्यांना भेटण्याची इच्छा असेल ते आपल्याला
भेटून संवाद साधू शकतात, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्माची
कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान,
शासनानं मेस्मा लागू केल्याच्या निषेधार्थ वाशिम शहरात महावितरणाच्या कार्यालयासमोर
कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशीही संपात सहभागी होत बँकेच्या शाखांसमोर
निदर्शनं केली. तसंच नवीन कामगार कायदा आणि खासगीकरणाचं धोरण यासंदर्भात माहितीपत्रकाचं
कर्मचाऱ्यांनी वाटप केलं.
आयटकच्या
वतीनं पैठण इथं आशा, आणि गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार तसंच उमेद अभियानचे सर्व कर्मचाऱ्यांनी
तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.
नांदेड
इथं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नांदेड शाखेच्या वतीनं खाजगीकरणाला
विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
हिंगोली
जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा ३१ मार्च रोजी रात्री दहा वाजेपर्यंत चालू
ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील हिंगोली,
वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव इथं शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने
हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
वीज
कर्मचाऱ्यांच्या संपामुळं चंद्रपूर इथल्या वीज निर्मिती केंद्रातील ६० मेगावॅट क्षमतेचे
पाच जलविद्यूत संच बंद झाले आहेत. सोबतच ५०० मेगावाट क्षमतेचा एक संच तांत्रिक बिघाडामुळे
आज दुपारी बंद झाला. कर्मचारी संपावर असल्याने जलविद्युत संच चालवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ
नसल्यानं वीजनिर्मिती बंद करावी लागली आहे.तर तांत्रिक कारणामुळे बंद पडलेला ५०० मेगावाटचा
संच उद्यापर्यंत दुरूस्त होण्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी दिली.
****
भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव उत्साहाने साजरा करू, यासंदर्भात आवश्यक ते
परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरात लवकर प्रसिद्ध केले जाईल असं मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते आज सहयाद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत बोलत होते.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉ आंबेडकरांची जयंती तसंच पुण्यतिथीनिमित्त
अभिवादन करताना, संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट
आहे. आता कोरोना सावट कमी झालं आहे, राज्यभरात उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून
हा जयंती उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
महाराष्ट्र
गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातील
लेफ्टनंट जनरल मिलिंद नारायणराव भुरके यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले
असून त्यासाठी २ लाख रूपये, जळगाव जिल्ह्यातील सुभेदार मच्छिंद्रनाथ गोविंदा पाटील
आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुभेदार संभाजी गोविंद भोगण यांना मेन्शन इन डिस्पॅच हे
शौर्यपदक पदक प्रदान करण्यात आले असून आणि त्यासाठी प्रत्येकी ६ लाख रुपये, कोल्हापूर
जिल्ह्यातील सुभेदार सुनिल नामदेव पाटील यांना सेना पदक आणि त्यासाठी ५ लाख ५० हजार
रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
****
राज्य सरकारने आता पेट्रोल
- डिझेलवरील मुल्यवर्धीत कर कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय
जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय केणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. भाजपची
सत्ता असलेल्या राज्यांसह एकूण २५ राज्य सरकारांनी पेट्रोल डीझेल वरील मूल्यवर्धित
करात कपात करून जनतेला दिलासा दिला मात्र महाविकास आघाडी सरकार पेट्रोल डिझेल वरील
कर कमी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं.
****
महाविकास आघाडी सरकार पूर्ण
पाच वर्ष चालणार असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले
यांनी व्यक्त केला आहे. ते आज भंडारा इथं एका कार्यक्रमात बोलत होते. भारतीय जनता पक्षाने
केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करुन, राजभवनच्या मदतीने सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न
केले तरी त्यात त्यांना यश मिळणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भंडारा इथं माझी वसुंधरा
अभियानांतर्गत खात रोडवरील रेल्वे मैदानावर आयोजित सायकल फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या फेरीसाठी २ हजार ९६० सायकलप्रेमींनी काल अखेर पर्यंत नोंदणी केली यापैकी २ हजार
४६२ नागरिकांनी फेरीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर २ हजार ४४५ नागरिकांनी फेरी पूर्ण
केली.या फेरीची नोंद लिम्का बुकमध्ये होण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हवामान -
राज्यात
उन्हाची तीव्रता वाढत आहे. मराठवाड्यात १ एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment