आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जानेवारी २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे नवं वर्ष प्रत्येकासाठी
आशा, प्रसन्नता आणि यशानं परिपूर्ण ठरो तसंच प्रत्येकाला चांगलं आरोग्य प्राप्त होवो,
असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
देशातील विविध विमानतळांवर
२ टक्के कोविड चाचणी करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत गोळा करण्यात आलेल्या ५ हजार ६६६
प्रवाशांच्या नमुन्यांपैकी ५३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
****
भीमा - कोरेगाव इथं आज विजयस्तंभ
अभिवादन सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर
प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केलं.
****
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचं नागपूर इथलं मुख्यालय बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी देणाऱ्या
एका मद्दपीला पोलिसांनी अटक केली आहे. या धमकी नंतर संघ मुख्यालय आणि रेशीमबागेतील
डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी काल रात्री एका पुलाच्या बांधकाम
साहित्याची जाळपोळ तसंच वाहनांची तोडफोड केली. पोलिस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले तोवर
नक्षलवादी तिथून फरार झाले होते.
****
परभणी
जिल्हा पोलिस दलातील ७५ रिक्त जागांकरता उद्या पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस
भरती प्रक्रिया होणार आहे. या जागांसाठी चार हजार ९०० अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती
जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांनी पत्रकार परिषदेत दिली.
****
महाराष्ट्र
खुल्या टेनिस स्पर्धेला कालपासून पुण्यात प्रारंभ झाला. बालेवाडी क्रीडा संकुलात सुरू
असलेल्या या स्पर्धेत युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांनी काल आपापले सामने जिंकत
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. येत्या सात जानेवारीला स्पर्धेची अंतिम
फेरी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment