Saturday, 30 November 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2024 रोजीचे रात्री 08.05 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबई केंद्राचा दिनांक 30.11.2024 रोजीचा वृत्तविशेष कार्यक्रम

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबईचे 30.11.2024 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होण्याचे संकेत

·      देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका

·      स्वामिनाथन् आयोगानुसार शेती उत्पादनाचा भाव ठरवावा- मेधा पाटकर यांची मागणी

आणि

·      सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक

****

राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होण्याचे संकेत ज्येष्ठ नेत्यांकडून मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज वार्ताहरांशी बोलतांना, अंदाजे पाच तारखेला शपथविधी सोहळा होईल, असं सांगितलं. खातेवाटपाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात, शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, आणि खातेवाटप जाहीर करतील, असं पवार यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत बोलतांना, पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचं सांगत, अशा तक्रारी करणं योग्य नसून, जे आरोप करतात, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, असं पवार यांनी नमूद केलं.

****

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विरोधकांनी पराभव स्वीकारावा, असं आवाहन केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला दिलेला कौल आम्ही मान्य केल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं, ते म्हणाले

मला असं वाटतं की हा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे. जसा आम्ही लोकसभेत झालेला पराभव मान्य केला, त्यातून आम्ही शिकलो. त्यातून आम्ही पुढे काम करून जिंकलो. आमचे एवढे खासदार पराभूत झाले, आम्ही साफ झालो लोकसभेमध्ये. आम्ही हा विचार नाही केला. आम्हाला केवळ तीन लाख, चार लाख मतं मिळाली असती तर आम्ही तेव्हाच जिंकलो असतो. तेव्हाही निवडणूक ई व्ही एम वरच झाली ना. आम्ही पराभव मान्यच केला. पुण्याच्या अधिवेशनातनं पराभव मान्य करून आम्ही पूढे गेला आणि आम्ही जिंकलो.

****

देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे, मात्र यातून काही निष्पन्न होईल, अशी आशा नसल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसला अपघात झाला. ही घटना आज सकाळी चिंचगडजवळ घडली. ही बसं रिकामी असल्यामुळं जीवित हानी टळली. या अपघातात वाहक आणि चालक किरकोळ जखमी झाले. कालच गोंदिया कोहमारा रस्त्यावर एसटी बसचा अपघात झाला, यामध्ये अकरा लोकांचा मृत्यू झाला होता.

 

दरम्यान, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून निकृष्ट बस पूर्व विदर्भात पाठवल्या जातात, त्यामुळे गोंदियातला अपघात झाल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चौकशी करुन अपघातातल्या दोषींवर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करु असं पडोळे यांनी म्हटलं आहे.

****

सर्पदंशाची प्रकरणं अधिसूचित रोगांच्या श्रेणीत समाविष्ट करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असून, त्यात ही सूचना केली आहे. सर्पदंश हा गंभीर विषय असून, २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.

****

महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून पाळण्यात येतो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथले पोलिस ठाणे, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी काल जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, सोडून दिलेल्या, अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.

****

स्वामिनाथन् आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा भाव ठरवला गेला पाहिजे, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय मेधा पाटकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी भवनात शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांबरोबर पाटकर यांनी आज संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. शेतकरी कुटुंबाच्या श्रमांची दखल या शेत मालाच्या भावामध्ये धरली जावी, श्रमाचं मूल्य-श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी, श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची गरजही पाटकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष उपोषणाच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं श्रमजीवी संघटनेच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आलं.

****

लखनऊ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत पी व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनची लढत जपानच्या शोगो ओगवा याच्याशी तर प्रियांशु राजावत याची लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो या जोडीनं चीनच्या झोऊ झी होंग आणि योंग जी यी यांचा २१-१६,२१-१५ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

****

५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.

****

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्ली इथं होणाऱ्या ९८ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र सरकारने पुण्याहून विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.

****

राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली असून, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गारवा जाणवत आहे. येत्या तीन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. परभणी जिल्ह्यात काल रात्री अकरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. विदर्भातही पारा घसरला असून, अमरावती जिल्ह्यात सकाळी बारा अंश सेल्सिअस, धारणी-चिखलदरा इथं नऊ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात आज सकाळी सात अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, मुंबईत काल किमान तापमान सोळा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं असून गेल्या आठ वर्षातला हा सर्वात थंड दिवस असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

****

नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज रात्री उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम्‌च्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ चेन्नईपासून सुमारे ११० किलोमीटर तर पुद्दुचेरीपासून सुमारे १२० किलोमीटर दूर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. वादळी वारे आणि पावसाचं पाणी साचल्याने विमानतळांवरील सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. चेन्नईहून उड्डाण करणाऱ्या आणि चेन्नईला उतरणाऱ्या सहा विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नौदल आणि तटरक्षक दल सज्ज ठेवण्यात आलं आहे. किनारीभागात सुमारे ३०० पोलिसांची फौज तैनात आहे. सर्व सहा जिल्ह्यातले मोठे फलक हटवण्यात आले आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी वादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तिरुवल्लूर, कांचिपुरम, रानीपेट आणि अन्य जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीसंदर्भातल्या सूचना देण्यात आल्या असल्याचं, स्टालिन यांनी माध्यमांना सांगितलं.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2024 रोजीचे दुपारी 03.00 वाजताचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

Audio - آکاشوانی خبریں‘ تاریخ: 30.11.2024 ‘ وقت: دوپہر 01:50

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,दिनांक 30.11.2024, सोलापूर जिल्हा वार्तापत्र

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2024 रोजीचे दुपारी 01.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 November 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

****

नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील फेंगल चक्रीवादळ काल मध्यरात्रीपासून ताशी पंधरा किलोमीटर वेगानं वायव्येकडे सरकत आहे. चक्रीवादळ आज रात्री पुद्दुचेरी इथं धडकण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमुळं किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांना अन्न, निवारा आणि मूलभूत मदत दिली जात आहे.

जलाशयातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम झाला असून जोरदार वारे आणि धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतला तसंच चेन्नई इथल्या चक्रीवादळ नियंत्रण केंद्राला त्यांनी भेट दिली. सरकारने तिरुवल्लूर, कांचीपुरम, राणीपेट आणि इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत असं यावेळी ते म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

****

सध्याचं जग भारताकडे शांतता दूत म्हणून पाहत असून, भारताचे विचार आणि मतं केवळ ऐकले जात नाही तर त्याचा अनेक कृती आराखड्यांमध्ये स्वीकार केला जातो, असं, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं आकाशवाणीच्या प्रतिष्ठीत डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत काल वैश्विक क्षितीजावर भारताची वाढती भूमिका या विषयावर ते बोलत होते. २०४७ पर्यंत देश ‘विकसित' होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि भारत ही वाटचाल भविष्यातला दृष्टीकोन बाळगून करत असल्याचं देखील हरिवंश सिंह यांनी म्हटलं आहे.

****

गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसला अपघात झाला. ही घटना आज सकाळी चिंचगडजवळ घडली. ही बसं रिकामी असल्यामुळं जीवित हानी टळली. या अपघातात वाहक आणि चालक किरकोळ जखमी झाले. कालच गोंदिया कोहमारा   रस्त्यावर एसटी बसचा अपघात झाला, यामध्ये अकरा लोकांचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून निकृष्ट बस पुर्व विदर्भात पाठवल्या जातात, त्यामुळे गोंदियातला अपघात झाल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चौकशी करुन अपघातातल्या दोषींवर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करु असं पडोळे यांनी म्हटलं आहे.

****

महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा केला जातो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथले पोलिस ठाणे, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी काल जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, सोडून दिलेले, अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.

****

५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा परवा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.

****

१९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अ गटातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना संयुक्त अरब अमिरातीतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी निवडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानने ३४ षटकांत २ बाद १७३ धावा केल्या आहेत.

दरम्यान, याच गटातील दुसऱ्या एका सामन्यात, संयुक्त अरब अमिरातीनं जपानविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना सुरु असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा संयुक्त अरब अमिरातीच्या ३६ षटकात ३ बाद २२८ धावा झाल्या आहेत.

****

ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा इथं आजपासून भारतीय क्रिकेट संघ आणि पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील दोन दिवसीय सराव सामना खेळवला जात आहे. दरम्यान पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान इलेव्हन बरोबरचा हा भारताचा चौथा आणि गेल्या २० वर्षातील पहिला सामना आहे. भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 November 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.

****

दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम् किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. काल मध्यरात्री हे वादळ नागापट्टिनमच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे २३० किलोमीटर आणि चेन्नईच्या २१० किलोमीटर आग्नेय दिशेला होतं. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचं काल चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. वादळाच्या प्रभावामुळं परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

****

राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुढच्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पुणे, आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दहा अंश सेल्सिअस इतकं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. तर नाशिक जिल्ह्यात निफाड इथं सात अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात अकरा अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल सायंकाळनंतर किमान तापमान दहा पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस तर धारणी-चिखलदरी येथे नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. कालचा दिवस मुंबईतील आठ वर्षांतील सर्वात थंड दिवस होता. किमान तापमान १६ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.

****

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल सायंकाळी राजभवनात करण्यात आलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक तथा माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या संकल्पनेनुसार, शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.

****

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसंच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पाच डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत, असं अवाहन करण्यात आलं आहे.

****

पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने त्रयस्त कोणत्याही देशात खेळवण्याच्या पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

लखनऊ इथं होत असेलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. महिलांच्या एकेरी सामन्यात पी. व्ही. सिंधूचा सामना उन्नती हुड्डाशी होईल. पुरुषांच्या एकेरी सामन्यात लक्ष्य सेनचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी तर प्रियांशु राजावतचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होईल. दरम्यान, महिलांच्या मिश्र दुहेरी सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसच अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो ही जोडी अंतिम चार मध्ये पोहोचली आहे.

**** 

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 نومبر 2024‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 30 November-2024

Time: 09:00-09:10 am

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر

علاقائی خبریں 

تاریخ:  ۰۳/نومبر  ۴۲۰۲ء؁

وقت: ۰۱:۹-۰۰:۹

***** ***** *****

::::: سرخیاں::::::

پیش ہے خاص خبروں کی سرخیاں:

٭ سیاحتی مقامات کی عالمی معیار کے مطابق ترقی کیلئے مرکزی حکومت نے تین ہزار 300 کروڑ روپؤں کی 40  اسکیمات کو دی منظوری۔

٭ پولس محکمے کے IG اور DIG کی کُل ہند کانفرنس کا بھونیشور میں آغاز۔

٭ مخالف جماعتوں کی ہنگامہ آرائی کے سبب پارلیمنٹ کی کارروائی آئندہ پیر تک کی گئی ملتوی۔

٭ گوندیا ضلع میں ایس ٹی کی شیوشاہی بس حادثے کا شکار؛ 11 مسافر ہلاک اور 29 زخمی۔

اور۔۔۔٭ کرکٹ کے آئی سی سی چمپئن شپ کپ مقابلے کیلئے پاکستان نہ جانے کے مؤقف پر بی سی سی آئی قائم۔

***** ***** *****

اب خبریں تفصیل سے:

مرکزی حکومت نے ملک کے مشہور سیاحتی مقامات کی عالمی معیار کے مطابق ترقی کی خاطر کم و بیش تین ہزار 300 کروڑ روپؤں کی 40  اسکیمات کو منظوری دی ہے۔ خبر میں کہا گیا ہے کہ 23 ریاستوں میں ان اسکیمات کیلئے دی جانے والی خصوصی امداد پر آئندہ 50  برسوں تک کوئی سود نہیں لیا جائیگا۔ ان میں سندھو دُرگ ضلع میں واقع واٹر میوزیم مصنوعی مرجان بنانے کے پروجیکٹ کیلئے 46کروڑ روپئے منظور کیے گئے ہیں۔ وہیں ناسک کے رام کال راستے کیلئے 99 کروڑ روپؤں کی منظوری دی گئی ہے۔ سوشل میڈیا پر ایک پیغام میں وزیرِاعظم نریندر مودی نے کہا کہ سیاحت میں بہت سے لوگوں کی زندگی میں خوشیاں لانے کی صلاحیت ہے اور حکومت ملک میں سیاحت کے بنیادی ڈھانچے کو مزید مضبوط کرنے پر توجہ مرکوز رکھے گی۔

***** ***** *****

بھونیشور میں کل ڈائریکٹر جنرل آف پولس اور انسپکٹر جنرل آف پولس کی کُل ہند کانفرنس کا آغاز ہوا۔ مرکزی وزیرِ داخلہ امیت شاہ نے اس کانفرنس کا افتتاح کیا۔ وزیرِ اعظم نریندر مودی بھی آج اور کل اس کانفرنس میں شرکت کریں گے۔ اس کانفرنس میں تمام ریاستوں اور مرکز کے زیرِ انتظام علاقوں کے DIG's کے ساتھ ساتھ مرکزی ریزرو پولس فورس‘ RAW‘ نیشنل سیکوریٹی فورس‘ NSG‘ خفیہ محکمے کی شاخیں اور SPG کے سربراہان موجود رہیں گے۔ کانفرنس میں داخلی سلامتی‘ سائبر کرائم‘ نکسلیت‘ AI ٹولز سے درپیش چیلنجز اور دہشت گردی سے مقابلے جیسے اہم مسائل پر تبادلہئ خیال کیا جائیگا۔ 

***** ***** *****

پارلیمنٹ کے سرمائی اجلاس کے دوران مخالف جماعتوں کی ہنگامہ آرائی کے سبب کل دونوں ایوانوں کا کام کاج متاثر ہوا۔ لوک سبھا میں کارروائی شروع ہوتے ہی کانگریس‘ DMK‘ سماج وادی پارٹی اور حزبِ اختلاف کے دیگر ارکان نے ایک خانگی صنعتی گروپ کی مبینہ رشوت ستانی کے معاملے پر نعرے بازی کی۔ اسی دوران اسپیکر اوم برلا نے سوال و جواب کے وقفے کا اعلان کیا‘ تاہم شور و غل بڑھتا گیا، جس کے سبب کام کاج گھنٹے بھر کیلئے ملتوی کیا گیا۔ جب دوبارہ ایوان کی کارروائی شروع ہوئی تو اسپیکر نے کہا کہ حکومت اس معاملے پر بحث کیلئے تیار ہے۔ تاہم ہنگامہ آرائی جاری رہنے پر کارروائی دن بھر کیلئے ملتوی کردی گئی۔

راجیہ سبھا میں بھی چیئرمن جگدیپ دھنکڑ نے مخالف جماعتوں کی جانب سے اس معاملے پر بحث کے مطالبے کو مسترد کردیا اور ایوان کی کارروائی جاری رکھنے کی کوشش کی۔ انھوں نے ایوان میں مسلسل خلل اندازی پر تشویش کا اظہار کیا اور کہا کہ اراکین غلط قدم اٹھارہے ہیں۔ ہنگامہ آرائی کے نہ رُکنے پر راجیہ سبھا کی کارروائی بھی دن بھر کیلئے ملتوی کردی گئی۔

***** ***** *****

بھارتیہ جنتا پارٹی کے اراکینِ اسمبلی گوپی چند پڈڑکر اور سدابھاؤ کھوت نے کل ممبئی میں ای وی ایم مشین کی حمایت میں مظاہرے کی قیادت کی۔ اس موقع پر سدا بھاؤ کھوت نے کہا کہ مخالف جماعتیں اسمبلی انتخابات میں ہار کا الزام ای وی ایم پر لگا رہی ہیں‘ کانگریس پارٹی نے بھی ای وی ایم اور رائے دہی کے مجموعی عمل کو لیکر شک کا اظہار کیا ہے۔

بی جے پی قائد سدھیر منگنٹیوار نے کانگریس کے ان الزامات کو مضحکہ خیز قرار دیتے ہوئے تنقید کی ہے۔ وہ کل ممبئی میں میڈیا سے گفتگو کررہے تھے۔ انھوں نے کہا کہ مہاراشٹر سمیت ملک بھر میں انتخابات جیتنے والے کانگریس کے نمائندوں کو ای وی ایم کے خلاف احتجاج کرنے سے پہلے استعفیٰ دے دینا چاہیے۔ تبھی کانگریس قائدین کو ای وی ایم کے بارے میں سنجیدہ سمجھا جائے گا۔ منگنٹیوار نے بتایا کہ ای وی ایم سے انتخابات کا فیصلہ کانگریس حکومت کے دور میں کیا گیا تھا اور ای وی ایم مشینوں کی خریداری بھی کانگریس حکومت کے دور میں ہوئی تھی۔ انھوں نے مزید بتایا کہ ریاست میں نئی حکومت کی حلف برداری کی تقریب جلد از جلد منعقد ہوگی۔ 

***** ***** *****

گوندیا ضلع میں کل ایس ٹی کی شیوشاہی بس حادثے کا شکار ہوگئی، جس میں 11 مسافر ہلاک اور 29 زخمی ہوگئے۔ بھنڈارا- گوندیا راستے پر بندراون ٹولہ گاؤں کے قریب ڈرائیور نے بس کا کنٹرول کھودیا اور بس سڑک ے کنارے اُلٹ گئی۔ اسی بیچ ریاست کے نگراں وزیرِ اعلیٰ ایکناتھ شندے نے حادثے میں مرنے والوں کے وارثوں کو فی کس 10 لاکھ روپئے امداد ینے کا اعلان کیا ہے۔ گوندیا کے کلکٹر کو ہدایت دی گئی ہے کہ زخمیوں کا سرکاری خرچ پر فوری علاج کیاجائے۔ وزیرِ اعظم نریندر مودی نے بھی اس حادثے پر دُکھ کا اظہار کیا ہے۔ انھوں نے مرنے والوں کے اہلِ خانہ کو دو لاکھ روپئے اور زخمیوں کو فی کس 50 ہزار روپئے دینے کا اعلان کیا ہے۔ 

***** ***** *****

یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔

***** ***** *****

گذشتہ روز گدیما فاؤنڈیشن کی جانب سے مختلف انعامات کا اعلان کیا گیا۔ ٹرسٹی آنند ما ڈگلکر نے کل پونے میں ایک صحافتی کانفرنس میں یہ اطلاع دی۔ اس برس کا گدیما ایوارڈ سینئر اداکارہ آشا کالے کو دیا جائے گا‘ جبکہ اداکارہ پریا لکشمی کانت بیرڈے کو گدیما کی اہلیہ ودیا تائی ماڈگلکر کی یاد میں گرہنی سکھی سچیو ایوارڈ سے نوازا جائے گا۔ اسی طرح مشہور کہانی نویس‘ اسکرین پلے ڈائیلاگ رائٹر اور نغمہ نگار شتیج پٹوردھن کو چتربن ایوارڈ دیا جائے گا۔ اسی طرح مشہور گلوکارہ منیشا نشچل کو ودیا پرگیہ ایوارڈ دیا جائے گا۔ 

***** ***** *****

بھارتی کرکٹ کنٹرول بورڈ BCCI‘ آئندہ برس کھیلے جانے والے آئی سی سی چمپئن شپ کپ کیلئے پاکستان نہ جانے کے اپنے مؤقف پر قائم ہے۔ بورڈ کے نائب صدر راجیو شکلا نے کل اس سلسلے میں ہونے والی انٹرنیشنل کرکٹ کاؤنسل کی میٹنگ میں کہا کہ کھلاڑیوں کی حفاظت سب سے اہم ہے۔ بی سی سی آئی اس ٹورنامنٹ کیلئے کسی تیسرے ملک میں میچ کھیلنے کے ہائبریڈ طریقے پر اَٹل ہے‘ جبکہ پاکستان کرکٹ بورڈ نے اس کی مخالفت کی ہے۔

***** ***** *****

53 ویں بین الاضلاع اور 86 ویں اسٹیٹ چمپئن شپ ٹیبل ٹینس مقابلے آئندہ دو تا چھ دسمبر کے دوران پونے میں ہونگے۔ ان مقابلوں میں 25 اضلاع کے ایک ہزار سے زائد کھلاڑی شرکت کریں گے۔ 

***** ***** *****

ڈائریکٹوریٹ آف اسپورٹس اینڈ یوتھ سروسیز کی جانب سے کل دھولیہ میں ریاستی سطح کے اسکول کراٹے اسپورٹس ٹورنامنٹ کا افتتاح کیا گیا۔ اس مقابلے میں حصہ لینے کیلئے 14,17  اور 19 برس عمر کے لڑکے اور لڑکیوں کی ٹیمیں دھولیہ میں داخل ہوئی ہیں۔ ضلع کھیل افسر اویناش ٹِلے نے کھلاڑیوں کو حلف دلایا، جس کے بعد مقابلوں کا آغاز ہوگیا۔ 

***** ***** *****

ریاست کے مختلف شہروں سے لاپتہ بچوں اور خواتین کی تلاش کی خاطر پولس محکمے کی جانب سے یکم تا 30 دسمبر کے دوران ایک خصوصی مہم ”آپریشن مسکان-13“ چلائی جائے گی۔ پونے کے پولس کمشنر امیتیش کمار نے کل یہ اطلاع دی۔ انھوں نے تیقن دیا کہ لاپتہ افراد کی تلاش کو 24 گھنٹے اور 365 دن ترجیح دی جائیگی۔ 

***** ***** *****

ناندیڑ ضلع کے دیگلور تعلقے کے مرکھیل ابتدائی طبّی مرکم کے تحت پیڈ پلّی گاؤں میں 23 نومبر کو چکن گنیا کے مریض پائے گئے تھے۔ اس مناسبت سے ضلع طبّی افسر ڈاکٹر سنگیتا دیشمکھ نے اس گاؤں کا دورہ کیا۔ اس موقع پر انھوں نے طبّی خدمات فراہم کرنے والے ملازمین کو ہدایات دیں۔ 

***** ***** *****

ریاستی حکومت کے دیگر پسماندہ بہوجن بہبود محکمے کی جانب سے دھنگر سماج کے طلبہ کیلئے پہلی تا پانچویں جماعتوں میں انگریزی میڈیم کے نامور رہائشی اسکولوں میں داخلہ دینے کی اسکیم کا آغاز کیا گیا ہے۔ اس کے تحت لاتور ضلعے کے اوسا تعلقے کے بدھوڑا میں واقع دی گلوبل اسکول میں 100 طلبہ اور لاتور میں واقع سوامی ویویکانندانٹیگریشن انگلش اسکولی میں 100 طلبہ کو داخلے کیلئے چنا گیا ہے۔ ان اسکولوں میں داخلوں کیلئے 5 دسمبر 2024 تک محکمے کے ڈپٹی ڈائریکٹر آفس میں درخواست دینے کی اپیل کی گئی ہے۔

***** ***** *****

چھترپتی سمبھاجی نگر ڈویژنل سطح پر لوک شاہی دِن آئندہ 9  دسمبر کو منعقد کیاجائے گا۔ ڈویژنل کمشنر دفتر کی جانب سے ایک مکتوب کے ذریعے یہ اطلاع دی گئی۔

***** ***** *****

ریاست میں کڑاکے کی سردی کا آغاز ہوگیا ہے۔ محکمہئ موسمیات کی جانب سے امکان ظاہر کیا گیا ہے کہ آئندہ تین دِنوں میں کچھ اضلاع میں سردی کی لہر آئے گی۔ اسی بیچ پربھنی ضلع میں سب سے کم درجہئ حرارت آٹھ ڈگری سیلسئیس درج کیا گیا۔ 

***** ***** *****

::::: سرخیاں::::::

آخرمیں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر:

٭ سیاحتی مقامات کی عالمی معیار کے مطابق ترقی کیلئے مرکزی حکومت نے تین ہزار 300 کروڑ روپؤں کی 40  اسکیمات کو دی منظوری۔

٭ پولس محکمے کے IG اور DIG کی کُل ہند کانفرنس کا بھونیشور میں آغاز۔

٭ مخالف جماعتوں کی ہنگامہ آرائی کے سبب پارلیمنٹ کی کارروائی آئندہ پیر تک کی گئی ملتوی۔

٭ گوندیا ضلع میں ایس ٹی کی شیوشاہی بس حادثے کا شکار؛ 11 مسافر ہلاک اور 29 زخمی۔

اور۔۔۔٭ کرکٹ کے آئی سی سی چمپئن شپ کپ مقابلے کیلئے پاکستان نہ جانے کے مؤقف پر بی سی سی آئی قائم۔

***** ***** *****

Audio - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 نومبر 2024‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

Audio - آکاشوانی خبریں‘ تاریخ: 30,11,2024 ‘ وقت: صبح 08:30

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2024 रोजीचे सकाळी 08.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 November 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी

पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला भुवनेश्वर इथं प्रारंभ

विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसला भीषण अपघात-११ प्रवासी ठार तर २९ प्रवासी जखमी

यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर

आणि

आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर बीसीसीआय ठाम 

****

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय तसंच कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असून, सरकार देशात पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ओडिशात भुवनेश्वर इथं कालपासून प्रारंभ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उदघाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आणि उद्या या परिषदेत सहभागी होत आहेत. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही या परिषदेत प्रदान करण्यात येणार आहेत.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच एका खासगी उद्योग समूहाच्या कथित लाचप्रकरणाच्या मुद्यावर काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, समाजवादी पक्षासह विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढतच गेल्यानं सदनाचं कामकाज आधी तासाभरासाठी, तर नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.

राज्यसभेतही विरोधी पक्षांची चर्चेची मागणी फेटाळून लावत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात काल मुंबईत ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर विरोधक ईव्हीएमवर फोडत असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली. काँग्रेस पक्षानंही ईव्हीएम आणि एकूणच मतदान प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे हे आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते काल मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते. ईव्हीएमविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशभरातील विविध निवडणुकांत विजयी झालेल्या काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा. त्यानंतरच, काँग्रेस नेते ईव्हीएमबाबत गंभीर असल्याचं मानलं जाईल, असं मुनगंटीवार म्हणाले. देशात ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला, ईव्हीएमची खरेदीही काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं. 

दरम्यान, राज्यात नव्या सरकारचा शपथविधी लवकरात लवकरच होईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

****

गोंदिया जिल्ह्यात काल शिवशाही बसला भीषण अपघात होऊन ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले. भंडारा -गोंदिया मार्गावरच्या बिंद्रावन टोला गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. दरम्यान, या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीने उपचार देण्यात यावेत, अशी सूचना गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत, त्यांनी जाहीर केली आहे.

****

गदिमा प्रतिष्ठानचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले. कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी काल पुणे इथं पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे, येत्या १४ डिसेंबरला पुण्यात टिळक स्मारक मंदिर सभागृहात समारंभपूर्वक या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने तिसऱ्या कोणत्याही देशात खेळवण्याच्या हायब्रीड पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा परवा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.

****

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचं काल धुळे इथं उदघाटन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुलं आणि मुलींचे संघ धुळ्यात दाखल झाले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी खेळाडूंना शपथ देत स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

****

राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसंच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान - १३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल ही माहिती दिली. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी २४ तास आणि ३६५ दिवस प्राधान्य देण्यात येत असल्याचं, अमितेश कुमार यांनी सांगितलं. 

****

केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत.  www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करावा, तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात २३ नोव्हेंबर रोजी चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी या गावाला भेट दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींची माहिती दिली तसच आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

****

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झालेली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी ५ डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे येत्या ९ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी येत्या १६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी विकसित करण्यात आलेल्या एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या नवीन पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केलं आहे.

****

राज्यात थंडीची कडाका वाढत असून पुढचे तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात काल सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे. 

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Audio - کاشوانی خبریں‘ تاریخ: 29,11,2024 وقت: رات 09:15

Friday, 29 November 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.11.2024 रोजीचे रात्री 08.05 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबई केंद्राचा दिनांक 29.11.2024 रोजीचा सायंकाळी 07.15 वाजेचा वृत्तविशेष कार्यक्रम

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबईचे 29.11.2024 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित

·      गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसला भीषण अपघात-११ प्रवासी ठार तर ३३ प्रवासी जखमी

आणि

·      गदिमा प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा;आशा काळे यांना गदिमा पुरस्कार, तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर

****

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय तसंच कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असून, सरकार देशात पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच एका खासगी उद्योग समूहाच्या कथित लाचप्रकरणाच्या मुद्यावर काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, समाजवादी पक्षासह विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र गदारोळ वाढतच गेल्याने सदनाचं कामकाज एका तासासाठी स्थगित करावं लागलं, कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर, तालिका अध्यक्षांनी, सरकार चर्चेसाठी तयार असून, नियोजित कामकाज झाल्यावर चर्चा होईल, असं सांगितलं. मात्र गदारोळ वाढतच गेल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

राज्यसभेतही विरोधी पक्षांची चर्चेची मागणी फेटाळून लावत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. धनखड यांनी सदनातल्या या सततच्या व्यत्ययाबद्दल चिंता व्यक्त करत, सदस्य चुकीचा पायंडा पाडत असल्याचं नमूद केलं. त्यानंतरही गदारोळ वाढत गेल्यानं, राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, माओवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

****

पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थांना त्यांचा पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा अधिक करता यावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसी पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. या संदर्भातल्या प्रकियेसाठी नुकतीच यूजीसीने मान्यता दिली. यासाठी पदवी अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थांना त्यांच्या प्रत्येक सेमिस्टर मध्ये अधिक गुण घेऊन कमी कालावधीत तीन किंवा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, असं आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेत्रृत्वात आज मुंबईत ईव्हीएम- मतदानयंत्राच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर विरोधक ईव्हीएमवर फोडत असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली. काँग्रेस पक्षानंही ईव्हीएम आणि एकूणच मतदान प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे हे आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते. ईव्हीएमविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशभरातील विविध निवडणुकांत विजयी झालेल्या काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा. त्यानंतरच, काँग्रेस नेते ईव्हीएमबाबत गंभीर असल्याचं मानलं जाईल, असं मुनगंटीवार म्हणाले. देशात ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला, ईव्हीएमची खरेदीही काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, राज्यात नव्या सरकारचा शपथविधी लवकरात लवकर होईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

****

गोंदिया जिल्ह्यात आज शिवशाही बसला भीषण अपघात होऊन ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३३ प्रवासी जखमी झाले. भंडारा -गोंदिया मार्गावरच्या बिंद्रावन टोला गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. दरम्यान, या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीने उपचार देण्यात यावेत, अशी सूचना गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत, त्यांनी जाहीर केली आहे.

****

गदिमा प्रतिष्ठानचे विविध पुरस्कार आज जाहीर झाले. कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी आज पुणे इथं पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे, येत्या १४ डिसेंबरला पुण्यात टिळक स्मारक मंदिर सभागृहात समारंभपूर्वक या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा कॉम्बॅट एव्हिटर्स कोर्स ४२, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रॅक्टर कोर्स ४१ आणि बेसिक रिमोटली पायलोटेड एअरक्राफ्ट सिस्टीम इंटरनल पायलट कोर्स ४चा दीक्षान्त आज उत्साहात पार पडला. या समारंभात नेपाळसह नायजेरिया आणि भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसह चार महिला अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली.

****

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचं आज धुळे इथं उद्‍घाटन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुलं आणि मुलींचे संघ धुळ्यात दाखल झाले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी खेळाडूंना शपथ देत स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

****

राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसंच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशम मुस्कान - १३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. हरवलेली अल्पवयीन मुलं आणि महिलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेला एक प्रभावी उपक्रम आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी २४ तास आणि ३६५ दिवस प्राधान्य देण्यात येत असल्याचं, अमितेश कुमार यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात २३ नोव्हेंबर रोजी चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी या गावाला भेट दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींची माहिती दिली तसच आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

****

परभणी इथल्या आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट वैद्यकीय महाविद्यालयात आज एका ६५ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करत पोटातून दहा किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांनी यश मिळवलं आहे. पोटात सतत दुखत असल्याने महिलेने सोनाग्राफी तपासणी केली असता तीच्या पोटात गोळा जमा झाल्याचं दिसून आलं होतं. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तासापेक्षा अधिक चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून दहा किलोचा गोळा आणि गर्भपिशवी काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतले वर्ग तीन आणि चार संवर्गातील १९ कर्मचारी नियत वयोमानाने आज सेवनिवृत्त झाले, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या हस्ते सेवा प्रमाणपत्र तसंच सामान्य भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देत, या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला.

****

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील ईदगाव पाडा इथल्या ग्रामस्थांनी पिंपळनेर नगर परिषदेमधून वगळून गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, अशी मागणी करत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. २५ फेबृवारी २०२२ च्या आदेशानुसार पिंपळनेर ग्रामपंचायतीचं नगरपरिषदेत रूपांतर केलं गेलं, त्यामुळे पिंपळनेर गावातल्या आदिवासी ग्रामस्थांना पेसा कायद्यानुसार सोयीसलवती मिळत नाहीत, म्हणून गावकऱ्यांनी ही मागणी केली.

****

केंद्र शासनाच्या आदेशानुसार पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. यानुसार सोलापूर जिल्ह्यात २५ नोव्हेंबर पासून पशुगणना मोहिम सुरु झाली आहे. ही पशुगणना २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन पशुधनाची माहिती घेणार आहेत.

****

राज्यात थंडीची कडाका वाढत असून बऱ्याच ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे. अमरावती शहरात देखील पारा १२ अंश सेल्सिअस पर्यंत तर धारणी-चिखलदऱ्यात पहाटे पारा ९ अं.से. पर्यंत घसरलाय. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

****