Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा
निर्णय
· गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
· नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू
आणि
· परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
****
पंतप्रधान विमा योजना सुरू राहणार असून या
योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
बैठकीत, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर सरकारनं शिक्कामोर्तब केलं.
या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले
–
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट
उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह
से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके
कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत
शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहिती वैष्णव यांनी
दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं
नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि
नुकसानाची भीती कमी होईल,
असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं
स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशीलेचं
अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यात सर्वार्थाने
मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या
पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा
हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये
काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे
मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला
मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ
इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची
शाळा, रुग्णालय,
कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं
उद्घाटन यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या
बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५
वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते
म्हणाले –
मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा
हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम
करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या
ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी
ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट
आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या
१० सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या
सी सिक्स्टी सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसंच मुख्यमंत्री
ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक
आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास आणि
पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात या योजनांच्या तसेच कंत्राटी
कामगार वेतन थकबाकीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. प्रधानमंत्री ग्राम
सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन
कामात सुलभता निर्माण होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी
बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृत्रिम बुद्धीमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक
व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे
निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. माहिती
आणि तंत्रज्ञान विभागाचा शेलार यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी
ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय
उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र
सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे
१० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन
तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या
गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सेवेकरी आणि धारकरी
शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहीमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून
आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. आजपर्यंत गडावर ४६ संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान
हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत.
****
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी
जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे
- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या
असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात
एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोन वाजता
हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये सहाजण होते. यातल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला
तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते.
अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील
मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविक जागेवरच ठार झाले
तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महीला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जातांना हा अपघात
झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी
सांगितलं.
****
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि
अन्य वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, विदर्भातील
प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसेच पाच राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी
दिले जातील. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाश’ या
ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ
आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ या
ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात रत्नागिरी राज्यात प्रथम ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या
भोवतीचं वातावरण तणावरहीत करण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘एक्झाम वॉरियर्स’ चळवळ
सुरु केली आहे. त्याचाच भाग असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमात
२८ डिसेंबर रोजी रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. मात्र दोन दिवसाच्या सुट्टीच्या
कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसंच
सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेवून या कामास गती दिली. दोन दिवसात झालेल्या कामगिरीमुळे
रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात
जिल्ह्यातील ७८ हजारावर विद्यार्थी, सव्वा आठ हजारावर शिक्षक आणि
सुमारे साडे चार हजार पालकांचा सहभाग राहिला आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००
व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं
आयोजन करण्यात आलं आहे. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक
न्याय मंत्री संजय शिरसाठ,
कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन
होईल. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारे तज्ञांचे व्याख्यान, तसंच
नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी
प्रदेशचे एकोणसाठावे प्रदेश अधिवेशन उद्यापासून लातूर इथं होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल
हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन आहे. तीन दिवस चालणाऱ्या
या अधिवेशनात शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. अधिवेशनात
सर्व नागरिकांनी उत्साहपूर्वक येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत करावे आणि अधिवेशनात
सहभाग घ्यावा,
असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
****
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात
वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस.एम.रचावाड
यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा
करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन
संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
बीड मार्फत ‘१०० दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना
त्रुटी पुर्ततेसाठी आणि तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती
स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment