Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 July 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० जूलै २०२५ सायंकाळी ६.१०
****
· महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानसभेत सादर-देशाच्या
व्यवस्थेवर घाला घालणाऱ्यांविरोधात कडक
कायदे करण्याची गरज
मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
· शेतकरी
कर्जमाफीचा अनुषंगिक अभ्यास
करण्यासाठी राज्यशासनाकडून समिती
गठीत
· गणेशोत्सवाला
राज्य महोत्सव म्हणून
जाहीर करण्यात येणार
· पंढरपूरच्या
आषाढी वारीचा समारोप-सर्व
पालख्या परतीच्या वाटेवर
मार्गस्थ
आणि
· मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङ्गमय पुरस्कार
जाहीर
****
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानसभेत आज
मांडण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक
सादर केलं. देशाच्या व्यवस्थेवर
घाला घालणाऱ्याविरोधात कडक
कायदे करण्याची गरज
व्यक्त करत, असा
कायदा करण्यामागची भूमिका
मुख्यमंत्र्यांनी सदनात स्पष्ट
केली, ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
या कायद्यानुसार सरसकट
कोणालाही अटक करता येणार
नाही, फक्त प्रतिबंध असलेल्या
संघटनांच्या सक्रीय कार्यकर्त्यांनाच न्यायव्यवस्थेनुसार स्थापन
प्राधिकरणाच्या परवानगीनुसार अटक
येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले
–
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
डिजिटल अरेस्ट सारखे
प्रकार रोखण्यासाठी जनजागृतीसाठी
अधिकाधिक प्रयत्न करणार
असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितलं आहे.
यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणेसाठी
केंद्रीय गृहमंत्र्यांनी विनंती
केली असल्याची माहिती
मुख्यमंत्र्यांनी दिली. यासंदर्भातल्या लक्षवेधीच्या उत्तरात मुख्यमंत्री
बोलत होते.
****
शेतकरी कर्जमाफीचा अनुषंगिक
अभ्यास करण्यासाठी राज्य
शासनाकडून समिती गठीत करण्यात
आली आहे. सहकार
मंत्री बाबासाहेब पाटील
यांनी विधानसभेत ही
माहिती दिली. गेल्या
आठवड्यात तीन जुलैला झालेल्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. यासंदर्भात सभागृहाला
सविस्तर माहिती मुख्यमंत्री
देणार असल्याचं पाटील
यांनी सांगितलं.
****
शेतमजूरांसाठी सामाजिक सुरक्षेची
योजना तयार करण्यात येत
असून, या योजनेचा मसुदा
लवकरच तो मंत्रिमंडळ बैठकीसमोर
ठेवला जाणार असल्याचं, कृषी
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी
सांगितलं आहे. ते
आज विधानसभेत २९३
अन्वये दाखल प्रस्तावावरच्या चर्चेला
उत्तर देत होते. राज्यातल्या
एक कोटी ७५ लाख
शेतमजुरांना या योजनेचा लाभ
मिळेल. शेतकऱ्याला समृद्ध
करण्यासाठी शासन कार्यरत असल्याचं
जयस्वाल यांनी सांगितल, ते
म्हणाले –
बाईट - आशिष जयस्वाल, कृषी राज्यमंत्री
शेतीसाठी एआय अर्थात कृत्रीम
बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर
केला जात असल्याची माहिती
जयस्वाल यांनी दिली. या
प्रस्तावावरच्या चर्चेत सदस्य
नमिता मुंदडा, अभिमन्यू
पवार, कैलास पाटील, यांच्यासह
अनेक सदस्यांनी सहभाग
घेत आपली मतं मांडली.
****
गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून
जाहीर केलं जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष
शेलार यांनी आज विधानसभेत
ही माहिती दिली.
ते म्हणाले –
बाईट - आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक
गणेशोत्सव साजरा करावा, आपल्या
देखाव्यांमध्ये भारतीय सैन्य,
महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेलं
यश अधोरेखित करावं,
त्यांना काहीही कमी
पडू दिलं जाणार नाही,
असंही शेलार यांनी यावेळी
नमूद केलं.
****
राज्यात जुनी पीक विमा योजना
राबवण्यात येणार
असल्याची माहिती कृषि मंत्री
माणिकराव कोकाटे यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी सूचना
राजेश विटेकर यांनी उपस्थित केली होती.
एक रुपयात विमा या योजनेत विमा कंपन्यांना सुमारे साडे सात
हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे, त्या मानानं शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळाला नसल्याने हा निर्णय घेतल्याचं
कोकाटे यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात सन २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक
आपत्तीपोटी शेतकऱ्यांच्या अनुदानात घोटाळ्याच्या आरोपांसंदर्भात विभागीय चौकशी विहित कालावधीत पूर्ण करणार असल्याचं,
कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेत सांगितलं.
चौकशीअंती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची
ग्वाही त्यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्याची थकीत असणारी १८
कोटीं रुपयांची पीकविमा आर्थिक
मदत येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य
राजेश विटेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात
ते बोलत होते.
****
शेतकऱ्यांच्या शेतजमीन, बांध
आणि रस्त्यांवरील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन
मोजणी मोहीम राबवणार असल्याची माहिती, महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीचा आज
समारोप झाला. पंढरपूरनजिक
गोपाळपुरात आज पहाटे झालेल्या
गोपाळकाल्यासाठी मध्यरात्रीपासून वारकरी
दाखल झाले होते. गोपाळकाल्यानंतर सर्व पालख्या पुन्हा
पंढरपुरात आल्या आणि विठ्ठल
रुक्मिणीचं दर्शन घेऊन परतीच्या
वाटेवर मार्गस्थ झाल्या.
मंदिर समितीच्या वतीने
मानाच्या पालख्यांमधील पादुकांचं
पूजन करून, मानकऱ्यांचा
उपरणे, श्रीफळ आणि
हार देवून सत्कार करण्यात
आला. दरम्यान श्री
विठ्ठलाची प्रक्षाळपूजा येत्या
बुधवारी १६ जुलैला होणार
असल्याचं, मंदिर समितीकडून सांगण्यात
आलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध पुरस्कारांची अध्यक्ष
कौतिकराव ठाले पाटील यांनी
आज घोषणा केली. यंदाचा
नरहर कुरुंदकर वाङ्गमय पुरस्कार छत्रपती संभाजीनगरच्या वंदना पारगावकर यांच्या अनोखे
थायलंड
या प्रवासवर्णनपर पुस्तकाला जाहीर
झाला आहे. प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्गमय पुरस्कार मिरजच्या कुसनाळे
यांच्या गांधी- वाद आणि वास्तव’ या वैचारिक ग्रंथाला, बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कार यंदा राधानगरी
इथल्या पांडुरंग मुरारी पाटील यांच्या
नांगरमुठी या कादंबरीला, तर
रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती
संभाजीनगरच्या
कैलाश प्रकाशन संस्थेचे अनिल
अतकरे
यांना जाहीर झाला आहे.
****
गुरुपौर्णिमेचा सण आज सर्वत्र
साजरा होत आहे. शिर्डी
इथं आज सकाळी श्री
साई
सच्चरित ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण
समाप्ती मिरवणुकीत
शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात योगाचरण करून सुदृढ आणि
सशक्त झालं पाहिजे, असं प्रतिपादन पतंजली सेवा समितीच्या
रमा जोग यांनी केलं आहे. रत्नागिरी
इथं
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रात आज
झालेल्या गुरुवंदन कार्यक्रमात त्या बोलत
होत्या.
गुरुपौर्णिमेनिमित्त आज छत्रपती
संभाजीनगर इथं सरस्वती भुवन
विद्याल महाविद्यालयात गुरुवंदन
२०२५ हे बहुविद्याशाखीय तसंच
बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र
घेण्यात आलं. डॉ
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ
विजय फुलारी यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्राचं, पुण्याच्या सावित्रीबाई फुले
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ
सुरेश गोसावी यांच्या
हस्ते उद्घाटन झालं.
दिल्लीच्या शिक्षा संस्कृती
उत्थान न्यासाच्या समन्वयक
शोभा पैठणकर तसंच
स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ मनोहर चासकर यावेळी
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित
होते. यशवंतराव चव्हाण
मुक्त विद्यापीठाचे प्रकुलगुरू
डॉ जोगेंद्रसिंह बिसेन
यांचं या चर्चासत्रात बीजभाषण
झालं.
****
यवतमाळ जिल्ह्यात आज बच्चू कडू
यांनी सातबारा कोरा पदयात्रा काढली. महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे बाळा
नांदगावकर यांनी या यात्रेत
आज सहभाग घेत, कडू
यांच्या या आंदोलनाला पाठिंबा
दिला.
****
नांदेड इथले साहित्यिक आणि रंगकर्मी सुधाकर गंगाधर गाजरे यांचं आज छत्रपती
संभाजीनगर इथं
निधन झालं, ते
८४ वर्षांचे होते.
त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात
उपचार सुरु होते.
****
लातूर इथल्या सहकारी संस्थाच्या विभागीय सहनिबंधकांनी पारीत
केलेल्या आदेशानुसार बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
यांनी जिल्हा बँकेच्या प्राधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्ष म्हणुन आज पदभार स्विकारला. बँकेचे अध्यक्ष आणि सदस्यांचा बँकेच्या
वतीने यावेळी
सत्कार करण्यात आला.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंड दरम्यान
सुरु असलेल्या तिसऱ्या
कसोटी सामन्यात आजच्या
पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंड
संघाने पहिल्या डावात
२ गड्यांच्या बदल्यात ८३
धावा केल्या आहेत.
भारताच्या नितिशकुमार रेड्डीने
इंग्लंड संघाचे दोन्ही
सलामीवीर बाद केले.
****
हवामान
मध्य महाराष्ट्राचा घाट भाग तसंच मराठवाड्यात पुढच्या २४ तासांत अनेक
ठिकाणी विजांच्या कडकडाटासह
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान
खात्यानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment