Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21
July 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात
आज पहिल्याच दिवशी
लोकसभेचं कामकाज विरोधकांच्या
गदारोळात सुरु झालं. अध्यक्ष
ओम बिर्ला यांनी
प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी
ऑपरेशन सिंदूरबद्दल सरकारने
निवेदन देण्याची मागणी
केली. यावर सुरु असलेल्या
गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास
सुरु होता. विरोधकांनी
रितसर मागणी करावी, सरकार
ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती
देईल, असं अध्यक्षांनी सांगितल्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं
सदनाचं कामकाज १२
वाजेपर्यंत स्थगित झालं
होतं.
कामकाज पुन्हा सुरु
झाल्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी
सुरुच होती. सरकार
चर्चेसाठी तयार आहे, मात्र
नियोजित कामकाजही झालं
पाहिजे, असं संसदीय कार्यमंत्री
किरेन रिजिजू यांनी
सांगितलं. त्यानंतरही गदारोळ
सुरच राहील्यानं लोकसभेचं
कामकाज दुपारी दोन
वाजेपर्यंत स्थगित झालं.
तत्पूर्वी लोकसभेत पहलगाम
दहशतवादी हल्ल्यात, तसंच
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यूमुखी
पडलेल्या नागरीकांना आदरांजली
वाहण्यात आली. अंतराळवीर
शुभांशु शुक्ला यांच्या
यशस्वी अंतराळ मोहिमेबद्दल
सदनाने त्यांचं अभिनंदन
केलं.
****
राज्यसभेत आज नवीन सदस्यांना
शपथ देण्यात आली.
समाजसेवक सी. सदानंदन मास्टर, माजी
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी जैन यांचा यात
समावेश आहे.
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी नियम २६७
अंतर्गत पहलगाम दहशतवादी
हल्ल्याचा मुद्दा उपस्थित
केला. हे दहशतवादी अद्याप
पकडले गेले नाहीत, हे
देशाच्या सुरक्षा यंत्रणेचं
अपयश असल्याचं ते
म्हणाले. दहशतवादाविरोधात आणि
ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह
सर्व विरोधी पक्षांनी
सरकारला पाठिंबा दिला,
त्यामुळे याबद्दल सरकारने
सविस्तर माहिती द्यावी,
असं खरगे म्हणाले.
सरकार पहलगाम दहशतवादी
हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल
चर्चा करण्यास आणि
देशाला माहिती देण्यास
तयार आहे, असं
सभागृह नेते जे पी
नड्डा यांनी सांगितलं. मात्र
तरीही विरोधकांचं समाधान
न झाल्यानं त्यांनी गदारोळ
करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे राज्यसभेचं कामकाजही
१२ वाजेपर्यंत स्थगित
झालं होतं.
****
संसदेचं हे पावसाळी अधिवेशन
राष्ट्रगौरव आणि विजयोत्सवाचं सत्र
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे.
संसद भवन परिसरात आज
वार्ताहरांशी बोलताना ते
म्हणाले -
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पहलगाम दहशतवादी हल्ला,
ऑपरेशन सिंदूर, देशाची
अर्थव्यवस्था, नक्षलवादाचं समूळ
उच्चाटन आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी
यावेळी भाष्य केलं.
****
२००६ मध्ये मुंबईत लोकल
ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची
मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. यापूर्वी विशेष न्यायालयानं पाच जणांना फाशी, सात
जणांना जन्मठेप सुनावली होती. मात्र, पुराव्याअभावी दोष
सिद्ध न झाल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं.
****
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध
योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीनं आणि परिणामकारकरीत्या
देण्यासाठी देशभरात अॅग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. यात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने सर्वाधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करत अग्रस्थान
पटकावलं आहे.
कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी ही
माहिती दिली. राज्यात एक कोटी ७१ लाख दहा हजार ६९७
शेतकऱ्यांची बँक खाती आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात एक कोटी आठ
लाख ९१ हजार म्हणजे सुमारे ६४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी १६
जुलैअखेर पूर्ण झाली असून, महसूल आणि कृषी विभागानं
त्यापैकी ९७ लाख ३९ हजार २९९ शेतकऱ्यांची नोंदणी मंजूर
केली आहे.
****
भंडारा जिल्ह्यातल्या कान्हळगाव इथल्या सरपंच रेखा गभणे
यांनी बनावट आधार कार्ड तयार करत वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस
आल्याने
त्यांना पदावरुन हटवण्यात आलं
आहे.
गभण यांनी सरपंच होण्याआधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करुन त्यावर स्वत:चे वय ४९ वरून
थेट ७१ केलं, त्यानंतर
एक जानेवारी २०२१ पासून शासनाकडून त्यांना अनुदान
मिळाल्याचं
उघडकीस आलं. उपसरपंच उमेश उपरकर यांनी केलेल्या तक्रारीवरुन अपर जिल्हाधिकारी राजेंद्र
कुमार जाधव यांनी चौकशी करुन ही कारवाई केली.
****
पनवेल रेल्वे स्थानकावर काल एका परदेशी महिला प्रवाशाकडून दोन किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात
आले. मंगला एक्स्प्रेस मधून ३५ कोटी रुपयांचे अंमली
पदार्थ घेऊन जाणाऱ्या या नायजेरियन महिलेला बंगळुरु अंमली
पदार्थ नियंत्रण विभाग आणि पनवेल रेल्वे पोलिसांनी
राबवलेल्या संयुक्त अभियानात अटक करण्यात आली. पुढील चौकशी
सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment