Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 25 July 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २५ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवची
राजधानी माले इथं पोहोचले.
मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइजु यांनी
विमानतळावर पंतप्रधान मोदी
यांचं स्वागत केलं.
या भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये काही द्विपक्षीय करार
देखील होण्याची शक्यता आहे. भारताच्या मदतीने साकारलेल्या काही पायाभूत सुविधा
प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. उद्या मालदीवच्या स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी
यांनी काल इंग्लंडमधल्या सद्रिंगहम
इस्टेट इथं, किंग
चार्ल्स तिसरे यांची भेट
घेतली. या भेटीत त्यांनी
भारत - युके द्विपक्षीय मुद्यांवर
तसंच उभय देशांच्या संबंधांमधल्या
प्रगतीवर चर्चा केली. आयुर्वेद,
योग आणि मिशन लाईफ
मुळे होणाऱ्या
फायद्यांबद्दल यूकेमध्ये जाणीव
निर्माण करण्याच्या अनुषंगानं
त्याला कशा प्रकारे प्रोत्साहन
देता येईल, याबद्दलही
त्यांनी चर्चा केली.
तत्पूर्वी, भारत आणि ब्रिटन
दरम्यान ऐतिहासिक आर्थिक
आणि मुक्त व्यापार करार
काल करण्यात आला.
या करारामुळे महाराष्ट्रासाठी औद्योगिक संधी निर्माण
होतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यामुळे राज्यातला आंबा,
द्राक्ष, फणस तसंच धान्य आणि जैविक उत्पादनांच्या
निर्यातकांची स्थिती मजबूत
होईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.
****
महाराष्ट्र सर्वच महत्वाच्या
आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे, असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग तसंच वित्तीय संशोधन क्षेत्रातली ख्यातनाम
वित्तीय संस्था - मॉर्गन स्टॅनलेने प्रकाशित केला आहे. या
अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्रांचं नेतृत्व करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्तीय शिस्त, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांसह विविध
क्षेत्रांतल्या कामगिरीची दखल यात घेतली गेली आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी
या अहवालाचं आणि
त्यातील निष्कर्षाचं स्वागत
केलं आहे. अहवालातले
हे निष्कर्ष म्हणजे
आपल्या राज्याने विविध
क्षेत्रांसाठी स्वीकारलेली धोरणं
आणि त्यानुसार सुरु
असलेली त्याची सकारात्मक
वाटचाल यांचं द्योतक असल्याचं
त्यांनी म्हटलं आहे.
****
गंगा नदी आणि तिच्या
उपनद्यांच्या पर्यावरणीय प्रवाहावर
लक्ष देण्यासंदर्भातली एक
महत्वाची बैठक, जलशक्ती
मंत्री सी आर पाटील
यांनी काल नवी दिल्लीत
घेतली. नद्यांमध्ये पाण्याचा
प्रवाह वाढवण्यासाठी, नदीच्या
परिसंस्थांचं जतन करण्यासाठी आणि
जलसंपत्तीच्या संतुलित वापसारासाठी, एक ठोस आणि
समग्र कृती आराखडा विकसित
करण्यावर पाटील यांनी यावेळी
भर दिला. अतिरिक्त
पाण्याचा वापर आणि प्रदूषणाला
तोंड देणार्या प्रदेशांमध्ये
अखंड प्रवाह टिकवण्यासाठी
तसंच एकूणच नदीच्या परिसंस्थेचं
आरोग्य सुधारण्यासाठी एकत्रित
प्रयत्न करण्यावर या
बैठकीत भर देण्यात आला.
****
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कारांची
घोषणा काल करण्यात आली. यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य
जीवन गौरव पुरस्कार, कोल्हापूर इथले डॉ. सुनिलकुमार लवटे
यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मुंबईच्या
डॉ.मिनाक्षी पाटील
आणि डॉ.एच व्ही देशपांडे यांना, नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप यांना, तर
कलागौरव पुरस्कार अतांबर शिरढोणकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना जाहीर झाला आहे.
येत्या
आठ ऑगस्ट रोजी प्रवरानगर इथं
या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.
****
चीन खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेत भारताच्या उन्नती
हुडाने उपांत्यपूर्व फेरीत
प्रवेश केला आहे. तिचा
आज जपानच्या अकाने
यामागुचीसोबत सामना होईल, काल
झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या
लढतीत उन्नतीने भारताच्याच
पी व्ही सिंधूचा २१-१६,
१९-२१, २१-१३
असा पराभव केला. याच
स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचे
सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि
चिराग शेट्टी या
जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा
२१-१९, २१-१९
असा सरळ दोन गेम्समध्ये
पराभव केला. आज
उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना
मलेशियाच्या जोडीसोबत होणार
आहे.
****
बीड इथं परवा
रविवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मराठवाडा विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचं उद्धघाटन होणार आहे. महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील यांनी ही माहिती
दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या विष्णूपुरी प्रकल्पातच्या जलसाठ्यात एकाच दिवसात ६० टक्के वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे विष्णूपुरी
प्रकल्पातील जलसाठा आता सुमारे ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात
ठिकठिकाणी पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला
आहे. पश्चिम द्रुतगती
महामार्गावर त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हवामान खात्याने आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र तसंच
मराठवाड्याच्या काही भागात आज
जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाने
वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment