Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 01 April 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, राज्यात आज वर्धा इथं पहिली जाहीर सभा.
Ø सार्वजनिक धनाचा दुरूपयोग होऊ
देत नसल्याचा, ‘मै भी चौकीदार कार्यक्रमात’ पंतप्रधानांचा
निर्वाळा; आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचं कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं आश्वासन
Ø विजया
आणि देना बँकेचं आजपासून, बँक ऑफ बडोदात विलीनीकरण.
Ø पॅन
क्रमांक - आधार क्रमांकाशी
जोडण्यास तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
.
आणि
Ø यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव
अभयारण्याला लागलेल्या आगीनं धारण केलं रौद्र रुप.
****
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असून विविध
राजकीय पक्षांचे नेते देशभरात वेगवगळ्या ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे
वरीष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, राज्यात वर्धा इथं पहिली
जाहीर सभा घेऊन निवडणूक प्रचाराचा
शुभारंभ करतील. त्यानंतर ते आंध्रप्रदेशात राजमुंद्री, तेलंगणात सिकंदराबाद आणि ओडिसात
कालाहंडी इथं जाहीर सभा घेतील. काँग्रेस अध्यक्ष
राहूल गांधी तेलंगणात जहिराबाद, वानापर्थी, आणि हुजुरनगर इथं सभा घेणार आहेत.
****
चौकीदारच्या रूपात आपण आपल्या
कर्तव्याचं पालन करत असून सार्वजनिक धनाचा दुरूपयोग होऊ देत नसल्याचं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मै भी चौकीदार कार्यक्रमांतर्गत
दूरदृश्य संवाद प्रणाली- व्हिडीओ कॉन्फरसिंग प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या जनतेशी
संवाद साधतांना ते काल बोलत होते. २०१४मध्ये जनतेनं आपल्यावर विश्वास ठेऊन राष्ट्रीय
लोकशाही आघाडीला बहुमत दिलं, आणि देशाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या काळात
आपण भ्रष्टाचारापासून देशाचं रक्षण करण्याचे अथक प्रयत्न केले असल्याचं ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षात आपल्याला जे यश मिळालं त्याचं श्रेय लोकांच्या सहभागाला असल्याचं
त्यांनी सांगितलं. स्वच्छता अभियानाला लोकांच्या सहभागामुळे जनआंदोलनाचं स्वरूप प्राप्त
झाल्याचं ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाचं सरकार केंद्रात
सत्तेत आल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल, असं पक्षाध्यक्ष राहुल
गांधी यांनी म्हटलं आहे. ते काल विजयवाडा इथं जाहीर सभेत बोलत होते. या संदर्भात पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याची टीका गांधी
यांनी केली. अत्याधिक गरीब परिवारांना काँग्रेसचं सरकार प्रतिवर्षी बहात्तर हजार रुपयांची
रक्कम किमान उत्पन्न योजनेच्या माध्यमातून देणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तरप्रदेश मधल्या
अमेठी मतदार संघाबरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातूनही निवडणूक लढवणार असल्याची
माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी
यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना दिली. दक्षिण भारतातले कार्यकर्ते आणि
नेत्यांच्या आग्रहामुळे गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या मतदारसंघातून डाव्या लोकशाही आघाडीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पी पी सुनीर यांना
उमेदवारी दिली आहे. गांधी यांच्या केरळमूधन निवडणूक लढवण्याच्या, निर्णयामागे, केरळमध्ये
काँग्रेसची सत्ता बळकट करणं हे प्रमुख उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया भारतीय कम्युनिस्ट
पक्षाचे महासचिव प्रकाश करात यांनी व्यक्त केली आहे.
बड्या उद्योजक घराण्यांच्या दबावामुळेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष- भा.क.प.ला ‘महाआघाडी’चा घटक बनू दिलं गेलं
नाही अशी टीका भाकपचे राष्ट्रीय सचिव के. नारायण
यांनी केली आहे. ते काल बिहारच्या पाटणा इथं बोलत होते. यामुळेच कन्हैया कुमार यांनाही
महाआघाडीनं सहभागी करून घेतलं नाही असंही ते म्हणाले.
****
विजया बँक आणि देना बँक या दोन बँकांचं आजपासून
‘बँक ऑफ बडोदात’ विलीनीकरण होत आहे. या विलिनीकरणानंतर ‘बँक ऑफ बडोदा’ ही देशातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक
ठरणार आहे. विजया बँक आणि देना बँकेच्या ठेवीदारांसह, ग्राहकांना आजपासून बँक ऑफ बडोदाचे
ग्राहक मानलं जाईल, असं भारतीय रिजर्व बँकेनं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
****
पॅन क्रमांक – आधार क्रमांकाशी जोडण्यास येत्या तीस सप्टेंबर, २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्र सरकारनं काल याबाबत आदेश जारी केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
आजपासून आयकर विवरण पत्र दाखल करतांना, त्यामध्ये आधार क्रमांक नोंदवणं सक्तीचं झालं
आहे. पॅन क्रमांक मिळवण्यासाठीही
आधार क्रमांक गरजेचं असणार आहे. दरम्यान, बँक खात्यांसह, दूरसंचार सेवेसाठी आधार संलग्निकरणाची
सक्ती नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
बीड लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस आणि
काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी काल शिरूर तालुक्यातल्या शिरूर कासार,
नारायणवाडी, निमगाव, वरंगलवाडी, आनंदवाडी, तिंतरवणी, मातोरी, नांदेवली, ब्रह्मनाथ येळंब,
उकांडा चकला, रुपुर, गोमाळवाडा, वडाळी, जाटनांदूर, सवसवाडी, कोळवाडी, राक्षसभुवन, कान्होबाची
वाडी, झापे वाडी इथं भेटी दिल्या तसंच या ठिकाणी छोट्या सभाही घेतल्या.
****
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी प्रचारानं
आता जोर धरला आहे. प्रचारासोबत अनेक राजकीय नेते पक्षबदलही करत आहेत. लातूर जिल्ह्याचे
शिवसेना सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी काँग्रेसमध्ये
प्रवेश करण्याची घोषणा काल वार्ताहरांशी बोलतांना केली. अधिक माहिती देत आहेत आमचे
वार्ताहर -
काही राजकीय कारणांमुळे मला शिवसेना
सोडावी लागत असून मी निस्वार्थपणे आता काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं सांगितलं. त्याचवेळी
काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी सुध्दा यांचा काँग्रेस संघटना बळकट करणे आणि निलंगा
विधानसभा मतदारसंघातलं मताधिक्य वाढवण्यासाठी मदत होईल असा विश्वास केला आहे. भाजपच्या
वतीनं बुथ मेळावे जोदारपणे सुरु केलेले आहेत.
अरुण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात
केलेली विकास कामं पाहता देशाला शिखरावर नेण्यासाठी त्यांना पुन्हा संधी देणं गरजेचं
असल्याचं मत, परभणीचे शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेवार संजय जाधव यांनी व्यक्त
केलं आहे. ते काल परभणीत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेनेतले अंतर्गत वाद संपुष्टात
आले आहेत, तसंच महायुती झाल्यानं प्रचारात शिवसेना- भारतीय जनता पक्ष युतीचे सर्वजण
सहभागी झाले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली मतदारसंघातही प्रचार जोरावर आहे. हिंगोलीचे
विद्यमान खासदार काँग्रेस नेते राजीव सातव हे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या
प्रचारार्थ काल हिंगोलीत दाखल झाले. काल त्यांनी एका मेळाव्याला संबोधित केलं. अधिक
माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
हिंगोली येथील साई लॉन्समध्ये आयोजित कार्यकर्ता
पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत जाण्याच्या सूचना दिल्या.
सातवांच्या आगमनाने काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला. परंतू भाऊ पाटील गोरेगावकरांना
मेळाव्या निमंत्रित न केल्याने पक्षांतर्गत गटबाजी उघडपणे दिसून आली. शिवसेनेतर्फे
ठिकठिकाणी गाठीभेटी घेऊन मनोमिलनाचे प्रयत्न सुरु केले आहेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे
हिंगोली, सेनगाव, कळमनुरी आदी भागात ग्राम भेटी देणे सुरु आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.
****
परभणीतले शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची काल
सकाळी हत्या झाली. जायकवाडी वसाहतीतल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला पाणी
कमी दाबानं येत असल्याची तक्रार काही महिलांनी केल्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी रोडे
जायकवाडी वसाहतीत गेले. या ठिकाणी किरण डाके आणि रवी गायकवाड यांच्या सोबत त्यांचा
वाद होऊन त्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, डाके आणि गायकवाड या दोघांनीही पोलिसांसमोर
शरणागती पत्करली असून, मोंढा पोलिस ठाण्यात याबाबत हत्येचा गुन्हा नोंदवला असल्याची
माहिती पोलिसांनी दिली.
****
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संबंधित जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश
राज्याच्या पणन संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद
आणि बीड जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार १८ एप्रिल रोजी बंद राहणार आहेत.
****
यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव
अभयारण्याला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण केलं असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. तब्बल २२ एअर ब्लोअर मशीनद्वारे पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण
मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात गवत असल्यानं आगीचा
वणवा पसरत आहे. यापूर्वी देखील ह्या अभयारण्यात लागलेल्या आगीने मोठे नुकसान झालं होतं.
पांढरकवड्यासह घाटंजी तहसीलमध्ये असलेल्या आणि १४८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या
या जंगलाचा बहुतांश भाग आगीनं व्यापल्यानं १२ वाघांसह इतर वन्यप्राणी –पक्ष्यांचे जीव
आणि वनसंपदा धोक्यात आहे.
****
नवी दिल्लीत झालेल्या भारतीय
खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला अखेर उपविजेतेपदावर
समाधान मानावं लागलं. पुरुष एकेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात त्याला डेन्मार्कच्या
व्हिक्टर एक्सेलसननं २१-७, २२-२०
असं पराभूत केलं.
जागतिक
क्रमवारीत ७व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतनं, २०१७मध्ये
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावल होतं.
*****
***
No comments:
Post a Comment