Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
प्रसिद्ध
अभिनेते रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार, आज उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
अनुराग ठाकुर यावेळी उपस्थित होते. प्रियदर्शन दिग्दर्शित मल्याळम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट
कथा चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. संजय पूरन सिंह चौहान यांना हिंदी चित्रपट बहात्तर
हुर्रे साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार, अभिनेता मनोज बाजपेयी यांना हिंदी
चित्रपट भोंसले साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर धनुषला तमिळ चित्रपट असुरनसाठी सर्वोत्कृष्ट
अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. कंगना राणावतला मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी आणि
पंगा या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, विजय सेतुपतीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक
अभिनेता, तर पल्लवी जोशी यांना ‘द ताश्कंद फाईल्स’ चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा
पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटनिर्मितीसाठी सुविधा पुरवून निर्मितीला प्रोत्साहन
देणाऱ्या सिक्कीम राज्याला ‘चित्रपटस्नेही राज्य’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा
अभियानाचा’ प्रारंभ होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं होणाऱ्या या कार्यक्रमात
पंतप्रधान, वाराणसीसाठी पाच हजार २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं
उद्घाटनही करणार आहेत.
****
पंतप्रधान
मोदी येत्या २९ ऑक्टोबरपासून दोन नोव्हेंबरपर्यंत, रोम आणि ग्लासगोच्या दौऱ्यावर जाणार
आहेत. ३० आणि ३१ ऑक्टोबरला रोम इथं जी- ट्वेंटी देशांची सोळावी शिखर परिषद होणार आहे.
ग्लास्गो इथं ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान बदलविषयक
सीओपी-26 या जागतिक नेत्यांच्या परिषदेला ते उपस्थित राहतील.
****
आर्यन
खान अंमली पदार्थ प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबी मुंबईचे प्रादेशिक
संचालक समीर वानखेडे आज अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठीच्या विशेष न्यायालयात
हजर झाले. आपल्यावर झालेले आरोप चुकीचे असून, आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात
आहे, त्यामुळे कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं, वानखेडे यांनी न्यायालयात सांगितलं.
या प्रकरणातले पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची
लाच मागितल्याचा आरोप केला आहे.
****
देशात
आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या १०२ कोटी २७ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
आहेत. काल दिवसभरात देशात १२ लाख ३१ हजार नागरीकांना लस देण्यात आली.
दरम्यान,
देशात काल नव्या १४ हजार ३०६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४४३ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४१ लाख
८९ हजार ७७४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५४ हजार ७१२ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल १८ हजार ७६२ रुग्ण बरे झाले, देशात सध्या एक लाख ६७ हजार ६९५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
केंद्राने
२०१४ पासून देशात १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, या प्रकल्पांवर
१७ हजार ६९१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही वैद्यकीय महाविद्यालये पूर्ण झाल्यावर
जवळपास १६ हजार पदवीपूर्व वैद्यकीय जागा उपलब्ध होतील, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं
आहे. यापैकी ६४ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे सहा हजार ५०० जागा आधीच उपलब्ध झाल्या
आहेत. केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालयं अद्ययावत करण्यासाठी सुमारे दोन हजार ४५१
कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं, मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
महाराष्ट्र
राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वी दिलं जावं,
तसंच इतर भत्त्यांसह थकबाकीची पूर्ण रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी, कर्मचाऱ्यांनी
केली आहे. अन्यथा एसटी महामंडळातल्या सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं
२७ ऑक्टोबरपासून राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स
काँग्रेसनं दिला आहे.
****
मध्य
रेल्वेच्या किसान रेल्वे या विशेष गाडीनं शनिवारी ७०० वी फेरी पूर्ण केली. ही किसान
रेल्वे सांगोला ते आदर्श नगर दिल्लीपर्यंत धावली. या फेरीत दोन लाख ३४ हजार ५०० टन
मालाची वाहतूक करण्यात आली. किसान रेल्वे द्वारे सोलापूर भागातून फळे, लातूर आणि उस्मानाबाद
भागातून फुले, नाशिक प्रदेशातून कांदा, भुसावळ आणि जळगाव भागातून केळी, नागपूर प्रदेशातून
संत्री किसान रेलच्या माध्यमातून दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालसारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये
त्वरीत आणि ताज्या पोहचतात, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठांसह चांगला महसूल
मिळत आहे.
****
No comments:
Post a Comment