आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभेच्या तीन तसंच १४ राज्यांमधल्या विधानसभेच्या ३० मतदार संघातल्या
पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मध्य प्रदेशातल्या खांडवा, हिमाचल प्रदेशातील मंडी
तसंच दादरा आणि नगर हवेली या तीन लोकसभा मतदार संघात, तर महाराष्ट्रासह १४ राज्यात
विधानसभेच्या ३० जागांसाठी निवडणूक होत आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी
मतदान सुरु आहे. पहिल्या दोन तासांत सहा पूर्णांक १३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक
अधिकाऱ्यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीची राजधानी रोम इथं होणाऱ्या सोळाव्या
जी ट्वेंटी शिखर संमेलनात सहभागी होत आहेत. जागतिक आर्थिक सुधारणा, ऊर्जेची वाढती किंमत,
कोविड लसीकरण आणि जलवायू संकटावर या संमेलनात चर्चा होणार आहे.
दरम्यान, काल पंतप्रधानांनी रोम इथं इटलीचे पंतप्रधान मारिओ द्रागी यांच्यासोबत
प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा केली. भारत आणि इटली यांच्यात द्विपक्षीय भागीदारीतील
२०२० ते २०२५ या कालावधीसाठीच्या कृती योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला, तसंच व्यापार
आणि गुंतवणूक वाढवण्याचा पुनरुच्चार केला.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना - डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलानं हवेतून
हल्ला करता येणाऱ्या दीर्घपल्ल्याच्या बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. हवाई दलाच्या विमानातून
टाकलेले हे बॉम्ब जमिनीवरच्या लक्ष्यावर दिलेल्या मर्यादेत, अचूकतेनं पोहोचलं असं संरक्षण
मंत्रालयाच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी ठार मारण्याची
धमकी दिली आहे. पालकमंत्री शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या भामरागढ एरिया कमिटीच्या नावानं
आलेल्या पत्रात अशी धमकी देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण
विभागाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून सांडव्याद्वारे करण्यात येणारा
विसर्ग काल पूर्णपणे बंद करण्यात आला. या पावसाळ्यात धरणातून एकूण ४८ पूर्णांक ७० अब्ज
घनफूट पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती, जायकवाडी पाटबंधारे विभागानं दिली
आहे. सध्या धरण १०० टक्के भरलेलं आहे.
****
No comments:
Post a Comment