Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 April
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ एप्रिल २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन,
हिंगोलीसह राज्यात सात ठिकाणी सुरू होणार एफ एम सेवा
· धर्मादाय
रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या
दरात उपचार देण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे
निर्देश
· येत्या
महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, यासाठी केंद्र
सरकारकडे पाठपुरावा करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
· भारतीय
किसान सभेच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य, शेतकऱ्यांची नियोजित मोर्चा स्थगित
· राज्यातील
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान
· मराठवाड्यात
सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट, वीज पडण्याच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू
आणि
· आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाची चेन्नई सुपर किंग्जवर ३२ धावांनी विजय
सविस्तर
बातम्या
देशात रेडिओ संपर्क व्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत.
१८ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या ८४ जिल्ह्यांमध्ये, हे शंभर वॅटचे ट्रान्समीटर्स
बसवण्यात आले आहेत. यामध्ये आकांक्षी जिल्हे आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर
भर देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजरात,
केरळ, छत्तीसगड, नागालँड इत्यादी राज्यांचा समावेश आहे. या अंतर्गत राज्यात हिंगोली,
सटाणा, नंदुरबार, वाशिम, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या सात ठिकाणी, एफ एम सेवा सुरू
होणार आहे. आकाशवाणीच्या एफ एम सेवेच्या विस्तारामुळे अतिरिक्त दोन कोटी लोकांना संपर्क
व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
****
नागपूरमध्ये राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे सरसंघचालक डॉ.
मोहन भागवत यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नव्यानं उभारण्यात आलेल्या या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये
संशोधन केंद्रंही असल्यानं देशाला कर्करोगमुक्त बनवण्याचं स्वप्न ही संस्था पूर्ण करेल,
असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले…
Byte…
टाटा कॅन्सर के सिवाय कोई
पर्याय नही था। और मुंबई मे इस प्रकार की सेवा, वहां रहना काफी मुश्किलें होती थी।
पर मुंबई मे जो टाटा कॅन्सर का जो स्टँडर्ड था, जो इक्विपमेंट थे, डॉक्टर्स थे, उसी
स्तर का ये नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूट तयार हुआ है। और मुझे इस बात की खुशी है, की ये
स्टेट ऑफ आर्ट ऐसा बना है की इसकी हर चीज केवल देश मे ही नही तो वर्ल्ड स्टँडर्ड का
ये इन्सिट्यूट बना है। और इसलिये ऐसा संकट जिनके उपर आता है, उनको .फिर से जीवन मे
जीने की उम्मीद देना, उनका आत्मविश्वास बढाना, उनकी सेवा करना, उनको वैद्यकीय उपचार
रिजनेबल रेट मे उपलब्ध कराके देना ये बहोत ही आवश्यक काम है।
हवामान बदल, जीवनशैलीतील बदल यामुळे कर्करोगाच्या रुग्णसंख्येत
वाढ होत आहे. त्यामुळे कर्क रोगावर उपचार करणाऱ्या अशा विशेष रुग्णालयांची गरज असल्याचं,
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भविष्यात परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार
सर्वांना उपलब्ध करून देणं हे आव्हान असून, शासन यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी
सांगितलं.
डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या वतीनं या राष्ट्रीय
कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेत रुग्णांच्या नातेवाईकांच्या
नि:शुल्क निवासासाठी धर्मशाळा उभारण्यात येणार असून, एक संशोधन केंद्र देखील उभारण्याचा
मानस असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
****
धर्मादाय रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना
विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या दरात उपचार मिळणं आवश्यक आहे. यादृष्टीनं
सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश, सार्वजनिक
आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. मुंबईत काल या रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात
आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागानं धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के
उपलब्ध खाटांची माहिती देणारं, सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असं ॲप प्राधान्यानं
विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदारानं
दिलेला उत्पन्नाचा दाखला, या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त, अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक
होऊ नये, अशी सूचनाही सावंत यांनी केली.
****
येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
देण्याची घोषणा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून
केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार
यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. अभिजात भाषेसाठीचे
सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते, त्यासंदर्भात पुराव्यांनिशी तपशीलवार अंतरिम अहवाल
राज्यानं २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तेव्हापासून सातत्यानं
पाठपुरावा सुरू असल्याचं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक
मंत्रालयापासून सर्वसंबंधित विभागांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यास मान्यता दिली
असून, फक्त केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब करणं बाकी असल्याकडेही अजित पवार यांनी
या पत्राद्वारे लक्ष वेधलं.
****
रायगड जिल्ह्यात खारघर इथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण वेळी,
उष्माघाताच्या त्रासामुळे झालेल्या १४ जणांचा मृत्यू प्रकरणी, संबंधितांवर फौजदारी
कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास, मुंबई उच्च
न्यायालयानं काल नकार दिला. विरारच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल
केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या इतर दहा
जणांविरुद्ध या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी, या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर
येत्या आठ जूनला सुनावणी होणार आहे.
****
सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांसाठी सात हजार मेगावॅट वीज निर्मितीमुळे
ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असं महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी
म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते काल वार्ताहरांशी बोलत बोलत होते. राज्य सरकारनं
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत
‘मिशन २०२५’ ला सुरुवात झाली आहे. सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर २०२५
पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालवण्याचं या अभियानाचं
उद्दीष्ट असल्याचं पाठक यांनी सांगितलं. राज्यात ४५ लाख कृषी पंपधारक शेतकरी आहेत आणि
त्या सर्वांसाठी आगामी काळात हे अभियान महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा
शंभरावा भाग परवा रविवारी प्रसारीत होणार असून, प्रेरणा आणि माहिती देणारा हा कार्यक्रम
सर्वांनी ऐकावा, असं आवाहन, अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. ते
काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. 'मन की बात' कार्यक्रमाचा शंभरावा
भाग विशेष असल्यामुळे सर्वांना तो ऐकता यावा, यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी
कार्यालय, अंगणवाडी तसंच जिथे जिथे शक्य आहे तिथे कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था करण्यात
येणार असल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
भारतीय किसान सभेच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य
केल्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजित मोर्चा स्थगित केल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांनी सांगितलं. ते काल अहमदनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. अखिल भारतीय
किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी, दोन
दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात अकोला ते लोणी दरम्यान, लाँग मार्च काढला होता. नाशिक,
पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर,
अमरावती, बुलडाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमधले शेतकरी, या मोर्चात सहभागी झाले होते.
किसान सभेनं केलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी काल संगमनेर इथल्या बैठकीत चर्चा
झाल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठीच्या
निवडणुकीचं आज आणि परवा ३० तारखेला मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती
संभाजीनगर, वैजापूर, कन्नड तसंच लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज तर
पैठण, गंगापूर आणि फुलंब्री बाजार समित्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. जालना जिह्यातल्या
परतूर आणि घनसावंगी बाजार समितीसाठी आज, तर अंबड, आष्टी आणि मंठा बाजार समितीसाठी ३०
तारखेला मतदान होणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या नऊ पैकी कडा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध
झाली. उर्वरित बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज आणि वडवणी या बाजार समित्यांसाठी
आज, तर माजलगाव आणि पाटोदा या बाजार समित्यांसाठी परवा ३० तारखेला मतदान होणार आहे.
****
`प्रधानमंत्री स्वनिधी` योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला
व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांनी
पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं काल या संबंधी महोत्सवा अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात
आलं, त्यावेळी ते बोलत होते. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महापालिकेत नोंदणी
असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही कराड यांनी दिली.
ते म्हणाले,
Byte…
या जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका
आहेत. ही योजना जशी महानगरपालिकेला आहे तशी नगरपालिकेला सुद्धा आहे. म्हणून कन्नड असेल,
वैजापूर असेल, गंगापूर असेल, सिल्लोड असेल, खुलताबाद असेल याठिकाणी सुद्धा ही योजना
चालू आहेच. पण त्याचं रिव्ह्यू मिटींग आपण लवकरात लवकर घेऊ. म्हणून जिल्हा परिषदेचे
असिस्टंट सीईओ जिल्हा परिषदेमार्फत मी त्यांना सूचना करतो की लवकरात लवकर तुम्ही आढावा
घ्या. आणि एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी कन्नड किंवा वैजापूर असा मेळावा ठेवा. आणि त्यात
एसबीआय बँक असेल सर्व बँक असेल सर्व सहकार्य करतील.
****
मराठवाड्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट
झाली. वादळी वाऱ्यासह वीज पडण्याच्या घटनांमध्ये विभागात काल पाच जणांचा मृत्यू झाला.
हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश गावांत काल मेघगर्जनेसह
पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान कळमनुरी, वरूड, जवळाबाजार, वाकोडी, रामेश्वरतांडा,
डिग्रस कऱ्हाळे, कनेरगाव नाका, सवना, कडोळी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे
हळद काढणी आणि वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव शहरात काल अवकाळी
पाऊस पडला. सिल्लोड तालूक्यातील घटांब्री आणि आमसरी इथं दुपारी दोनच्या सुमारास गारपीटीसह
पाऊस पडला.
जालना जिल्ह्यातही विरेगाव, रामनगर परिसरात काल रात्री
वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. निलंगा तालुक्यातल्या
मुबारकपूर इथं आरुषी राठोड या १३ वर्षीय मुलीचा, तर तगरखेडा इथं राजाप्पा कल्याणे हा
शेतकर्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यातही काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस
झाला. माहूर तालुक्यात सातघरी इथं घराच्या पत्र्यावर ठेवलेला दगड अंगावर पडल्यानं सोनुबाई
पवार या महिलेचा मृत्यू झाला. मालटेकडी परिसरातल्या कामठा इथं वीज पडून शेख वजीर शेख
चांद यांचा मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यात पांगरी तालुक्यातही एका मुलाचा अंगावर
वीज पडून मृत्यू झाला.
दरम्यान, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि
गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दहा हजार आठ
शेतकऱ्यांच्या पाच हजार ४८७ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात गारपीटीचा फटका बसला असून,
गहू पिकासह मोसंबी, आंबा या फळपिकांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, आजही मराठवाड्यासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात
ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल जयपूर
इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं चेन्नई सुपर किंग्जवर ३२ धावांनी विजय
मिळवला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानच्या संघाने २० षटकात २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल
आलेला चेन्नईचा संघ १७० धावातच सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच राजस्थानचा संघ पदक तालिकेत
अव्वल स्थानी पोहोचला आहे.
****
पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा घडवणाऱ्या भारत गौरव रेल्वेला,
आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पुणे इथं हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 'देखो
अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उदात्त पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या
उद्देशानं, ही योजना सुरू करण्यात आली आहे.
****
मुंबई इथल्या `आफ्टरनून व्हॉईस`च्या १५ वा `न्यूजमेकर्स
अचिव्हर्स अवॉर्ड` २०२३ मधला 'सर्वोत्कृष्ट कार्यशील राजकारणी'चा पुरस्कार, छत्रपती
संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना जाहीर झाला आहे. जलील यांची संसदेतली भाषणं
हा लोकांचा आवाज असल्यानं, त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं, या
संदर्भातली घोषणा करताना संयोजक डॉ. वैदेही तमन यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनी -
येत्या एक मे रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात
जलील यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
****
कोविड -१९ लसीकरणा अंतर्गत इन्कोव्हॅक ही नाकवाटे घ्यावयाची
लस छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चिकलठाणा इथल्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली आहे.
ही लस फक्त ६० वर्षांवरील नागरिकांच्या वर्धक मात्रेसाठीच वापरण्यात येणार असल्याचं,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment