Friday, 28 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 28.04.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेडिओ संपर्क व्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी देशात ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन केलं. १८ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या ८४ जिल्ह्यांमध्ये, हे शंभर वॅटचे ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत. या अंतर्गत राज्यात हिंगोली, सटाणा, नंदुरबार, वाशिम, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या सात ठिकाणी, एफ एम सेवा सुरू होणार आहे.

***

यंदाच्या ३१ मार्चपर्यंत अटल पेन्शन योजनेअंतर्गत झालेल्या नोंदणीनं ५ कोटी २० लाखांचा टप्पा ओलांडल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा या नोंदणीत २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं दिसून आली आहे.

***

राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. जालना जिह्यातल्या परतूर आणि घनसावंगी बाजार समितीसाठी, बीड जिल्ह्यातल्या बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज आणि वडवणी या बाजार समित्यांसाठी, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड तसंच लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान होत आहे.   

***

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण औरंगाबाद मंडळातर्फे ८४९ सदनिका आणि ८७ भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडत काल काढण्यात आली. म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव इथल्या सदनिका आणि भूखंडांसाठी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे ही सोडत काढण्यात आली.

***

नांदेड जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्यानं झालेल्या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून, यातले तीन गंभीर आहेत. अपघातग्रस्त बस कंधार-बाचोटीमार्गे नायगावला जात असताना बामणी फाट्याजवळ उलटली. जखमींना उपचारांसाठी नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

***

छत्रपती संभाजी नगर शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून मनोज लोहिया काल रुजू झाले. मावळते पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. समाजभिमुख, लोकाभिमुख काम झालं पाहिजे. कामात पारदर्शकता महत्वाची असते, असं लोहिया यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

//***********//

 

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...