Sunday, 24 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.11.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 November 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग होता. मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा दिवस विशेष आहे. आज राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी दिवस आहे. एनसीसीचा विषय निघाल्यानंतर शाळा-महाविद्यालयातील दिवस आठवतात. मी स्वःत एनसीसीचा कॅडेट राहिलेलो आहे. त्यातुन मिळालेला अनुभव अमूल्य आहे. एनसीसी तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवते. देशात कोणतीही आपत्ती आल्यानंतर एनसीसीचे कॅडेट् मदतीला धाऊन जातात. एनसीसीमध्ये मुलींचं प्रमाण ४० टक्क्यांवर पोहचले असून, देशात एनसीसीला मजबूत करण्यासाठी सातत्याने काम होत असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

विकसित भारत घडवण्यात युवावर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १६२ वी जयंती आहे. त्यावेळी ही जयंती, विशेष प्रकारे साजरी केली जाणार आहे. यानिमित्तानं ११-१२ जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथं युवा विचारांचा महामेळावा होणार असून, 'विकसित भारत युवा नेते संवाद' असं या उपक्रमाचं नाव आहे. भारतभरातून कोट्यवधी तरुण-तरुणी यात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आजकाल मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. आपल्या मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढवणं गरजेचं आहे. चेन्नईत मुलांसाठी एक वाचनालय तयार केलं आहे, जे सर्जनशीलता आणि शिकण्याचं केंद्र बनलं आहे. हैदराबादमध्येही फूड फॉर थॉटफाऊंडेशननं अनेक अनोखी ग्रंथालये निर्माण केली आहेत. बिहारमध्ये गोपालगंजच्या प्रयोग लायब्ररीया ग्रंथालयाची चर्चा तर आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागल्याचं मोदी सांगितलं.

 ओमानमध्ये भारतीय दूतावास आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने एका पथकानं, भारतीय असलेल्या कुटुंबांचा इतिहास जतन करण्याचे काम सुरू केले आहे.  या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, हजारो कागदपत्रे जमा केली आहेत. जो देश, जे स्थान, आपला इतिहास जपतात, त्यांचे भविष्यही सुरक्षित राहते. हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक डिरेक्टरी-निर्देशिका तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

चेन्नईच्या कूदुगल ट्रस्टने चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहिम शाळकरी मुलांना सामावून घेतले आहे. संस्थेतील लोक शाळांमध्ये जाऊन मुलांना चिमणीचे दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे समजावून सांगतात. या संस्था मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याचे प्रशिक्षण देतात. यासाठी संस्थेतील लोकांनी लहान मुलांना लाकडी घरटी बनवायला शिकवले. गेल्या चार वर्षांत संस्थेने चिमण्यांसाठी अशी दहा हजार घरटी तयार केली आहेत.

'सरकारी कार्यालय' असं कोणी म्हटल्याबरोबर फायलींच्या ढिगाऱ्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. वर्षानुवर्षे या फायली कार्यालयात पडून होत्या, धुळीनं भरल्या होत्या, तेथे घाण होऊ लागली होती. अनेक दशके पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. याशिवाय इतरही अनेक विषयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून माहिती दिली आहे.

****

कायद्याचं शिक्षण घेणा-यांसाठी विधी विधान सेवावृत्ती अर्थात इंटर्नशिपहा उपक्रम राबवण्यात येत आहे.

२० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे.राज्यातील विधी महाविद्यालयं-विद्यापीठातील पदवी -पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. यासाठी internship.aicte-india.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.

कायदेशीर प्रस्ताव तपासणी  प्रक्रिया, विधेयक-अध्यादेश मसुदा तसंच दुय्यम विधी विधान निर्मिती आणि संविधानातील कायदेविषयक तरतुदींचा प्रत्यक्ष वापर याबाबत यातुन प्रशिक्षण प्राप्त होणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात उद्या पशुगणनेला सुरुवात  होत आहे. २१ व्या पंचवार्षिक पशुगणने अंतर्गत विविध प्रजाती, लिंग -वयनिहाय ही गणना केली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.

****

बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आज तिस-या दिवशी; ताज्या वृत्तानुसार दुस-या सत्रात ,भारतानं आपल्या दुस-या डावांत पाच बाद ३२६ धावा करत ३७२ धावांची आघाडी घेतली आहे.

****

No comments: