Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ-कोणत्याही विषयावर चर्चेला तयार असल्याची सरकारची ग्वाही.
• विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची-मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन.
• महिला हिंसाचाराविरोधात केंद्र सरकारचं आजपासून 'अब कोई बहाना नहीं' अभियान.
• विधानसभा निवडणूक निकाल राज्यपालांकडे सादर-सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग.
आणि
• बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यावर भारताची पकड मजबूत.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, या अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली.
****
विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाचा ११६वा भाग काल प्रसारित झाला.
येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या असलेल्या युवा दिनाच्या निमित्तानं, दिल्लीत ११ आणि १२ जानेवारी रोजी भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमाअंतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू असून, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची वा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं.
****
महिलांवरील हिंसेच्या विरोधात केंद्र सरकार आजपासून अब कोई बहाना नहीं, या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करत आहे. या अभियानाअंतर्गत देशातले नागरीक, सरकारी यंत्रणा तसंच इतर घटकांना महिलांच्या विरोधात हिंसेला संपवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय, तसंच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या अभियानाअंतर्गत आज दिल्लीत होत असलेल्या कार्यक्रमात अब कोई बहाना नहीं, या विषयावर एक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
****
राज्यातील विधानसभा निवडणुकांची जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी काल राज्यपालांना ही अधिसूचना सुपूर्द केली.
****
दरम्यान, राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी काल आपापल्या विधीमंडळ पक्षांची स्वतंत्र बैठक घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली.
शिवसेनेच्या आमदारांचीही काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या सर्व निर्णयांचे एकाधिकार पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत असं ते म्हणाले.
****
दरम्यान, लाडक्या बहिणींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांचं औक्षण करुन, त्यांचं अभिनंदन केलं.
****
निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजप-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा असल्याचं, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात त्यांनी, जनतेने दाखवलेला विश्वास आणि प्रेमाबद्दल आभार मानले. हे यश विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, त्या तुलनेत आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या सरकारच्या काळात झाली, त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याविरोधात जातील हे मनाला पटत नाही, लाडकी बहीण योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडला असं सांगितलं. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्याने, त्याची कारणमीमांसा करु, यावर अभ्यास करुन पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ, असं पवार म्हणाले.
****
झारखंडमध्ये नवीन सरकारचा शपथविधी येत्या २८ तारखेला होणार आहे. झारखंड मुक्ति मोर्चा - जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला, त्यानंतर राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्याचं सोरेन यांनी सांगितलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत ८१ पैकी ३४ जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळाला आहे. भाजपला २१, काँग्रेसला १६, राष्ट्रीय जनता दलाला चार, तर मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन जागांवर विजय मिळवता आला आहे.
****
गोव्यात सुरु असलेल्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीमध्ये काल क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टूमॉरो या स्पर्धेच्या निकालांची घोषणा करण्यात आली. टीम ग्रीननं तयार केलेल्या, गुल्लू या चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटातला अभिनेता, पुष्पेंद्र कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. लव्हफिक्स सबस्क्रिप्शन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी, विशाखा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. उदयोन्मुख दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धेत, १०० युवा कलाकारांची निवड करण्यात आली होती. त्यांना दिलेल्या विषयावर केवळ ४८ तासात लघुपट बनवायचा होता. १०० युवांना ५ चमूत विभागण्यात आलं होतं.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ५३४ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तीन बाद १२ धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी सात गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला आता ५२२ धावांची आवश्यकता आहे. जसप्रित बुमराहनं दोन, तर मोहम्मद सिराजनं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारताने काल दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित केला. या डावात यशस्वी जयस्वालनं १६१, विराट कोहलीनं १००, तर के एल राहुलनं ७७ धावा केल्या.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला कालपासून आळंदीमध्ये सुरुवात झाली असून, राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल होत आहेत. आळंदी नगरपरिषद, देवस्थान, एमआयटी महाविद्यालय, वारकरी सेवा संघ आणि इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने वारी काळात शहर आणि इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं आहे. समाधी सोहळ्याच्या काल पहिल्याच दिवशी चाकण चौक ते प्रदक्षिणा मार्ग, शिवसृष्टी परिसर, माउली मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट या भागात पडलेला कचरा गोळा करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इंद्रायणी नदी घाटावर जनजागृतीपर पथनाट्य देखील सादर करण्यात आलं.
****
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त धाराशिव जिल्हा पर्यटन विकास समिती आणि पुरातत्व विभागाच्यावतीनं काल चामर लेणी इथं हेरीटेज वॉक घेण्यात आला. जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी यावेळी इतिहासप्रेमींना चामर लेणीची माहिती सांगितली. लेणीपासून जवळच असलेल्या जुणी गल्ली इथल्या पुरातन गढीचीही पाहणी यावेळी करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं देखील जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभाग आणि इंटॅकच्या वतीने काल शहरातल्या सोनेरी महल परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला. पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालक जया वाहाणे यांनी यावेळी वारसा सप्ताहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी या परिसराचा इतिहास आणि स्मारकांची, तर पुरातत्व समन्वयक डॉ. कामाजी डक यांनी प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात असलेल्या पुराणवस्तूंची सविस्तर माहिती दिली.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आजपासून सुरु होत आहे. मुंबई इथले विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सिने कलावंत किरण माने असतील. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात आज पशुगणनेला सुरुवात होत आहे. २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेअंतर्गत विविध प्रजाती, लिंग -वयनिहाय ही गणना केली जाणार आहे.
****
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या
****
** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ-कोणत्याही विषयावर चर्चेला तयार असल्याची सरकारची ग्वाही
** विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची-मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन
** महिला हिंसाचाराविरोधात केंद्र सरकारचं आजपासून 'अब कोई बहाना नहीं' अभियान
** विधानसभा निवडणूक निकाल राज्यपालांकडे सादर-सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
आणि
** बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यावर भारताची पकड मजबूत
****
या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र, AIR छत्रपती संभाजीनगर, या यू- ट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.
****
[$2E59F6D6-ACDC-4CB7-86AD-EF1BA209637D$NEW CLOSING SIGNATURE TUNE - NEW CLOSING SIGNATURE TUNE - ]
[$3A007504-60D4-46C0-A92B-4094FC30DAE4$NEW OPENING SIGNATURE TUNE - NEW OPENING SIGNATURE TUNE - ]
****
नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते.
****
ठळक बातम्या
****
** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ-कोणत्याही विषयावर चर्चेला तयार असल्याची सरकारची ग्वाही
** विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची-मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन
** महिला हिंसाचाराविरोधात केंद्र सरकारचं आजपासून 'अब कोई बहाना नहीं' अभियान
** विधानसभा निवडणूक निकाल राज्यपालांकडे सादर-सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
आणि
** बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यावर भारताची पकड मजबूत
****
आता सविस्तर बातम्या
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, या अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली.
****
विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाचा ११६वा भाग आज प्रसारित झाला.
येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या असलेल्या युवा दिनाच्या निमित्तानं, दिल्लीत ११ आणि १२ जानेवारी रोजी भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमाअंतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू असून, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची वा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं.
****
महिलांवरील हिंसेच्या विरोधात केंद्र सरकार आजपासून अब कोई बहाना नहीं, या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करत आहे. या अभियानाअंतर्गत देशातले नागरीक, सरकारी यंत्रणा तसंच इतर घटकांना महिलांच्या विरोधात हिंसेला संपवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय, तसंच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या अभियानाअंतर्गत आज दिल्लीत होत असलेल्या कार्यक्रमात अब कोई बहाना नहीं, या विषयावर एक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
****
राज्यातील विधानसभा निवडणुकांची जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी काल राज्यपालांना ही अधिसूचना सुपूर्द केली.
****
दरम्यान, राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी काल आपापल्या विधीमंडळ पक्षांची स्वतंत्र बैठक घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली.
शिवसेनेच्या आमदारांचीही काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या सर्व निर्णयांचे एकाधिकार पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत असं ते म्हणाले.
**
दरम्यान, लाडक्या बहिणींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांचं औक्षण करुन, त्यांचं अभिनंदन केलं.
****
निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजप-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा असल्याचं, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात त्यांनी, जनतेने दाखवलेला विश्वास आणि आभार मानले. हे यश विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, त्या तुलनेत आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या सरकारच्या काळात झाली, त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याविरोधात जातील हे मनाला पटत नाही, लाडकी बहीण योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडला असं सांगितलं. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्याने, त्याची कारणमीमांसा करु, यावर अभ्यास करुन पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ, असं पवार म्हणाले.
****
झारखंडमध्ये नवीन सरकारचा शपथविधी येत्या २८ तारखेला होणार आहे. झारखंड मुक्ति मोर्चा - जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला, त्यानंतर राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्याचं सोरेन यांनी सांगितलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत ८१ पैकी ३४ जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळाला आहे. भाजपला २१, काँग्रेसला १६, राष्ट्रीय जनता दलाला चार, तर मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन जागांवर विजय मिळवता आला आहे.
****
[$C6C96025-1C31-49C9-90B1-C0DC4CBC2ACA$MID Break - HMD CSN - MID Break - HMD CSN - ]
****
गोव्यात सुरु असलेल्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीमध्ये काल क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टूमॉरो या स्पर्धेच्या निकालांची घोषणा करण्यात आली. टीम ग्रीननं तयार केलेल्या, गुल्लू या चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटातला अभिनेता, पुष्पेंद्र कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. लव्हफिक्स सबस्क्रिप्शन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी, विशाखा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. उदयोन्मुख दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धेत, १०० युवा कलाकारांची निवड करण्यात आली होती. त्यांना दिलेल्या विषयावर केवळ ४८ तासात लघुपट बनवायचा होता. १०० युवांना ५ चमूत विभागण्यात आलं होतं.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ५३४ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तीन बाद १२ धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी सात गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला आता ५२२ धावांची आवश्यकता आहे. जसप्रित बुमराहनं दोन, तर मोहम्मद सिराजनं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारताने काल दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालनं १६१, विराट कोहलीनं १००, तर के एल राहुलनं ७७ धावा केल्या.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला कालपासून आळंदीमध्ये सुरुवात झाली असून, राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल होत आहेत. आळंदी नगरपरिषद, देवस्थान, एमआयटी महाविद्यालय, वारकरी सेवा संघ आणि इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने वारी काळात शहर आणि इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं आहे. समाधी सोहळ्याच्या काल पहिल्याच दिवशी चाकण चौक ते प्रदक्षिणा मार्ग, शिवसृष्टी परिसर, माउली मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट या भागात पडलेला कचरा गोळा करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इंद्रायणी नदी घाटावर जनजागृतीपर पथनाट्य देखील सादर करण्यात आलं.
****
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त धाराशिव जिल्हा पर्यटन विकास समिती आणि पुरातत्व विभागाच्यावतीनं काल चामर लेणी इथं हेरीटेज वॉक घेण्यात आला. जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी यावेळी इतिहासप्रेमींना चामर लेणीची माहिती सांगितली. लेणीपासून जवळच असलेल्या जुणी गल्ली इथल्या पुरातन गढीचीही पाहणी यावेळी करण्यात आली.
**
छत्रपती संभाजीनगर इथं देखील जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभाग आणि इंटॅकच्या वतीने काल शहरातल्या सोनेरी महल परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला. पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालक जया वाहाणे यांनी यावेळी वारसा सप्ताहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी या परिसराच्या इतिहासाबद्दल आणि स्मारकांबद्दल, तर पुरातत्व समन्वयक डॉ. कामाजी डक यांनी प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात असलेल्या पुराणवस्तूंची सविस्तर माहिती दिली.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आजपासून सुरु होत आहे. मुंबई इथले विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सिने कलावंत किरण माने असतील. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात आज पशुगणनेला सुरुवात होत आहे. २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेअंतर्गत विविध प्रजाती, लिंग -वयनिहाय ही गणना केली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment