Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 31
May 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे
२०२५ दुपारी १.०० वा.
****
जनतेची सेवा करुन त्यांच्या जीवनात सुधारणा करणं म्हणजे
शासन असल्याचा विचार लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला.
त्यांच्या नितीमुल्यानुसार, सरकार चालवत असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी
जयंतीनिमित्त आज मध्य प्रदेश इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परिस्थिती
कितीही विरोधात असली तरीही संघर्ष केल्यास यश येतं हे अहिल्याबाईंनी शिकवलं. गरीब
आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं मोठं योगदान असून भारतीय वारश्याच्या त्या
खूप मोठ्या संरक्षक होत्या, असंही पंतप्रधान म्हणाले.
यावेळी देवी अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचं आणि
विशेष नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या
हस्ते करण्यात आलं.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी इथं आज त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम होत आहे.
यानिमित्त चौंडी इथं विविध विकास कामांचं उद्घघाटन करण्यात येईल.
****
जम्मू-काश्मीरमध्ये आज संध्याकाळी पाच वाजता व्यापक नागरिक
सुरक्षा मॉक ड्रील आयोजित करण्यात येणार आहे. आपत्कालीन इशाऱ्यांचं अनुकरण करत
जम्मू काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी यावेळी सायरन सक्रीय केले जातील. मॉक ड्रीलमध्ये
नियंत्रित हवाई हल्ल्यांदरम्यान सायरन सक्रीय करणं, नागरी
परिसरात ब्लॅकआऊट प्रोटॉकॉल आणि ड्रोन हल्ल्यांच्या स्थितीत सैनिकी छावणी जवळून
कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत उपाय योजना करणं
आदींचा यात समावेश आहे.
****
आज संध्याकाळी हैदराबाद इथं मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अंतीम
फेरीचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. या भव्य समारोहात चित्रतारकांचं कला प्रदर्शन, मानुषी छिल्लरच्या वतीनं विशेष सादरीकरण तसंच अभिनेता सोनू सूद याला देण्यात
येणारा मिस वर्ल्ड ह्यूमैनिटेरियन पुरस्कार हे आकर्षण असणार आहे. अमेरिका, कैरिबियाई,
आफ्रीका, यूरोप, आशिया तसंच ओशिनिया या खंडांमधल्या अनेक देशांच्या सौंदर्यवती या स्पर्धेत
सहभागी होत आहेत. स्पर्धेत भारताच्या नंदिनी गुप्तासह १६ सौंदर्यवतींनी शीर्ष ४०
अर्थात टॉप ४० मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. निर्णायक मंडळ अन्य २४
सौंदर्यवतींची निवड करतील. प्रत्येक खंडातून दोन जणींची निवड होईल आणि अंतिम फेरीत
केवळ चार सौंदर्यवतींना अंतिम प्रश्न विचारले जातील.
****
राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या पोर्टलवरुन दिल्या जाणाऱ्या
सर्व १ हजार २७ अधिसूचित ऑनलाईन सेवा येत्या १५ ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरुन
देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती महा आयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय
काटकर यांनी हिंगोली इथं आयोजित बैठकीत दिली.
हिंगोली जिल्ह्यात ४७३ सेवा केंद्र असून या सेवा केंद्रांवर
सेवांचे दर प्रदर्शित करणं, क्युआर कोडवर तक्रार दाखल
करता येणं आदी सुधारणा करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या सेवांची माहिती
लोकांना मिळावी म्हणून व्हॉटस्अपवरुन चॅटबॉट सुविधा नजीकच्या काळात उपलब्ध करुन
देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण-
म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ५३ अनिवासी भूखंडांची विक्री करण्यात येत
आहे. ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला
येत्या दोन जून रोजी सकाळी अकरा वाजेपासून प्रारंभ होईल. सात जुलैला सकाळी अकरा ते
सायंकाळी पाच वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी
ऑनलाईन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in
या संकेतस्थळावर होणार आहे. त्यानंतर आठ जुलैला सकाळी अकरा
वाजता mhada.gov.in
आणि www.eauction.mhada.gov.in
या म्हाडाच्या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित
निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
****
गोंदिया इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या
त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त दहावी आणि बारावीत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या
गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समाज कार्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा
सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातल्या आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय
पुराण आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या सविता पुराण यांच्या उपस्थितीत हा
सोहळा पार पडला.
****
लातूरमध्ये परवा दोन जून रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं
आयोजन करण्यात आलं आहे. तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी किंवा
तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या
तक्रारी किंवा अर्ज विहीत नमुन्यात, दोन प्रतींमध्ये संबंधित
तहसील कार्यालयात सादर करावेत, असं आवाहन जिल्हा
प्रशासनानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment