आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ ऑगस्ट २०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशात कोरोना विषाणुचे नवे
५४ हजार ७३५ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या सतरा लाख ५० हजार ७२३ झाली आहे. देशभरात
आतापर्यंत अकरा लाख ४५ हजार ६२९ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना
विषाणुचे शहात्तर नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता १४ हजार ४०३
झाली आहे.
****
औरंगाबादमधे कोरोना विषाणुच्या
आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार सहाशे एक असून सध्या तीन हजार तीनशे
चोवीस रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची
संख्या ४७८ झाली आहे.
****
परभणी शहरातल्या फळ,
भाजीपाला तसंच मांस विक्रेत्यांनी १५ ऑगस्टपर्यंत
कोरोना विषाणुची तात्काळ चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे. जे विक्रेते चाचणी करुन घेणार नाहीत, त्यांची दुकानं
बंद करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात सामाजिक
अंतर न पाळणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई
करण्यात येत आहे. काल ठिकठिकाणी २१२ नागरिकांकडून ४६ हजार ८०० रुपये
दंड वसूल करण्यात आला.
****
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे २०२ रुग्ण आढळले असून
रुग्ण संख्या चार हजार दोनशे बावन्न झाली आहे, तर दोन हजार चौऱ्याऐंशी रुग्ण या आजारातून
बरे झाले आहेत. सहा रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या
रुग्णांची एकूण संख्या १३६ झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या चांदोळा इथला
तलाठी उदयकुमार मिसाळे याला ३० हजार रुपये लाच घेताना काल अटक
करण्यात आली. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली शेतजमीन भावाच्या
आणि बहिणीच्या नावे करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
//************//
No comments:
Post a Comment