आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना
विषाणूचे नवे १२९ रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २० हजार ८५६ झाली
आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतल्या ६३ आणि ग्रामीण भागातल्या ६६
रुग्णांचा समावेश आहे.
****
अमरावती जिल्ह्यात आणखी १५५
जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार
५७७ झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ३३४ रुग्ण बरे झाले असून, ११२ रुग्णांचा या संसर्गामुळे
मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार १३१ जणांवर उपचार सुरु आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात काल ४२४
रुग्णांना कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानं, रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यतल्या
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं
जिल्ह्यातलं प्रमाण हे आता सुमारे ७९ टक्के
झालं आहे.
****
जायकवाडी धरणाची पाणी पातळी
आज ७८ पूर्णांक ८१ शतांश टक्के झाली आहे. धरणात सध्या १५ हजार २९९ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी दाखल होत आहे.
****
चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रीकरणास सुरुवात
करण्याबाबतची मानक नियमावली काल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी जारी केली. त्यानुसार कॅमेऱ्या समोरील व्यक्ती वगळता इतर सर्वांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक राहील. गृह
मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्याशी चर्चा करून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात
आली असल्याचं जावडेकर म्हणाले. या निर्णयामुळे
आता देशभर चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण सुरु होऊ
शकणार आहे.
****
भारतीय
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. जेटली
हे हुशार, बुद्धीवान, कुशल कायदेतज्ज्ञ आणि महान व्यक्ती होते, असं मोदी यांनी आपल्या
ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment