Saturday, 31 July 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 31.07.2021 रोजीचे- कोरोना वृत्त विशेष

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.07.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.07.2021 रोजीचा सायंकाळी 06.35 वाजेचा वृत्तविशेष कार्यक्रम प्रासंगिक

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** नवे रस्ते तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - मुख्यमंत्र्यांचं आवाहन

** ज्येष्ठ शेकाप नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

** टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅटमिंटनच्या उपांत्यफेरीत पी.व्ही. सिंधूचा पराभव; उद्या कांस्य पदकासाठी सामना

आणि

** औरंगाबाद इथं आज तीन कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

****

रस्ते दुरुस्त करताना तसंच नवे रस्ते तयार करताना अनेक पिढ्यांसाठी टिकतील अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नागपूर - नागभीड रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलांच्या भूमिपूजन सोहळ्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. या पुलाचं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. नव्या रेल्वेमार्गामुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना फक्त दोन तासांमध्ये कोळशाची सुलभ वाहतूक होणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समृद्धी महामार्गाला जालना इथून जोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं.

****

आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सोमवार पासून सुरु करण्यात येणार असल्याचं आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी तसंच सुरु झाल्यानंतर पाल्याला शाळेत आणि वसतिगृहात पाठवण्याआधी पालकांचं संमतीपत्र घेणं बंधनकारक राहणार आहे. तसंच शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक तयार करणे, भोजन वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचं पालन करणे याबाबतच्या सर्व सूचना आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.

****

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पार्थिव देहावर सांगोला इथं आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी देशमुख यांचं अंत्यदर्शन घेऊन, श्रद्धांजली अर्पण केली. देशमुख यांचं काल रात्री सोलापूर इथं खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला या एकाच मतदारसंघातून ते सर्वाधिक ११ वेळा विधानसभेवर निवडून आले होते. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

गणपतराव देशमुख यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी आमदार नरसय्या आडम यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणं आवश्यक असून त्यासाठी प्रत्येक गावातल्या पाणंद रस्त्याचे माती काम आणि मजबुतीकरण होणे गरजेचं असल्याचं मत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या कारतळा या गावातील पाणंद रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गावातील पाणंद रस्ते पक्के झाल्यास दळण-वळणाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्यास मदत होईल. योग्य नियोजन आणि आराखडा तयार करुन शासनाच्या वेगवेगळ्या योजना गावा-गावात राबवाव्यात, त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

****

नागरिकांनी शासकीय वैद्यकीय सुविधेकडे असलेल्या सेवा लक्षात घेवून शासकीय रुग्णालयांमध्येच उपचार घेण्याला प्राधान्य देण्याचं आवाहन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केलं. ते आज परभणी इथं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. जिल्हयातल्या आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं अल्पसंख्यांक विभागाकडून रुग्णालयासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती पालकमंत्री मलिक यांनी यावेळी दिली. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचं पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

****

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅटमिंटनच्या उपांत्यफेरीत पी.व्ही. सिंधूचा चिनी तैपेईच्या ताई झू यिंन हिने २१-१८, २१-१२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. उद्या सिंधूचा चीनच्या ही बिंग जियो हिच्यासोबत कांस्य पदकासाठी सामना होईल.

 

भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ४-३ अशी मात केली. वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्याच्या अपेक्षा कायम आहेत.

थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत कौर हिने ६४ मीटर थाळीफेक करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. थाळीफेक मध्येच सीमा पुनिया तिच्या गटात सहाव्या क्रमांकावर राहिली. या गटात कोणत्याही स्पर्धकाला पात्रतेसाठी आवश्यक असलेला ६४ मीटरचा टप्पा ओलांडता न आल्यानं अंतिम १२ मध्ये स्थान मिळवण्याच्या सीमाच्या आशा कायम आहेत.

****

ज्येष्ठ ॲथलीट मान कौर यांचं आज पंजाबमध्ये मोहाली इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, त्या १०५ वर्षांच्या होत्या. वयाच्या ९३ व्या वर्षापासून ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या मान कौर यांनी, त्यांचे पुत्र गुरुदेव यांच्या मार्गदर्शनात, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १७ हून अधिक सुवर्णपदकं पटकावली आहेत. २०१९ साली पोलंडमध्ये झालेल्या ॲथेलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक, भालाफेक तसंच ६० मीटर आणि २०० मीटरच्या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. गेल्या वर्षी त्यांना केंद्र सरकारचा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

****

औरंगाबाद इथं आज तीन कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्यांची संख्या तीन हजार ४९८ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत या संसर्गाने बाधित झालेल्या एक लाख ४७ हजार ३७२ रुग्णांपैकी एक लाख ४३ हजार ५८६ रुग्ण बरे झाले आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ४५६ झाली आहे. कोरोना विषाणूमुक्त झालेल्या सात रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार १८९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले १९८ रुग्ण आढळले. यामध्ये बीड तालुक्यात ६१, आष्टी तालुक्यात ४७, शिरूर २१, गेवराई १८, पाटोदा १६, अंबाजोगाई, वडवणी तसंच केज तालुक्यात प्रत्येकी ९, धारूर ६, तर माजलगाव तालुक्यात दोन रुग्ण आढळले. परळी तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाही.

****

जालना शहरातल्या कादराबाद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील निजामकालीन मूर्तीवेसचा काही भाग आज सकाळी कोसळला. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मंगळबाजारकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा, असं आवाहन नगरपालिका प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.

****

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आज शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कोविडसारख्या आव्हानात्मक काळात मुगळीकर यांनी दिलेलं योगदान हे लाख मोलाचं आहे या शब्दात पालकमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.

//********//

 

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक - 31.07.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.07.2021 सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

देशांतर्गत सुरक्षा राखण्यासाठी विकास आणि कल्याणकारी उपक्रम महत्वाची भुमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी इथं भारतीय पोलिस सेवेतल्या प्रशिक्षणार्थींसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. डिजिटल माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक पोलिसांपुढे मोठं आव्हान असून, तरुण पोलिस अधिकाऱ्यांनी ही फसवणूक रोखण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधावे, असं पंतप्रधान म्हणाले. तरुण आयपीएस अधिकाऱ्यांनी पोलिस दलातील सुधारणा आणि उत्तम आरोग्य राखण्यावर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. गेल्या ७५ वर्षात भारतानं उत्तम पोलिस सेवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पोलिस प्रशिक्षणाशी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वाढ झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.   

****

देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या ४६ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ४४ लाख ३८ हजारांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली.

****

कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या महिनाभरात देशातल्या दोन लाख २७ हजारांहून अधिक गर्भवतींना, लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, गर्भवतींचं नियमितपणे समुपदेशन करत त्यांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगितल्यानं हे यश मिळाल्याचं, मंत्रालयानं म्हटलं आहे. गर्भवतींच्या लसीकरणात तमिळनाडू आघाडीवर असून तीथे ७८ हजार ८३८ जणींना लस देण्यात आली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशात ३४ हजार, तर ओडिशामध्ये २९ हजार ८२१ गर्भवतींना लस मिळाली आहे.  

****

लसीकरण मोहिमेला वेग आणण्यासाठी भारतीय उद्योग परिषद - सी आय आयनं सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया या कंपनीबरोबर करार केला आहे. यानुसार आता देशातल्या छोट्या गावांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये, लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी, विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. रुग्णालये आणि उद्योगजगत यांच्यातला दुवा बनत ‘सीआयआय’ आणि सीरम या संस्था लसीकरण मोहिमेला वेग आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. या मोहिमेमुळे दुर्गम भागातल्या लोकांपर्यंत कमी कालावधीत पोहोचता येईल, असं सीरम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

****

देशात काल नव्या ४१ हजार ६४९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५९३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या तीन कोटी १६ लाख १३ हजार ९९३ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख २३ हजार ८१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३७ हजार २९१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी सात लाख ८१ हजार २६३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख आठ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यात ५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी संस्थांना, सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. सहकार विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ५० पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी, ऑनलाईन पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किसनराव किनवटकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. किनवटकर हे बळीराम पाटील महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी युवक काँग्रेसच्या विविध समित्यांवर जबाबदारी सांभाळली आहे. ते नांदेड जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष होते.

****

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा, यंदाचा जीवनगौरव पुरस्कार, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना जाहीर झाला आहे. एक्कावन्न हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

नांदेडहून हिमाचल प्रदेशातल्या अम्ब अन्दौरा इथं जाणारी विशेष साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी, मंगळवार तीन ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. कोविड-19 विषाणू संसर्गामुळे ही विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती.

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारतीय महिला हॉकी संघानं दक्षिण आफ्रिकेचा चार - तीन असा पराभव केला.

थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत कौर हिने ६४ मीटर थाळीफेक करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. थाळीफेक मध्येच सीमा पुनिया तिच्या गटात सहाव्या क्रमांकावर राहीली. या गटात कोणत्याही स्पर्धकाला पात्रतेसाठी आवश्यक असलेला ६४ मीटरचा टप्पा ओलांडता न आल्यानं अंतिम १२ मध्ये स्थान मिळवण्याच्या सीमाच्या आशा कायम आहेत.

मुष्टीयुद्ध प्रकारात पुरुषांच्या ४८ ते ५२ किलो वजनी गटात अमित पंघालचा कोलंबियाच्या युबेरजन मार्टीनेज कडून चार - एक असा पराभव झाला. तीरंदाजीत अतनु दासचा पराभव झाला.

****

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारतीय महिला हॉकी संघानं दक्षिण आफ्रिकेचा चार - तीन असा पराभव केला.

थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत कौर हिने ६४ मीटर थाळीफेक करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. थाळीफेक मध्येच सीमा पुनिया तिच्या गटात सहाव्या क्रमांकावर राहीली. या गटात कोणत्याही स्पर्धकाला पात्रतेसाठी आवश्यक असलेला ६४ मीटरचा टप्पा ओलांडता न आल्यानं अंतिम १२ मध्ये स्थान मिळवण्याच्या सीमाच्या आशा कायम आहेत.

मुष्टीयुद्ध प्रकारात पुरुषांच्या ४८ ते ५२ किलो वजनी गटात अमित पंघालचा कोलंबियाच्या युबेरजन मार्टीनेज कडून चार - एक असा पराभव झाला.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. दाचीगाम वनक्षेत्रात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक झाली.

****

आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान वाहतूकीवर असलेली स्थगिती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय विमान वाहतूक महासंचालकांनी घेतला आहे. त्याबाबतचं पत्रक काल जारी करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय मालवाहतुक आणि विशेष परवानगी असलेल्या विमान उड्डाणांवर मात्र बंधन नसेल, असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

जालना पंचायत समितीतला अभियंता आणि त्याच्या साथीदाराला काल लाच देताना अटक करण्यात आली. जालना तालुक्यातल्या काकडा इथं खासदार निधीतून झालेल्या कामांचा चार लाख ७३ हजार रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाला होता. हा धनादेश संबंधित कंत्राटदारास देण्याकरता कनिष्ठ अभियंता देविदास पाटील आणि त्याच्या साथीदारानं संबंधित सरपंचाला १५ हजार रुपये लाच देऊ केली होती, मात्र सरपंचांना ही लाच घ्यायची नसल्यानं त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प भरण्यासाठी अद्याप जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे, धरणात चार हजार १९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. धरणाची पाणी पातळी सध्या ३७ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाली आहे.

****

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ جولائی 2021 وَقت : صبح 0...

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ جولائی 2021 وَقت : صبح 09.00 سے09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 31 July 2021

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:   ۳۱ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍  جولائی  ۲۰۲۱ئ؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


سامعین ملک میں18؍سال سے زیادہ عمر کے شہر یان کو  کووِڈ 19؍سے بچائو کے ٹیکے مفت دیے جا رہے ہیں ۔ آپ سے در خواست ہے کہ ویکسین ضرور لیں  اور  اپنوں کو بھی ٹیکہ لینے کی حوصلہ افزائی کریں ۔ چونکہ کورونا وائرس کا خطرہ ابھی ٹلا نہیں ہے اِسی لیے احتیاط برتنا ضروری ہے  نہایت ضروری کام کے لیے ہی گھر سے با ہر جا ئیں ۔محفوظ رہنے کے لیے ماسک کا استعمال کریں  اور  سوشل ڈسٹنسنگ کا خیال رکھیں ۔ اپنے ہاتھ اور چہرہ صاف رکھیں  اور  محتاط رہیں۔


اب خاص خبروں کی سر خیاں...

٭ پارلیمنٹ کے مانسون اجلاس کا 9؍ واںدِن بھی ہنگامہ آرائی کی نذر ‘  کام کاج نہیں ہو سکا

٭ CBSE   کے بارہویں جماعت کے نتائج ظاہر ‘  99؍ عشاریہ  تین  سات  فیصد طلباء کامیاب 

٭ آفات سے متاثر ہونے والوں کی باز آباد کاری کے لیے سخت فیصلے کرنا ہوں گے  ‘  وزیر اعلیٰ کا اشارہ  

٭ ریاست میں کَل مزید6؍ ہزار600؍ افراد کووِڈ19 ؍ سے متاثر  ‘  مراٹھواڑے میں 10؍ مریضوں کی موت  جبکہ  مزید 337؍ مریض پائے گئے 

اور

٭ ٹو کیو اولمپِک مقابلوں میں  بیڈ مِنٹن کھلاڑی  پی  وی  سِندھو  اور  مُکے باز  لَو لینا بور گو ہین سیمی فائنل میں داخل  


 

  اب خبریں تفصیل سے....

پارلیمنٹ کے جاری مانسون اجلاس میں کَل 9؍ ویں دِن بھی کوئی خاص کام کاج نہیں ہو سکا ۔ زرعی قوانین کی مذمت  اور  مبینہ Pegasus   جاسوسی معاملہ سمیت دیگر معا ملات پر حزب اختلاف نے ایوان میں خوب ہنگا مہ آرائی کی ۔  ہنگامہ آرئی کی وجہ سے ایوانِ زیریں  اور  ایوانِ بالا میں دوپہر تک کئی مرتبہ کام کاج  روکا گیا  اور  آخر کار دو نوں ایوانوں کی کار وائی پیر کے روز تک ملتوی کر دی گئی۔

لوک سبھا میں کام کاج شروع ہو تے ہی کانگریس پارٹی  ‘  ترنمول کانگریس ‘ درمُک  اور  دیگر حزب اختلاف جماعتوںکے اراکین نے نعرے بازی شروع کر دی ۔کانگریس پارٹی کے رہنما ادِھر رنجن چودھری نے حکو مت پر سر کشی کا الزام لگا تے ہوئے کہا کہ حکو مت بات چیت کرنے سے گریز کر رہی ہے ۔  اِس موقعے پر انھوں نے حکو مت سے حزب اختلاف کے مطلوبہ معاملات پر بات چیت کرنے کا مطالبہ کیا ۔ اِسی دوران شور وغل میں اضافہ ہونے کی وجہ سے اسپیکر نے لوک سبھا کی کار وائی دوپہر 12؍ بجے تک روک دی تھی۔ بعد میں کام کاج دوبارہ شروع ہونے پربھی ہنگامہ آرائی جاری تھی ۔اِسی شور و غل میں جنرل اِنشورنس ورکِنگ بِل ایوان میں پیش کیا گیا ۔ اسپیکر اوم بِر لا کی جانب سے سوال جواب کے وقفے کا آغاز کیے جانے پر ہنگامے کے دوران ہی کچھ سوا لات پر بحث کی گئی ۔ آخر میں حزب اختلاف کی ہنگا مہ آرائی کی وجہ سے اسپیکر نے ایوانِ زیریں کی کار وائی پیر کے روز تک ملتوی کر دی ۔

دوسری جانب راجیہ سبھا میںبھی کام کاج شروع ہوتے ہی حزب اختلاف نے ہنگامہ بر پر کر دیا تھا۔ اِسی دوران ایون کے چیئر مین  وینکیا نائیڈو نے وقفۂ  صفر شروع کرنے کی کوشش کی  تا ہم  شور و غل میں اضا فہ ہونے کی وجہ سے ایوان کی کار وائی پہلے دو پہر 12؍ بجے تک  اور  بعد میں  دو پہر  ڈھائی بجے تک روک دی گئی تھی۔ اِسی دوران وزیر مملکت برائے خزا نہ  بھاگوت کراڈ نے  ڈِپازٹ انشورنس  اینڈ کریڈٹ گیرنٹی تر میمی بل   اِسی طرح   مملکتی وزیر اِندرجیت سنگھ نے  Limited Liability Partnership Amendment Bill  ایوان کے سامنے پیش کیا ۔  اِس کار وائی کے پس منظر میں جاری ہنگامہ آرئی کو مد نظر رکھتے ہوئے  ڈپٹی چیئر مین نے راجیہ سبھا کی کار وائی  پیر کے روز تک ملتوی کر دی ۔

***** ***** ***** 

مرکزی ثانوی تعلیمی بورڈ  CBSE   کی جانب سے کَل بارہویں جماعت کے نتائج ظاہر کیے گئے  ۔ اِس امتحان میں  99؍ عشا ریہ  تین  سات  فیصد طلباء کامیاب ہوئے ہیں ۔ اِس میں لڑ کیوں کی کامیابی کا تنا سب 99؍ عشاریہ  چھ  سات فیصد ہے  اور  لڑ کوں کی کامیابی کا تنا سب  99؍ عشا ریہ  ایک  تین  فیصد ہے۔ کیندریہ وِدیا لیہ کا نتیجہ صد فیصد رہا  جبکہ  جواہر  ن  و  دئے  وِدیا لیہ کا نتیجہ 99؍ عشاریہ  نو  چار فیصدرہا ۔ خیال رہے کہ اِس سال کووِڈ 19؍ کے پھیلائو  کی وجہ سے روایتی طریقے سے امتحان نہ لیتے ہوئے

  Alternative Assessment    کی بنیاد پر نتائج ظاہر کیے گئے ہیں ۔ 

ریاستی ثانوی  اور  اعلیٰ ثانوی تعلیمی بورڈ کے بارہویں جماعت کے نتائج آج ظاہر کیے جا سکتے ہے ۔

***** ***** ***** 

وزیر اعلیٰ اُدھو ٹھاکرے نے کہا ہے کہ سیلاب سے متاثرہ علاقے  اور  وہ علاقے جہاں چٹا نیں کھسکنے کا خطرہ ہو   اُن علاقوں کو دوبارہ آباد کرنا حکو مت کی ترجیحات میں شامل ہیں  اور  اِسے یقینی بنا نے کے لیے سخت فیصلے کرنا ہوں گے ۔ وہ کَل کو لہا پور میں سیلاب سے متاثرہ علاقے کا دورہ کرنے کے بعد اظہار خیال کر رہے تھے ۔ اِس موقعے پر وزیر اعلیٰ نے کہا کہ پتھریلے  اور  خستہ حال راستوں کو مد نظر رکھتے ہوئے ارضیات کامطالعہ کر کے منا سب اقدامات کیے جا ئیں گے ۔وزیر اعلیٰ نے بتا یا کہ  انھوں نے ندی کنا روںسے تجا وزات ہٹا نے اور  تعمیراتی کام کی اجازت نہ دینے کی ہدایت دی ہے ۔


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


وزیر اعظم نریندر مودی نے اُن کی یوم ِ آزادی کی تقریر کے لیے عوام سے اپنے خیا لات طلب کیے ہیں ۔ انھوں نے عوام سے  mygov  پورٹل پر اپنے خیالات درج کر وانے کی اپیل کی ہے۔

***** ***** ***** 

شیتکری کامگار پکش کے بزرگ رہنما  اور  سانگولا کے سابق رکن اسمبلی گنپت رائو دیشمکھ کا کَل انتقال ہو گیا ۔  وہ 94؍ برس کے تھے ۔ وہ شولا پور ضلعے کے سانگولاحلقہ ٔ انتخابات سے 11؍ مر تبہ رکن اسمبلی منتخب ہوئے تھے ۔ اُن کی آخری رسومات آج سانگولا میں اداکی جائے گی ۔ 

***** ***** ***** 

ریاست میں گزشتہ روز مزید6؍ ہزار600؍ افراد کورونا وائرس سے متاثر پائے گئے ۔ اِس اضا فے کے بعد ریاست میں اب تک پائے گئے کووِڈ19؍ متاثرین کی تعداد بڑھ کر62؍ لاکھ 96؍ ہزار756؍ ہو چکی ہے۔

اِسی دوران کَل231؍ مریض علاج کے دوران انتقال کر گئے ۔ ریاست میںکووِڈ19 ؍ کے سبب اب تک ایک لاکھ 32؍ ہزار566؍ اموات ہو چکی ہے۔

دوسری جانب علاج معالجے کے بعد کَل  7؍ ہزار  431؍ متاثرین کورونا وائرس سے نجات پا کر شفا یاب ہو گئے ۔ اِس طرح ریاست میں اب تک 60؍ لاکھ 83؍ ہزار319 ؍ متاثرین علاج کے بعد صحت یاب ہو چکے ہیں۔فی الحال ریاست بھر میں 77؍ ہزار494؍  مریض زیر علاج ہیں ۔

***** ***** ***** 

مراٹھواڑے میں کَل 337؍ افراد کورونا وائرس کی زد میں آ گئے۔ جبکہ 10؍ مریض علاج کے دوران چل بسے ۔ وفات پانے والوں میں اورنگ آ باد ضلعے کے  5؍ بیڑ ضلعے کے 4 ؍  اور  پر بھنی ضلعے کے ایک مریض کا شمار ہے ۔

دوسری جانب بیڑ ضلعے میں کَل مزید 180؍ کورونا مریض پائے گئے ۔ اِسی طرح عثمان آباد میں72؍ لاتور میں41؍ اورنگ آباد میں28 ؍ جالنہ میں9؍ ہنگولی میں3؍  پر بھنی  ا ور  ناندیڑ ضلعے میں فی کس 2 - 2 ؍ مریض پائے گئے۔

***** ***** ***** 

بیڑ ضلعے میں کووِڈ19؍ متاثرین کے اضافے پر قابو پانے کے مقصد سے  نگراں  وزیر  دھننجئے منڈے نے  آشٹی  ‘  پاٹو دا  اور  شِرور تعلقے میں سخت پا بندیاںلگانے کا حکم دیا ہے ۔ وہ کَل بیڑ ضلع کلکٹردفتر میں منعقدہ اجلاس میں بول رہے تھے ۔ اِس موقعے پر انھوں نے کہا کہ اِن تعلقوں کی سر حدوں میں داخل ہونے والے شہر یان کی کورونا وائرس کی جانچ کرنے کے بعد ہی داخلے کی اجازت دی جا ئے ۔

***** ***** ***** 

ٹو کیو اولمپِک مقابلوں میں بھارت کی بیڈمِنٹن کھلاڑی  پی  وی  سِندھو سیمی فائنل میں پہنچ چکی ہیں ۔ کَل کھیلے گئے کوارٹر فائنل مقابلے میں سندھو نے  جا پان کی کھلاڑی  یا ما گوچی کو 13 - 21 ؍   اور  20 - 22 ؍ کے سیٹ سے شکست دی ۔ 

مُکے بازی میں لَو لینا بورگو ہین بھی سیمی فائنل میں داخل ہو چکی ہے ۔ کَل کھیلے گئے مقابلے میں لَو لینا نے  چینی کھلاڑی کو 1 - 4 ؍ سے شکست دے کر شاندار جیت حاصل کی ۔ 

***** ***** ***** 

ناندیڑسے ہماچل پر دیش کے امبا  اندورا  جانے والی خصو صی ہفتہ واری ٹرین منگل یعنی 3؍ اگست سے دوبارہ شروع کی جا رہی ہے ۔ خیال رہے کہ کووڈ19 ؍ کے پھیلائو کے سبب یہ گاڑی عارضی طور پر روک دی گئی تھی۔

***** ***** ***** 

پر بھنی کے نگراں وزیر نواب ملک نے کہا ہے کہ مقامی خود مختار اِداروں اور  حکو مت کی جانب سے دی جانے والی سہو لیات کا مناسب استعمال کیا جا نا چا ہیے۔ وہ  کَل جنتور نگر پریشد کی جانب سے تعمیر کیے گئے کثیر مقصدی ہال کا افتتاح کرنے کے بعد اظہار خیال کر رہے تھے ۔اِس موقعے پر انھوں نے کہا کہ اِداروں کی عمارتیں سال میں صرف کچھ دن استعمال کرنے کی بجائے نو جوانوں کی تر بیت کے لیے بھی استعمال کی جا نی چاہیے۔

***** ***** ***** 


آخر میںخاص خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے ...


٭ پارلیمنٹ کے مانسون اجلاس کا 9؍ واںدِن بھی ہنگامہ آرائی کی نذر ‘  کام کاج نہیں ہو سکا

٭ CBSE   کے بارہویں جماعت کے نتائج ظاہر ‘  99؍ عشاریہ  تین  سات  فیصد طلباء کامیاب 

٭ آفات سے متاثر ہونے والوں کی باز آباد کاری کے لیے سخت فیصلے کرنا ہوں گے  ‘  وزیر اعلیٰ کا اشارہ  

٭ ریاست میں کَل مزید6؍ ہزار600؍ افراد کووِڈ19 ؍ سے متاثر  ‘  مراٹھواڑے میں 10؍ مریضوں کی موت  جبکہ  مزید 337؍ مریض پائے گئے 

اور

٭ ٹو کیو اولمپِک مقابلوں میں  بیڈ مِنٹن کھلاڑی  پی  وی  سِندھو  اور  مُکے باز  لَو لینابور گو ہین سیمی فائنل میں داخل


علاقائی خبریں ختم ہوئیں۔

آپ یہ خبریں ہمارے یو ٹیوب چینل آکاشوانی سما چار اورنگ آباد  Aurangabad AIR News  پردوبارہ کسی بھی وقت سن سکتے ہیں۔

٭٭٭٭٭
















आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे राष्ट्री...

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2021

Time 7.10AM to 7.20AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा नववा दिवसही विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित.

·      सीबीएसई चा बारावीचा निकाल जाहीर; ९९ पूर्णांक ३७ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.

·      आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार - मुख्यमंत्र्यांचे संकेत.

·      शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन.

·      राज्यात सहा हजार ६०० नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल दहा जणांचा मृत्यू तर नव्या ३३७ बाधितांची नोंद.

·      बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यात कडक निर्बंध लावण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

आणि

·      टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन उपांत्य फेरीत दाखल.

****

कृषी कायद्यांना विरोध तसंच कथित पेगासस हेरगिरीसह अन्य विविध मुद्यांवरून, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा नववा दिवसही, विशेष कामकाज न होता गोंधळाचाच ठरला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यानं, लोकसभा तसंच राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत वारंवार स्थगित झाल्यानंतर अखेर सोमवारपर्यंत तहकूब झालं.

लोकसभेत कामकाज सुरू होताच, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर अडमुठेपणाचा आरोप करत, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका केली. विरोधी पक्ष मागणी करत असलेल्या मुद्यांवर सरकारने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. या गदारोळातच सामान्य विमा कामकाज विधेयक सदनासमोर सादर करण्यात आलं. प्रश्नोत्तराच्या तासात काही प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं, अध्यक्षांना कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करावं लागलं.

राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. या गदारोळातच नारळ विकास मंडळ विधेयक राज्यसभेनं चर्चेविना मंजूर केलं. अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी, ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा विधेयक, तर राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी, मर्यादित जबाबदारी भागीदारी सुधारणा विधेयक सदनासमोर सादर केलं. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, वारंवारच्या तहकुबीनंतर उपसभापतींनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई चा बारावीचा निकाल काल जाहीर झाला. यात ९९ पूर्णांक ३७ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९९ पूर्णांक ६७ शतांश टक्के, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण, ९९ पूर्णांक १३ शतांश टक्के इतकं आहे. केंद्रीय विद्यालयाचा निकाल १०० टक्के, तर जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल, ९९ पुर्णांक ९४ शतांश टक्के इतका लागला आहे. यंदा कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता, वैकल्पिक मूल्यांकनाच्या आधारावर हा निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

****

पूरबाधित क्षेत्र तसंच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचं पुनर्वसन करण्यावर सरकारचा भर असून, हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. दरडी तसंच खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून, त्याबाबत उपाययोजना केल्या जातील तसंच नदीपात्रातली अतिक्रमणं हटवण्याच्या आणि बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती तसंच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे, रस्त्यांचं सुमारे एक हजार ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. सर्वाधिक नुकसान एकट्या कोकण विभागात झालं असून, त्याखालोखाल पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागात नुकसान झालं आहे. २९० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, ४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती, तर लहानमोठे १४० पूल पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता, चव्हाण यांनी वर्तवली.

****

पूरग्रस्त भागात विज बिलास स्थगिती देण्यात आली असून, या भागात वीज बिलाची वसुली करू नका असे स्पष्ट आदेश दिले असल्याची माहिती, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. सांगली जिल्ह्यात पुरामुळे वीज पारेषण आणि वितरण कंपनीच्या नुकसानीची पाहणी राऊत यांनी केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वीज बिल माफ करण्याचा अधिकार आपल्याला नाही, त्याबाबत मंत्रिमंडळात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, पूरग्रस्त भागात वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत उपकेंद्र, वीज वाहिन्या आणि रोहित्र यांचे अंदाजे ३४ कोटी ६८ लाख रूपये इतकं नुकसान झाल्याची माहिती, राऊत यांनी दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांकडून आपले विचार आणि मतं मागवली आहेत. नागरिकांनी माय जीओव्ही पोर्टलवर आपले विचार पाठवावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला या एकाच मतदारसंघातून ते सर्वाधिक ११ वेळा विधानसभेवर निवडून आले होते. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सांगोला इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी आमदार नरसय्या आडम यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

प्रसिद्ध लेखिका आणि प्रख्यात मराठी शिक्षिका सुषमा अभ्यंकर यांचं काल नाशिक इथं वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९५ वर्षांच्या होत्या. ‘सदाफुली’ या बालनाट्य संस्थेची स्थापना करून त्यांनी अनेक बालनाट्यं रंगभूमीवर आणली. या संस्थेसाठी लिहिलेल्या बालनाट्याच्या दोन संहितांना, राज्य शासनाचे उत्कृष्ट वांङमय निर्मितीचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. काल नाशिक इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

राज्यात काल सहा हजार ६०० नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ९६ हजार ७५६ झाली आहे. काल २३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३२ हजार ५६६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल सात हजार ४३१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६० लाख ८३ हजार ३१९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ६१ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७७ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३३७ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, बीड जिल्ह्यातल्या चार, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८० रुग्ण आढळले. उस्मानाबाद ७२, लातूर ४१, औरंगाबाद २८, जालना नऊ, हिंगोली तीन, तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले.

****

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यात कडक निर्बंध लावावेत असे आदेश, पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या तालुक्यांचा थेट नगर जिल्ह्याशी संबंध येत असल्यामुळे, तालुक्यांच्या सीमेवरच नागरिकांची कोरोना विषाणू चाचणी करूनच प्रवेश देण्याची सूचना करण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आता बीड जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने अँन्टीजेन टेस्ट जाणाऱ्या येणाऱ्यांची निश्चित केल्यानंतर नक्कीच संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी होईल. तिसरी लाट आलीच तर बीड जिल्हा सर्व व्यवस्थेनं सुसज्ज आहे. ओटू बेड पासून, नॉन कोविड बेड पासून, ओटू बेड, नॉन ओटू बेडपासून, व्हेंटीलेटरपासून सर्व यंत्रणा बीड जिल्ह्याच्या आज तयार आहेत.

****

कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा अभ्यास करून, आवश्यक उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करावी, असं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल आढावा बैठकीत बोलत होते. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात बालकांसाठी ६३१ खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, यामध्ये ४५ व्हेंटिलेटरयुक्त रुग्णखाटांचा समावेश असल्याचं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं.

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिला सिंधूनं २१-१३, २२-२० असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केलं. 

मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात तिने चीनी तैपेईच्या चेन निन चेन हिचा चार - एक असा पराभव केला.

भारतीय महिला हॉकी संघानं उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं आयर्लंडचा एक - शून्य असा पराभव केला. आज भारतीय महिला संघाचा शेवटचा गट सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 

भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानला शेवटच्या गट सामन्यात पाच-तीन ने पराभूत केलं. पुरुष संघाने याआधीच उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे.

 

थाळीफेक स्पर्धेत सीमा पुनिया सहाव्या क्रमांकावर राहिली. तीरंदाजीत दीपीका कुमारीला उपान्त्य फेरीत दक्षिण कोरियाच्या आन सान कडून शून्य - सहा असा पराभव पत्करावा लागला.

नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकेर आणि राही सरनोबत अंतिम फेरीत स्थान मिळवू शकल्या नाही. मनु १५व्या, तर राही ३५व्या स्थानावर राहिली.

ॲथलेटिक्स मध्ये महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतची द्युती चंद सातव्या स्थानावर राहिली. पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत एम पी जबीर देखील सातव्या स्थानावर राहीला.

नेमबाजीत आज महिलांच्या ५० मीटर रायफल प्रकारात पात्रता फेरीत तेजस्वीनी सावंत आणि अंजूम मौदगील खेळणार आहेत. तर मुष्टीयुद्ध प्रकारात अमित पंघाल आणि पूजा राणी यांचे सामने होणार आहेत.

****

अहमदनगर जिल्ह्यात बनावट दूध तयार करणारं रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. जामखेड तालुक्यात खर्डा तसंच नागोबाची वाडी इथं थेट कारवाई करून, दूध तयार करण्याचे अड्डे उध्वस्त करण्यात आले. दुध संकलन केंद्रातलं सुमारे दोन हजार ११८ लीटर बनावट दूध नष्ट करण्यात आलं असून, दूध तयार पावडर, रसायनं तसंच अन्य साहित्यं, असं सुमारे दोन लाख रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध विभागानं ही कारवाई केली.

****

स्थानिक स्वराज्य संस्था तसंच शासनाच्या सुविधांचा अधिकाधिक कुशलतेने वापरावर भर दिला पाहिजे, असं परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. जिंतूर नगर परिषदेनं उभारलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचं उद्घाटन मलिक यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संस्थांच्या मोठ्या वास्तू वर्षातून फक्त काही दिवसापुरत्याच वापरण्याऐवजी, युवकांच्या गरजेनुरुप प्रशिक्षणासाठी उपयोगात आल्या पाहिजेत, असं मलिक म्हणाले. दरम्यान, जिंतूर तालुक्यात देवगाव फाटा इथल्या नुकसानग्रस्त शेतकरी रमेश तांबे यांच्या शेतातील पीक नुकसानीची, पालकमंत्री मलिक यांनी काल पाहणी केली. इतर भागात झालेल्या पीक नुकसानीची त्यांनी माहिती घेतली.

****

जालना इथं शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीनं काल जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कामगारांना प्रतिमाह ११ हजार रुपये मानधन देऊन सेवत कायम करावं, सेंट्रल किचन पध्दत रद्द करावी, यासह अन्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात, पोषण आहार कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. शिक्षणाधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून मागण्यांचं निवेदन स्वीकारलं.

****

उमेद स्वयंसहाय्यता समुहांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी आर्थिक आणि बौद्धिक मदत करावी, असं आवाहन, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं. ते काल जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना उपजीविकेच्या वेगवेगळ्या संधी शोधुन उत्पन्नवाढीसाठी मदत करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बा...

Friday, 30 July 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.07.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 30.07.2021 रोजीचे- कोरोना वृत्त विशेष

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.07.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा नववा दिवसही बाधित

** सीबीएसई चा बारावीचा निकाल जाहीर

** पूरबाधित तसंच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांच्या पुनर्वसनावर सरकारचा भर - मुख्यमंत्री

** बीड जिल्ह्यात कोविड रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यात कडक निर्बंधांचे आदेश

आणि

** टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश

****

कृषी कायद्यांना विरोध तसंच कथित पेगासस हेरगिरीसह अन्य विविध मुद्यांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा नववा दिवसही विशेष कामकाज न होता गोंधळाचाच ठरला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यानं, लोकसभा तसंच राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत वारंवार स्थगित झाल्यानंतर अखेर सोमवारपर्यंत तहकूब झालं.

लोकसभेत कामकाज सुरू होताच, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, दम्रुक आणि अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर अडमुठेपणाचा आरोप करत, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका केली.

राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. सभापती व्यंकय्या नायडू यांनी शून्यकाळ चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळ वाढल्यानं, सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. या गदारोळातच नारळ विकास मंडळ विधेयक राज्यसभेनं चर्चेविना मंजूर केलं. अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा विधेयक तर राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी मर्यादित जबाबदारी भागिदारी सुधारणा विधेयक सदनासमोर सादर केलं. या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्यानं, उपसभापतींनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई चा बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. मंडळाच्या सीबीएसई रिजल्ट डॉट एनआयसी डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सीबीएसई डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. यंदा कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता, वैकल्पिक मूल्यांकनाच्या आधारावा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

पूरबाधित क्षेत्र तसंच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचं पुनर्वसन करण्यावर सरकारचा भर असून, हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथं पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. नृसिंहवाडी इथं पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला, कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमतानं ठराव मंजूर करावा, असं त्यांनी सांगितलं. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून त्याबाबत उपाययोजना केल्या जातील. तसंच नदीपात्रातली अतिक्रमणं हटवण्याच्या आणि बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनाची परिस्थिती आणि महापूर यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

****

गडचिरोली इथं आज दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. विनोद उर्फ मनिराम नरसू बोगा आणि कविता उर्फ सत्तो हरिसिंग कोवाची अशी या दोघांची नावं असून, त्यांच्यावर एकूण  आठ लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

                                   ****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांकडून आपले विचार आणि मतं मागवली आहेत. नागरीकांनी माय जीओव्ही पोर्टलवर आपले विचार पाठवावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यात कडक निर्बंध लावावेत असे आदेश पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या तालुक्यांचा थेट नगर जिल्ह्याशी संबंध येत असल्यामुळे, तालुक्यांच्या सीमेवरच नागरिकांची कोरोना विषाणू चाचणी करूनच प्रवेश देण्याची सूचना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आता बीड जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने अँन्टीजेन टेस्ट जाणाऱ्या येणाऱ्यांची निश्चित केल्यानंतर नक्कीच संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी होईल. तिसरी लाट आलीच तर बीड जिल्हा सर्व व्यवस्थेनं सुसज्ज आहे. ओटू बेड पासून, नॉन कोविड बेड पासून, ओटू बेड, नॉन ओटू बेडपासून, व्हेंटीलेटरपासून सर्व यंत्रणा बीड जिल्ह्याच्या आज तयार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन कोविड बाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोविड संसर्गानं तीन हजार ४९१ रुग्ण दगावले आहेत.जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ३४४ झाली असून एक लाख ४३ हजार ५५० रुग्णांनी कोविडवर मात केली आहे.

दरम्यान, कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत केल्या. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बालकांसाठी ६३१ खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून यामध्ये ४५ व्हेंटीलेटरयुक्त रुग्णखाटांचा समावेश असल्याचं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. 

****

उमेद स्वयंसहाय्यता समुहांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी आर्थिक आणि बौद्धिक मदत करावी असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं. ते आज जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना उपजीविकेच्या वेगवेगळ्या संधी शोधुन उत्पन्नवाढीसाठी मदत करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात जपानच्या यामागुची हिला सिंधूनं २१-१३, २२-२० असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केलं. 

भारतीय महिला हॉकी संघानं उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात भारतीय संघानं आयर्लंडचा एक - शून्य असा पराभव केला. पुरुष हॉकी संघाचा आज जपान विरुद्ध सामना होणार आहे. 

तीरंदाजीत दीपीका कुमारीला उपान्त्य फेरीत दक्षिण कोरियाच्या आन सान कडून शून्य - सहा असा पराभव पत्करावा लागला.

भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात तीने चीनी तैपेईच्या चेन निन चेन हिचा चार - एक असा पराभव केला.

नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकेर आणि राही सरनोबत अंतिम फेरीत स्थान मिळवू शकल्या नाही. मनु १५व्या, तर राही ३५व्या स्थानावर राहीली.

ॲथलेटिक्स मध्ये महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताची द्युती चंद सातव्या स्थानावर राहीली. पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत एम पी जबीर देखील सातव्या स्थानावर राहीला. तीन हजार मिटर स्टिपलचेस मध्ये भारताच्या अविनाश साबळेनं नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सातवं स्थान मिळवलं, मात्र अविनाश ला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आलं.

****

जालना जिल्हा परिषद कार्यालयावर आज शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कामगारांना प्रतिमाह ११ हजार रुपये मानधन देऊन सेवत कायम करावं, सेंट्रल किचन पध्दत रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात पोषण आहार कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. शिक्षणाधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून मागण्यांचं निवेदन स्वीकारलं.

****

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात देवगाव फाटा इथल्या नुकसानग्रस्त शेतकरी रमेश तांबे यांच्या शेतातील पीक नुकसानीची पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज पाहणी केली. इतर भागात झालेल्या पीक नुकसानीची त्यांनी माहिती घेतली.

//********//